घ्या अजुन एक…बॉम्ब स्फोट

आत्ताच प्रसन्न आणि मी गप्पा मारत असताना हा एसएमएस आला…पुण्‍यात कोरेगाव पार्क येथील जर्मन बेकरीत स्‍फोट, 10 ठार-40 जखमी..

सकाळीच पोस्ट टाकली होती आपल्या अंतर्गत राजकारणावर..माय नेम ईज़ वाद आणि आता स्वतःला आवरू शकलो नाही ही पोस्ट टाकण्यापासून…
दोन दिवस राज्यातील मुख्य पोलीस बळ एके-४७ घेऊन तुम्ही खानच्या सिनेमाला संरक्षण करायला थियेटर बाहेर उभे केलत आणि हे दहशदवादी कृत्या झालं पुण्यात. अरे भडव्यांनो काय गरज होती, सिनेमाला इतकं संरक्षण देऊन विरोधी पक्षाला खाली दाखवायची..विरोधकाना अक्कल नाही पण तुमच्याकडे सिस्टम आहे ना सगळ्या राज्याची तुम्हाला कळत नाही का ह्या गोष्टी?

काय गरज होती लोकांसाठी असलेल हे पोलीस बळ सिनेमा हॉल च्या बाहेर दोन दिवस तात्कळत उभी करायची? राज्याची सुरक्षा व्यवस्था काय ह्या गोष्टीसाठी आहे? महागाई, दहशदवाद असे मुद्दे Primary आणि Most Essential असताना काय केलत तुम्ही हे? तुमच्या या राजकारणात दशतवादी आपल काम करून त्यांच अस्तित्व दाखवून गेलेच ना? का तुम्हाला अश्या धमाके लागतात जाग व्हायला?

Shit काय होऊन बसलं हे…टीवी वर कसल्या फुशारक्या मारता २६/११ नंतर आज हल्ला झाला..अरे कळत नाही का तुम्हाला?
काय बोलू आणि किती बोलू दगडावर डोक आपटतोय असा वाटताय मला..

निषेध  निषेध निषेध  सरकारचा, विरोधकाचा आणि सगळ्यात शेवटी दहशतवाद्यांचा…