माझा इमोसनल अत्याचार..

“हेरंब दादा, अरे हो…विसरलेच…माझा खो सुहास दादाला…”

हे जेव्हा वाचला म्हटला आता हे काय, हे कसा जमणार, कुठला गाण निवडू, सोप्प हव, अनुवाद जमेल..छ्या काय करणार मी अनुवाद. मी खरोखर इमोसनल अत्याचार करणार हे ठरलाच. मागे त्या टॅगचे खो आरामात सांभाळता आला, पण कविता आणि मी? कसा शक्य आहे? मैथिली मला ह्याचा कॉंपेन्सेशन हवय बरर्रर का? ह्या खो साठी कारणीभूत हेरंब, देवेन आणि मैथीली आता भोगा 😉 गाण मुद्दाम सोप्प निवडल आहे, जास्त मेंदूला ताप न देता  🙂

हे गाण सदमा ह्या चित्रपटातील असून सुरेश वाडकर ह्यांनी स्वरबद्ध केल आहे. मला अतिशय आवडत हे गाण, सौम्य संगीत, टिपिकल सुरेश वाडकारांचा आवाज आणि उत्कृष्ठ अभिनयाने नटलेला हा चित्रपट. त्यातलच हे गाण “ए जिंदगी गले लगा ले”

प्लीज़ हसू नका ह 🙂

हे जीवना जवळ घे ना..
हे जीवना जवळ घे ना..
आम्हीपण तुझ्या प्रत्येक दु:खाला जवळ केल आहे..
हो ना?
हे जीवना जवळ घे ना..
हे जीवना…

आम्ही बहाण्याने लपून जगापासून
पापण्यांच्या पल्याड घर सजवल..
तुझी साथ लाभली जीवना..
ला ला ला ला ला ला ला…
तुझी साथ लाभली जीवना….

हे जीवना जवळ घे ना..
हे जीवना जवळ घे ना..
आम्हीपण तुझ्या प्रत्येक दु:खाला जवळ केल आहे..
हो ना?
हे जीवना जवळ घे ना..
हे जीवना…

छोटस ते प्रतिबिंब, डोळ्यात पडलेल्..
आम्ही तर दोन थेंबांनी मन भरवल
आम्हाला किनारा सापडला जीवना..
ला ला ला ला ला ला ला…
आम्हाला किनारा सापडला जीवना..

हे जीवना जवळ घे ना..
हे जीवना जवळ घे ना..
आम्हीपण तुझ्या प्रत्येक दु:खाला जवळ केल आहे..
हो ना?
हे जीवना जवळ घे ना..
हे जीवना…

मैथिली मला अर्ध चॉकलेट मिळायला हव..बस 🙂
आता मी खो देणार ना?…सागर, सागर, तृप्ती वाट बघतोय व्हा तय्यार … 🙂