IPv 6.0

गेल्या काही वर्षात आपल्या रोजच्या वापरातलं इंटरनेट असं काही लोकप्रिय झालंय, की आजच्या घडीला ज्याला इंटरनेट माहित नाही तो अडाणीचं ग्राह्य धरला जातो. मी जेव्हा अकरावीत होतो तेव्हा, सायबर कॅफेमध्ये जाऊन पहिल्यांदा माझा ईमेल एड्रेस बनवला होता याहूवर. तेव्हाची परिस्थिती आणि आजची परिस्थिती यात आता पार जमीन आसमानाचा फरक झालाय. अतीव संशोधन करून विकसीत केल्या गेलेल्या प्रणाली, नवीन तंत्रज्ञान यामुळे वाढलेली स्पर्धा यामुळे इंटरनेट सहजतेने उपलब्ध होऊ लागलं. जेव्हढ्या प्रचंड प्रमाणावर याचा वापर सुरु झाला, तसच काही गोष्टीवर निर्बंध येऊ घातलेत लवकरच, जे आपल्याला जगभर पाहायला मिळतील ह्या वर्ष अखेरीस.

आपल्या पीसीचा वर्ल्ड वाईड वेबवर असलेला पत्ता (आयपी एड्रेस) आता नवीन रुपात दिसणार आहे. नवीन रुपात म्हणजे सांगतो ना, प्रश्न आणि उत्तर अश्या पद्धतीने.

आयपी (इंटरनेट प्रोटोकॉल) एड्रेस म्हणजे नक्की काय?

आपण १९८२ पासून जगभर ही अंक ओळख वापरतोय. आयपी एड्रेसची साधी सरळ सोपी व्याख्या म्हणजे – वर्ल्ड वाईड वेब (इंटरनेट) वर तुमच्या संगणकाची असलेली सांकेतिक ओळख अंकांच्या स्वरुपात. हे अंक तुमच्या संगणकाला जागतिक नेटवर्कशी (डिजीटल स्वरुपात) जोडण्यास आणि माहिती आदानप्रदान करण्यात उपयुक्त ठरतात.

आयपी एड्रेस ४.० नक्की कसा असतो?

आपण सध्या जे आयपी एड्रेस व्हर्जन वापरतो ते आहेत IPv4. ह्या आयपी एड्रेसमध्ये चार क्रमांक असतात, जे प्रत्येकी तीन अंकी असतात. हा साधारणपणे XXX.XXX.XXX.XXX असा असतो (उदारणार्थ १७२.८.९.०). ह्यात “X” च्या जागी ० ते २५५ ह्या मधले कुठलेही अंक असू शकतात. ह्यामध्ये प्रत्येक तीन अंकी क्रमांक ८ बीट्सचे असतात. बीट्स हे एक मापक आहे संगणक गणिती प्रणालीचे, ज्यात प्रत्येक अंक त्या उपकरणात डीजीटली किती माहिती साठवलेली आहे त्याची जागा दर्शवितो. त्यानुसार आयपी व्हर्जन ४.० मध्ये ८+८+८+८=३२ बीट्स आहेत.

आयपी एड्रेस व्हर्जन ६.० ची गरज ती काय?

वर दिलेल्या माहितीनुसार ३२ बीट्सचा असलेला आयपी एड्रेस व्हर्जन ४.० आपल्याला ४,२९४,९६७,२९६ इतके युनिक पब्लिक एड्रेस देऊ शकणार होता. आता इतक्या प्रमाणात इंटरनेटचा वापर वाढल्यामुळे साहजिकच जितके कॉम्बिनेशन्स आपण वापरू शकत होतो ते संपू लागलेत आणि तेव्हाच इंटरनेटच्या पुढच्या पिढीची म्हणजेच आयपी एड्रेस व्हर्जन ६.० ची सन १९९५ मध्ये निर्मीती करण्यात आली.

आयपी एड्रेस व्हर्जन ६.० कसा असतो आणि याचे फायदे काय?

इंटरनेटची पुढची पिढी व्हर्जन ६.० खुप संशोधनातून तयार केली गेली आहे. व्हर्जन ४.० च्या तुलनेत व्हर्जन ६.० मध्ये १२८ बीट्सची क्षमता आहे. हे तयार करताना मागील व्हर्जनमधल्या तीन अंक स्वरुपात बदल करून तो चार अंकी करण्यात आला आणि चार क्रमांक वाढवून ८ करण्यात आले. म्हणजेच चारपट जास्त आयपी एड्रेस आपल्याला मिळतील. हा साधारपणे XXXX:XXXX:XXXX:XXXX:XXXX:XXXX:XXXX:XXXX अश्या फॉर्ममध्ये दिसेल (उदाहरणार्थ – 3ffe:1900:4545:3:200:f8ff:fe21:67cf). आपणास फरक जाणवेल की जुन्या व्हर्जनमध्ये दोन अंकांच्यामध्ये डॉट (.) होता आणि इथे कोलन् ( : ) आहे. ह्यामध्ये अजून एक महत्वपूर्ण केलेला बदल म्हणजे, ह्या आयपी एड्रेसमध्ये अक्षरसुद्धा असतील अंकांबरोबर A to F पर्यंत. ह्यामध्ये एक चार अंकी क्रमांक हा १६ बिट्सचा असणार (अंक आणि अक्षर असल्याने) आहे. त्यामुळे १६+१६+१६+१६+१६+१६+१६+१६=१२८ बिट्स. ह्या प्रकारच्या आयपी एड्रेस व्हर्जनमुळे जगभर नवीन ३४०,२८२, ३६६,९२०, ९३८,४६३,४६३,३७४,६०७,४३१,७६८,२२१,४५६ इतके युनिक आयपी उपलब्ध होतील. 🙂

आयपी एड्रेस व्हर्जन ६.० कधी पासून उपलब्ध होईल?

ह्या वर्ष अखेरीस जगभर व्हर्जन ६.० वापरायला सुरुवात होईल. अमेरिकेत मागच्यावर्षी नोव्हेंबरमध्ये दोन शहरात आमच्या कंपनीने व्हर्जन ६.० देण्यास प्रायोगिक तत्वावर सुरुवात केली होती. सुरुवातीला थोडा गोंधळ उडाला होता, पण मग सगळ सुरळीत झालं. आपल्या भारतातसुद्धा फेब्रुवारीपासून हे काम सुरु झालंय.

हे वापरण्यासाठी आपल्याला बदल करावे लागतील का?

हे व्हर्जन वापरण्यासाठी आपल्याला हार्डवेअरमध्ये काहीही बदल करावे लागणार नाहीत एक मोडेम रिसेट सोडून (काही ठिकाणी राऊटर रि-कॉन्फिगर करावे लागतील इतकंच). जर तुम्ही डायनामिक आयपी एड्रेस वापरत असाल तर तो आपोआप बदलला जाईल, आणि जर स्टॅटिक आयपी असेल तर आपल्याला मॅन्यूअली बदलावा लागेल.

ह्याचे फायदे ते काय?

१. खुप मोठ्या प्रमाणावर युनिक एड्रेस मिळणे.
२. नेटवर्क अजून जास्त सुरक्षित होईल.
३. डीएनएस (DNS – Domain Name System) जी संकेतस्थळ उघडण्यासाठी वापरली जाते ती प्रक्रिया जलद होईल.

काही तोटे –

१. हा आयपी लक्षात ठेवायाला कठीण आहे.
२. लगेच मोठ्या प्रमाणावर होणारा हा बदल काहीसा त्रासदायक ठरू शकतो इनस्टॉल करताना सर्वीस ऑपरेटर्सना.

चलो लेट्स होप फॉर द बेस्ट…बघुया काय होतंय ते 🙂

अधिक टेक्नीकल माहिती हवी असल्यास इथे भेट देऊ शकता – http://en.wikipedia.org/wiki/IPv6

– सुझे

पहिला वाढदिवस :)

मनाला उधाण येऊन आज एक वर्ष झाला.

कळलच नाही की एक वर्ष कस पटकन निघून गेल. नियमीत ब्लॉगिंग करेन की नाही याबाबत आधी शंका होती, पण काही तोडकमोडक खरडत राहिलो. माझा हा उत्साह वाढवणार्‍या सर्व मित्रमंडळी, वाचकांचे मनापासून आभार.

पहिला वाढदिवस...
असाच लोभ असावा.  :)

धन्यवाद,

सुझे

Adobe Creative Suite 5.0

अडोबी (Adobe भारतात ज्याला अडोब म्हणतात) ग्राफिक आणि मल्टिमिडीया अॅप्लीकेशन निर्मिती करण्यात एक नंबर हे आपण जाणतोच. जगभर ख्याती मिळवलेली त्यांची सॉफ्टवेर माहीत नाही असा कोणीच नसेल. पीडीफ, फ्लॅश प्लेयर, शॉकवेव प्लेयर, फॉन्ट्स, इमेजिंग आणि मीडीया एडिटिंग प्रॉडक्ट्स काय काय बनवते ही कंपनी आणि तेही एकडम अप टू डेट. फ्लॅश प्लेयर, शॉकवेव प्लेयर, फॉन्ट्स नसतील तर वेब पेजस नीट बघता पण येणार नाहीत. आडोबी पीडीफ हे त्यांच सगळ्यात जास्त गाजलेला प्रॉडक्ट. डॉक्युमेंट्सला सहजरीत्या, कमी जागेत आणि प्रोफेशनल लुक देण्याच काम ह्या अॅप्लीकेशन ने केला.

१२ फेब्रुवारी २००७ रोजी जेव्हा SGSI  जॉइन केला लोवर परेलला तेव्हा मला सुतराम कल्पना नव्हती की मी अडोबीसाठी काम करतोय. आम्हाला आमच्या क्वालिफिकेशनच्या आणि सेलेक्षन प्रोसेस नंतर वेगळा करण्यात आल होत पहिल्याच दिवशी. Induction रूम मध्ये एक फिरंग बसला होता जाडया, बटल्या, पण सुटाबुटात, लॅपटॉपशी खेळत. आम्ही कुजबुजतोय, शिव्या देतोय, सुरू कर रे बाबा काय ते एकदाच सांग काय करणार आम्ही? तेवढ्यात त्याने टाळी मारली आणि रूम मध्ये अंधार आणि प्रोजेक्टर लावला गेला. वेलकम स्लाइड संपल्यावर नेक्स्ट स्लाइड वर खाली दिलेला लोगो आला.

Better By Adobe

मग डियौन नॅश (तोच तो फिरंग) त्याने असा प्रेज़ेंटेशन आणि इंट्रो दिला आमच्या प्रोसेसचा मानला. आम्हा सर्वांसाठी तो एक मल्टीटॅलेन्टेड डॅन बाबा होऊन बसला होता 🙂 त्याने आम्हाला ट्रेनिंग दिला प्रोसेसचा आणि आम्ही प्रोसेस यशस्वीरित्या दोन वर्ष आणि ३ महिने सांभाळला. आम्ही Adobe Creative Suite 3.0 (CS3) आणि Adobe Creative Suite 4.0 (CS4) सपोर्ट करायचो. त्यांच्या अडोबीची नवीन नवीन प्रॉडक्ट्स आणि त्यातून साकारलेली क्रियेटिविटी बघून तोंडात बोट घातली अक्षरशः…आज खास ही आठवण काढतोय कारण मला आताच अडोबीकडून इन्विटेशन आलय Creative Suite 5.0 (CS5) च्या लॉंचचा.

तुम्ही हे लॉंच घरबसल्या देखील बघू शकता..त्या साठी खाली दिलेल्या लिंकला क्‍लिक करा..क्रियेटिव लोकांच्या क्रियेटिविटी ला मन:पूर्वक दाद द्या.माझ्या शुभेच्छा अडोबीला..

Click Here for Registration

Countdown and Tweets for Adobe CS 5.0

Join Facebook Community Here