खादाडीवर बोलू काही…

जेव्हा पासून ब्लॉग लिहायला घेतला वेगवेगळे विषय वाचनात आले, त्यातला एक अल्टिमेट विषय आणि मला खास आवडणारा अगदी रुचकर, खमंग, तोंडाला बादलीभर पाणी आणणारा म्हणजे खादाडी. इतके दिवस झाले सागर सारखा सारखा विचारतो एवढ्या वेगवेगळ्या पोस्ट टाकल्यास खादाडीवर का नाही लिहीत तू? म्हटला आज काही तरी लिहावच..सागरा, ही पोस्ट खास तुझ्या आग्रहास्तव बर 🙂

ह्या विषयावर लेखन करणारे मात्तब्बर आणि अनुभवी असे अष्टप्रधान मंडळ आहेच आपल्याकडे. त्यानी केलेल्या खादाडी वाचून निषेधाची अशी लाट सुरू झाली ह्या ब्लॉगविश्वात की विचारू नका. (त्यानी टाकलेल्या पोस्ट आठवल्या बघा परत निssssषेssssध सगळ्यांचा …हे हे हे) तस किचन हा माझा आवडता विषय, घरात असलो की इथे जास्त रमतो मी. सगळा जेवण करू शकतो, नॉनवेज-वेज (कृपया वधुपक्ष वाचत असेल तर हा एक प्लस पॉइण्ट आहे बर माझ्यात : )

असो, आईच्या आजारपणात जेवण करण शिकलो मी, कारण बाबांच ऑफीस, भावाची शाळा ह्या मुळे मलाच ते करणा भाग होता. साठेला असताना अटेंडेन्सची काळजी अजिबात नव्हती, मग मी फक्त प्रॅक्टिकल्स करून घरी धुम. आजही तिथल्या प्रोफेसर मंडळींना मी तिथे होतो या बद्दल शंका वाटते. घरी आल्यावर कूकरमध्ये भात, डाळ लावून मग त्याला फोडणी देण एवढ भारी जमायाच मला. मग भाताची खिचडी, पुलाव आणि मसालेभात आणि वरणाची आमटी, सांबार, तडका डाल असा अपग्रेड होत गेला. जेवढा करायची आवड आहे तेवढीच खायची पण. मग कधी काही चुकल, बिघडला करताना की ते खाण क्रमपात्रच होतच. घरात मॅगी नूडल्स हा प्रकार फक्त मला आणि भावालाच आवडतो, त्यामुळे मला तिथे प्रयोग करायला भरपूर वाव मिळाला 🙂 मग त्या टू मिनिट मॅगीला तयार करायला १५-२० मिनिटे लावायचो. प्रकार पण भारी त्यात हेरंबने केलेले प्रकार आहेतच, पण वर माझे..सेजवान मॅगी, एग मॅगी, सांबार मॅगी (हा ऑफीसमध्ये केलेला प्रकार) 🙂

आता ऑफीसच नाव आला म्हणजे धम्माल, आम्ही मध्यरात्री-पहाटे खाणारे लोक, म्हणजे उसाच्या टाइमनुसार म्हणाना..लोवर परेलला जेव्हा कमला मिल्समध्ये तीन मजली ऑफीस होत आणि तिथला कॅंटीन लाजवाब. तेव्हा नवीन नवीन ह्या क्षेत्रात आल्यामुळे जरा दबकूनच असायचो. जेवण टाळायचो, घरूनच काय ते खाउन मग तिथे ज्युस किवा ब्रेड बटर खायचो. मग जसे दिवस पुढे गेले तसा आपला रुबाबपण हा हा …जेवण नाही खायचो पण जेवणासोबत दिली जाणारी स्वीट डिश ४-४ खायचो. मॅनेजर लोकाना एकदाच स्वीट डिश मिळणार असा सांगून त्यांना भीक न घालणारा आमचा कॅंटीनवाला रघु आमच्या पुढयात नुसती आरास लावायचा, शिरा, जिलेबी, बासुंदी, बर्फी, गुलाब जामून…बस अजुन नाही सांगू शकत भूक लागली 🙂  त्या रघुला किती दुवा देतो मी अजुनपण.

This slideshow requires JavaScript.

मग ऑफीस बदलला, अंधेरीला आलो. अंधेरीला ऑफीस छोटाच असल्याने तिथे कॅंटीनमध्ये उभा राहून स्वत:ला जे वाटेल ते बनवून घ्यायचो किवा बनवायचो, लोक बघत राहायचे हा काय करतोय पण मी आपला खुशाल चालू.  त्याच दरम्यान शाळेच्या आणि कॉलेजच्य ग्रूपच रियूनियन झाला, मग भेटायला निरनिराळी हॉटेल्स आमचे अड्डे बनत गेले. ५डी काय, बीबीसी काय, बंजरा काय, बॉम्बे ब्लूज काय, कोबे काय…आठवला की कसा भरून येत सांगू (भरून पोट येतय याची नोंद घ्यावी… ;)) प्रत्येकवेळी नवीन नवीन हॉटेलमध्ये जेवायला जायचा यावर आमचा भर. कुठल्या हॉटेलमधली डिश आवडली की त्यातील सगळे जिन्नस खाताना लक्षांत ठेवायचे आणि घरी गिनीपिग सारखा प्रयोगुन पहायचो, याची मला नितांत आवड 😉

आमच्या खाण्याच्या जागा पण अश्या की गूगल मॅप्स मध्ये शोधून पण न सापडणार्‍या, मागे यावर लिहल होत. अजुन म्हणजे ट्रेकला केलेली खादाडी विशेष करून जास्त लक्षात राहिली मग ती रोहणा ने विसापूरला आणलेली पुरणपोळी, नारळाच्या वड्या, कचोरी, की राजमाचीला रात्री १ ला खाल्लेली पीठल भाकरी, पेठ ला खाल्लेला नुसता वरण भात आणि कच्च तेल, मीठ..स्वर्ग सुख म्हणतात ते हेच…अहाहहा बस थांबतो इथेच, जरा जेवून येतो. आज जरा लवकरच भूक लागलीय.. :)))))

पॉइण्ट टू बी नोटेड – मी जिथे जिथे खाल्लय ते सगळा व्यवस्थित पचवलय आणि तृप्तिचा ढेकरही दिलाय, त्यामुळे त्याची काळजी करू नका, माझ्या पोटात दुखणार नाही एकट्याने खादाडी केली म्हणून आणि अजुन तरी  कोणाच्या पोटाबद्दल तक्रार नाही माझ्या हातच खाउन …हे हे हे.

आपलाच खादाड सुझे

🙂