सनडे स्पेशल – फरसाण

आताच उठलोय, उशीर झाला रविवार आहे ना, आणि एक तर मला रात्रीची सुखाची झोप फक्त शनिवार आणि रविवारीच मिळते. काल मन पण थोडा असवस्था होता..सांगितला ना थोडा केमिकल लोचा झालाय..काळजी करू नका..लोचा ठीक होईल..for Sure 🙂

तर मी कुठे होतो बर?.. अरे हा फरसाण..तर आज आरामात उठाल्याने आंघोळ करायची पण घाई नाही म्हणून थोडा फ्रेश होऊन चहा आणि नाश्ता उरकला..पोहे आणि सोबत चकणा म्हणून फरसाण. खाउन झाला आणि पीसी वर येऊन बसलो. टाइम्स ऑफ इंडियाचा ई-पेपर रोज येतो मेल मधून तो उघडला आणि फ्रंट पेज वर खाली एक बातमी होती – Munch this: Dharavi serves city its farsan fix . धारावी – मुंबई सॉरी एशियामधील सगळ्यात मोठी स्लम. मी नाश्ता केलेल्या एक-एका घासाची आठवण काढत ती बातमी वाचू लागलो.

Fresh फरसाण जमवानू छे?

आता धारावी मधे खूप छोटे-मोठे लघुउद्दोग आहेत..त्यात लेदर इंडस्ट्री सगळ्यात मोठी..मलाही माहीत आहे शॉपिंग मॉल मध्ये मिळणार्‍या महागडी लेदर जॅकेट्स तिथे फक्त ५००-६०० ला मिळून जातात. टाइम्सच्या बातमीच्या माहिती आधारे कळला की फरसाण मिक्सचा उत्पादन करणारा धारावी हा मुंबईतील सगळ्यात मोठा यूनिट आहे. ह्या उत्पादनातून तेथील २०,००० लोकांची उपजीविका होते आणि ह्यातील उलाढाल म्हणाल तर ७०-८० करोड

बाप रे बाप ७०-८० करोड…

मुंबईतील सगळ्याच हॉटेल्स रेस्टोरेंट्स आणि बारमध्ये आणि घाउक विक्रेत्यांकडे यांची उत्पादन पोचवली जातात. आता म्हणाल काय बेवडा माणूस आहे मी मला हॉटेल आणि बारची चिंता – अहो तसा नाही, मी मदिरेचा आदी नाही मी बार मध्ये मित्रना कंपनी द्यायला आणि चकणाच खायला जातो शप्पथ 🙂 त्यामुळे माझी अवस्था जास्त बिकट आहे हे समजू शकता आपण 🙂
मी असा म्हणत नाही की ते फरसाण मिक्स छान नसत, टेस्टी नसत..मीच असतो जो वेटेर् ला चकणा संपला की ऑर्डर देतो गाठी, चकली, लेके आ जल्दी…

प्रश्न आहे फक्त एकच तेथील हाइजिनचा..काही कारखाने आहेत जे याची पूर्ण काळजी घेतात पण काही असे आहेत जे सगळे नियम धाब्यावर बसवून उत्पादन चालू असता, निक्रुष्ठ दर्जाच तेल, अस्वछ् भांडी वापरतात. मागे यावर खूप आगडपाखड झाली होती मागे, फरसाणच नाही तिथे मंदिरात दिले जाणारे साखरेचे दाणे ज्याना आम्ही चिरन्गिचे दाणे म्हणतो ते सुद्धा इथेच बनवले जातात…आणि जे देशभर वापरला जात मंदिरात. असो बाकी आपण आपल्या मर्जीचे मालक…

घरी सांगितला आता हे फरसाण घरी आणायचा नाही..लगेच बाबा म्हणाले अरे आपण जैन मधून आणतो फरसाण तिथे सगळी काळजी घेतात हाइजिनची..मी म्हटला असा काय, आई मला थोड दे ना अजुन, मस्त आहे जैनच फरसाण 🙂