शाळेला जातो मी…

आठवतो काय आजचा दिवस? काय म्हणता नाही? काय हे कसा विसरू शकता तुम्ही?

एक-दीड महिनामामाच्या गावी मस्त भेट देऊन, मज्जा करून शाळेच्या पुढल्या वर्गात जाणारे आपणच.. गावाला जाउन आला की आधी धावपळ शाळेच्या शॉपिंगची – पुस्तके, वह्या, दप्तर, रेनकोट, पावसाळी बूट, गणवेश, नवीन डबा मज्जा ना एकदम…

पहिला दिवस शाळेचा - मायाजालावरुन साभार 🙂

जून महिन्याच्या १३ तारखेला सगळी छोटी मंडळी शाळेच्या गेटवर आपापली दप्तर सांभाळत, हातात रंगीबेरंगी वॉटरबॅग घेऊन, काहीसे त्रासलेले (सुट्टी संपली म्हणून) काही आनंदी आपले मित्र भेटणार म्हणून, नवीन वर्गात जायला एकदम उत्साही, नवीन बाई सरांना भेटण्यासाठी उत्सुक आणि आयुष्याच्या पुढील पायरीवर चढून वाटचाल करायला एकदम तयार . खरच तो दिवस आजही आठवतो आदल्या दिवसापर्यंत चालेलेली तयारी, बाबांनी नवीन पुस्तकाना घालून दिलेली चापचोप कवर्स, आपण फक्त स्टिकर लावायचे 😉

वॉटरबॅगवर आपला कोणी तरी आवडीचा सूपरहीरो, किवा एकदम हाय फॅंडू गेजेट वाटावी अशी..दप्तराला जास्त खण हवेत आणि आपण ते कशासाठी वापरायचे ते आणल्याबरोबर ठरवायच..नवीन पुस्तकांचा वास घेत, वर्गात गोंधळ चालू होईल. आपण पहिल्या पानावर सुबक हस्ताक्षरात नाव लिहतो भले बाकी पुढली सगळी पान डॉक्टरी लिपीत 🙂 मग एक-एक तास संपायची घंटा वाजते, छोटी मधली सुट्टी, मोठी सुट्टी मग डबे खाउन बाहेर धुम ठोकायची..मग पकडापकडी, कॅच कॅच खेळायच..

घंटा वाजली की धावत धडपडत बाकावर येऊन बसायच, एकमेकांच्या खोड्या काढायाच्या परत अभ्यासात तात्पुरत मन लावून बसायच पण सगळा लक्ष असत ते शेवटचा तास संपायची घंटा कधी वाजतेय ह्याच्याकडे आणि एकदा ती वाजली की वाजली धुम घरी ठोकायची…मज्जा ना..

किती मस्त वाटत 🙂 निदान अश्या गोष्टींसाठी तरी कधीच मोठ होऊ नये..खरय ना मित्रहो?

–सुझे 🙂

माझं स्वप्न आणि माझी शाळा..

अहो गोंधळून जाऊ नका, मी एवढा हुशार कधीच नव्हतो, की माझ्या शाळेला माझा गौरव वगैरे असेल आणि त्या आठवणींना मी उजाळा द्यायचा प्रयत्‍न करतोय 😀 गेले दोन दिवस, का कोण जाणे एक स्वप्न पडतंय, की मी ऑफीसच्या डेस्क वरुन उठून आमच्या टीम मॅनेजरच्या डेस्कवर जातोय बोलायला माझ्या टार्गेट्स आणि पर्फोरमन्सबद्दल, पण जसा उठतो तसा मी माझ्या शाळेच्या यूनिफॉर्म मध्ये आणि मॅनेजरच्या डेस्कच्या जागी आमच्या वर्ग शिक्षिका बाईंची बसायची खुर्ची आणि टेबल. मी आमच्या बाईंशी बोलतोय. मला कळत होत, की मी ऑफीसला असायला हव, पण आता शाळेत सर्व वर्गासमोर पांढरा हाफ शर्ट आणि ब्लू हाफ पॅंट घालून उभा होतो. मी खूप गोंधळलेला होतो आणि तेवढ्यात मला माझे मित्र आणि मैत्रिणी दिसू लागतात. शाळेच्याच गणवेशात (काहींची लग्न पण झालीत पण तोच निळा फ्रॉक आणि केसांच्या वेण्या 🙂 )

मला ते बघून खूप हसू येत होतं, आमच्या गप्पा, हसणं-खिदळणं चालू एकदम मच्छीमार्केट सारखं (असा आमच्या बाईंच ठरलेलं वाक्य गोंगाट वाढला की) पण माझा गोंधळ अजुन वाढला, म्हटलं मी तर ऑफीस मध्ये होतो आणि केतनला पर्फॉर्मेन्सबद्दल विचारायला आलो होतो आणि आता चक्क बालक विहार विद्यालयाच्या “अ” तुकडी वर्गासमोर उभा. मी हलकेच माझ्या डेस्कवर नजर टाकली, तर माझे ऑफीस फ्रेंड्स रिशी, इम्रान, रोहन मॉनिटर मध्ये डोक घालून कीबोर्ड वर खट-खट करत नॉर्मल काम करत बसलेत. म्हटलं आयला हे काय गौंडबंगल आणि हे स्वप्न सलग दोन दिवस पडले. मला स्वप्न दिवसाच पडतात, कारण मी सकाळीच झोपतो नाइट शिफ्ट असल्यामुळे 🙂 मग विचार करायला लागलो काय अर्थ असेल या स्वप्नाचा.

कारण मनी वसे ते स्वप्नी दिसे असे म्हणतात, पण मला शाळेचं स्वप्न पडावं? असा हुशार, गुणी, शिक्षकांचा लाडका, स्पोर्ट्समध्ये अव्वल असा मी कधीच नव्हतो. सुहास म्हटलं की  लाजराबुजरा, . आमच्या इंग्रजीच्या मानेबाईना तर धक्काच बसेल, जर त्याना कळलं की सुहास Works in International Contact Center now. त्या आम्हाला इंग्रजी शिकवीत आणि ७ वीत असताना, मी फक्त काठावर पास झालो होतो इंग्लीशमध्ये 🙂 असो तर मी माझ्या गुणपत्रिकेचा अहवाल देऊ इच्छित नाही, पण सांगायाच मुद्दा हा की माझा शाळेतलं अस्तित्व फक्त त्या पुरतचं आणि मधल्यासुट्टीत मित्राना वडा-पाव, कटलेटची पार्टी देणारा इतकंच. त्यामुळे शाळेची मला अशीच मध्ये आठवण यावी ८-९ वर्षानंतर असा काहीच घडलं नाही एवढ्यात..

मग माझं संशोधन चालू त्याचा अर्थ शोधून काढण्यात..मग असा ना तसा अर्थ लावला त्यातले काही निष्कर्ष..

– सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यात शाळेतले दिवस आरामाचे आणि आनंदाचे वाटले असतील.

– प्रॉजेक्ट्स, सर्विस लेवल, टार्गेट्स पेक्षा शाळेतला इतिहास, भूगोल, गणित अधिक जवळचा वाटत असेल मला

– ऑफीस महागडा मधला बर्गर, पिझा पेक्षा २५-५० पैश्यात घेतेलेल्या गोळ्या आणि त्याने झालेले चिकट हाथ आवडत असेल

– तो निरागसपणा लहान वयातील लोभवत असेल मला ह्या कॉर्पोरेट लाईफस्टाईल समोर..का मोठे झालो असा विचार येतो 🙂

– शाळा सुटली की धावत घरी येऊन. जेवून थोडा वेळ टीवी बघून मस्त बिछान्यात ७-८ तास लोळायला आवडत असेल, आताच्या ४-५ तासाच्या डिस्टर्ब झोपेसमोर.

– खिशातले पाकीट संभाळण्यापेक्षा, बाबांनी शाळेत खर्चाला दिलेले ५ रुपये मोलाचे वाटत असतील.

कारण भरपुरच असतील पण May be I am missing something badly..very very badly 😦

This slideshow requires JavaScript.