Being Social

शाळा संपली, बारावी ढकलली 🙂 सगळयांचे मार्ग वेगळे झाले. कोणी शिकायला पुण्यात, कोकणात गेल. मी आपला मुंबई सोडायची नाही म्हणून इथेच राहिलो. चार-पाच वर्ष उलटली. मोबाइलची एवढी क्रेज़ नव्हती, म्हणजे मोबाइल वापरायचो पण फक्त घरगुती वापरासाठी आणि कॉलेजच्या फ्रेंड्सला माझी जरनल विसरू नकोस रे बाबा, माझी असाइनमेंट कोणाकडे आहे?, उद्या परीक्षा आहे लक्षात आहे ना 🙂 असे रिमाइंडर देण्यासाठीच वापरायचो. शाळेतले जास्त कोणीच कोणाच्या संपर्कात नव्हते. सगळे कसे आपापल्या जगात सुखी.

त्याच दरम्यान स्वताच्या प्रेयसीला शोधण्यासाठी एका तरुणाने ओर्कुट निर्मिती केली, माहीत नाही त्याला ती मिळाली की नाही, पण गूगल दादानी त्यातील फायदा ओळखला आणि ते अप्लिकेशन विकत घेतला आणि पूर्ण जगाला लावला धंद्याला, शोधा आपले मित्र, मैत्रिणी, प्रेयसी, प्रियकर, कॉलेज/ऑफीसमध्ये आवडलेली/आवडलेला. नावाने शोधाशोध करायची..एकाच नावाचे दोघे-तिघे सापडले तर सगळ्याना फ्रेंड रिक्वेस्ट टाकून तू तोच/तीच ना अशी विचारपूस करायची. आता जरी ती व्यक्ती आपण शोधतो आहोत ती नसली तरी तिला आपल्या फ्रेंड लिस्ट मधून काढायचा विचार पण करत नाही.

आमच्या शाळेच्या ग्रूपचा रियूनियन ह्या ओर्कुट मुळेच झाला तोच काय तो आमचा फायदा बाकी दुष्परिणाम सोडले तर. प्रत्येक गोष्टीचे साइड एफेक्ट्स असतातच, ओरकुतमुळे आपले मित्र सापडले पण आपल्या प्रोफाइलचे फोटोस, आपले स्क्रॅप, आपली पर्सनल माहिती जगजाहीर झाली. कोणीही कोणाच्या प्रोफाइल मध्ये डोकावू लागला, माहिती कॉपी करून ठेवू लागले. मग उगाच आपला वेळ त्या व्यक्तीला कोण काय काय विचारत, ती व्यक्ती त्याला कसा रिप्लाइ देते हे “मॉनिटर” करण्यात जाउ लागला. माझ्या एक मैत्रिणीचा किस्सा सांगतो, तिच्या ऑफीस पिकनिकचे रेन डान्स फोटोस एका टूकार फोरम लिस्ट वर पब्लिश केले गेले. न्यू आइटम गर्ल इन टाउन म्हणून…काय म्हणायाच याला? ओरकुतला मिळालेल्या यशाने तश्या साइट्सचा धडाकाच लागला. असा म्हणत नाही की वाईट आहे हे, पण सगळ्याना याची सवय होऊन बसली कारण ते एका मर्यादेपर्यंत राहायला हव होत, ह्याला मी पण अपवाद नव्हतो.

दिवसभर आपण त्या तिथे लॉगिन करून गप्पा मारल्या मित्रांसोबत की तो माणूस सोशल. त्याला/तिला आपल्या मित्रांची काळजी वाटते, बोलायला आवडत म्हणून तासन्तास विषय नसताना उगाच गप्पा मारण सुरू झाला. Orkut, Twitter, Facebook, Power.com, Ibibo, Indiarocks Etc. खूप आहेत, काहींची नाव पण माहीत नाही पण मला तिथून फ्रेंड रिक्वेस्ट येतेय. माझ्या मित्राना विशेष करून मूलीना रिक्वेस्ट पाठवली जाते की मी सुहासचा मित्र, आता असा सांगितल्यावर कोण नाही म्हणेल त्याला? कसला नको तो धंदा लावला आहे ह्यानी? प्राइवसी पब्लिकली करून ती प्राइवेट असल्याच भासवला जातय ह्या सोशल पोर्टल्स मधून. त्यातच ग्रूप इन्विटेशन्सचा प्रकार, एक मराठी ग्रूप म्हणून मी जॉइन केला म्हटला काही मराठी वाचायला मिळेल, एक-दोन महिने सगळा ठीक चालल होत, पण मग तो मराठी ग्रूप पोर्न ग्रूप होऊन बसला आणि नाइलाजाने सोडावा लागला मला.

आपला ईमेल अड्रेस आपला राहिलाच नाही, त्यामुळे मला नाइलाजाने माझे मेल्स दुसर्‍या अकाउंट मध्ये ट्रान्स्फर करावे लागले. आता मराठी ब्लॉग्स.नेट वर मी एका ब्लॉगला कॉमेंट काय दिली त्या बलॉगर कडून फॉर्वर्डेड मेल्स चालू मला न विचारता, शेवटी तो आइडी ब्लॉक केला तेव्हा कुठे शांती मिळाली. सोशल नेटवर्किंग करा, माझा विरोध नाही त्याला मी पण करतो पण कोणाला न विचारता त्याच्या मनाविरुद्ध त्याचा ईमेल आइडी त्या वेब साइट वर सब्मिट करू नका. कारण तिथून पुढे होणारा त्रास त्या व्यक्तीला होणार आहे हे लक्षात असु द्या.

काल एक दिवस ईमेल्स चेक नाही केल्या तर रात्री उशिरा मला हा सगळा इन्विटेशन्सचा कचरा साफ करावा लागला. आजपासून मी पण नावापुरताच त्या वेब साइट्स वर असेन, वाढदिवसाच्या शुभेच्छा, सण वगेरे त्यासाठीच बस. फेसबुक वरील सगळ्या अपलिकेशन्स ब्लॉक करतोय. त्यामुळे इन्विटेशन्स पाठवू नका प्लीज़. अजुन त्रास झाला तर सरळ प्रोफाईल उडवून द्यावी लागेल मला :(:(

——- एक अति सोशल नेटवर्किंग पीडीत 😦