ईडियट Media

काय लिहाव सुचत नाही, पण गेले काही दिवस गाजलेला (?) विषय, रवींद्र काकांनी तर त्या विषयाला धरून क्लासचं सुरू केलाय, पण माझा विषय फक्त तो नाही. गेले १२-१३ दिवस महाराष्ट्रात खूप आत्महत्या झाल्या. प्रसारमाध्यमानी खूप उचलून धरलं हे प्रकरण. कोणी वाटेल ते निष्कर्ष काढले. कोणी ३-ईडियट्सला कारण मानलं, तर कोणी आजच्या शिक्षणपद्धतीला….पण एक सांगतो हे आत्महत्येचे हे प्रमाण नॉर्मल आहे. तुम्हाला धक्का बसेल, पण परीक्षेच्या काळात दबावाखाली किवा टेन्शनमध्ये ह्या गोष्टी नेहमीच होतात. आता फक्त त्या गोष्टी मिडियासमोर मांडतेय, म्हणून आपल्याला ह्या गोष्टी कळतायत. स्पर्धा आणि आणि यश मिळवण्यासाठी असणारा दबाव काय फक्त ह्याच वर्षी नाही वाढला..तो दरवर्षी असतोच !!

ह्या वेळी न्यूज़ चॅनेल्सला आयतं कोलित मिळालं मग ते ३-ईडियट्स असो किंवा सरकारला कोंडीत पकडायला बाकी काही मुद्दे नव्हते म्हणून. त्यावर ग्रेट आपलं सरकार, लगेच आयोग स्थापन करून अहवाल घेतो असं सांगितलं.

आजकाल टीवी मिडिया फक्त फायद्याचे गणित बघून चॅनेल्स चालवतात असं दिसतंय. एका न्यूज़ चॅनेलवर मुलांच्या आत्महतेचा काउंटर लावला होता, म्हणे दिन नौवा आज क्या होगा? च्यायला हे असे पत्रकारिता करणार तर झालं कल्याण..

खुप मुद्दे देता येतील..स्वाईन फ्लू, टेरर अटॅक्स, बॉलीवुड गॉसिप्स, कुठला मुलगा बोअर वेल मध्ये ३५-४५ तास अडकून पडला  होता Etc Etc…

गोष्टीना अवास्तव महत्व देऊन त्या गोष्टी अक्षरशः थोपवल्या आहेत प्रेक्षकांवर. ह्या आत्महतेच्या बातम्या टीवी वर बघून सारख्या सारख्या कुठले पालक मुलाला पालकॅंसारखे रागाऊ शकतील? त्यांच्या मनात एक टांगती तलवार असेल आपण ओरडलो आणि ह्याने/हिने काही जीवाचा बरं-वाईट केलं तर? मुलांना पण आत्महत्येला प्रवृत्त केल्यासारखं नसेल का, ते जर त्याना एखादी गोष्ट जमत नसेल तर? ते त्याबद्दल बोलणं टाळतील पालकांशी. त्याना वाटेल आत्महत्या हाच एक पर्याय आहे आणि ह्यामुळे पालक आणि मुलांमध्ये संवांद कमी होऊन, दरी वाढत जाईल आणि अश्या दुर्दैवी घटना पण…

हे थांबवायला हवं. माझी नम्र विनंती सगळ्या टीवी मिडियाला..तुमच्याकडे सगळ्यात आधुनिक आणि तत्पर असे माध्यम आहे..प्लीज़ काळजी घ्या आणि ही फालतूगिरी  थांबवा.