तुम्ही काय कराल?

काल, माइक्रोसॉफ्टची परीक्षा द्यायला गेलो. तिथे वॉक-इन इंटरव्यूसाठी अर्ज मागवले होते. आता वॉक-इन म्हटल्यावर, माझ्या सोबत असणारे, इंजिनियर मूल गेली टाइमपास करायला म्हणून. एचआरला विचारला तर डेस्कटॉप सपोर्ट आणि सर्वर, क्लाइंट सपोर्ट अश्या दोन पोस्टसाठी इंटरव्यू चालू होते.

मित्रानी पॅकेजची माहिती विचारली तेव्हा त्याना दोन पर्याय देण्यात आले साहजिकच त्यानी जास्त पगार देणार्‍या कंपनीसाठी अप्लाइ करायाच आहे असा सांगितला. तिने त्याना फॉर्म्स दिले भरायला. त्यानी फॉर्म हातात घेतला आणि कंपनीच नाव बघताच कूजबूज सुरू केली. कोणाच लक्ष नाही हे पाहून फॉर्म्स तसेच फाडून फेकून निघून गेले. आता मला उत्सुकता होती की बाबा नक्की काय गोची झाली त्यांची? पॅकेजची माहिती मिळाल्यावर हवेत तरंगणारे असे मुस्क्तटात मारल्यासारखे निघून का गेले? मी विचारला एचआरला की बाबा कुठल्या कंपनी आहेत. तिने मला कंपनीची माहिती आणि कंपनीच्या पगाराच्या ऑफरची कॉपी दिली. एक जगविख्यात सॉफ्टवेर कंपनी आणि दुसरी कॉंटॅक्ट सेंटर इंडस्ट्री मधली दादा कंपनी. पॅकेज दुसर्‍या कंपनीनेच चांगल दिल होत पण ते नाकारून माझे वर्गमित्र (क्लास मधले) निघून गेले.

मी म्हटला ठीक आहे प्रत्येकाने आपआपल ध्येय ठरवला असत, काही करायची हीच उमर असते, पण हे त्याना सरळ सांगता आल असता तिला पण नाही..ते निघून गेले त्या अर्जाला कचरापेटी दाखवत. वाईट वाटला थोड…असो

अजूनही आमच क्षेत्र (मी कॉंटॅक्ट सेंटरलाच काम करतोय गेली अडीच वर्ष) हे समर/टाइमपास/लो-प्रोफाइल जॉब च्या पुढे गेलाच नाही खुप जणांसाठी. त्यात माझे आई-बाबा पण आहेत म्हणा. त्याना पण नकोय मी इथे काम केलेला..सारखे सांगतात दुसरीकडे बघ नोकरी. कोणी विचारला आम्हाला तुझ्या जॉब बद्दल तर काय सांगायाच? आयुष्यभर नाइट शिफ्टच करणार काय? मुलगी कशी मिळणार तुला लग्नाला? (हा आईचा ठरलेला प्रश्न)

खूप गमती, अनुभव मी आपल्या समोर मांडले ह्या ब्लॉग मधून जसे..वन नाइट @ कॉल सेंटर, डू नॉट डिस्टर्ब, आणि अजय पलेकर आलेच नाही.., How may I assist you today?

तुम्ही त्याना भरभरून दाद पण दिलीत. पण मला आज तुमच्या मनातल ह्या इंडस्ट्री बद्दलच खर मत जाणून घ्यायचा आहे. तुमचा मित्र/मैत्रिणी, मुलगा/मुलगी जर इथे जॉइन व्हायचा विचार करत असेल तर तुमचा स्टॅंड काय असेल? अगदी बिनदिक्कत लिहा कॉमेंट मध्ये. No Hard Feelings..बिंदास लिहा..चला तर मग

आणि अजय पलेकर आलेच नाही..

गुरुवार, दिनांक ११, फेब्रुवार…

फ्लोअर वर जास्त काम नव्हता..नेहमीसारखा वेळेत आरटीए (Real Time Attendance) पंच करून माझ्या पॉड वर येऊन बसलो..मस्त लाउड म्यूज़िक चालू होत..कॅंटीनवाल्या राजूला सगळ्यांसाठी चहा आणायला सांगितला. मस्त गरमागरम वाफ़ळता चहा (संध्याकाळी ६ वाजता बर का? हे माझ लॉगिन टाइम) घेत आमचे अप्लिकेशन्स उघडू लागलो. मग इम्रान तुकडा चकली घेऊन आला, म्हणाला साला भूक लगी है, मग एकाने वेफर्स, मग चिवडा अशी खाद्य मेह्फील जमली.

तेवढ्यात आमचा सीनियर टीम मॅनेजर आला अबे #%^$#@,  अजय पलेकर आने वाला है साइट विज़िट पे. झालं हातचा घास तसाच टाकून आवाराआवर सुरू केली…(सॉरी शिव्या खूप देतो आम्ही फ्लोअर वर  so those are censored :))

आता अजय पलेकर कोण, अहो माझ्या कंपनीचे कंट्री मॅनेजर, आमच्या कंपनीच दोन वेगळ्या कंपनी टाय-अप झाल्यावर एक संयुक्त असा हा कंट्री मॅनेजर अमेरिकेतून आला आहे. टिपिकल मॅनेजमेंटवाला चेहरा, अंगात नेहमी ब्लेझर, मस्त ताडमाड उंची, शिस्त प्रिय असा हा माणूस. अडोबी  (Adobe) मध्ये असताना एकदाच अजयशी बोललो होतो. त्याननंतर अजय आम्हाला फक्त साइट ग्रूप ईमेल मधूनच भेटायचे.ह्या माणसाने बीपीओचा चेहरामोहरा बदलायच असा निश्चय केलाय की काय सांगू, सोमवार ते गुरुवार जीन्स न घालणे, चप्पल घालून यायला बंदी, डोक्यावरच्या टोप्या नाही, सिगरेट नाही, मोबाइल ही नाही (हो आम्हाला मोबाइल नाही नेता येत प्रॉडकक्षन फ्लोरवर) (No Pens for voice agents as they take online orders for Cx). असे निर्णय घेतले त्याने आल्याआल्या आणि नियम तोडणारा सरळ बडतर्फीला पात्र 🙂

तर मी कुठे होतो? हा साइट विज़िट. आमच्या सगळ्या डेस्क वरुन पेपर्स, बॉट्टेल्स, टी कप्स गायब पाच मिनिटात. मग अजय यायच्या आधी आमचा एसडीम (Service Delivery Manager) आनंद जानी राउंडवर आला, सगळे रिपोर्ट्स बघून आम्हाला ब्रीफ केल. न जाणो अजय ने काही प्रश्न विचारले आम्हाला तर. मग तो प्रत्येक पॉड वर जाउन मोबाइल आहे की नाही बघू लागला. कॅमरा नसलेला मोबाईल असेल, तर निदान बंद तरी असावा. कॅमरावाला मोबाइल तर ऑफीस आवरत आणू पण शकत नाही. इम्रानच्या डेस्कवर आल्या आल्या आनंद ओरडला, इश्यू हिम अ वॉर्निंग लेटर, सगळे बघत राहीले. त्याने गोल गळ्याचा टीशर्ट घातला होता, बिचारा फसला 🙂

सगळ तय्यार, फ्लोरवर सगळे लाइट चालू (आम्ही काही बंद ठेवायचो, झोप नीट लागावी म्हणून :P). न्यूज़ आली होती की बाजूच्या फ्लोरवर अजय आलाय आणि त्याने दोन एजेंट्सला घरी पाठवले कॅषुयल्स घातले होते वीकडेसमध्ये म्हणून, एकाला मेन गेट वरुन घरी पाठवला होता कारण तो सिगरेट पीत होता, म्हटल आज इम्रानला टाटा करावा लागणार. आम्ही सगळे आमच्या फ्लोअरच्या दरवाज्याकडे बघत कस्टमर्स अटेंड करत होतो. दोन तास झाले म्हटल, हा करतोय तरी काय? म्हणून आमचा टीम मॅनेजर बघायला गेला तिथे आणि आला दोन मिनिटात.

अबे, अजय चला गया २० मिनिट पेहले..हे हे हे

हवा टाइट करून गेला तो आमची ३ तास. इम्रानने अल्लाला शुक्रिया अदा केला आणि लगेच चहा, कॉफी और कुछ खाने के लिये लेके आ रे अशी ऑर्डर सोडली राजूला.

साला टेन्शन मैं भूक बहोत लगती है ना? सुहास तू कुछ खायेगा?  :):)

– सुझे 🙂