आपली न्याय “व्यवस्था”

आताच दिवाबत्ती करून, टीवीवर न्यूज़ हेडलाइन्स बघितल्या..एवढे महिने ज्याच्या बद्दल कोणी चकार शब्द न काढणारे मीडीया हेडलाइन्स याच्या नावाने भरभरून बातम्या देत आहेत..काय म्हणता? कोणाबद्दल बोलतोय मी..आठवा की २६/११. आठवलं नं? अजमल कसाब? मागे लिहलं होत ह्यावर, लिहावसं वाटत पण नाही..पण 😦 कसाब आहे अजुन तो भारताच्या आदरातिथ्याचा उपभोग घेत..मस्त बिर्यानी ओपत..मराठी शिकत..न्यायालयात नाटक करत हा भडवा अजुन जिवंत आहे (सॉरी, जर ह्याला शिवी नाही देता आली तर मी याचा उल्लेख ग्रेट कसाब करेन पण ते चालेल का तुम्हाला?…खरच ग्रेट माणूस आहे हा, एवढा क्रूर कृत्य करून हा जिवंत आहे वर ग्रेट टूअर ऑफ इंडिया करतोय ते पण आपल्याच पैशाने..मग तो ग्रेट नाही का?)

दीड वर्ष झालं, उद्या (३ मे) म्हणे ह्याला शिक्षा सुनावणार आहे…दीड वर्ष ह्या केसचा निकाल द्यायला, ते पण असा फास्ट ट्रॅक कोर्ट जे फक्त त्या २६/११ च्या खटल्यासाठी नेमलेलं…तरी दीड वर्ष..५० हजाराच आरोपपत्र..एक सरकारी वकील आणि २-३-४ त्याचे वकील… मग निकाल लागेपर्यंत, याला स्पेशल सेल मध्ये ठेवलं, रोज खाऊ, पियू घातलं, आठवड्यातून मेडिकल टेस्ट, पोलीस बंदोबस्त, सगळे पुरावे परत परत सदर करणे कोर्टात, त्या दहशतवादीचे मुडदे जपून ठेवणे, वकिलांची सुरक्षा, ह्यूमन राइट्सची धडपड, आणि मीडीयाचा एअर टीरपी. हे भारताच्या न्याय व्यवस्थेचे काढलेले धिंडवडे आहेत जगभर हे कस नाही कळत ह्याना? कसली छाती ठोकून सांगता आम्ही दोषीवर कारवाई केली अरे थूssss  तुमच्या या कारवाईवर..

शहिद झालेल्या लोकांची किती हाय लागेल ह्या न्यायदेवतेला आणि ह्या शंढ सरकारला ते माहीत नाही ह्याना. मला खात्री आहे उद्या त्याला फाशी होईल..होईल ना? की जन्मठेप? की परत अपील करणार हा? [ही कसली खात्री :(]

पोलीस डिपार्टमेंट तुम्हाला माहीत आहे ना ह्याला जिवंत पकडून काही माहिती मिळाली नाही..द्यायचा की उडवून का जिवंत पकडून आपली नाचक्की करून घेतलीत? त्या २६/११ ते २८/११ पर्यंत मुंबईला ह्यानी हाइजॅक केल होत..विसरलात? प्रत्येक मुंबईवासी त्या दडपणाखाली, भीतीखाली होता माहीत आहे ना? उद्या जरी त्याला फाशी झाली तरी तो अल्लाचे आभारच मानेल, दीड वर्ष जिवंत राहिला ते पण राजा सारखा…

खरच हा कसाब जगाला आणि आपण??…काळजी नसावी कधीतरी मरु की आपण एखाद्या हल्ल्यात..व्हा तयार. मी रोजच असतो, तुम्हीपण व्हा….