माझ्याबद्दल थोडेसे…


ब्लॉग सुरू करून ६-७ महिने झाले, तरी माझ्याबद्दल या सदरात फक्त एक कविता कॉपी-पेस्ट करून ठेवली होती पण आज ह्या ब्लॉग आणि माझ्या बद्दल काही सांगणार आहे आपल्याला…

मी सुहास झेले..वय वर्ष ३०…राहणार मुंबई

मी मूळचा नागपूरचा (अमरावती आणि यवतमाळ सुद्धा), पण शिक्षण, नोकरी मुंबईत. त्यामुळे हाडाचा मुंबईकर. ट्रेकिंग, भ्रमंती, कंप्यूटर्स, वाचन, जेवण बनवणे आणि खाणे 🙂 असे माझे छंद. वेळ मिळेल तसे छंद जोपसतो. मित्र परिवार खूप मोठा झालाय. जे मला शाळेपासून ओळखत आलेत, ते मित्र तर म्हणतील हा ब्लॉग लिहिणारा सुहास, तो सुहास नाहीच. आता एकदम बदललाय. शाळेतला लाजरा, काही न बोलणारा सुहास, आज नुसती वटवट करतोय. ह्याचं श्रेय नक्कीच मी माझ्या काही जिवलग मित्र-मैत्रिणिना आणि माझ्या कॉंटॅक्ट सेंटरच्या नोकरीला देईन. या सगळ्यांना सांभाळून घेत त्यांच्या सुख-दु:खाचा वाटेकरी होऊन गेलोय.

सॉफ्टवेअरमध्ये रखडत रखडत शिक्षण पूर्ण केलं, पण ते कोडिंग आपल्याला जमणार नाही हे आधीच कळल्यामुळे त्यात जास्त रुची नाही घेतली. सॉफ्टवेअरमध्ये पैसा चिक्कार, पण आपल्या मनाने तो कधीच नाकारला होता. हार्डवेअर आणि नेटवर्किंगसाठी मी वेडा आहे, त्यामुळे काही नेटवर्किंगमध्ये शिकायला मिळेल ह्या उद्देशाने सीफी (Sify) जॉइन केलं. तिथे ब्रॉडबॅंड नेटवर्क सेट अप करायचं काम होत. पगार कमी, पण रुजू झालो. मग तेथून अनुभव घेऊन स्ट्रीम ग्लोबलमध्ये (SGSI)  रुजू झालो तो आजपर्यंत. कस्टमर सर्विस, टेक्निकल सपोर्ट, फ्लोर सपोर्ट. एसएमई, असिस्टेंट ट्रेनर असा असा पुढे येत गेलो. खुप मज्जा येते काम करायला, पण घरी माझी ही नोकरी कोणालाच पसंत नाही, पण काय करणार…असो.

तर हा ब्लॉग मन उधाण वार्‍याचे..खरचं मी हे इतक्या निष्ठेने करेन, याची मला शाश्वती नव्हती. लिखाणाची जास्त आवड नव्हती मला, पण एकदा मराठी ग्रूप मेल्स मधून एक लेख आला शेवटचे भांडण आणि “तो”,”ती”, त्यांची प्रेमकथा, तसल्या नजरा आणि आयुष्य … लेख मनापासून आवडला, लिंकचा मागोवा घेतला, तर मला मराठीब्लॉग्स.नेट ह्या मराठी ब्लॉगर्सच्या पंढरीत. माझा आधी गूगलवर एक ब्लॉग होता, म्हणजे आहे अजुन पण तिथे त्यावेळी मला ईमेल मधून आलेल्या कविता, लेख अपलोड करून ठेवायचो, पण इथल्या ब्लॉगर्स मित्र त्यांचा उत्साह, त्यानी मांडलेले नवीन नवीन विषय, एकदम हटके, कधी कधी डोळ्यात पाणी आणणारे अनुभव, तर कधी हसता हसता पुरेवाट, तर कधी काढलेले वैचारिक चिमटे…एक मोठ कुटुंब या मायाजालावर, मग मलाही मोह आवरता आला नाही, म्हटलं चला आपण पण सहभागी होऊया. जमेल तसं नक्कीच थोडाफार लिहायचा प्रयत्न करेन.

म्हणतात माणसाच्या विचारानी त्याच व्यक्तिमत्व दिसतं, पण मला असं काहीच सिद्ध करायच नाही. विचार आले की मांडायचे, मगच ते खरे. उसने विचार मांडून कोणीही मोठेपणा दाखवू शकतो. मी आहे तो असा साधा, तुटक-मुटक काही लिहाणारा. मग ते राजकीय घडामोडींवर असो, काही रोजच्या गोष्टी असोत, तंत्रज्ञान असो, कथा असो किंवा माझे स्वतःचे अनुभव. जे काही मनात आहे, ते सांगायचा प्रयत्न करतोय अर्थात विषय आणि वर्तमानाचं भान ठेवूनच..

 ह्या ५-६ महिन्यात खूप खुप नाती जमली ऑनलाइन. महेंद्रकाका, हेरंब, अपर्णा, कांचन, रोहन, आनंद, देवेन्द्र, अजय, सोनल, निखील, आशिष, विशाल, हेमंत, दीपक, सचिन, तृप्ती, सागर, विभि…ह्या सर्वांचे ब्लॉग काही वाचनीय ब्लॉग्स ह्या शिर्षकाअंतर्गत ह्याच ब्लॉगवर डाव्या बाजूला बघता येतील …

तुमच्या शुभेच्छा, आशीर्वाद असेच पाठीशी राहू देत..
तुमचाच,
(उधाणलेला) सुहास

81 thoughts on “माझ्याबद्दल थोडेसे…

  1. sudhirnikharge

    मित्रा!! फार छान लिहिले आहेस स्वत:बद्दल… पटायला काहीच हरकत नाही!

      1. priya suhas, man udhaan waaryaache mee nehamee waachato.malaa awaDate. maajhyaabaddal thodese he aaj waachale.anujaa he naav oLakheeche waaTale hee Anujaa koNatee? aujaa kanekar behere tar naahee naa?tee tar punyaat asate. Charkoplaa maajhaa block aahe,waaparaat nahee tulaa veL asel tewhaa mee tiaDe yewoon tulaa bheToo kaa?

        1. नमस्कार प्रधानकाका,
          आपले ब्लॉगवर स्वागत. अनुजा ताई ह्या मस्कतला असतात आणि एक अनुजा नावाची मैत्रीण पालघरला राहते. मी अनुजा कणेकर ह्यांना ओळखत नाही. आपण भेटू नक्कीच, मी सेक्टर १ ला राहतो.

          अशीच भेट देत रहा.. !!

  2. Kunal Hindalekar

    Mitra… Apratim site banavalis aahe,

    Ek Salla aahe, ki ,, Shiva charitra varti suddha kahi tari namud karave… Samarth Ramdasaanhya baddhal hi paahije tujhya saait war, tarach kharya arthane hi saait PURNA HOOIL ASE VATATE…

    || JAI MAHARASHTRA ||

  3. सुहास, मित्र स्वतःची अप्रतिम ओळख करून दिल्याबद्दल खरच मनापासून धन्यवाद!!! एक वेगळाच परिचय आहे हा.!!!

    1. धन्यवाद रविन्द्र…मी आपल्या ब्लॉग चा नियमीत वाचक आहे. असाच लोभ असावा 🙂

  4. नमस्कार,
    तुमचा ईमेल ऍड्रेस दिलात तर तुमच्याशी संपर्क साधता येईल.

    1. अरे वाह साक्षात निकम साहेब 🙂
      थॅंक्स, जमेल तसा करतोय. तू बोल नवीन जॉब जॉइन केलास, विसरला नाहीस ना?

  5. अरे ही पोस्ट वाचलीच नव्हती…ब्लॉगवर इतकं सगळं खरं मी लिहू शकणार नाही..का माहित नाही अजून इतकं सगळं पर्सनल सांगायला थोडी भितीच वाटते..पण तुझं प्रामाणिक लिखाण खूप भावलं….नववर्षाच्या शुभेच्छा आणि लिहिते राहा….

    1. असाच ग एक प्रयत्‍न..आवडल्याच आवर्जून संगितलस म्हणून थॅंक्स नाही म्हणत. असाच लोभ असू देत 🙂

  6. मस्त! एक नंबर!!
    सुहासजी, मीपण अगदी तुमच्या सारखाच! मीसुद्धा आउटसोर्सिंग मध्येच आहे…अर्थात अनेकांचा रोष पत्करूनच! जास्त विचार नाही करायचा कुणाचा..जस्ट से, ‘आल इझ वेल!!’….तुमचे लिखाण आवडले.

  7. Manisha Randive

    Tumche jevadhe lekh vachale ahet ataparyant tyanantar tumhi ji tumchi olakh karun dilit ti tantotant julate.

    Khup chan olakh keli.

    1. धन्यवाद मनीषा..ब्लॉगवर स्वागत…
      अशीच भेट देत रहा आणि मला अरे तुरे केलत तर बर 🙂

  8. मित्रा, खरे सांगू…..विश्वास बसत नाहीये….तू असे काही लिहू शकतो….एक just link म्हणून click केले…facebook वरून….एकदम मस्त…..लगे रहो…आपण एकत्र काम केले आहे, पण असे कधीच वाटले नाही कि तू लेखक वगेरे असशील.:)

    1. धुंडी, काय मित्रा मस्करी करतोस गरीबाची..काही लेखक वगेरे नाही आहे मी..फक्त लिहतो जे मनात येत ते..
      ब्लॉगवर स्वागत अशीच भेट देत रहा…

  9. नमस्कार! मी अद्वैत. सर्वप्रथम तुम्हाला खूप खूप शुभेच्छा! खरच तुम्ही खुपच सुंदर लिहिता. Asta La Vista !! हा लेख वाचताना तर खरच मजा आली. well सध्या आम्ही मराठी कॉर्नर नावाचे एक नवे दालन चालू केले आहे ज्याचा उद्देश असा की तुम्हासारख्या प्रतिभावंत मराठी लोकांना एकत्र एका छताखाली आणायचे की जेणे करून तुमच्या विचारांचे आदान-प्रदान होईल आणि अशा पद्धतिने या माय मराठीची सेवा होईल. खरे म्हणले तर मी तुम्हाला प्रत्यक्षात मेल करूनच कळवणार होतो पण तुमचा संपर्क मेल पत्ता कोठेच मिळाला नाही त्यामुळे इथे लिहितो आहे.

    आम्ही आशा करतो की आपण आमच्या निमंत्रणाला मान देऊन मराठी कॉर्नरचे सभासद व्हाल!

    कळावे!
    आपला विश्वासू,
    अद्वैत कुलकर्णी

    1. अद्वैत सर्वप्रथम ब्लॉगवर स्वागत आणि तुमच्या प्रतिक्रियेबद्दल आभार. 🙂
      आपण करत असलेल्या प्रयत्नांना माझ्या शुभेच्छा..मी काही प्रतिभावंत असा कोणी नाही, जे वाटत ते लिहतो, खरड्तो म्हणा आपल्याला अनेक अशी मंडळी मिळतील जी उत्कृष्ट लिखाण करतात, त्याच्या ब्लॉग लिंक्स आपल्याला मिळतील माझ्याच ब्लॉगवर..
      आपल्याला दिवाळीच्या फराळी शुभेच्छा…

  10. खूप खूप छान लिहतोस रे तू..
    खूप खूप आवडला मला तुझा स्पष्टवक्तेपणा, खूप कमी लोक असतात अशी..मला निलेश चौधरीकडून ह्या ब्लॉगची लिंक मिळाली..खुप खुप लीह.. मला तुझा ईमेल अड्रेस मिळेल का? ..

    1. शिल्पा, ब्लॉगवर स्वागत. तुला लिखाण आवडला आणि तू ते आवर्जून संगितलस ह्यातच सगळा आला..मी तुला ईमेल केला आहे. निलेश काय करतोय सध्या? त्याला सांग मला कॉंटॅक्ट करायला. खूप महिने झाले त्याच्या पत्ता नाही..

      अशीच भेट देत रहा. 🙂

  11. हे सुहास ब्लॉग मस्त आहे ,आवडला मला! आता मी नेहमीच भेट देणार आहे ह्या ब्लॉगला .पुढील वाटचालीकरता शुभेच्छा !

  12. गुरुनाथ

    अबे, तु तो गाववाला निकला बे!!!!, अमरावती, अकोला ही माझी गावे…. वा माय!!!! निसते गावाचे नाव वाचुन मला रोडग्या पासुन ते शेंगोळ्यापर्यंत सगळे आठवले यार!!!

    1. गुरु,
      मला पण आठवले की रे सगळ 🙂
      आता अमरावतीला कोणी राहत नाही आजोबा गेल्यानंतर. सगळे यवतमाळला राहतात. आणि हो ब्लॉगवर स्वागत. अशीच भेट देत रहा.

  13. kashmira

    <>

    स्वतःची ओळ्ख खुप छान करून दिली आहे तुम्ही.
    तुमचे लेख वाचले आणि आवड्ले सुद्धा. आता मी नियमीत भेट देणार आहे ह्या ब्लॉगला. पुढील वाटचालीकरता शुभेच्छा !

    असेच लिहीत रहा…….

    1. कश्मिराजी,

      ब्लॉगवर स्वागत. अशीच भेट देत रहा.
      मला अरे-तुरे केलेलं आवडेलं, तुमचे वगैरे शब्द वापरून माझं वजन अजुन वाढवू नका 😉

      पुन्हा एकदा खुप खुप आभार !!

  14. Martand Joshi

    ………उतरत जाणारा सूर्य सागरात पूर्ण सामावला कि जरी अंधार पसरत असला……
    तरीही.
    .
    उद्या परत एकदा सूर्य त्याच क्षितिजावरून आपले किरण पसरवत येणार आहे हि आशा मनात असते.
    पाण्यावर उठणारे तरंग हळू हळू कमी झाले कि मग ‘शांत डोह’ दृष्टीस पडतो आणि तुमच्या सारखा कलावंत जन्मास येतो .
    आमच्यासारख्या वाचकांना अमूल्य शब्द वाचण्यात येतात .अशीच लिखाणे लिहित चला ..
    गोड लिखाणाबाबत धन्यवाद …!!!

    1. मार्तंडजी,

      मी कलावंत वगैरे काही नाही. साधा सामान्य मनुष्यप्राणी आहे 🙂
      आपल्याला माझं लिखाण आवडलं आणि आपण आवर्जून प्रतिक्रिया दिलीत त्यासाठी खुप खुप आभार. अशीच भेट देत रहा !!

  15. Meena Thayalan

    Suhas, Chi. mhanu ka? mi 55 varshanchi 1 Aai, blog lihaycha tharvun lihit gele pan kunala vachayla dhyave ase nahi vatle, pan tuzya sarkhyanche vachayla nakki awdte, blog lihitana marathit lihita yeto pan comments detana te marathi font sapdat nahi, tuzi mahiti khup chchan sangitali ahes,
    take care

    1. मीनाजी,

      अहो मला अरे/तुरे केलं तरी चालेल…तुमच्या ब्लॉगची लिंक द्या नं. मी तरी कुठे धड लिहितोय. एक असंच छंद म्हणून सुरु आहे ब्लॉग. ब्लॉगवर स्वागत. अशीच भेट देत रहा 🙂 🙂

  16. Suhaas–Chaangalaa Lihila Aahes,Tu ! Alakaa,Aparnaa,Anujaa,Tanvi (…………………) Kitti Sahaj~Sundar Lihitaat….Kalaayachyaa Aat Gangaa-Jamunaa Barsaayalaa Laagataat !Keep Writing & Talking,Too.Take Care.~~Chhakuli (praachikulkarni@yahoo.com)

    1. प्राचीजी,

      अहो इतकं हळवं नाही हो लिहिता येत. काहीबाही खरडतो. तुमचे स्वागत आणि अशीच भेट देत रहा… 🙂

  17. तुमच्या ब्लॉग वर भेटी खूप झाल्यात पण कसं आहे ना …. बरेच दा पुस्तक चांगलं असेल तर प्रस्तावनाच वाचायची राहून जाते. ती वाचण्याचा योग आज आला.
    शुभेच्छा.

  18. i m the 13th descendant of shrimant krishnaji raje baandal your history ref are completali wrong
    बांदल व् जेधे शकावाली
    सन १६३० शिवाजी महाराज जन्म
    सन १६३६-दादोजी कोंडदेवला कृष्णाजी बांदल यान्नी हरवले, कृष्णाजी बांदल यांचा मृत्यु .
    म्हणजे कृष्णाजी बांदल व शिवाजी महाराज यांच्या मधे लढाई होने शक्य नहीं .
    वरील मृत्यूचे साल आणखी चार पुरावे दाखवतात
    १-जेधे शकावाली
    २-बांदल घरान्याची तकरीर
    ३-शिवापुरकर शकावाली
    ४-बाजी बांदल यांनी १६३६ मधे केलेला निवाडा (मजहर )
    आत्तापर्यंत सर्वच इतिहास्करानी बांदल फितूर असाच इतिहास लिहलेला आहे.

    वीर शिवाजी colour चैनल वरती २३ डिसेम्बरचा भाग पहा
    त्यामधे शिवाजी महाराज्यान्चे सैनिक कृष्णाजी बान्दलांचा खून करतात .
    सगल्या भारतात बान्द्लांचा खोटा इतिहास पोहचला .

    बाबासाहेब पुरंधरे यांनी कालनिर्णयमधे नविन शोध लावला आहे.
    त्यामधे सुद्धा कृष्णाजी बांदल फितूर दाखवले आहेत
    बान्दलांची तुलना लादेन बरोबर केलि आहे ज्या प्रमाने अमेरिका लादेंला घरात घुसून मारते त्याप्रमाणेच दादोजी कोंडदेव कृष्णाजी बान्दलाना मारतो असे शेवटाच्या पानावर लिहलेले आहे .

    बांदल खरा घराण्याचा इतिहास वैभवशाली आहे पण तो कधी समोरआन लाच नहीं .

    पण बांदल घरा न्यात पुराव्यानिशी कधीच फितूरी जाली नहीं .
    रायजी बांदल ;कृष्णाजी चे नातू यांना पराक्रमा बद्दल पहिली मानाची तलवार दिली.
    पावन खिंदित केलेल्या त्यांच्या सैन्याच्या परक्रममुले ,
    पुढे शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजायत गेले होते त्यावेळी मोगालानी तलेगाव धाम्धेरे जिंकले तेव्हा मोगालाना रोखान्यसथी रायजी बांदल याना पठाव न्यात आले ज्हालेल्या लढाई मधे रायजी बांदल मृत्यु पावले .real history

  19. सुहास,
    मस्त ब्लोग आहे तुझा. आवडला.
    तू मेनू टाकला आहेस तसा तो काही मला जमत नाहीये.
    अतुलच्या ब्लोग वरून हिंडत हिंडत इथे आलो. स्वतः बद्दल लिहिलेले एकदम मस्त. माणूस स्वतः बद्दल लिहितो तेव्हा नक्कीच त्याने आत्मपरीक्षण केले असावे असा माझा कयास आहे.
    माझा हि छोटा ब्लोग आहे. वेळ असेल तर आपल्या नजरेखालून घाला.
    http://sagarshivade07.blogspot.in

    1. सागर,
      कुठल्या मेन्यूबद्दल बोलतोयस? मला सांग जरा आणि हो रिप्लाय करायला अंमळ उशीर झालाय त्याबद्दल क्षमस्व 🙂

      बाकी तुझा ब्लॉग आणि लेख वाचून झालेत मीसुद्धा एक मिपाकर आहेच. अशीच भेट देत रहा 🙂

    1. स्वप्नजाजी,

      खूप खूप आभार.. तुम्हाला आवडलेली काही पुस्तके, त्यातील काही वाक्ये नक्की इथे द्या. वाचायला आवडेल 🙂 🙂

Leave a Reply to सुहास Cancel reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.