बदल

गेले तीन-चार आठवडे ब्लॉगवर काहीच पोस्ट नाही करता आला, ऑफीसच्या अंतर्गत राजकारणामुळे मला माझ्या आयुष्यच्या पहिल्या वाहिल्या दिवस पाळीला सामोरे जाव लागला. गेली ३ वर्ष आणि ४ महिने अविरत नाइट शिफ्ट करणारा मी आता ज्या वेळेला घरी यायचो त्या वेळेला ऑफीसला जायला लागलो ह्या सोमवार पासून. आता हा चेंज शरीराला लगेच मानवणारा नाही हे माहीत आहे, पण काय करणार करना पडता है. जिथे मला विचारल्या शिवाय माझे On शिफ्ट ब्रेकपण चेंज नाही व्हायचे तिथे माझी पूर्ण शिफ्टच बदलली गेली, कारण दिला गेला की मी नाइट शिफ्ट करतो म्हणून माझा पर्फॉर्मेन्स छान आहे.

सकाळच्या शिफ्टला उसात रात्र असते, त्यामुळे कस्टमर्स उगाचच काहीच  प्रॉब्लेम नसताना मुद्दामुन आम्हाला कॉंटॅक्ट करतात म्हणजे टाइमपास इश्यूस म्हणा हवा तर..ज्या मुळे सकाळच्या शिफ्ट करणार्‍या एजेंट्सचे स्कोर त्यामानाने थोडे कमीच असतात….हीच बाब लक्षात घेऊन आमच्या प्रतिस्पर्धी टीमच्या मॅनेजरने (हे माझ्या टीम मॅनेजरच्या भाषेत, पण ते सगळे माझे मित्रच) माझी शिफ्ट बदलायला लावली..म्हटला ठीक आहे. मला कामच तर करायाच आहे, म्हटला करू. माझ्या टीम मॅनेजरला हा माझा आटिट्यूड आवडाला नाही, त्याला वाटला मी खूप वाईट केला ती शिफ्ट करायाच मान्य करून. माझ्या स्कोर्सची चिंता सगळ्याना. (आयला एवढी काळजी दाखवतात सांगू :)) म्हटला जाउ दे जे होईल ते बघून घेईन मी, आपल्या टीम स्कोरपेक्षा मला क्लाइंट टार्गेट्स आणि पूर्ण फ्लोरचे स्टॅट्स महत्त्वाचे आहेत..

सकाळी सकाळी माफ करा, पहाटे ३ वाजता ट्रान्सपोर्टवाल्याचा फोन, “सर, पिक अप घेताय ना?” {साल्या एकतर आधीच झोपमोड करायची आणि वर विचारणार येणार की नाही} (त्याच पण बरोबरच हो, पण काय करू सुखाची झोप कोणी मोडली की राग येतो) गाडी येणार असते ४-४:१५ ला मी हो म्हटल्याशिवाय ते लोक गाडी पाठवत नाही. मग कंटाळा करत उठून आंघोळ आवरून गाडीच्या होर्नची किवा फोनची वाट बघायची हा दिनक्रम झाला. मग कधी मी उशिरा तयारी करायचो किवा गाडी उशिरा यायची. रोज-रोज वेगवेगळे ड्राइवर येत असल्याने दिशादर्शकाच काम कराव लागतच फ्रंट सीटवर बसून. ड्राइवरला झोप येऊ नये म्हणून गप्पा मारणे, साइकलवरचा चहा-कॉफी पिणे हा नित्यक्रमच झालाय.  सगळा कस वेगळा वेगळा वाटतय. 😦

बदल घडत जातायत..लोक बदलायत, मी बदलतोय. काही जण नव्याने ह्या बदलात सामील होतायत तर काही नव्याने हरवतायत. काही जण वेड्यात काढत असतील मला माझ्या वागण्याबद्दल तर काहींना दीडशहाणा वाटत असेन. कधी कधी वाटत नको काही बदल आयुष्यात सगळा आहे तस राहू देत पण कधी वाटत होऊ देत, बदलला नाही तर ते आयुष्य कसला?. निदान काही गोष्टी बदलेल्या चांगल्या असतात.

चला भेटू परत…बदललेल्या स्वरुपात 🙂

— सुझे

डू नॉट डिस्टर्ब

आSSSSआSई ग् !!

अहो तुम्हाला नाही हो आमच्या हापिसातल्या बॉस आणि टीम मॅनेजरला सांगतोय. DO NOT DISTURB

आठवडाभर शॉनकडून मर मर काम करवून घेतल. सगळी एस्कलेशन्स, रिपोर्टिंग सांभाळून माझा स्वताचा स्कोर चांगला ठेवून तुमची काम केली. पण आज नाही आज ना फोन ना पीसी संध्याकाळपर्यंत. त्यामुळे खबरदार मला फोन केलात तर. सहा-सहा दिवस काम करतोय (पैसे डबल मिळतात म्हणा ओवरटाइमचे:) ) म्हणून काय झाला?. एका डंब यूस कस्टमर ला मॅकमध्ये (Macintosh)माउस राइट-क्लिक (Right-Click) समाजावता समाजावता डोक्यात तिडीक गेली होती माहीत आहे ना? पण मी सांभाळला त्याला राग आवरून, फ्लोरवर सांगायला काय जातय तुमच सुहास बघा किती सहज टार्गेट अचिव्ह करतोय.

ज्याची जळते त्यालाच कळते. बस झाला, खूप सहन केला. मला आराम नको? त्यादिवशी फक्त डोक दुखतय, मला झोप हवी आहे मी घरी जातो हाल्फ डे तेव्हा कसे भाव होते तुमच्या चेहर्यावर. नशीब सोडला होतत मला..

पण आज हक्काची सुट्टी. मस्त तंगड्या पसरून झोपणार…so Don’t dare to DISTURB me today

गुड नाइट…ZZZzzzzzzz,,,,…!!!

माझी चहाची तलप….

आता मेल चेक करता करता वाटलं ब्लॉग अपडेट करू माझ्या परवाच्या अनुभवाने.. म्हणून ही चहाची तलप मध्यरात्री 🙂

रविवार संपला, शनिवार वर्किंग असल्यामुळे वीकेंड झोपण्यातचं आणि घरातली काम करण्यात गेला. आई आणि बाबा दोघेही गावी गेले आहेत, त्यामुळे  शुक्रवारपासून घरची आणि माझ्या भावाची जबाबदारी माझ्या मोठ्या खांद्यावर आलीय. 😀

कॉन्टॅक्ट सेंटर (कॉल सेंटर) मध्ये काम करणारा मी नाइट शिफ्ट करून रात्रीचा दिवस करायची सवय मला. पहाटे घरी आलो की माहीत असतेचं, की काही ना काही खायला असेलचं घरी. कारण ते डिपार्टमेंट माझ्या आईचं, पण दोन दिवस तो पायंडा किवा सवय तुटली. मलाच घरी येऊन सगळं आवरून खायला करायाचं होतं माझ्या साठी आणि लहान बंधूसाठी. मी हे आधी पण केलंय, कारण किचन हा विषय माझा आवडता. सगळा स्वयंपाक मला करता येतो :), त्यामुळे माझी आई बिंदास असते, जरी कुठे बाहेर गेली तर. नेहमीप्रमाणे शनिवारी सकाळी आलो ४:३० ला, मला लगेच फ्रेश होऊन निघायचा होत मरीन लाइन्सला एका मित्राकडे. चहाची तलप लागली, म्हणून दूध गरम करायला ठेवलं. मित्रांना फोन करून कधीची ट्रेन पकडायची, कुठे भेटायाचा हा प्लान ठरला. मी पीसी चालू करून गाणी ऐकत बसलो आणि फोन चार्ज करायला ठेवला.

सकाळचे ७ वाजले, माझ्या भावाने मला ओरडत ओरडत उठवले…मी वैतागून आणि काहीसा दचकून उठलो. मला गाणी ऐकताता डुलकी (डुलकी कसली २ तास झाले होते). मी उठलो आणि घाबरलोचं घरात सगळीकडे धूर धूर, काही दिसत नव्हतं. भाऊ ओरडला दूध ठेवलं, तर लक्ष नाही देता येत काय? मी उठलो सगळ्या खिडक्या उघडल्या आणि फॅन सुरु केले. मी किचनमध्ये आलो, दुधाचा कोळसा झाला होता करपुन, आणि त्याचा अतिशय घाण वास सुटला होता. पूर्ण घर त्या वासानेच भरून गेलं होतं. आमच्या बंधूराजांनी तडक फर्मान सुनावलं, जे झालं ते निस्तर आधी आणि घरातला हा वास घालव नाही तर मी आत्ताच फोन करून हा प्रकार आईला सांगतो.

मी माझी सगळी शस्त्र भावासमोर म्यान करून धूर घालवू लागलो. नशीब कोणी तो धूर बघून फायर ब्रिगेड ला फोन नाही केला 😀 धूर घालवुन मी माझा मोर्चा किचनकडे वळवला आणि त्या करपलेल्या दुधाच्या भांड्याकडे बघितलं. आई रोज ते पातेल किती काळजीपूर्वक धुवून ठेवायची कारण ते दुधाचे असायचे. त्या करपलेल्या दुधाकडे बघून, आईचा(संतापलेला) चेहरा आठवला आणि लागलीच ते भांड वॉश बेसिन मध्ये धुवायला घेतल. खूप दुर्गंधी सुटली होती पण मला ते करपलेलं भांड स्वच्छ होतं तसचं करायचं होत. काही केल्या तो कोळसा निघत नव्हता. मग त्यात थोडा पाणी भरून दुसऱ्या दिवशी सकाळी परत घासायचं असं ठरलं. भावाला सांगितलं, तर त्याचं उत्तर अपेक्षित असंच मिळालं. “तुला हव ते कर, ते भांड स्वच्छ कर आणि हा घरातला वास घालव”

मी रूम फ्रेशनएर मारला घरभर, पण काही केल्या तो वास जाईच ना. शेवटी धूर का जवाब धूर से 🙂 असा ठरवून देवासमोर धुप लावली. सगळी दार खिडक्या बंद केल्या. हॉल, बेडरूममध्ये अगरबत्ती लावली आणि १५-२० मिनिटानंतर घर त्या वासने भरून गेलं. मी म्हणालो भावला बघितलीस माझी आइडिया. तर समोरून परत अपेक्षित उत्तरचं मिळालं, हे झाल पण दुधाच्या भांड्याच काय? त्याला समजावल मी घासेन ते उद्या म्हणून आणि त्यादिवशी जेवण बाहेरूनचं मागवलं, अर्थातच भावाच्या आवडीचं.

दोन दिवस रोज सकाळी उठून ते भांड घासतोय, उद्या तिसरा दिवस आणि मंगळवारी तर आई-बाबा येणार. कोळसा पूर्ण काढलाय मी तरी थोडा करपलेल्या खुणा आहेतचं त्यावर,  पण मी हार मानलेली नाही.

I still have two attempts to make, मंगळवारी जेव्हा सकाळी मी ऑफीस मधून येताना दूध आणींन तेव्हा मला ते त्याचं भांड्यात गरम करायचं आहे आणि त्याचा आई-बाबाना मस्त कडक चहा करून द्यायचाय… 🙂 🙂

अरे रात्रीचे दोन वाजले, झोपायला हवं आता, सकाळी परत माझा थर्ड अटेंप्ट आहेच.. गुड नाइट 🙂

 

– सुझे !!