हुश्श्श… संपले एकदाचे ..

हुश्श्श… संपले एकदाचे… खरंच एकदाचे हे वर्ष संपले. अनेक चांगल्या-वाईट घडामोडींचे हे वर्ष, कधीच विसरता येणे शक्य नाही. पहिले सहा महिने कसे गेले कळलंच नाही. नुसती भटकंती, नवीन हापीस सगळं सगळं कसं सुरूळीत सुरु होतं. मग… मग अचानक अश्या घडामोडी घडत गेल्या, की त्यानंतर येणारे प्रत्येक दिवस मोजूनमापून जावू लागले…. पण आता बाप्पा कृपेने सगळं व्यवस्थित सुरु आहे.

ठरल्याप्रमाणे गड-किल्ले भटकंती हे विशेष टार्गेट ठरलं होतं, आणि त्यानुसार एकदम धुमधडाक्यात किल्ले मोहिमा सुरु झाल्या. ह्यावर्षीचा पहिला मॉन्सून ट्रेक सेनापतीं बरोबर करून, मस्त सुरुवात देखील झाली. तसेच ब्लॉगर ट्रेकच्या दुसऱ्यावर्षाची परंपरा कायम ठेवली गेली. त्याच दिवशी भविष्यात ट्रेक आयोजित केले जातील. सॉलिड धम्माल मज्जा सुरु होती. सुरुवातीच्या ५-६ महिन्यात जवळजवळ ११ किल्ल्यांना भेटी

तसेच सगळ्यांत महत्वाचे म्हणावे तर, ब्लॉगर्स मेळाव्याचे आयोजन करण्याची संधी मिळाली. ज्या ब्लॉगने मला रक्ताच्या नात्यांहून प्रेमळ अशी नाती दिली, त्याचं ब्लॉगर्स मित्रांना एकत्र आणायची जबाबदारी खांद्यावर पडली. विशुभाऊ, महेंद्रकाका आणि कांचनसोबत एका अभूतपूर्व सोहळ्याची तयारी करताना खूप छान वाटलं. पहिल्या मेळाव्याला रोहन, महेंद्रकाका आणि कांचन ने, किती मेहनत घेतली असेल ह्याची कल्पना आली. एका कार्यक्रमाचे आयोजन करणे ही खायची गोष्ट नाही हे कळून चुकले आणि खूप काही नवीन शिकायला मिळाले.

नंतर… बाबांना हृदयविकाराचा झटका आला आणि माझं आयुष्य एकदम बदलून गेलं. असं वाटत होतं, की अशी परिस्थिती कोणावरही येऊ नये. आयुष्याला एकदम ब्रेक लागला आणि त्यांच्या काळजीने दोन महिने अक्षरशः घरात बसून होतो. त्यांच्यावर जेजे हॉस्पिटलमध्ये अॅन्जिओप्लास्टी केली आणि आता एकदम ठणठणीत बरे झालेत… पण खूप पथ्यपाणी सुरु झाली… कधीकधी खूप वैतागतात, पण माझं सगळं ऐकतायत. एक वेगळे बाबा मला बघायला मिळाले गेल्या काही महिन्यात. काय माहित, पण त्याचं वागणं खुपच बदललंय. त्यातल्यात्यात ते खुश असतात, आणि नियमित ऑफिसला जातात जी जमेची बाजू.  God Bless Him 🙂

ह्याकाळात HP ने त्यांचे पीसी युनिट जगभर बंद करायचे ठरवले आणि नवीननवीन प्रोजेक्टवर काळाची गदा आली. पुन्हा मायग्रेशन प्रोसेस सुरु झाली..रोज नवीन नवीन म्यानेजरला इंटरव्ह्यू द्या…सगळं सगळं कटकटीचे काम मागे लागले. एके ठिकाणी तर मला पहिल्या राउंड्लाच बाहेर काढले आणि म्यानेजरला स्वतःला धक्का बसाला होता…. तो माझं सांत्वन करायला लागला, दुसऱ्या प्रोजेक्टमध्ये बघ म्हणून…. मला पण धक्का बसला होता, पण काय करणार….नंतर चौकशीअंती कळले की माझ्या लॉगिन डिटेल्स चुकीच्या होत्या आणि माझ्या नावावर दुसऱ्या मुलाचे मार्क्स अपलोड झाले होते आणि शेवटी त्याचं प्रोजेक्टमध्ये माझं सिलेक्शन झालं… 😉 (एकदम फिल्मी वाटतंय… पण हे खरंय )

ह्यावर्षात ब्लॉगवर फारसं लिखाण झालं नाही… ह्याला कारण च्यामारेकीच्या सिरिअल्स आणि सिनेमे… हेरंब आणि आप्पा ने असं काही व्यसन लावून दिलं, की तासनतास पीसीसमोर बसून सिनेमे आणि सिझन्स सुरु झाले. बझ्झच्या बझ्झ चर्चेने पडू लागले. एकमेकांना रेकमेन्डेशन्स दिल्या गेल्या आणि इंटरनेटचे बिल वाढत गेले, पण ती हौस सुद्धा वाढत गेली… 😉  आज विभीने इटलीला जायच्या आधी १४० जीबीच्या सिझन्सचा खजिना देऊन ठेवला आहे. तो संपेपर्यंत बघू काय होतंय.

माझा स्वतःचा ब्लॉग दोन महिन्यांनी उघडतोय (इथे अजिबात सांगायचा प्रयत्न नाही की, म्या कामात बिजी वगैरे आहे… कं हेच कारण आहे) बघू पुढे जितकं लिहायला जमेल तितकं प्रामाणिकपणे लिहायचा प्रयत्न केला जाईल. तुम्हा सर्वांचा लोभ असाच राहू द्या.

सध्या इतकंच….ह्या वर्षात अनेक मित्र मिळाले आणि खूप दुरावले. जे आहेत त्यांना जपणे इतकंच माझ्या हातात आहे. अजुन काही लिहायला सुचत नाही. घोटाळे आणि सरकार ह्यावर लिहायची वेळ नाही… असो आज त्यांना सुट, त्यांचा यथेच्छ समाचार नंतर घेतला जाईल… 😉

ह्या सरत्यावर्षाच्या काही आठवणी….   🙂   🙂

This slideshow requires JavaScript.

!!! सर्व मित्रांना इंग्रजी नववर्षाच्या शुभेच्छा  – Wish you and your family a happy new year !!!

PS –

१. गेल्यावर्षीच्या संकल्पांबद्दल विचारणा करू नये… ह्यावर्षी नो संकल्प ..  🙂

२.  लग्न अथवा तत्सम गोष्टी असलेल्या कमेंट्स स्पॅम करण्यात येतील, याची नोंद घ्यावी  😀

— (चिअर्स) सुझे !!!   🙂   🙂