फुलांचा स्वर्ग – कास पठार !!

गेल्यावर्षी २५ तारखेला रोहनमुळे तिकोना दुर्गाला भेट देण्याचा योग आला. तो अनुभव अविस्मरणीय होता. पहिल्या मराठी ब्लॉगर्स ट्रेकनंतर, आम्हा सर्वांची ती दुसरी भेट होती. ह्या ट्रेकचं अजुन एक वैशिष्ट्य म्हणजे अनघा, श्रीताई ह्यांची पहिल्यांदा भेट झाली होती. यावर्षीदेखील त्याच तारखेला तो योग जुळून आला आणि आम्ही सगळे कासला भेट देण्याचे ठरवले. राजीवकाकांनी सगळी व्यवस्था चोख केली होती, त्यामुळे प्रवासाचा अजिबात त्रास झाला नाही. बरोब्बर १२:३० ला आम्ही ठाण्याहून प्रवास सुरु केला. रात्रभर आम्ही गाणी म्हणत / केकाटत जागून काढली. आमची मैफिल एकदम मस्त जमली होती. पहाटे ५ वाजता गौरीला चांदणी चौकातून पिकअप करून, आम्ही कासच्या दिशेने कुच केले.

कास पठार म्हणजे फुलांचा स्वर्ग. गेली अनेक वर्ष काहीसा दुर्लक्षित असा हा भाग, आता सातारा जिह्यातील एक महत्वाचे पर्यटन केंद्र बनलं आहे. फोटोग्राफीची आवड असलेल्या मंडळींना तर ही वेगळी पर्वणीच. फुलांचा सडा पडावा, अशी फुलं संपूर्ण पठारावर (१२०० एकर) विखुरलेली आहेत. अनेक प्रकारची विविधरंगी फुलं आपल्याला इथे बघायला मिळतात. अजुन जास्त लांबण लावत नाही, काही निवडक फोटो टाकतोय. एन्जॉय 🙂 🙂

सूर्योदय..
बसमधून उतरल्यावर हे साहेब एकदम अंगावर धावून आले 🙂 🙂
सकाळचा नाश्ता गरमागरम कांदा पोहे !!
कास पठारावर स्वागत !!
--
Sonki (Adenon indicum)
Halunda (Vigna Vexillata) (फोटो साभार – देवेंद्र चुरी !! )
Jartari (Slender Flemingia)
Abolima (Murdannia lanuginosa) (फोटो साभार - देवेंद्र चुरी)
 फुलांचा सडा …
पठारावर असलेला तलाव…
कास पठारावर जायला लोकांची झुंबड… 😦
सागर, देवेंद्र आणि चैतन्य…
खादाडी..... खास आकर्षण पुरणपोळी 🙂 🙂
दीपक, चैतन्य, देवेंद्र, राजीव काका, धुंडीराज, सागर आणि भारत ...

कास पठाराची भेट मस्तच झाली. सगळ्यांनी एकदा नक्की भेट द्यायला हवी, पण लवकरात लवकर.  इथे मानवी वस्ती वाढली, तर ह्या जागेचं काही खरं नाही..तसे काही ठिकाणी प्लॉटस् ची बुकिंग झालेली दिसते पठारावर जाताना, कुंपणांची गर्दी होती थोडीफार  😦

असो… !!

– सुझे !! 🙂