हुश्श्श… संपले एकदाचे ..


हुश्श्श… संपले एकदाचे… खरंच एकदाचे हे वर्ष संपले. अनेक चांगल्या-वाईट घडामोडींचे हे वर्ष, कधीच विसरता येणे शक्य नाही. पहिले सहा महिने कसे गेले कळलंच नाही. नुसती भटकंती, नवीन हापीस सगळं सगळं कसं सुरूळीत सुरु होतं. मग… मग अचानक अश्या घडामोडी घडत गेल्या, की त्यानंतर येणारे प्रत्येक दिवस मोजूनमापून जावू लागले…. पण आता बाप्पा कृपेने सगळं व्यवस्थित सुरु आहे.

ठरल्याप्रमाणे गड-किल्ले भटकंती हे विशेष टार्गेट ठरलं होतं, आणि त्यानुसार एकदम धुमधडाक्यात किल्ले मोहिमा सुरु झाल्या. ह्यावर्षीचा पहिला मॉन्सून ट्रेक सेनापतीं बरोबर करून, मस्त सुरुवात देखील झाली. तसेच ब्लॉगर ट्रेकच्या दुसऱ्यावर्षाची परंपरा कायम ठेवली गेली. त्याच दिवशी भविष्यात ट्रेक आयोजित केले जातील. सॉलिड धम्माल मज्जा सुरु होती. सुरुवातीच्या ५-६ महिन्यात जवळजवळ ११ किल्ल्यांना भेटी

तसेच सगळ्यांत महत्वाचे म्हणावे तर, ब्लॉगर्स मेळाव्याचे आयोजन करण्याची संधी मिळाली. ज्या ब्लॉगने मला रक्ताच्या नात्यांहून प्रेमळ अशी नाती दिली, त्याचं ब्लॉगर्स मित्रांना एकत्र आणायची जबाबदारी खांद्यावर पडली. विशुभाऊ, महेंद्रकाका आणि कांचनसोबत एका अभूतपूर्व सोहळ्याची तयारी करताना खूप छान वाटलं. पहिल्या मेळाव्याला रोहन, महेंद्रकाका आणि कांचन ने, किती मेहनत घेतली असेल ह्याची कल्पना आली. एका कार्यक्रमाचे आयोजन करणे ही खायची गोष्ट नाही हे कळून चुकले आणि खूप काही नवीन शिकायला मिळाले.

नंतर… बाबांना हृदयविकाराचा झटका आला आणि माझं आयुष्य एकदम बदलून गेलं. असं वाटत होतं, की अशी परिस्थिती कोणावरही येऊ नये. आयुष्याला एकदम ब्रेक लागला आणि त्यांच्या काळजीने दोन महिने अक्षरशः घरात बसून होतो. त्यांच्यावर जेजे हॉस्पिटलमध्ये अॅन्जिओप्लास्टी केली आणि आता एकदम ठणठणीत बरे झालेत… पण खूप पथ्यपाणी सुरु झाली… कधीकधी खूप वैतागतात, पण माझं सगळं ऐकतायत. एक वेगळे बाबा मला बघायला मिळाले गेल्या काही महिन्यात. काय माहित, पण त्याचं वागणं खुपच बदललंय. त्यातल्यात्यात ते खुश असतात, आणि नियमित ऑफिसला जातात जी जमेची बाजू.  God Bless Him 🙂

ह्याकाळात HP ने त्यांचे पीसी युनिट जगभर बंद करायचे ठरवले आणि नवीननवीन प्रोजेक्टवर काळाची गदा आली. पुन्हा मायग्रेशन प्रोसेस सुरु झाली..रोज नवीन नवीन म्यानेजरला इंटरव्ह्यू द्या…सगळं सगळं कटकटीचे काम मागे लागले. एके ठिकाणी तर मला पहिल्या राउंड्लाच बाहेर काढले आणि म्यानेजरला स्वतःला धक्का बसाला होता…. तो माझं सांत्वन करायला लागला, दुसऱ्या प्रोजेक्टमध्ये बघ म्हणून…. मला पण धक्का बसला होता, पण काय करणार….नंतर चौकशीअंती कळले की माझ्या लॉगिन डिटेल्स चुकीच्या होत्या आणि माझ्या नावावर दुसऱ्या मुलाचे मार्क्स अपलोड झाले होते आणि शेवटी त्याचं प्रोजेक्टमध्ये माझं सिलेक्शन झालं… 😉 (एकदम फिल्मी वाटतंय… पण हे खरंय )

ह्यावर्षात ब्लॉगवर फारसं लिखाण झालं नाही… ह्याला कारण च्यामारेकीच्या सिरिअल्स आणि सिनेमे… हेरंब आणि आप्पा ने असं काही व्यसन लावून दिलं, की तासनतास पीसीसमोर बसून सिनेमे आणि सिझन्स सुरु झाले. बझ्झच्या बझ्झ चर्चेने पडू लागले. एकमेकांना रेकमेन्डेशन्स दिल्या गेल्या आणि इंटरनेटचे बिल वाढत गेले, पण ती हौस सुद्धा वाढत गेली… 😉  आज विभीने इटलीला जायच्या आधी १४० जीबीच्या सिझन्सचा खजिना देऊन ठेवला आहे. तो संपेपर्यंत बघू काय होतंय.

माझा स्वतःचा ब्लॉग दोन महिन्यांनी उघडतोय (इथे अजिबात सांगायचा प्रयत्न नाही की, म्या कामात बिजी वगैरे आहे… कं हेच कारण आहे) बघू पुढे जितकं लिहायला जमेल तितकं प्रामाणिकपणे लिहायचा प्रयत्न केला जाईल. तुम्हा सर्वांचा लोभ असाच राहू द्या.

सध्या इतकंच….ह्या वर्षात अनेक मित्र मिळाले आणि खूप दुरावले. जे आहेत त्यांना जपणे इतकंच माझ्या हातात आहे. अजुन काही लिहायला सुचत नाही. घोटाळे आणि सरकार ह्यावर लिहायची वेळ नाही… असो आज त्यांना सुट, त्यांचा यथेच्छ समाचार नंतर घेतला जाईल… 😉

ह्या सरत्यावर्षाच्या काही आठवणी….   🙂   🙂

This slideshow requires JavaScript.

!!! सर्व मित्रांना इंग्रजी नववर्षाच्या शुभेच्छा  – Wish you and your family a happy new year !!!

PS –

१. गेल्यावर्षीच्या संकल्पांबद्दल विचारणा करू नये… ह्यावर्षी नो संकल्प ..  🙂

२.  लग्न अथवा तत्सम गोष्टी असलेल्या कमेंट्स स्पॅम करण्यात येतील, याची नोंद घ्यावी  😀

— (चिअर्स) सुझे !!!   🙂   🙂

28 thoughts on “हुश्श्श… संपले एकदाचे ..

  1. Tanvi

    सुहास अरे लग्नाबिग्नाचं काही ठरलं की नाही गेल्या वर्षात , नव्या वर्षात तो कार्यक्रम होऊन जाऊ दे 😉

    (बाकिच्यांच्या कमेंटा टाकल्यास की काय रे स्पॅममधे 😉 )

    तूला आणि तूझ्या कुटूंबियांना आम्हा सगळ्यांकडून नव्या वर्षाच्या अनेकोनेक शुभेच्छा … 🙂

    येणारं नवं वर्ष सुख , समृद्धी आणि समाधान घेऊन येवो!!

    बाबांची काळजी घे!!

    1. तन्वीताई,

      काही ठरलं नाही, आणि सध्या काही ठरवायचं पण नाही 😉

      खूप खूप धन्स गं. तुलाही शुभेच्छा 🙂 🙂

  2. नविन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा मित्रा…

    २०१२ में अपुन जरूर मिलेंगे… कुठे भेटू ते पण लिहिणार होतो पण जल्ला कमेंट स्पॅम व्हायची 😀

    1. सिद्ध्या,

      भेटूच रे …. 🙂

      तुझा पुण्यातला नंबर पाठव. दोनदा येऊन गेलोय पुण्यात, पण तुझा नंबर नव्हता 😦

      1. अरे मी २५ तारखेला पुन्हा बंगलोरला परत आलोय. सगळे सामान न्यायला आणि बाकीची सेटलमेंट करायला. ह आठवडा बहुतेक बंगलोरलाच जाईल.
        पुण्यात अजून नविन नंबर घेतला नाही आहे. घेतला की लगेचच कळवतो. बहुतेक फेन्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात मिळेल. पुन्हा पुण्यात येशील तेंव्हा कळव.

  3. सुझे, नवीन वर्षाच्या तुला आणि घरच्यांना अनेक शुभेच्छा ! 🙂

    आपलं ’ कास ’ मस्तच झालं. पुढल्या वर्षात जाऊच कुठेसे नक्की…. रोहना ऐकतोय वाटते… :D:D

    बाबांना जप ! आणि लग्नाचे घाटतेय काय… ? :):)

  4. सुझे, नविन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा….

    बाबांची काळजी घे…अनेक शुभेच्छा….

    लिहित राहा बाकी सगळं स्पॅम स्पॅम स्पॅम….

  5. काय ते पटापट बघून घे रे पिक्चर्स आणि सिरीज.. एकदा लग्न झालं की मग काही खरं नाही 😉 .. बट डोंट वरी. लग्नाचा आहेर म्हणून तुला एक टीबीची हार्ड डिस्कच देतो. रिकामी नाही. चित्रपट आणि सिरीजने भरलेली 🙂

    रच्याक, पोस्ट स्पॅम केली गेल्या पुन्हा पुन्हा टाकण्यात येईल.

    >> >> लग्न अथवा तत्सम गोष्टी असलेल्या कमेंट्स स्पॅम करण्यात येतील, याची नोंद घ्यावी 😀

    अशी पुणेरी पाटी असल्यावर अशी प्रतिक्रिया द्यायला अजून जास्त मजा येते 😉 (आठवा : सिद्ध्याच्या चहाच्या पोस्टवरची कमेंट) 😛

    1. @हेरंब – What an !dea Sirji… आत्ता प्रत्येक पोस्टवर निषेधाची पाटी लावणार म्हणजे एक प्रतिक्रिया नक्की 😉

    2. हेरंब,

      हा हा हा …. मला सगळ्या सिरीज विभीने दिल्या 😉

      पुणेरी पाटी नव्हती रे ती, वैधानिक इशारा होता 😀

  6. भटकंती जिंदाबाद ! तुझ्यामुळे मला एक असाईनमेंट पण मिळाली.
    बायदवे, लग्न कधी करतोयेस?

  7. विशाल फाळके

    नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
    वडिलांची काळजी घे

    1. पंक्या,

      अपनी मर्ज़ी से कहाँ अपने सफ़र के हम हैं, रुख हवाओं का जिधर का है उधर के हम हैं 🙂 🙂

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.