आणि सचिन नाचू लागला…

आज त्याला खुप आनंदाने नाचताना बघितलं. सगळ्यांनी त्याला खांद्यावर घेऊन मैदानाच्या चकरा मारल्या. त्याची पाठ थोपटली. मानाने भारतीय तिरंगा, त्याच्या हातात सोपवला. तो क्रिकेट विश्वचषक कप त्याच्या हाती देऊन, त्याला अक्षरशः सलाम केला…ज्याच्यासाठी हे केलं, त्या सचिन रमेश तेंडूलकरचे डोळे आज आनंदाश्रूंनी डबडबलेले होते.

खुप खडतर प्रयत्नानंतर हे अद्भुत यश, भारतीय संघाला मिळाले आहे ते सुद्धा तब्बल २८ वर्षांनी. भले कोणी काही म्हणो, काही पर्वा नाही मला. आज खुप आनंद झालाय. दिवसभर जो खेळाचा रोमांच अनुभवला तो शब्दात व्यक्त करणे कठीण आहे. एकावेळी अशी हालत होती की, सामना आपल्या हातून निसटतोय की काय. सगळे टीव्ही बंद करून, आपापल्या कामाला लागले. पण मन सांगत होत नाय रे जिंकू, आरामात खेळल तर मॅच आपलीच आहे आणि तेच झालं.

जेव्हा आपण सामना जिंकला तेव्हा, सगळे आनंदाने नाचत होते, पण सचिन काही दिसत नव्हता. काही मिनिटानंतर, ड्रेसिंग रूम मधून सचिन धावत बाहेर आला, चेहऱ्यावर निरागस हास्य, अप्रतिम आनंद आणि उंचावलेले हात. एखादा लहान मुलगा मी परीक्षेत यशस्वी झालो, असं सांगत धावत येतो ना आई-बाबांकडे तसा आनंद त्याच्या चेहऱ्यावर होता. खुप भरून आलं. त्याने एवढ केलं आपल्या देशासाठी, पण कारकीर्दीत विश्वचषक जिंकून दिला नाही हा कलंक (????) {आयचा घो, आधी हे कोण बोलले त्याला शोधा रे} त्याच्या माथी मारला, पण त्याच्याकडे याचे सुद्धा उत्तर होत आज.

 

जिंकलो रे जिंकलो....

 

 

सssचिsssन .... सsssचिsssन...

आजचा विजय संपूर्ण भारत देशासाठी आणि खास आपल्या लाडक्या तेंडल्यासाठी..

स्पर्धेत सगळ्यांनी केलेल्या कष्टाचे आज चीज झालं आणि भारत क्रिकेट विश्वविजेता झाला. सर्वांचे खुप खुप अभिनंदन !!!

 

विशेष सूचना – इथे येऊन फिक्सिंग किंवा तत्सम कमेंट्स टाकून माझ्या आनंदावर विरजण घालू नये. अशी लोक जगाच्या वेगळ्या कोपऱ्यात असतात जिथे, क्रिकेट हा फक्त चेंडू-फळी म्हणून ओळखला जातो. आमचा आनंद तुम्हाला नाही कळणार.. धन्यवाद !!

– सुझे 🙂

अपेक्षेच ओझ…

इतके दिवस वाट बघत असलेला क्रिकेटचा महासंग्राम आजपासून ढाका येथे सुरू होतोय. जगातील १४ संघ ही स्पर्धा जिंकण्याचे मनसुबे घेऊन त्वेषाने ह्या संग्रामात उतरतील. भारतातील मीडियाचा सारखा प्रचार भारतीय जनतेच्या अपेक्षा अजुनच वाढवत आहेत. भारतीय संघाने हा कप जिंकवा म्हणून सगळे प्रार्थना करत आहेत. काहींनी देव पाण्यात ठेवलेत. काही जण भारताच्या मॅचला सुट्टी किवा आजारी पडून बॉल अन् बॉल याची देहा याची डोळे बघण्यास सज्ज आहेत. प्रचंड प्रमाणात जाहिरातबाजी सुरू आहेत. खेळाडूंच्या मुलाखती, त्यांचे स्टॅट्स सगळ सगळ आपल्यासमोर राहील पुढील दीड महिना. 🙂

 

जाहिरात ..!!

आपण भारतीय लोक म्हणजे क्रिकेटसाठी अती भावनिक, गेले दोन वर्ल्डकप सुरू होण्याच्या आधी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी स्टेडियममध्ये सत्कार केले, हार फूल दिले….पण पण काही कारणाने एखाद्या संघाकडून पराभूत झाल्यावर त्यांच्या घराची तोडफोड केली, शिव्या दिल्या, खेळायची अक्कल काढली… अस व्हायला नको. खेळ आहे हा, जो चांगला खेळेल तो जिंकेलच आणि तोच जिंकायला हवा. खेळामधली खिलाडूवृत्ती जपून ह्या स्पर्धेचा आनंद लूटा.

स्पर्धेत सामील होणार्‍या प्रत्येक संघाला शुभेच्छा…  🙂

स्पर्धेच वेळापत्रक इथे बघता येईल – http://www.cricbuzz.com/cricket-schedule/series/228/icc-world-cup-2011

– सुझे

तेंडल्या लगे रहो..

सssssssचिन सssssssचिन

Exceptional तेंडल्या

काय बोलू?

या लिट्ल मास्टरने दिल गार्डन गार्डन कर दिया.. इतिहास घडवला तेंडल्याने ग्वाल्हेरच्या रूपसिंग स्टेडियमवर…नाबाद २०० अशा वनडेतील सर्वोच्च धावा मास्टरच्या बॅटमधून निघाल्या…साउथ आफ्रिकेच्या गोलंदाजाना असा काही भिरकावला स्टेडियम मध्ये की अंपायर पण हाथ दाखवून थकले .. सचिनवर झालेल्या टिकेला त्याच्या बॅटने असा काही उत्तर दिला की सगळेच निरूत्तर…खरच तू एकच – सचिन रमेश तेंडुलकर. God Bless You

ह्या रन मशीनला सलाम आणि मनःपूर्वक शुभेच्छा…