मीटर डाउन…डाउन डाउन डाउन

काल रात्री नेहमीप्रमाणे ऑफीसला निघालो आणि गेट समोर गाडीची वाट बघत थांबलो होतो. आज फक्ता माझा पिक-अप असल्याने बाकी कोणी नव्हते. गाडीत बसलो आणि उगाच टाइम मारुन न्यावा म्हणून ड्राइवरशी बोलू लागलो, भय्या होता तो. रात्री आमच्या ऑफीसमध्ये आणि सकाळी आइबीएन ७ मध्ये. आइबीएन न्यूज़ चॅनेलचा विषय निघाल्यावर तो म्हणाला आज का खास न्यूज़ सुना क्या आपने?

कहा जाओगे साहब?

मी म्हटला नाही काय आहे बाबा अशी खास खबर. तर तो म्हणाला जेवढ्या लवकर टॅक्सी यू-टर्न घेत नाही त्याहून लवकर अशोक चव्हाण यानी यू-टर्न घेतला 🙂 मग कळला मला की काल जी घोषणा थाटामाटात केली होती महाराष्ट्र सरकारने (टॅक्सी परवाने १५ वर्षे महाराष्ट्रात वास्तव्य असणार्‍या मराठी भाषा लिहीता वाचता येणार्‍या लोकांनाच दिले जातील) त्याच घोषणेवरुन सरकार साफ फिरला.  दुसर्‍या दिवसखेर त्यात स्थानिक भाषासुद्धा यायला हवी अशी सपलिमेंट लावण्यात आली. कारण नक्कीच आदल्या रात्री दिल्लीवरुन मॅडमचा फोन आलेला असच दिसतय.

आता एवढे दिवस शांत असलेला हा मराठी मुद्दा (खर तर हा मुद्दा महाराष्ट्रात मांडावा लागतो याचीच जास्त खंत आहे) परत ऐरणीवर आला. सगळ्या प्रमुख मराठी आणि अमराठी पक्षाच्या प्रतिक्रिया आल्या. अपेक्षेप्रमाणे मनसे आणि शिवसेनेने हा मुद्दा आक्रमकतेने धरून सरकारला कोंडीत पकडायची फिल्डिंग लावली आणि कॉंग्रेस आणि मित्र पक्षाची सारवा सारव सुरू झाली.

मुख्यमंत्र्यांनी या निर्णयाचे स्पष्टीकरण केले आहे. मोटार व्हेईकल एक्टनुसार टॅक्सी चालविण्याचा परवाना मिळविण्यासाठी राज्यात पंधरा वर्षे वास्तव्य असावे आणि त्याला स्थानिक भाषा येणे गरजेचे आहे, असा नियम आहे. आता ही स्थानिक भाषा मराठी, हिंदी, गुजराती कोणतीही असू शकते, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. आता या यू-टर्न ला काय म्हणणार?

हे तद्दन राजकारण आहे ते आपण जाणतोच. मराठीहा मुद्दा कसा माझा मुद्दा आहे किवा मी मराठीसाठी काय काय केला असे अनेक चर्चित विषय आपल्या पक्षांकडे आहेतच. मराठी जनतेच भल झाला ह्या आंदोलानातून तर चांगलाच, नाही तर मराठी जनतेचपण न जाणो पुढे पक्षाप्रमाणे विभाजन होईल अशी भीती वाटते 😦

जाए तो जाए कहाँ, समाझेगा कौन यहाँ दर्द भरे दिल की झुबान जाए तो जाए कहाँ….