वेरूळची लेणी..


एखाद्या लांबच्या ठिकाणी भटकंतीला जायचं, म्हणजे खूप आधीपासूनच तयारीला सुरुवात करावी लागते. गाड्यांचे वेळापत्रक बघणे, तिथे राहण्याची सोय आहे की नाही, असेल तर ते परवडणार की नाही. त्या ठिकाणी अजून काय काय बघता येईल, याची इत्यंभूत माहिती काढणे.. इत्यादी इत्यादी सोपस्कार पार पाडणे ओघाने आलंच. बरं इतकी तयारी करूनसुद्धा सगळं नीट जुळून आलं नाही, तर सगळ्या तयारीचा बट्ट्याबोळ. 🙂

सेनापतींच्या बड्डे पार्टीमध्ये अनघाने हंपी आणि बदामी बघायला जाऊया, असा किडा सोडला आणि लगोलग ५-६ जण तयार सुद्धा झाले. मला इतक्या कमी कालावधीत तीन दिवसांची सुट्टी मिळणे निव्वळ अशक्य. मी नंतर सांगतो म्हणून वेळ मारून नेली. मग त्यांचे प्लान्निंग सुरु झाले, मला ईमेल अपडेट्स येत होतेच. म्हटलं जाऊ देत, हे आपल्या नशिबात नाहीत. ह्यावेळी ह्यांना जाऊ देत. मी नंतर कधी तरी जाईन, पण नंतरला अंतर असतेच. कर करता येईल म्हणून हापिसात बॉसला नवस बोललो. तो नवसाला पावला, पण एका अटीवर. आठवड्याचे कामाचे ४५ तास भरून देत, आणि मग हवं तिथे जा. मला एका दिवसाचे काम भरून काढायचे होते आणि बाकी दोन आठवड्याची हक्काची रजा. त्याप्रमाणे हापिस संपल्यावर ४-४ तास बसून सगळे तास पूर्ण करायचे ठरले.

इथे आमच्या प्लानचे पार बारा वाजले आणि ऐन मोक्याच्या वेळी हंपी आणि बदामी कटाप केले गेले. नेमका त्याचं दिवशी दोन दिवसांमधला एक दिवस ओव्हरटाईम करून आलो होतो. अजून एक दिवस केलं की झालं, ह्या विचारात मी अगदी आनंदात होतो. घरी येऊन हा ईमेल बघितला आणि म्हटलं आता काही करायला नको. ऑफिसमध्ये काम करून विकांत गपचूप घरी घालवायचा. आता गप्प बसतील ते राजीवकाका आणि अनघा कुठले. ज्यांना हंपी आणि बदामीला यायला जमणार होते, त्यांच्यासाठी नवीन प्लान तयार केला गेला…वेरूळ आणि देवगिरी !!

धावपळीत सगळी तयारी केली गेली आणि अगदी आयत्यावेळी दोन गाड्या बुक करून, औरंगाबादच्या दिशेने निघालो. राजीवकाकांनी वेरूळ येथे, वृंदावन ह्या छोटेखानी हॉटेलमध्ये दोन रुम्स बुक करून ठेवल्या. आमच्या अंदाजाप्रमाणे आम्ही पहाटे ३-४ ला पोचून, दोन-तीन तास झोप काढणार होतो, पण मुसळधार पावसाने दगा केला. निवांत प्रवास करत सकाळी ७ ला पोचलो आणि अंघोळी आटोपून ८:३० ला लेण्या बघायला बाहेर पडलो. खरे तर दोन किलोमीटर परिसरात पसरलेल्या लेण्या बघायला, दोन दिवसदेखील पुरे नाहीत….पण आता आम्हाला तेव्हढा वेळ देता येणार नव्हता. त्यामुळे काही मुख्य लेणी बघून, देवगिरीच्या दिशेने कूच करायची असे ठरले होते. 🙂

लेण्यांची पुढील माहिती विकिपीडियावरून साभार –

महाराष्ट्र राज्याच्या औरंगाबाद या जिल्ह्याच्या ठिकाणापासून २३ किलोमीटर अंतरावर वायव्य दिशेला, सह्याद्रीच्या रांगेतील सातमाळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पर्वतरांगेत दोन किलोमीटर परिसरात वेरूळ लेण्यांचा समूह विखुरलेला आहे. हैदराबादच्या निजाम राजवटीकडे या लेण्यांची मालकी जाईपर्यंत, इंदूरच्या होळकरांनी या लेण्यांची काळजी घेतली होती. मात्र इ.स. १९५१ साली भारत सरकारने वेरूळ लेणी, हे राष्ट्रीय स्मारक असल्याचे घोषित केले आणि त्यानंतर ती भारत सरकारच्या पुरातत्त्व विभागाकडे सोपविण्यात आले.

वेरूळमधल्या १६ व्या लेण्यातले शिवमंदिर (कैलास मंदिर – लेणे क्रमांक १६) जगातले सर्वात मोठे कोरीव शिल्प आहे. ह्या बहुमजली मंदिराची रचना कैलास पर्वताच्या धर्तीवर आहे. ते मंदिर निर्माण करायला अंदाजे २ लाख टन वजनाचा, एका अखंड खडक वापरण्यात आला असून. तो उघडपणे वरून खाली, म्हणजे कळसाकडून पायाकडे खोदून कोरण्यात आलाय आणि ते प्रचंड खोदकाम/कोरीवकाम पुरे व्हायला कित्येक दशके लागली.

लेणी बघायला प्रचंड गर्दी असते, त्यामुळे विकांत सोडून तिथे जावे. लेणी बघून बाहेर पडल्यावर, रस्त्याच्या डाव्या बाजूला पाच-सहा दुकाने-हॉटेल्स सोडली तर एक तामिळ/तेलगु पाटी असलेलं हॉटेल आहे. दुरून बघितल्यार एक जुनाट गॅरेजसारखे वाटेल, पण तिथे साउथ इंडिअन पदार्थ अफलातून मिळतात. आयुष्यात आजवर खाल्लेला सगळ्यात बेस्ट सांभार इथे खाल्लाय. ते सगळे नाश्त्याचे पदार्थ आपण सांगितल्यावर बनवून देतात. उदारणार्थ पोहे, साबुदाणा खिचडी. मेदू वडा, उपमा इत्यादी. त्या अम्माच्या हाताच्या जेवणाची चव एकदा घ्याच, सुहासची आठवण काढाल 🙂 🙂

आता काही फोटो –

१. कैलास मंदिर

२.

३.

४.

५.

६.

७.

८. महाभारतातील प्रसंग…

९.

१०.

११.

१२.

१३.

१४.

१५.

१६.

१७.

१८.

१९.

२०.

२१.

२२.

२३.

२४.

– सुझे !!

(देवगिरीचा वृत्तांत आणि फटू लवकरचं… 🙂 )

23 thoughts on “वेरूळची लेणी..

 1. Tanvi

  औरंगाबादला राहिल्यामूळेही आणि त्यापुर्वीही या दोन्ही ठिकाणी बरेचदा जाणे झालेले आहे त्यामूळे नो निषेध 🙂 … पण खरच अत्यंत प्रेक्षणीय स्थळं आहेत रे….
  पुढल्या वेळेस जाणे होइल तेव्हा म्हैसमाळचा बालाजी चुकवू नकोस…. डोंगरावर खूप शांत, सुरेख मंदीर आहे…

  1. तन्वीताई,

   आधी सांगायचं की, गेलो असतो… आता जाणार परत तेव्हा बालाजी नक्की 🙂 🙂

 2. Maithili

  भार्री रे दादा… इतक्या फटाफट प्लान बनवून जाऊन आलात… मजा आली वाचायला… 🙂

 3. छान 🙂 घृष्णेश्वर शिवमंदीर जवळ आहे. तेसुद्धा छान आहे. अहिल्याबाईंनी त्याचाही जीर्णोद्धार केला होता बहुतेक. लोकं जिथे नाही गेले ती ठिकाणं सांगायची मजा काही अौरच अाहे. 😛
  बदामी, हंपी चा प्लान केला, तर ऐहोळे, पट्टादकल आणि कुडलसंगमला ही जा, सोलापूर-विजापूर ही जोडू शकता. आम्हासही सांगा, चालणार असेल तर मी पण येईन.

 4. Trupti

  मस्त वर्णन आणि अप्रतिम फोटू 🙂
  मला पण यायचं आहे , चालेल का?

 5. aruna

  सुंदर फोतो. त्या काळी इतके प्रिसीजन कसे आणि कुठून आणले असेल? आणि आता ती कला कुठे गेली हा विचार मनात अल्यापासून रहात नाही. या साठीही इंग्रजांना धन्यवाद द्यायचे का?

  1. अरुणाजी,

   हो त्याकाळीसुद्धा इतकं रेखीव काम केलं गेलं हे आश्चर्य आहेचं… इंग्रजांनीसुद्धा हा ठेवा जपून ठेवला …

 6. एकंदर प्रवास उत्तम झाला म्हणायचा तर..!! दोन चार महिन्यापुर्वी आठवडाभर आप्तेष्टांकडे औरंगाबाद मुक्कामी होतो तेव्हा मला देखील वेरूळ ला जाण्याचा योग आला. छायाचित्रणाचा छंद असल्याने खुप छायाचित्रे काढली.

  पाहण्यासाठी येथे टिचकी द्या.

  https://www.facebook.com/media/set/?set=a.408307002555499.115552.100001286092904

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.