फुलांचा स्वर्ग – कास पठार !!


गेल्यावर्षी २५ तारखेला रोहनमुळे तिकोना दुर्गाला भेट देण्याचा योग आला. तो अनुभव अविस्मरणीय होता. पहिल्या मराठी ब्लॉगर्स ट्रेकनंतर, आम्हा सर्वांची ती दुसरी भेट होती. ह्या ट्रेकचं अजुन एक वैशिष्ट्य म्हणजे अनघा, श्रीताई ह्यांची पहिल्यांदा भेट झाली होती. यावर्षीदेखील त्याच तारखेला तो योग जुळून आला आणि आम्ही सगळे कासला भेट देण्याचे ठरवले. राजीवकाकांनी सगळी व्यवस्था चोख केली होती, त्यामुळे प्रवासाचा अजिबात त्रास झाला नाही. बरोब्बर १२:३० ला आम्ही ठाण्याहून प्रवास सुरु केला. रात्रभर आम्ही गाणी म्हणत / केकाटत जागून काढली. आमची मैफिल एकदम मस्त जमली होती. पहाटे ५ वाजता गौरीला चांदणी चौकातून पिकअप करून, आम्ही कासच्या दिशेने कुच केले.

कास पठार म्हणजे फुलांचा स्वर्ग. गेली अनेक वर्ष काहीसा दुर्लक्षित असा हा भाग, आता सातारा जिह्यातील एक महत्वाचे पर्यटन केंद्र बनलं आहे. फोटोग्राफीची आवड असलेल्या मंडळींना तर ही वेगळी पर्वणीच. फुलांचा सडा पडावा, अशी फुलं संपूर्ण पठारावर (१२०० एकर) विखुरलेली आहेत. अनेक प्रकारची विविधरंगी फुलं आपल्याला इथे बघायला मिळतात. अजुन जास्त लांबण लावत नाही, काही निवडक फोटो टाकतोय. एन्जॉय 🙂 🙂

सूर्योदय..
बसमधून उतरल्यावर हे साहेब एकदम अंगावर धावून आले 🙂 🙂
सकाळचा नाश्ता गरमागरम कांदा पोहे !!
कास पठारावर स्वागत !!
--
Sonki (Adenon indicum)
Halunda (Vigna Vexillata) (फोटो साभार – देवेंद्र चुरी !! )
Jartari (Slender Flemingia)
Abolima (Murdannia lanuginosa) (फोटो साभार - देवेंद्र चुरी)
 फुलांचा सडा …
पठारावर असलेला तलाव…
कास पठारावर जायला लोकांची झुंबड… 😦
सागर, देवेंद्र आणि चैतन्य…
खादाडी..... खास आकर्षण पुरणपोळी 🙂 🙂
दीपक, चैतन्य, देवेंद्र, राजीव काका, धुंडीराज, सागर आणि भारत ...

कास पठाराची भेट मस्तच झाली. सगळ्यांनी एकदा नक्की भेट द्यायला हवी, पण लवकरात लवकर.  इथे मानवी वस्ती वाढली, तर ह्या जागेचं काही खरं नाही..तसे काही ठिकाणी प्लॉटस् ची बुकिंग झालेली दिसते पठारावर जाताना, कुंपणांची गर्दी होती थोडीफार  😦

असो… !!

– सुझे !! 🙂

26 thoughts on “फुलांचा स्वर्ग – कास पठार !!

  1. मस्त मस्त सुहास ! तुम्हां सर्वांमुळे हे असं काही बघायला मिळतं मला ! खरंच ! नाहीतर मी जशी तिकोनाला पोचले नसते तशीच कासला देखील नसतेच पोचले ! त्याबद्दल तुम्हां सर्वांचे खूप खूप आभार आभार ! 🙂
    आणि त्यामुळेच तुम्हां सर्वांची भेट झाली…आणि अगदी कायम जपावेत असे मित्र मैत्रिणी मिळाले ! 🙂
    आता पुढची ट्रीप कधी आणि कुठे ?? :p 🙂

    1. अनघा,

      धन्स गं 🙂

      आभार कसले मानतेस, आता तू आम्हाला सवाई गंधर्वला घेऊन चल.. हा का ना का 😉

  2. सुहास, मस्त!
    अनघा + १ … त्यानिमित्ताने सगळ्यांची भेट झाली … उत्साही मुंबईकरांमुळे मी पुण्याहून कासला गेले 🙂

    1. गौरी,

      तुला भेटून छान वाटलं. आपण गेल्यावर्षी भेटलो होतो जून १९ला 🙂 🙂

      आठवतंय नं?

    1. सिद्ध्या,

      हो रे खरंच… काही गोष्टी नामशेष वाहायला नको ह्या धावपळीच्या जगात 😦

  3. aruna

    घरात बसून तुम्ही कास पठाराचे दर्शन घडवले. फोटोज अप्रतीम. सगळे एकत्र गेल्यामुळे जास्त मजा आली असणार.

  4. अफलातून आहे सुहास हे कास! खरंच! सर्वत्र पहातोय आणि अजून अजून उत्सुकता आणि त्याबद्दलचं आकर्षण वाढत चाललंय! तुमचा शेवटचा इशारा, तुमचं निरीक्षण ही लक्षात घेण्यासारखं आहे.छायाचित्रं अ प्र ति म!

    1. पंडितकाका,

      नक्की भेट देण्यासारखी जागा आहे ही. पुढच्यावर्षी जाऊ सगळे एकत्र… धन्यवाद 🙂 🙂

  5. कासच्या प्रत्येक पोस्ट/बझ/फेबु स्टेटसला देतो तीच प्रतिक्रिया देतो इथेही..

    काश काश काश :((

  6. Gurunath

    सुहास गर्दी नाही होणार तिथे ऐन पठारावर, कास आता युनेस्को च्या बायोडायव्हर्सिटी लिस्ट मधे आहे असे ऐकले मी कुठेतरी….. कास मस्तच आहे, त्या मोठ्या तलावात आम्ही ४-५ तास पोहलो होतो मस्त म्हणजे मस्तच जागा…. फ़ोटो ट्रीट साठी आभारी….. पुरानी यादें ताजा हो गई यार!!!!

    1. गुरु,

      अरे पठारावर चिक्कार गर्दी होती. पोलीस बंदोबस्त असून सुद्धा लोकं त्या फुलांवर झोपून फोटो काढत होते 😦

      प्रतिक्रियेसाठी आभार रे !!

  7. सौ गीतांजली शेलार

    अप्रतिम निसर्ग! धन्यवाद कास पठारचे घर बसल्या दर्शन घडवल्याबद्दल! सूर्योदय आणि फुलांचे फोटो आवडले.

    1. गीतांजलीजी,

      प्रतिक्रियेसाठी अनेक अनेक आभार आणि ब्लॉगवर स्वागत. अशीच भेट देत रहा.. 🙂 🙂

    1. विदुला,

      धन्यवाद, तुम्ही काढलेल्या फोटोंचे दुवे दिलेत तर मलाही बघता येतील 🙂

      ब्लॉगवर स्वागत. अशीच भेट देत रहा.

    1. महेश,

      धन्यवाद… आणि प्लान आम्ही नव्हता केला त्यामुळे आम्ही जास्त कोणाला बोलवू शकलो नाही. पुढल्यावेळी जमवू…

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.