तुमच्या अ‍ॅन्ड्रॉईडसाठी…


१९७३ मध्ये मार्टीन कूपरने मोबाईलचा शोध लावला. तेव्हा त्याने कल्पनादेखील केली नसेल की, हे तंत्रज्ञान इतकं झटपट प्रगत होऊ शकेल. सुरुवातीला मोठ्या लोकांची वापरायची गोष्ट म्हणून मोबाईल ओळखले जायचे. कोणाला फोन करायचा तर १५-१६ रुपये मिनिटाला द्यावे लागायचे. आज निव्वळ भारताचा विचार केला तर, लोकसंखेच्या जवळजवळ ६५ ते ७० टक्के लोकांकडे मोबाईल आहेत. ही आकडेवारी अजून मोठ्या प्रमाणात वाढली असेलच, कारण ही २०१० च्या वार्षिक अहवालानुसार केलेली पाहणी होती.

असो मोबाईलच्या इतिहासावर जास्त बोलायचे नाही. आज आपण मोबाईलचा आत्मा…ऑपरेटिंग सिस्टीमबद्दल थोडे जाणून घेणार आहोत. घाबरू नका… काही लेक्चर वगैरे देत नाही. फक्त हल्ली रोजच्या वापरातली अ‍ॅन्ड्रॉईड प्रणालीसाठी, काही उपयुक्त गोष्टी जाणून घेणार आहोत. जसजसे नवीन तंत्रज्ञान आले, तसे मोबाईल प्रगत होत गेले. मोबाईल्स आता स्मार्ट फोन्स किंवा टॅब्लेट पीसी झाले. लोकांच्या गरजा बघून त्यात रोज काही ना काही बदल घडत गेले आणि त्यासाठी अनेक डेव्हलपर्स दिवसरात्र मेहनत घेत आहेत. सुरुवातीच्या काळात करवंदाची (Blackberry) ओढ असायची लोकांना, ती आजही आहे म्हणा….पण त्यांच्या डेटा सर्व्हर्सवरून झालेला वाद बघता, काही कंपन्यांनी सुरक्षेच्यादृष्टीने करवंद हद्दपार करत, स्मार्टफोन्स दिले. आता थोडी माहिती ह्या स्मार्टफोन्सला स्मार्ट बनवणाऱ्या प्रणालीची.

अ‍ॅन्ड्रॉईड (Android)– इंटरनेट जगतात एकहाती वर्चस्व असणाऱ्या गुगलचा सध्याचा हुकुमाचा एक्का. गुगल सर्च, जीमेल, यु ट्यूब, ऑर्कुट, बझ्झ, अश्या एकसोएक सोयी (व्यसनं) देणाऱ्या गुगलने, २००५ साली अ‍ॅन्ड्रॉईड ही कंपनी विकत घेतली. संपूर्णतः लिनक्सवर आधारीत ही प्रणाली, खूप कमी वेळात प्रसिद्ध झाली. सध्या अ‍ॅन्ड्रॉईडची प्रणाली जेली बिन (Jelly Bean) व्हर्जन ४.१ ग्राहकांसाठी उपलब्ध आहे आणि पुढील व्हर्जनसाठी काजू कतली हे नाव देण्यासाठी कँपेन जोरदार सुरु आहे. अ‍ॅन्ड्रॉईड प्रणाली वापरायला अतिशय सोप्पी आणि ह्या प्रणालीसोबत वापरण्यास लाखो ऍप्लिकेशन्स गुगल स्टोरवर ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत

अ‍ॅन्ड्रॉईडच्या आधी सिंम्बिअन (Symbian) ही प्रणाली अनेक फोन्समध्ये वापरली जायची आणि अजूनही वापरली जाते म्हणा. पण नोकीयाने सिंम्बिअनसोबत असलेला आपला करार गेल्यावर्षी मोडीत काढला आणि त्यांनी मायक्रोसॉफ्ट प्रणाली देण्यास सुरुवात केली. तरी काही नवीन फोन्समध्ये नोकीया सिंम्बिअन देत आहेच. कारण ही प्रणाली हाताळायला सोपी आणि विविध प्रकारचे ऍप्लिकेशन्स फार कमी वेळात सिंम्बिअनसाठी उपलब्ध झाले होते. नोकीया अजून तरी एक वर्ष ही प्रणाली ग्राहकांना देणार आहे आणि त्यानंतर ते पूर्णतः विंडोज बेस्ड फोन देणार आहेत. ह्याला कारण म्हणजे अ‍ॅन्ड्रॉईड आणि सफरचंदाचे (Apple) झपाट्याने वाढणारे मार्केट. विशेषतः अ‍ॅन्ड्रॉईड, कारण ऍपल उपकरणांची किंमत तुलनेने भारतात खूप आहे, त्यामुळे खिश्याच्या दृष्टीने अ‍ॅन्ड्रॉईड परवडेबल आहे. अगदी ८–९ हजारापासून ४० हजारापर्यंत अ‍ॅन्ड्रॉईड स्मार्टफोन्स मिळतात. फार कमी वेळात गुगलने ह्या क्षेत्रात मुसंडी मारली आणि त्यामुळे सिंम्बिअनची लोकप्रियता घटू लागली. त्यामुळेच नोकियाने दुश्मन का दुश्मन दोस्त, ह्या तत्वावर सिंम्बिअन बरोबर आपला करार मोडीत काढून मायक्रोसॉफ्टशी हात मिळवणी केली. (बातमी)

सध्या मायक्रोसॉफ्ट विंडोज ८.० आणि मायक्रोसॉफ्ट ऑनलाईन ऍप्लिकेशन स्टोर वर तुफान काम करत आहेत. तज्ञांचे मत जाणून घ्याल तर, पुढील एका वर्षात गुगलच्या तोडीसतोड ऍप्लिकेशन स्टोर बनवण्याचा त्यांनी चंग बांधलाय. ऍपलचे मार्केट स्टोर सुद्धा खूप मोठे आहे, पण तुलनेने त्यांची ग्राहकसंख्या भारतात कमी आहे. तरीसुद्धा अनेक क्रियेटीव्ह ऍप्लिकेशन्समुळे, त्यांनी त्यांचा वेगळेपणा स्मार्टफोन्स जगतात ठसवला आहे. (अवांतर – मी तर पंखा आहे स्टीव्ह जॉब्सचा आणि त्याच्या कंपनीच्या विविध प्रोडक्ट्सचा, पण खिश्याने दगा दिला…. असो !!)

आता पुढे जे होईल ते होईल, पण तूर्तास आपण काही प्रसिद्ध अ‍ॅन्ड्रॉईड मार्केट ऍप्लिकेशन्सची माहिती करून घेऊ. मी Samsung Galaxy S II हा फोन वापरतोय. तुम्ही वापरलेल्या ऍप्लिकेशन्सची माहिती लेखाच्या प्रतिसादात द्या, आणि कुठले फीचर्स तुम्हाला आवडले वगैरे सांगितले तर उत्तम.

१. WhatsApp Messenger – सुरुवातीला गरीबांचा बीबीएम (BBM – BlackBerry Messanger) म्हणून अनेकांनी ह्या ऍप्लिकेशनची थट्टा उडवली, पण आज सर्वात जास्त वापरले जाणारे ऍप्लिकेशन म्हणून ह्याची नोंद आहे. हे ऍप तुम्ही सिंम्बिअन, ब्लॅकबेरी, ऍपल आणि अ‍ॅन्ड्रॉईड अश्या सर्व प्रणालीवर वापरता येते. इंटरनेटच्या सहाय्याने तुमचा मोबाईल नंबर वापरून तुम्ही जगात कोणाशीही संवाद साधू शकता आणि तेही फुकट.

२. M-Indicator – मुंबईकरांसाठी हे सर्वात महत्त्वाचे ऍप. लोकल ट्रेन्सचं टाईमटेबल, मेगा ब्लॉकचे डायरेक्ट अपडेट्स, बेस्ट बसेसची माहिती, रिक्षा आणि काळ्या-पिवळ्या टॅक्सीचे दर पत्रक, मराठी नाटक आणि सिनेमांची माहिती, हिंदी सिनेमांची माहिती, भारतीय रेल्वेच्या PNR स्टेटस जाणून घेण्याची सुविधा अश्या अनेक लोकोपयोगी सुविधांमुळे हे ऍप प्रसिद्ध आहे आणि सर्वप्रकारच्या प्रणालीवर वापरता येते.

३. NewsHunt – अपडेटेड बातम्या तुम्हाला ह्या ऍपमुळे मिळू शकतील. मराठीतील सकाळ, लोकसत्ता, सामना, लोकमत आणि पुढारी ही वृत्तपत्रे तुम्ही वाचू शकता. इतर अनेक भाषांतील वृत्तपत्रेसुद्धा उपलब्ध आहेत.

४. Smart App Protector – तुम्ही वापरत असलेल्या कुठल्याही ऍप्लिकेशन्स परवलीचा शब्द लावून सुरक्षित करू शकता.

५. Wattpad – Free Books & Stories – भरपूर ई-बुक्स आणि कथा संग्रहाचा खजिना. तुम्ही पुस्तके डाऊनलोडसुद्धा करू शकता आणि ऑफलाईन वाचू शकता.

६. मराठीत टाईप करण्यासाठी

A) GO Keyboard आणि देवनागरी प्लगईन

B) PaniniKeypad Marathi IME

C) AnySoftKeyBoard – Devanagari

D) Lipikaar Hindi Keyboard Free

मी चारही प्रकारच्या IME मी वापरून बघितल्या आहेत. त्यातल्यात्यात लिपिकार आणि गो कीबोर्ड आवडले.

७. Hide It Pro – तुमची प्रायव्हसी जपण्यासाठी हा एक प्रकारचा सिक्युरिटी व्हॉल्ट आहे. जिथे तुम्ही तुमच्या महत्त्वाच्या फाईल्स ठेवू शकता. ह्यालाही पासवर्ड असतो.

८. Truecaller – Global directory – नावाप्रमाणे ही एक डिरेक्टरी आहे, पण हे ऍप ऑनलाईन रजिस्टर केलेले फोन नंबर्सचा डेटा वापरते. जसे तुम्ही तुमचा नंबर सोशल साईटवर देता, हे असा डेटा जमा करतात. तसेच इंटरनेटवर स्पॅम केलेले नंबर्स दाखवून, तुम्ही त्यांना परस्पर ब्लॉक करू शकता.

९. Scan – आजवर उपलब्ध असलेला सर्वात जलद क्यूआर कोड (QR Code) स्कॅनर.

१०. Justdial – ही पण एक प्रकारची लोक डिरेक्टरी, ज्यात तुम्ही आपल्या जवळपास असलेली हॉटेल्स, मॉल्स, डॉक्टर, हॉस्पिटल्स वगैरे माहिती पत्त्यासकट शोधू शकता.

११. Instagram – फोटो शेअरिंगसाठी अतिशय उपयुक्त.

१२. Autodesk SketchBook Mobile – ह्या ऍपची माहिती अनलिमिटेड भटकंती करणाऱ्या पंकजने दिली. उत्तम ट्रेकर आणि फोटोग्राफर असणाऱ्या पंकजला ह्या ऍपमुळे डूडल्स रेखाटनाचासुद्धा छंद लागला. बाळासाहेब ठाकरे जेव्हा गेले, तेव्हा १० मिनिटात ह्याने श्रद्धांजली म्हणून एक डूडल काढले, जे खूप प्रसिद्ध झाले. काही डूडल्स इथे बघू शकता.

१३. Misalpav – आपल्या लाडक्या मिपाचेही ऍप उपलब्ध आहे बरं 🙂

१४. TED – तांत्रिक आणि सामाजिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण लोकांची माहिती Ideas worth spreading 🙂 🙂

१५. Dictionary – Merriam-Webster – शब्दकोश

१६. Any.DO To Do List | Task List आणि Life Reminders – टास्क शेड्यूल करण्यास उपयुक्त

१७. Flashlight HD LED – मोबाईल फ्लॅशचा टॉर्चसारखा उपयोग करणे

बाकी जीमेल, गुगल मॅप्स, फेसबुक, स्काईप, ट्विटरही नेहमीची ऍप्लिकेशन्स आहेतच, पण तुम्हाला माहित असलेली आणि तुम्ही स्वत: वापरलेली ऍप्लिकेशन्स जाणून घ्यायला आवडतील. तुमचे अनुभव नक्की शेअर करा.

– सुझे !!

35 thoughts on “तुमच्या अ‍ॅन्ड्रॉईडसाठी…

    1. महेंद्रकाका,

      नक्की घ्या आणि तुम्हाला काही नवीन माहिती मिळाली तर ती पण सांगा 🙂 🙂

  1. एव्हरनोट(नोट शेअरींग आणि sync), जीनोट्स( नोट शेअरींग आणि sync), टुक्टुक मीटर (जिपिएस प्रणाली चा वापर करून टॅक्सी/रीक्षाचे नेमके भाडे जाणून घेण्याकरता), ट्विटर, हॅण्ड्सेंट एसेमेस ( एसेमेस शेड्युल करून ठेवण्याकरता), सेसेमेस बॅक अप ( एसेमेस कलेक्शन जीमेल वर sync करण्याकरता), एसेमेस क्लिनर ( वेळेनुसार, कॉन्टॅक्टनुसार एकाच क्लिकमध्ये एसेमेस उडवून लावण्याकरता) , अडोब रीडर ( पिडिएफ्स वाचण्याकरता) एक ना दोन अनेक उपयुक्त ऍप्स आहेत. मेमरीच कमी पडते ती डाऊनलोड करता करता.

    बाकी पुढचं व्हर्जन ’काजु कतली’ म्हणजे लईच भारी 😉

    1. श्रेता,

      असे अनेक उपयुक्त ऍप्स आहेत. काजु कतली ह्या नावासाठी प्रचार सुरु आहे, नक्की तेच नाव असेल असं नक्की नाही 🙂 🙂

  2. मी तर पंखा आहे स्टीव्ह जॉब्सचा आणि त्याच्या कंपनीच्या विविध प्रोडक्ट्सचा, पण खिश्याने दगा दिला +1
    माझ्याकडे अ‍ॅंड्राईड नाही.. पण लवकरच घेणार आहे. तेंव्हा हे पोस्ट उपयोगी पडेल +2
    पूर्ण पोस्ट ++

  3. आल्हाद alias Alhad

    व्वा! एक एम इंडिकेटर सोडलं तर मी एकही ऍप वापरत नाही… 🙂 स्केचिंगसाठी एक ऍप आहे ते पुरतं मला… बाकी टचस्क्रीन मोबाईलचा स्केचिंग आणि ड्रॉईंगहून उत्तम उपयोग कुठला? (त्या ऍपवर केलेले स्केचेस बघ जमल्यास फेबुवर. :))
    असो. मला माझा सिम्बीयन प्रिय आहे. 😀

  4. माझ्याकडेही अ‍ॅंड्राईड नाही. २००६ पासून विंडोज बेस्ड मोबाईलच वापरतोय. तो उत्तम चालतोय. (होय विंडोज असहूनही फक्त एकदा रिसेट कारावा लागाला आजवर. 😉 )
    लेख मात्र माहितीपूर्ण आहे. आवडला. कधी भविष्यात अ‍ॅंड्राईड बेस्ड मोबाईल घ्यायचा झाला तर ही माहिती उपयोगी पडेल.

    1. गणपा,

      विंडोज बेस्ड फोन वाईट नाहीत रे, आता ते पण मार्केट घेऊन आलेत. थोडावेळ लागेल पण खूप चांगले चेंजेस होतील 🙂 🙂

  5. मी ह्याच महिन्यात अ‍ॅंड्राईडन झालोय , त्यामुळे ह्या पोस्टचा जरूर उपयोग होईल ..धन्स….मी पण ह्यासंदर्भात काही लिहायला घेतलं आहे ,आता मारतो कं ला गोळी … 🙂

  6. माझ्यासारख्या लोकांसाठी म्हणायला उपयुक्त पोस्ट. पण खरतर फारसा फोन वापरत नसल्याने ह्याचा कितपत फायदा मी करून घेईन मला होईल काय माहित. 🙂

  7. ४.२ आवृत्ती आली आहे. तिच नाव जेली बिनच आहे. सिंबीअनसाठी काही बनवणं अजिबात सोपं नव्हतं. गूगलने ज्याप्रमाणे आयफोनवरून बऱ्याच गोष्टी घेतल्या त्याप्रमाणे काही न करता नोकिया नुसतं बघत बसले. सिंबीअन सुरुवातीला प्रमाणित C/C++ न वापरता, सिंबिअन C/C++ वापरायचं. त्यांनंतर त्यांनी प्रमाणित C/C++ त्यात घातलं, नंतर QT घातलं, कळस म्हणजे नंतर Python घातलं. असल्या गोंधळात नक्की अॅप्लिकेशन बनवायचं कसं हे शिकण्यापेक्षा कोणालाही अॅड्रॉईड सोपच वाटलं असतं. लिनक्स आणि जावा दोन्ही प्रमाणित गोष्टी होत्या.
    बाकी स्टीव जॉब्सचं एक उत्पादन मी वापरतो आहे. मॅकमध्ये देवनागरी कळफलक आणि तोही इतका चांगला असेल असं मला अजिबात वाटलं नव्हतं. फोनेटिक कळफलक न वापरल्यामुळे माझं मराठी टंकलेखन वेगात होतं. अर्थात इतर अनेक अडचणी आहेत. पण युनिक्स असल्यामुळे निभावून नेता येतयं

    1. अनिश,

      लेका तुम्ही टेक्निकल लोकं. मला त्यातलं जास्त कळत नाही. तू लिह की त्यावर. म्हणजे एकदम डीटेलमध्ये माहिती मिळेल. 🙂 🙂

  8. whatsapp, Autodesk Mobile sketch, Gokeyboard devnagari हे फाईंड (आपल्या ग्रुपमध्ये) माझं असल्याने पोस्ट जास्त आवडली 😉
    बाकी मलाही उपयोग होईलच या पोस्टचा. लवकरच सगळे ऍंड्रॉईडमय व्हा.

  9. मस्त झालीय पोस्ट …
    माझ्या माहितीतले ऍप्स विचारशील तर लोकसत्ता, IMDB, कॉल ब्लॉकर आहे, Mosquito Repellent आहे (पण त्याने डास मरतात/बेशुद्ध होतात का नाही माहित नाही), तंतूवाद्य शिकणार्‍यांसाठी किंवा ध्यान करणार्‍यांसाठी Tanpura Droid आहे, संगीताच्या प्राथमिक माहितीसाठी Shrutilaya आहे, पियानो सुद्धा आहे, कोणाची टेर खेचायची असेल तर Talking Tom नावाचा नकलाकार बोका सेवेला हजर असतो, आणि हो खेळ राहिले की angry bird, temple run, Darts, Chess, Pool, Basket Ball, Car Race, bottle shoot टाईमपास असतो अगदी

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.