दिवाळीचा साहित्य फराळ…!!


दिवाळी सण मोठा, नाही आनंदाला तोटा…

सर्वप्रथम सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !!

शुभ दीपावली…

म्हणता म्हणता दिवाळी आली…सारा आसमंत दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघाला. दिवाळी म्हटलं की फराळ आलाच… लाडू, चकली, चिवडा, करंजी, शंकरपाळी…. अजुन बरंच काही 🙂

दिवाळी सणाचे अजुन एक वैशिष्ट्य म्हणजे दिवाळी अंक. विविध दिवाळी अंक ह्या काळात प्रकाशीत होतात. ह्या अंकाची संख्या खुपच जास्त असल्याने विविध विषय, साहित्य प्रकार ह्यात हाताळले जातात आणि त्यामुळे सर्व साहित्य प्रेमींना दिवाळीत एक हवीहवीशी साहित्य मेजवानी मिळते.

बघता बघता जग इंटरनेटमुळे जोडलं गेलं आणि हेच साहित्य ऑनलाईन उपलब्ध होऊ लागले, त्यांची वाचकसंख्या लाखो-करोडोंच्या घरात पोचली. ह्यातूनच सुरुवात झाली ई-दिवाळी अंकाची, एका आंतरजालीय साहित्य मेजवानीला.  आज अश्याच काही ई-दिवाळी अंकाची यादी इथे देत आहे, जे या वर्षी प्रकाशीत झाले आहेत. त्यांचा मस्त आस्वाद घ्या आणि हो प्रयत्न आवडला असेल किंवा नसेल, त्याबद्दल प्रतिक्रिया द्यायला विसरू नका.

१. मोगरा फुलला ई-दीपावली अंक

२. जालरंग प्रकाशाचा दीपज्योती दिवाळी अंक 

३. कलाविष्कार ई-दीपावली अंक

४. मीमराठी.नेट चा पहिलावाहिला दिवाळी अंक

५. मायबोली डॉट कॉमचा हितगुज दिवाळी अंक (वर्ष १२ वे)

६. ऐसी अक्षरे दिवाळी अंक

७. रेषेवरची अक्षरे दिवाळी अंक (वर्ष ४ थे)

८. मनोगत.कॉम चा दिवाळी अंक (वर्ष ५ वे)

९. उपक्रम.कॉम चा दिवाळी अंक (वर्ष ४ थे)

१०. सृजन ई-दिवाळी अंक

जर तुम्हाला कुठल्या इतर ई-दिवाळी अंकाची माहिती असेल, तर इथे प्रतिक्रिया नोंदवा.

धन्यवाद ..

सुझे  🙂  🙂

|| शुभ दीपावली ||

26 thoughts on “दिवाळीचा साहित्य फराळ…!!

 1. दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा! “आंतरजालीय साहित्य मेजवानी”- अगदी खरं बोललास. कितीतरी अंक वाचायचेत. दिवाळीच्या फराळासोबत हा साहित्याचा फराळसुद्धा चाखायचाय.

 2. या दिवाळीला एक विशेष पोस्ट येणार आहे. पण त्यासाठी मला किमान ३-४ दिवसांचा अभ्यास करावा लागणार आहे. पाहू या कसं जमतंय.

 3. तुम्हाला आणि तुमच्या संपुर्ण दिवाळीच्या मन:पुर्वक हार्दिक शुभेच्छा.
  ही दिवाळी तुम्हाला सुखी, समृद्धी, आरोग्यदायी, भरभराटीची यशप्राप्तीकडे नेणारी जावो हिच मनापासून शुभेच्छा! आपला कुणाला त्रास होणार नाही याची या दिवाळीत काळजी घ्या!
  आनंदाचा क्षण आनंदानेच साजरे करुया काय?

 4. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा …. सगळ्या लिंक bookmark मध्ये टाकल्यात. सवडीन वाचीन. सगळ्या दिवाळी अंकांना एकत्र आणल्या बद्दल आभार.

  1. प्रसादजी,

   कृपया ब्लॉगलिंक पुन्हा द्या. वर दिलेला दुवा उघडत नाही आहे.

   धन्यवाद !!

 5. इतके सगळे ई-दिवाळी अंक आहेत हे माहिती नव्हते. सगळ्या लिंक एकत्र दिल्याबद्दल धन्स रे. आत्ता तुझ्या पोस्टची एक लिंक सेव्ह केली की काम झाले 😀

  तुला आणि तुझ्या कुटुंबियांना दिपावलीच्या खूप खूप शुभेच्छा!!!

Leave a Reply to prasad Cancel reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.