रात का समा, खादाडी कहा?

म्हणतात ना मुंबई कधी झोपत नाही..खरच आहे ते!! अहो आम्ही रात्रीचे काम करतो म्हणून नाही, पण मुंबई खरच कधीच नाही झोपत. मला विचारा की रोज ह्या निवांत झोपलेल्या शहराला मी अनुभवतो.

दिवसभर गर्दी, ट्रॅफिक ने भरून वाहणारे रस्ते मध्यरात्री मस्त थंड, फ्रेश हवा खायचा अड्डा बनतात. एकदम शांत वातावरण, ना कसला गोंधळ, ना होर्न चे आवाज, मध्येच एखादी गाड झूम करून निघून जाते, पुन्हा शांतता मागे ठेवून. मग कोणी ह्या शांत वातावरणात शतपावली करत असो, कोणी घरी येत असो ऑफीस मधून किवा आमच्यासारखे ऑफीस मधून ब्रेक घेऊन कामाच फ्रस्ट्रेशन, किवा झोप उडवायला चहा, कॉफी घ्यायला आणि काही खायला खाली उतरतो.

कॅंटीन आहे हो मस्त, पण मी त्याचा वापर फक्त टीवी बघायला करतो. कॅंटीनचा चहा याsssक्, नकोसा असतो, तिथे खाण पण लिमीटेड असता. तर आमच्या जिभेचे चोचले मध्यरात्री पुरवणार कोण जर आम्ही कॅंटीन मध्ये खात नाही तर?

सांगतो की मी, आमच्या खादाडीच्या जागा…तेच सांगायला पोस्ट लिहतोय ना 🙂

अंधेरी चकाला-वेस्टर्न एक्सप्रेस वे जंक्षन अजय किवा कधी दिलीप (अण्णा) रस्त्याच्या कोपर्‍यात मस्त साइकल लावून उभे असतात. हो हो साइकलच..अहो साइकलचा एवढा टॅक्टफुल्ली वापर कधी बघितला नव्हता. मागे स्टॅंडवर एक स्टीलची टाकी त्यात गरम गरम दूध समोर एका हॅंडलला एका

टपरी साइकलवरची

मोठ्या बॅग मध्ये गुटखा , सिगारेटसची पाकीट, एका हॅंडलला बिस्कीटस्ने भरलेली पिशवी, त्यातच दूध गरम करायाच भांड आणि स्टोव. मागे स्टंडच्या खाली अजुन एक बॅग त्यात कॉफी, चहा, प्लास्टिक कप्स आणि बूस्ट सचिनवाला (माय फेवरेट- बूस्ट इस द सीक्रेट ऑफ अवर एनर्जी). जमलच तर कधी गरम गरम इडली. माइंडस्पेस मालाड-(वेस्ट) मध्ये रात्री गेलात तर टोयोटा शोरूम च्या थोडा पुढे एक असाच अण्णा साइकल घेऊन उभा असतो. तो तर साइकल वर डोसे, इडल्या, समोसे विकतो, त्याचा पसारा इमॅजिन करा 🙂

पण काय चहा-इडली खाउन पोट भरणार..ह्या काही काय…तव्याचा टन टन करणारी भुर्जीची गाडी असते की (हायजिनचा विचार करताय? चालता की राव गेले ३ वर्ष सवय झालीय आणि अजूनही धडधाकट आहे म्हटला मी) सिनेमॅक्स थियेटरच्या मागच्या गल्लीत रात्रभर, निदान २ पर्यंत ही गाडी असते. जर तुम्हाला एकदम हटके अंड्याचे पदार्थ खायचे असतील आणि रस्त्यावर खायला आवडत असेल तर मालाड सब वे वेस्ट ला बाहेर पडलात की डाव्या बाजूला एका मराठी माणसाची एक भुर्जी-पाव ची गाडी आहे. त्याच नाव पण सुहास. तिथे गेलात की फक्त सांगा चारकोप वरुन आलोय खायला सुहास-शंतनू ने सांगितल म्हणून. तीन स्पेशल डिश मागवा त्याच्या पसंतीच्या आणि त्याची नाव खाल्यावर विचारा, नाही दोन्ही सुहासच नाव काढाल तर शप्पथ 🙂

आता अंड नको असेल तर वडा-पाव किवा मिसळ पाव चालेल? दचकू नका…बिसलरीच्या पुढचा सिग्नल एरपोर्ट च्या इथला लेफ्ट घेताला की तिथे रात्रभर सदानंदच्या टपरीवर गरमागरम वडापाव आणि मिसळ पावचा आस्वाद घेता येईल. तसाच गोरेगावचा वैभव, अंधेरीच अपना धाबा चालू असतो रात्रभर काही सिलेक्टेड गोष्टी मिळण्यासाठी. माइंडस्पेस मालाड-(वेस्ट) हे तर कॉल सेंटर्सच हब. इथे रात्रभर चालणार ५-डी आहे, तसेच भुर्जी, चाइनिस चालू असता. अंधेरी वेस्टला पण फक्त रात्री १२-४ असा चालणारा चाइनिस वाला आहे स्टेशन बाहेरच.

पाव भाजी खाणार? या कांदिवली वेस्टला..इराणी वाडीत रात्रभर चालणारा भगवती हॉटेल आहे. मस्त पाव भाजी मिळते इथे. रात्री लेट नाइट शो बघितला की आमचे पाय भगवतीकडे वळलेच समजा.

आता काही हॉटेल्स-बारस् जी समोरून बंद असतात पण आत मध्ये बिनदिक्कत चालू अशी भरपूर आहेत पण काही सेलेक्टेड कांचा, सन शाइन, गुरूकृपा, एलपी, एसपी…बस (मी पीत नाही ना त्यामुळे हे अड्डे कमी माहीत आहेत)

चला आता मलाच भूक लागायला लागली आहे…हाफ फ्राइ बनवतो आणि खातो..कोणी खाणार का? या लवकर…

कोणाला चांगल्या जागा माहीत असल्यास नक्की सांगा कॉमेंट्स मध्ये…

– सुझे