प्रेम दिन विशेष

आता प्रेम तर रोजच करा हो त्याला मुहूर्त कशाला 🙂 पण आपला एक ट्रेंड म्हणून जगभर हा वॅलिंटाइन्स डे सेलेब्रेट केला जातो १४ फेब्रुवारीला. आता महेन्द्रजीनी एवढ्या रोमॅंटीक आयडीयाज..दिल्या आहेतच एकूण एक अफलातून. आता मी काही जास्त भारी आयडीयाज देत नाही फक्ता माझ्या सुपीक डोक्याच्या कल्पना आणि काही अनुभवावरून (माझ्या नाही हां :))..

तुम्ही पण तुमच्या प्रेम दिन साजरा करायच्या आयडीयाज द्या प्रतिक्रियेमधून काय माहीत कोणाला उपयोगी पडेल एखादी 🙂

१. सगळ्यात बेस्ट, प्रभावी, कधीही न विसरता येणार असा सेलेब्रेशन – लग्न 🙂
खूप जण हा मुहूर्त धरायचा प्रयत्‍न करतात…माझ्या ऑफीसच्या मित्राने त्याच अरेंज मॅरेज मागल्या वर्षी ह्याच दिवशी ठरवून केला,  आश्चर्य म्हणजे ती दोघे पहिल्यांदा ३१ जानेवारीला भेटले होते…
२. शादी ना सही एंगेज्मेंट तरी..
३. सकाळी सकाळी छानसा लाल गुलाबांचा बुके आणि स्वीट स्माइल प्रेज़ेंट करा..
४. प्राइवसी असेल तर मस्त घरीच सुट्टी टाकून जेवण बनवायचा प्लान एकत्र आणि भरवायचा सुद्धा हां…
५. सरळ ऑफीसला बंक मारुन कुठे तरी लांब शांत ठिकाणी जाता येऊ शकत…
६. ऑफीस बंक नसेल मारता येत तर ऑफीसमध्येच तीला / त्याला प्रपोज करा सगळ्यांसमोर.. (बाबानो नीड गट्स फॉर धिस)
७. दोघे वेगवेगळ्या ऑफीसमध्ये असाल तर खोट कारण देऊन लवकर निघून मस्त सी-फेसला फेरफटका मारुन डिन्नरला जा..
८. ऑफीसमध्ये Rose क्वीन आणि Rose किंग सारखे कॉंपिटेशन ठेवू शकता — माझा असिस्टेंट मॅनेजर कंगाल झाला होता त्याच्याच बायकोला रोज बनवायाच्या अट्टहासने (दोघेही एकाच कंपनीमध्ये ना)..पण तिचा आनंद बघण्यासारखा होता..
९. छोटा हनिमून.. (ओन्ली फॉर मॅरीड…हे हे)
१०. देव दर्शन (देवाकडे तिला / त्याला माझ कर ही प्रार्थना करायला..)
११. मुलीला / मुलाला मागणी मागायचा उत्तम दिवस
१२. अजुन काय बर..श्या हे असा होता आपला प्रांत नसला की शब्दच सापडत नाहीत, महेन्द्रजी सारखा अनुभव नाही पाठीला माझ्या हे हे हे..
आता तुम्हीच सांगा तुमच्या काय कल्पना आहेत त्या दिवसाच्या सेलेब्रेशन च्या..

आता कॉमेंट्स मध्ये विचारू नका यातील कुठली आइडिया मी वापरणार आहे ते…माझ्या मित्राला Valentine day सेलेब्रेट करता यावा म्हणून त्याच्या बदली मी ऑफीसला जाणार आहे ओवरटाइम करायला   :):):)

Happy Valentines Day..!! (In Advance)

प्रेम दिन सगळ्यांचाच…सगळे दिवस प्रेमाचे करा

माझ्या शुभेच्छा (सगळ्याच प्रेमळ दिवसांसाठी)