“राज” निष्ठा ??

वर दिलेला फोटो बघून दचकलात ना?

मला तर खूप मोठा धक्का बसला जेव्हा ह्या फोटोची लिंक विक्रमने बझ्झ वर दिली. विश्वास बसत नव्हता स्वताच्या डोळ्यावर. महाराष्ट्राची ब्लू प्रिंट तयार आहे माझ्याकडे, एकदा संधी द्या मला असे आवाहन करणारे राजसाहेब ठाकरे. ‘कोणत्याही समाजापुढे लांगूलचालन करणार नाही , निवडणुका आल्या म्हणून ‘ टोप्या ‘ घालणार नाही ‘ असे ठणकावून सांगणारे मराठी हृदयसम्राट नक्कीच उन लागता म्हणून वर टोपी घालून नाहीत.

त्यांच्या या कृतीमुळे मलाच काय सगळ्या मराठी लोकाना काही प्रश्न पडले हाच ना तो राज? मी महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्र माझा असे गर्वाने सांगणारे राज “सैनिक” काय विचार करत असतील आता? राजचा निवडणुकीचा अजेंडा नक्की काय? ह्या वर पक्षातर्फे काहीच प्रतिक्रिया का नाही?

मी राजच्या अ.भा.वि.से. बरोबर काम केलय साठेला असताना, तेव्हापासून ह्या माणसाबद्दल माझ्या मनात प्रचंड आदर आहे. राज यांची निवडणुकीतील सडेतोड, आभ्यासपूर्ण, अर्थपूर्ण भाषण कानावर पडली की रक्त कसा सळसळून येत. पण, राजला असा बघून सगळा अवसान गळून पडलय. सगळे म्हणतात (मलापण वाटत) की बाळासाहेबांनंतर तुम्हीच असे युवा आणि कणखर नेतृत्व देऊ शकाल महाराष्ट्राला, पण का कोण जाणे बाळासाहेबानची जागा घेण्याची लायकी कोणाचीच नाही याची खात्री पटली पुन्हा. ज्यानी ४० वर्षापूर्वी दिलेला शब्द मोडला नाही आजपर्यंत.

नक्की कुणाकडे बघायच आता मराठी समाजाने? राज लवकरच पक्षाकडून तुमच्या बदललेल्या अजेंड्यावर प्रतिक्रिया अपेक्षित आहे..

बाकी काही बोला माझ्या राजनिष्ठेला नक्कीच धक्का लागलाय 😦

पुन्हा राडा

आतच पहाटे भाईदास हॉलच्या इथून घरी येताना नाकाबंदी दिसली, म्हटला पहाटे ५ ला एवढे पोलीस इथे काय करतायत इथे, तेवढ्यात बाजूच्या मुंबई युवक कॉंग्रेसच्या बॅनर कडे लक्ष गेला, राहुल गांधीचे स्वागत वगेरे वगेरे.. तेव्हा आठवला आज हा मुंबईत येणार आहे.
आता गांधी परिवार सदस्य म्हटला तर राजकारणाचा वारसा (?) आयताच मिळतो हे तर आपण जाणतोच. तसाच हा पण मस्त परदेशात शिकून भारताच्या वेल सेटल्ड कॉंग्रेस राजकारणात उतरला. येताना पूर्ण हिंदी शिकून आला हे बर केला ह्याने..
Romi

आता रोमपुत्राने बिहार मध्ये केलेल्या मूर्खपणाच्या (मुद्दाम राजकीय हेतुपुर्व असलेल्या) वक्तव्यानंतर पूर्ण महाराष्ट्र आणि दिल्लीच राजकारण हादरून गेला, काय तर म्हणे “२६/११चे वेळी बिहार, उत्तर प्रदेशातील बहाद्दर एनएसजी कमांडोंनी मुंबई वाचवली” च्यायला याच्या ते कमांडों काय मुंबई वाचवायला आले होते की देशावरच संकट दूर करायला? त्याच कसला राजकारण करायाच? पण नाही बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये कॉंग्रेसची लाट आणायचा विडा उचललाय ह्या माणसाने, मग तिथल्या लोकाना आवडणारी, दाद मिळवणारी भाषण करायचा अट्टहास कसा सोडेल आपला रोमी 🙂

तर हे साहेब भाषण ठोकून मोकळे झाले आणि इथे मुंबईत राजकारणात संतापाचा वणवा पेटला आणि का पेटू नये, त्या हल्ल्यात आपल्या मुंबई पोलीस डिपार्टमेंटचे जाबाझ ऑफिसर्स शहीद झाले. एनएसजी कमांडोंना यायला तर ४० तास लागले कारण मॅडमचा आदेश वेळेवर मिळाला नव्हता म्हणून..असो आता आपल्या रोमी एवढा शिकलेला सवरलेला महाराष्ट्राच्या वाटेला जायच्या आधी थोडा आभ्यास केला असता तर काय बिघडले असत पण नाही मला माझ्या पक्षाच्या वोट बॅंकला मजबूत करायचा होता ना..म्हणून बोललो बाबा ते, मस्त टाळ्या पडल्या असतील तिथे पण त्याला खरच कल्पना नाही त्याने उगाच वाघाच्या जबड्यात हात घातलाय.

मग आता शिवसेना आणि मनसे ह्या दोन्ही प्रमुख मराठी पक्ष पुढे सरसावले आणि त्याच्या विधानाचा तीव्र निषेध केला, आणि तो व्हायलाच हवा होता. देशहिताच्या गोष्टीत कशाला आणायाच राजकारण? मुंबईतील प्रांतवादा बद्दल काय माहीत आहे ह्याला? पण नाही उचलली जीभ आणि लावली…

एवढी मोठी संतापाची लाट उसळली तरी याला अजुन अक्कल आली नाही, एवढे ताशेरे ओढले गेले त्याच्या विधानावर तरी तो आपला त्याच गोष्टीवर ठाम आणि हाईट म्हणजे तो आज मुंबई भेटीवर येतोय. आता त्याला हे टाळता आला असता पण “खाज” असते ना स्वत:ला कट्टर राजकारणी असल्याची तीच पूर्ण करायला येतोय तो.

बाळासाहेबानी तर त्याच स्वागत करायचे आदेश दिलेच आहेत शिवसैनिकाना, मनसे सुद्धा सज्ज असेल त्याचा समाचार घेण्यासाठी आपल्या परीने..कॉंग्रेस आणि मित्रपक्ष नक्कीच ही भेट वीना विघ्न पार पाडू द्यायचा प्रयत्‍न करणार..

त्यामुळे आज राडा होणार…रोमी सांभाळ रे बाबा

फुकट सल्ला – पुढच्या वेळेस जमल्यास भाषण तुझी आई ज्याच्या कडून लिहून घेते त्याच्या कडून लिहून घे रे राजा..जो लिहून देतो त्याचा अभ्यास नक्कीच तुझ्यापेक्षा दांडगा आहे…Take Care