दिवाळी सण मोठा, नाही आनंदाला तोटा…
सर्वप्रथम सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !!
म्हणता म्हणता दिवाळी आली…सारा आसमंत दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघाला. दिवाळी म्हटलं की फराळ आलाच… लाडू, चकली, चिवडा, करंजी, शंकरपाळी…. अजुन बरंच काही 🙂
दिवाळी सणाचे अजुन एक वैशिष्ट्य म्हणजे दिवाळी अंक. विविध दिवाळी अंक ह्या काळात प्रकाशीत होतात. ह्या अंकाची संख्या खुपच जास्त असल्याने विविध विषय, साहित्य प्रकार ह्यात हाताळले जातात आणि त्यामुळे सर्व साहित्य प्रेमींना दिवाळीत एक हवीहवीशी साहित्य मेजवानी मिळते.
बघता बघता जग इंटरनेटमुळे जोडलं गेलं आणि हेच साहित्य ऑनलाईन उपलब्ध होऊ लागले, त्यांची वाचकसंख्या लाखो-करोडोंच्या घरात पोचली. ह्यातूनच सुरुवात झाली ई-दिवाळी अंकाची, एका आंतरजालीय साहित्य मेजवानीला. आज अश्याच काही ई-दिवाळी अंकाची यादी इथे देत आहे, जे या वर्षी प्रकाशीत झाले आहेत. त्यांचा मस्त आस्वाद घ्या आणि हो प्रयत्न आवडला असेल किंवा नसेल, त्याबद्दल प्रतिक्रिया द्यायला विसरू नका.
१. मोगरा फुलला ई-दीपावली अंक
२. जालरंग प्रकाशाचा दीपज्योती दिवाळी अंक
३. कलाविष्कार ई-दीपावली अंक
४. मीमराठी.नेट चा पहिलावाहिला दिवाळी अंक
५. मायबोली डॉट कॉमचा हितगुज दिवाळी अंक (वर्ष १२ वे)
६. ऐसी अक्षरे दिवाळी अंक
७. रेषेवरची अक्षरे दिवाळी अंक (वर्ष ४ थे)
८. मनोगत.कॉम चा दिवाळी अंक (वर्ष ५ वे)
९. उपक्रम.कॉम चा दिवाळी अंक (वर्ष ४ थे)
१०. सृजन ई-दिवाळी अंक
जर तुम्हाला कुठल्या इतर ई-दिवाळी अंकाची माहिती असेल, तर इथे प्रतिक्रिया नोंदवा.
धन्यवाद ..
सुझे 🙂 🙂