“कुंडलीका” वर दे..

सकाळी सकाळी कितीही कामाची गडबड असो पण आमच्या घरी सकाळी ८ ला टीवी हा लागतोच. आधी ई टीवी मराठी आणि मग झी मराठी. काय स्पेशल असता ह्या वेळी सकाळी? आठवा बर तुम्ही? नाही आठवत? मीच सांगतो आपल सगळ्यांच भविष्य कथन. तुमचा आजचा दिवस कसा जाईल? तुमच्या आयुष्यात काय नवीन बदल घडेल? तुम्हाला कुठला रंग लकी आहे? तुमच्या घरच वातावरण कसा राहील? ऑफीसमध्ये बढती होईल की नाही? परदेशगमनाची संधी कधी मिळेल? सगळ्यात महत्वाच लग्नाचा योग कधी आहे? अश्या निरनिराळ्या प्रश्नांची उत्तर ह्या कार्यक्रमात दिली जातात.

खूप हसायला येत मला जेव्हा कोणी अनोळखी माणूस आपल भविष्य आपल्या जन्म कुंडलीवरुन आपल्याला सांगतो. (आता प्लीज़ म्हणू नका उद्धट आहे मेला, काय बोलायच कळत नाही मला). मी नाही आवडला की नाही आवडला सांगणारा आहे. जर असे लोक उद्धट तर मी उद्धट लोकांचा राजा ठरायला हरकत नाही…:) असो, तर मी कुठे होतो हा, भविष्य, जन्म कुंडली. माझ्या मातोश्रींच्या तोंडून भरपूर वेळा ऐकल पिताश्रींना सांगताना हे कार्यक्रम बघताना पाठवून द्या बर याची पण पत्रिका इथे, कळेल तरी काय आहे कार्टयाच्या नशिबात 🙂 मी आपला उद्धटासारखा सांगून मोकळा काही गरज नाही, जो भविष्य सांगतोय त्याचच भविष्य या कार्यक्रमामुळे आहे. त्याला त्याच काम करू देत आणि मला माझ..मग परत सगळ सुरू आईच बघितला किती शेफारला आहे हा, अश्याने याच लग्न होईल का? काय आहे त्या नोकरीत असे नेहमीचे प्रश्‍न माझ्यावर बाबांच्या आडून फेकले जातात..मग मी आपला काणाडोळा करून आपल्या कामात रमून जातो.

माझ्या फ्रेंड सर्कल मधील काही मुलींची लग्न सराई सुरू आहे सध्या जोरात ह्या वर्षी उरकून टाकायच ह्या ध्यासापोटी त्यांची नाव वेगवेगळ्या मंडळात, मॅरेज पोर्टलवर नोंदवली गेली आहेत. आम्ही गप्पा मारताना मध्येच त्या मंडळाच्या काकूचा फोन, मग मुलाचा प्रोफाइल आइडी घ्या, ऑनलाइन जाउन त्याची प्रोफाइल बघा, कोणी आपल्या प्रोफाइलला शॉर्टलिस्ट केलाय ते बघा असा रोज चालू झाला ह्यांच. आयला रोज गूगल टॉक बरोबर हे ऑनलाइन पोर्टल्स लॉगिन व्हायला लागल्या सगळ्याजणी..हे हे हे. त्या मग त्यांच्याच तोंडून पण मला मंगळ, राहू, देव गण, राक्षस गण असे शब्द कळू लागले. “माझे त्या मुलाशी ना फक्त २५च गुण जुळले, नाही तर मला आणि घरच्याना मुलगा आवडला होता” – इति माझी मैत्रीण. अरे मग सांगायाच ना हो असा मी म्हटला की तुला नाही कळत त्यातला असा बोलून माझाच पोपट करून गेली ती. मनात म्हटला असेलही मला नसेल काही कळत…

कदाचित कुठल्या तरी गुरुजीच्या सांगण्यावरुन माझ्या एक मैत्रिणिने लवकर लग्न व्हाव म्हणून केलेले सात मंगळावर उपवास आणि दर मंगळवारी दत्ताच्या देवळात जाउन नारळ देण हे राहू शान्तिचा उपाय बरोबर असेल किवा घरच्याना बर वाटाव म्हणून केलेला व्रत बरोबर असेल. पण तेच व्रत संपल्यावर त्याच मुलीला मंगळ सौम्य आहे आणि विवाह योग उशिरा आहे आणि संतान सुखं नाही असे सांगणारे तेच गुरुजी बरोबर असतील????…तिला ह्याबद्दल मी विचारल्यावर ती सांगते माझा विश्वास नाही रे पण घरचे म्हणतात तर करते…. म्हटला ठीक आहे,ह्यावर मी काहीच न बोलणे बर….पण आता एवढे उपाय केल्यावर त्या फ्रेंडच्या लग्नाला होणारा विलंब तिला ह्या कुंडली शास्त्रावर विश्वास ठेवायला भाग पाडत हे बघून मला फार वाईट वाटल….

माझा एका गोष्टीवर पूर्ण विश्वास आहे (तुम्ही सहमत असाल की नाही माहीत नाही तरी) की माणूस कोणाच भविष्य सांगू शकत नाही, एकवेळ तो भूतकाळ सांगू शकेल एकदम व्यवस्थित जर त्याची निरीक्षण शक्ति चांगली असेल तर…भविष्य नाही. पण आपली भविष्य जाणून घेण्याची धडपड काही संपत नाही. म्हणूनच वर्तमानपत्रात रकानेच्या रकाने भविष्यावर लिहून येतात, सामाजिक टीवी चॅनेल, न्यूज़ चॅनेल्स वर प्राइम स्लॉट दिला जातो भविष्य कथन करणार्‍या लोकांसाठी…बघा आनंद घ्या त्याचा..जमल्यास ते काय सांगतात तस करून तुमच ऑफीस प्रमोशन होत असेल, घरचे वाद मीटत असतील, भरपूर पैसा मिळणार असेल तर तुम्ही ते करू शकता..पण मी नाही. जे काही घडतय किवा घडेल ते आपल्याच कृतीमुळे, निर्णयामुळे होताय वर फिरणार्‍या ग्रह-तार्‍यामुळे नाही ह्या मताचा मी आहे आणि राहीन…

असो तुम्हा सगळ्यांच्या भविष्यासाठी माझ्या शुभ कामना 🙂

तुम्ही जर वर्तमान नीट सांभाळलात तर भविष्य नक्कीच सुंदर असेल यात शंका नाही – इति सुहास 🙂