उधाणाला ३ वर्ष…


तिसरा वाढदिवस..

तीन वर्षापूर्वी आजच्याच दिवशी ब्लॉगवर खरडपट्टी सुरु झाली. सुरुवातीचे दोन महिने काहीच नव्हतं लिहिलं. नंतर महेंद्रकाका आणि हेरंबच्या ब्लॉगचा पाठलाग करता करता करता, थोडंफार लिखाण सुरु केलं. जवळजवळ सगळे अगम्य लेखन प्रकार लिहिले आणि तुम्ही ते मुकाट्याने सहन केलेत. वेळोवेळी माझ्या लिखाणाला प्रोत्साहन दिलेत. जे काही चुकले आणि जे मनापासून आवडले, ते आवर्जून प्रतिक्रियांच्या माध्यमातून तुम्ही कळवत राहिलात.

जसे मी नेहमी म्हणतो हे माझे एक बिन भिंतीचे घर आहे. इथे तुम्ही सगळे नुसते वाचक नाहीत. परिवारातले एक सदस्य आहात. तुम्हा सर्वांची ह्या ब्लॉगद्वारे ओळख झाली हेच माझे भाग्य. मुळात मी फार कमी बोलतो. एक उत्कृष्ट श्रोता म्हटलं तरी चालेल, पण मन उधाणमुळे थोडीफार बडबड सुरु केलीय आणि ती पुढे सुरूच ठेवण्याचा मानस आहे (अरे देवा वाचव रे 😉 )

ह्या तीन वर्षात ब्लॉगला ९६,४०० भेटी मिळाल्या असून १४० पोस्ट लिहिल्या गेल्या आहेत. ह्या सगळ्या पोस्टवर आलेल्या प्रतिक्रियांची संख्या (माझे उपप्रतिसाद धरून) २,८१९ आहे. फेसबुक सारख्या सोशल नेट्वर्किंग वेबसाईटवर ८३० वेळा ब्लॉगची लिंक विविध कारणांनी शेअर केली गेली आहे. ११० ब्लॉगपोस्टचे ईमेल सबस्क्रायबर आहेत. मीमराठी.नेट आणि मिसळपाव ह्या अग्रगण्य मराठी संकेतस्थळांमुळे एक मोठा वाचकवर्ग ब्लॉगला मिळाल्याचे आवर्जून सांगावेसे वाटते. सर्वांचे मनापासून आभार. तुम्ही सर्वांनी भरभरून दिलंय मला आणि पुढे असाच लोभ राहील अशी आशा करतो.

तुम्हा सर्वांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद असेच राहू देत….

– सुझे 🙂 🙂

50 thoughts on “उधाणाला ३ वर्ष…

  1. कोटी कोटी शुभेच्छा रे ….

    ही घोडदौड अशीच चालु राहो …..
    (पेट्रोल-डीझेल वाढल्याने घोडदौडच चालु राहणार आहे ….)

  2. abhijit desai

    खूप खूप अभिनंदन मित्रा… अजून बरे वाढदिवस अपेक्षित आहेत…:D

  3. दादा, मागील उधाणलेल्या तिनही वर्षांनकरीता त्रिवार अभिनंदन….. आणि येणा-या नवनवीन उधाणाकारीता तुम्हाला अनेक शुभेच्छा….!!!

  4. Tanvi

    मस्त मस्त आणि मस्तच 🙂

    मन:पुर्वक अभिनंदन सुहास… लिहीत रहा….

  5. मनापासून अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा. थुमी पुढे तर जाणारच आहात. तुमचे बोधवाक्यच आहे ते. ते पूर्ण करायला देव तुम्हाला असेच बळ देत राहॊ. आणि आम्हाला वाचनाचा आनंद असाच मिळत राहॊ. many times i regret being born about at least 20 years earlier! :))

Leave a Reply to सुहास Cancel reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.