पुन्हा एकदा… सलाम सबको सलाम !!
मुंबईच्या वैभवाला साजेश्या हॉटेल ताजला सलाम…
हॉटेल ट्रायडेंटला सलाम..कॅफे लिओपोल्डला सलाम…
बोटीतून आलेल्या त्या दहशतवाद्याना सलाम…
तिथे गोळ्या घालून मारलेल्यांना सलाम…
रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मुंबईकरांना सलाम…
सागरी सुरक्षेवर लक्ष नसणार्या सुरक्षा यंत्रणेला सलाम…
कोळी बांधवांनी दहशतवाद्याना दाखवलेल्या कोयत्याला सलाम…
सीएसटीला स्टेशनमध्ये प्राण गमावलेल्यांना सलाम…
शहीद करकरेंना सलाम…साळसकर साहेबांना सलाम…
जाबाझ कामटे यांचा प्राण घेणार्या लास्ट बुलेटला सलाम…
हुतात्मा मेजर संदीप उन्नीकृष्णन याला सलाम…
त्यांच्या गोळ्या लागून ठार झालेल्या प्रत्येक भारतीयाला सलाम…
मुंबईवर हल्ला करणार्या पाकिस्तानला सलाम…
पुरावे दाखवून त्यांच्यावर आरोप करणार्या आपल्या नेत्यांना सलाम…
हल्लेखोर आम्ही नव्हेच म्हणणार्या त्यांच्या नेत्यांना सलाम…
हल्ल्याच लाइव्ह फुटेज टीवीवर दाखवणार्याला मीडीयाला सलाम…
त्याच रिपीट टेलीकास्ट करण्याच्या त्यांच्या मानसिकतेला सलाम…
वर्षातून एकदाच आठवण येऊन श्रद्धांजली देणार्या प्रत्येकाला सलाम…
कोरडे अश्रू ढाळणार्या लोकांना सलाम…
शहीदांच्या पराक्रमांचे बॅनर लावणार्या घोटाळेबाज राज्यकर्त्यांना सलाम…
कसाबला जिवंत पकडणार्या पोलिसांना सलाम..
त्याला पोसणार्या आपल्या सरकारला सलाम…
त्याला फाशी देणार्या आपल्या न्यायदेवतेला सलाम…
त्याला सुधारू द्या असा म्हणणार्या मानवाधिकार समितीला सलाम..
बॅनर घेऊन मूक मोर्चे काढणार्यांना सलाम…
मृतांचे फोटो पुन्हापुन्हा प्रदर्शित करणार्या वृत्तपत्राला सलाम..
पोस्टर्सला बघून हळहळ व्यक्त करणार्याला सलाम..
उद्या त्याच पोस्टर्सचा कचरा उचलणार्याला सलाम…
फेसबुकवर स्टेटस टाकून श्रद्धांजली देणाऱ्याला सलाम…
कमीत कमी शब्दात जास्त सांगून जाणारे ट्विट करणाऱ्याला सलाम…
कॉंग्रेस सरकारला सलाम..त्यांच्या आदर्श राजकारणाला सलाम..
सगळा माहीत असूनही षंढ असलेल्या आपणा सर्वांना सलाम..
ज्यांना सलाम करायचा राहिला त्या सगळ्यांना सलाम..
गांडीवर हात न ठेवता दोन्ही हाताने करतो सलाम…
लाथ नाही पडणार, गोळीने किवा बॉम्बने मरणार ह्या माझ्या विश्वासाला सलाम..
सलाम तुम्हा सर्वांना सलाम… सलाम तुम्हा सर्वांना सलाम… !!!
लाथ नाही पडणार, गोळीने किवा बॉम्बने मरणार ह्या माझ्या विश्वासाला सलाम..
साऱ्याच परिस्थितीला सलाम …
भारी जमलीय
भक्ती,
धन्स गं !!
apratim…
गणेश,
धन्स !!
येडझव्या सरकारला सलाम…. 😦
काका,
खरंच सलाम !!
सद्य परिस्थितीत स्वतः षंढासारखे जगूनही पुढची पिढी जन्माला घालणाऱ्यांना सलाम!!!
सिद्ध्या,
सलाम !!
एक राहिलाच .. आपला आपल्याला पण सलाम (हे मी स्वत:साठी लिहितेय. तुमच्यावर टिप्पणी नाही ही आधीच स्पष्ट करते गैरसमज नसावा.) .. कारण आपण तरी काय करतो? निषेध नोंदवण्याव्यतिरिक्त? काही करता येण्याची शक्यता आहे की नाही हेही कळत नाही इतकी अगतिकता आली आहे. पण केल तर पाहिजे .. सलाम सोडून काहीतरी …
सविताताई,
नक्कीच… अगदी मनातलं. आपल्याला कळतंय, पण वळत नाही आहे 😦
:(… Salam… fakt salam….
आका,
…. !!
सलाम खरंच फक्त सलाम !! हतबलता जाणवतेय शब्दाशब्दातून :(((
हेरंब,
खरंय.. हतबलता… हतबलता 😦 😦
😦
अपर्णा,
….. !!