आपली न्याय “व्यवस्था”

आताच दिवाबत्ती करून, टीवीवर न्यूज़ हेडलाइन्स बघितल्या..एवढे महिने ज्याच्या बद्दल कोणी चकार शब्द न काढणारे मीडीया हेडलाइन्स याच्या नावाने भरभरून बातम्या देत आहेत..काय म्हणता? कोणाबद्दल बोलतोय मी..आठवा की २६/११. आठवलं नं? अजमल कसाब? मागे लिहलं होत ह्यावर, लिहावसं वाटत पण नाही..पण 😦 कसाब आहे अजुन तो भारताच्या आदरातिथ्याचा उपभोग घेत..मस्त बिर्यानी ओपत..मराठी शिकत..न्यायालयात नाटक करत हा भडवा अजुन जिवंत आहे (सॉरी, जर ह्याला शिवी नाही देता आली तर मी याचा उल्लेख ग्रेट कसाब करेन पण ते चालेल का तुम्हाला?…खरच ग्रेट माणूस आहे हा, एवढा क्रूर कृत्य करून हा जिवंत आहे वर ग्रेट टूअर ऑफ इंडिया करतोय ते पण आपल्याच पैशाने..मग तो ग्रेट नाही का?)

दीड वर्ष झालं, उद्या (३ मे) म्हणे ह्याला शिक्षा सुनावणार आहे…दीड वर्ष ह्या केसचा निकाल द्यायला, ते पण असा फास्ट ट्रॅक कोर्ट जे फक्त त्या २६/११ च्या खटल्यासाठी नेमलेलं…तरी दीड वर्ष..५० हजाराच आरोपपत्र..एक सरकारी वकील आणि २-३-४ त्याचे वकील… मग निकाल लागेपर्यंत, याला स्पेशल सेल मध्ये ठेवलं, रोज खाऊ, पियू घातलं, आठवड्यातून मेडिकल टेस्ट, पोलीस बंदोबस्त, सगळे पुरावे परत परत सदर करणे कोर्टात, त्या दहशतवादीचे मुडदे जपून ठेवणे, वकिलांची सुरक्षा, ह्यूमन राइट्सची धडपड, आणि मीडीयाचा एअर टीरपी. हे भारताच्या न्याय व्यवस्थेचे काढलेले धिंडवडे आहेत जगभर हे कस नाही कळत ह्याना? कसली छाती ठोकून सांगता आम्ही दोषीवर कारवाई केली अरे थूssss  तुमच्या या कारवाईवर..

शहिद झालेल्या लोकांची किती हाय लागेल ह्या न्यायदेवतेला आणि ह्या शंढ सरकारला ते माहीत नाही ह्याना. मला खात्री आहे उद्या त्याला फाशी होईल..होईल ना? की जन्मठेप? की परत अपील करणार हा? [ही कसली खात्री :(]

पोलीस डिपार्टमेंट तुम्हाला माहीत आहे ना ह्याला जिवंत पकडून काही माहिती मिळाली नाही..द्यायचा की उडवून का जिवंत पकडून आपली नाचक्की करून घेतलीत? त्या २६/११ ते २८/११ पर्यंत मुंबईला ह्यानी हाइजॅक केल होत..विसरलात? प्रत्येक मुंबईवासी त्या दडपणाखाली, भीतीखाली होता माहीत आहे ना? उद्या जरी त्याला फाशी झाली तरी तो अल्लाचे आभारच मानेल, दीड वर्ष जिवंत राहिला ते पण राजा सारखा…

खरच हा कसाब जगाला आणि आपण??…काळजी नसावी कधीतरी मरु की आपण एखाद्या हल्ल्यात..व्हा तयार. मी रोजच असतो, तुम्हीपण व्हा….

कसाबचं पत्र खास तुमच्यासाठी

असल्लांम वालेकूम, नमस्कार मुंबई,
(अभी मराठी सीख रहा हू कुछ गलती हो तो माफ कर दे ना)

पेहचाना ना मुझे?

बहोत दिनो के बाद ये खत लिखनेका टाइम मिला है| वो क्या है, अभी पूनामे हुए ब्लास्ट की जानकारी दी हवालदार साहब ने दिल को तस्सलि मिली, हमारे भाईजान अपने काम को बखुबि अंजाम दे रहे है| हमारे जिहाद से पुरी दुनिया काप उठेगी देख लेना एक दिन|

वैसे तो मुंबई, मैं डेढ साल पेहले ही आया हु! अरे, पता तो होगा ही आपको, न्यूज़ पे दिखा तो रहे थे लाईव टेलीकास्ट| पाकिस्तान से एक बोट के जरिये, हम आए यहां गेट वे पे| पेहले सीएसटी पे फाइरिंग करके, बहोत लोगो को मार के, लिओपोल्ड केफे मे ग्रेनेड फेके| सब लोग डर रहे थे, हंगामा हुआ मुंबई मैं| सारे दुनिया मै सिर्फ हम ६-७ भाई लोगो की खबरे दिखाई गयी उस दिन| मुंबई पुलीस के कुछ जाबाज अफसर हमे रोकने आए थे मगर उनका अंजाम तो पता ही है आपको| हम को तो एक मिशन दिया गया था, जिसमे ज्यादा से ज्यादा आम आदमी लोगो को मारने का ऑर्डर था कमॅंडर का पाकिस्तान से| बस जो दिखे उसे…

दो दिन हमारे भाई लोगोने हिंमत दिखाई और लढते रहे ताज और ट्राइडेंट फाइव स्टार हॉटेलो मैं, पर अफसोस मैं पकडा गया | पर कोई, गम नही, भारत का कानून और ह्यूमन राइट्स वाले है मेरे साथ|वो लोगो को मारनेवालो को मारने की सजा के सक्त खिलाफ है, मेरी तो चांदी हुई ना| आज डेढ साल हुए २६/११ को, एक अनिवरर्सयरीभी मनाली लोगोने, पर मुझ पर आंच भी नही आयी अभितक| ४५-५० हजार पन्नो का केस फाइल कर दिया, और चालू हो गया इतिहास का सबसे बडा केस, निकम साब तो मुझे लटकाके ही रहेंगे लगता है फासी पे, पर मेरे वकील बदलते रहे और केस खिचता गया, अभी रिज़ल्ट आने ही वाला था के मेरे वकील केस छोड गये, अभी नया वकील केस पठ रहा है| तो मुझे और वक्त मिल गया|

मेरे लिये यहा एक स्पेशल जेल बनाया गया| मुझे बिर्यानी, कोफ्ते जो चाहु खाने मै वो मिलता है| पुरा खयाल रखा जा रहा है मेरा| करोडो रुपये खर्च किये गये अभी तक और आगे भी होंगे| सच माने तो इतना प्यार मिला इन लोगो से मुझे, जितना मुझे अपने अम्मी और अब्बा से भी नही मिला| अफजल गुरू भाईजान भी मजे मैं है| उनको तो फासी होने से रही| अभी बस उसी दिन का इन्तेजार कर राहा हु, की मेरे साथी मुझे छुडाने का कोई अछा प्लान बनाए और मैं आप से विदा लु| अल्ल्हा से बस यही दुआ है मेरी| आप लोगो की याददाश बहोत कमजोर है, जल्दी सब भूल जाते हो| पर मुझे मत भूलना, मैं नाम बदलके फिर यहा-वहा भारत मैं आते ही रहुंगा|

खुदा हाफीज|

आपका,

अजमल कसाब

काय म्हणताय संताप होतोय?

अहो माझ्या शुद्धलेखनाच्या आणि उर्दूच्या चुका सोडल्यात तर माझा संताप, राग, द्वेष जे अजुन समानार्थी शब्द आहेत याला तो तसाच आहे. भारताच्या न्याय व्यवस्थेवर सडकून टीका करावीशी वाटते, तो अफजल गुरू किती वर्ष आहे जेल मध्ये, त्याला फाशी द्या अशी विनवणी करावी लागते, पुरावे असून सुद्धा. इथे ह्या कसाब वर करोडो रुपये खर्च होतायत..अरे भडव्याला उडवून का नाही टाकला तेव्हाच..कशाला आमचा संयम बघताय, पैसा उडवताय याच्या मागे? आपण मुंबईकर स्पिरिट वाले, सगळे मुंबईच्या स्पिरिटला सलाम करतात..अरे साल्यांनो..ह्याच स्पिरिटचा दिवा लावा आणि परिस्थिती बघा डोळे फाडून. उद्या कोणी यांच्या सुटकेसाठी विमान अपहरण केल, किवा अजुन काही तेव्हा काय कराल हो? सांगा नं..

का कोण जाणे पुण्याच्या हल्ल्यानंतरच ही पोस्ट टाकायची होती पण राहिली….पण काल बातमी बघितली टीवीवर, आता हे अतिरेकी खुल्ला टीवी मीडीयाला वापरुन आइपील, कॉमनवेल्थ, राष्ट्रकुल हॉकी च्या आयोजकना धमक्या देतायत…काय बोलणार? बघा किती हिंमत वाढली आहे यांची..अरे भारताच्या भूमीवर दहशतीचे घाव घालणारा प्रत्येक हाथ उचकटून टाका ना..त्याचा असा पाहुणचार नको त्याना जेल मध्ये. निदान त्यांच्यासाठी तरी ठोकशाही वापरायला शिका….की आम्हीच ठोकायच… तुम्हाला?

– सुझे