माय नेम ईज़ वाद…

आता काही वेगळा सांगायला नको पोस्ट कशावर आहे ती, गेले १०-१२ दिवस बॉलीवुडचा बादशाह शाहरूख खान आणि शिवसेना असा द्वंद्व चालू आहे…काल त्याला हिंसक वळण मिळाल. बाळासाहेबांच्या (???) आदेशावरून सिनेमाच प्रदर्शन थांबवायला शिवसैनिक निघाले… आता हा वाद कसा सुरू झाला ते आपण जाणतोच..आइपीलच्या प्लेयर्सच्या खरेदी नंतर एसआरकेने सांगितला खूप दुखद आहे की पाकिस्तानी खेळाडू कोणी निवडले नाहीत ते..etc etc

शाहरूख, संघ निवडीचा हक्का हा प्रत्येकाला होता, तुला सुद्धा आणि तुझ्या टीम मध्ये तरी मला कोणी पाकिस्तानी दिसत नाही (निदान माहितीत तरी नाही माझ्या) तरी अशी प्रतिक्रिया देऊन मोकळा झालास. वर शिवसेनेच्या राजकारणाला उलट उत्तर देऊन तू आगीत तेल टाकलस, शिवसेनेला फुकाच राजकारण म्हणून कॉंग्रेसच्या या प्रकारातील इनवोल्मेंटला काही न बोलता तोंड बंद करून बसलास..का तर तू मॅडमचा खास म्हणून?

शिवसेना, काय बोलू आता तुमच्या बद्दल पेपर आणि टीवी प्रसारमाध्यमानी तुमच्या अपयाशाच रिपीट टेलीकास्ट करून करून डोक भांभावून सोडलाय…कधीही शिवसेनेच्या एका आवाजाला मुंबई बंद करणार्‍या मुंबईने एकाच आठवड्यात तुम्हाला परत “टांग” दिली..अहो रोमीची भेट विसरलात काय? मराठी माणूसच टीवी वर खुलेआम ठाकरे काही नाही करू शकत आता अशी मुलाखत टीवी वर देतायत..सामनामध्ये आदेश (संजय राउत, उद्धव आणि जोशी सर यांचाच आदेश असणार, साहेब आता सामनामध्ये लक्ष घालत नाही अशी पक्की खबर आहे) छापून आला आणि काही शिवसैनिक काल उतरले रस्त्यावर..मार खाल्ला, पकडले गेले, हाल हाल झाले त्यांचे पण चित्रपट चालूच राहिला. कशाला असे फालतू मुद्दे घेऊन राजकारण करता? प्रॉब्लेम शाहरूख होता तर त्याला पकडा ना, चित्रपट बंदी, जाळपोळ करून काय मिळाल? नाक कापला गेला ना? मुद्दा घेतलात तर पूर्णपणे तडीस न्यायचा होता..पण नाही जमला..लोकानी शिवसेनेच्या विरोधाला न जुमानता थियेटर्समध्ये गर्दी केली..आणि खान निकला खिलाडी, सेना मे नही दम, शिवसेनेला चपराक अश्या बातम्या वाचायला मिळाल्या. खरच मराठी माणसाची नाडी बरोबर ओळखणारे बाळासाहेब चुकूच शकत नाही यावर माझा पूर्ण विश्वास आहे. राजकारण हे फक्त त्यांच नाव घेऊन केला जाताय एवढा नक्की….अरे काय वाटत असेल त्याना?

कॉंग्रेस, शिवसेनेला समानार्थी शब्द शिवसेनेने जे केला त्याच्या उलट करून दाखवणा ही ह्यांची जुनी खोड. गरज नसताना ते ह्या वादात पडले, फर्स्ट डे फर्स्ट शो बघून मस्त फोटो काढून आले सिनेमा बघताना..म्हणतात काय लोकांची भीती काढायला आलो, सगळ्यानी बघावा असा चित्रपट, कोणाला घाबरू नका वगेरे वगेरे…असा आहे तर जाउन या की नक्षलवादी भागात असा हसत फोटो काढत दौरा करून दाखवा ना? नको म्हणता त्यानी राष्ट्रवादीला मध्ये आणला, का तर शरद पवार भेटले होते बाळासाहेबाना हल्लीच..काय म्हणायचा याला… :p

राजकारण राजकारण….हे हे हे खेळ झालाय आज माझा डाव उद्या तुझा 🙂

मी तरी बघणार आहे माय नेम ईज़ खान…सेन्सर बोर्डने अप्रुव केलाय ना, मग कुठल्या पक्षाचा बोर्ड तरी थांबवु शकणार नाही मला…