नौ दस ग्यारह !!


नमस्कार मित्रहो,

आज २२ सप्टेंबर २०११, बरोब्बर २ वर्षापूर्वी मराठी ब्लॉगिंगचा || श्री गणेशाय नम: || करून मराठी ब्लॉगविश्वात पदार्पण केलं होत. सुरुवात पार डळमळीतच झाली, काही धड लिहिता येत नव्हतं आणि शुद्धलेखनाचे पार बारा वाजवले होते. अजूनही तशीच परिस्थिती आहे म्हणा, पण त्यातल्यात्यात थोडा सुधारलो म्हणता येईल 🙂

ह्या पोस्ट द्वारे, पुन्हा एकदा महेंद्रकाका आणि हेरंबचे आभार मानतो. ह्यांनी भरीस पाडलं नसतं तर, इथवर कधीच आलो नसतो. ह्या दोघांनी लिखाणाला खूप खूप पाठींबा दिला.  🙂

(हा प्रयत्न आवडला नसल्यास, कोणाला जबाबदार ठरवावे हे सुज्ञास सांगणे न लगे 😛 )

दुसरा वाढदिवस 🙂 🙂

 

सुरुवातीला मराठी ब्लॉगविश्व खूप लहान भासलं, पण जशी जशी ओळख होत गेली, तशी त्याची व्याप्ती किती मोठी आहे ते कळले. मराठीमध्ये लिखाण करणारे हजारो ब्लॉग्स बघून मनात प्रचंड आनंद जाहला, पण खूप जणांनी चांगली सुरुवात करून नंतर लिहिणे बंद केले.  😦 चांगली गोष्टी अशी की, जे नियमित लिहायचे त्यांच्यामुळे मला सतत काहीबाही खरडायची सवय लागली.. खूप नावं घेता येतील यासाठी – देवेंद्र, कांचनताई, तन्वीताई, रोहन, अपर्णा, योगेश, आनंद पत्रे, अनुजा ताई, विद्याधर, सिद्धार्थ, विशुभाऊ, तृप्ती, मैथिली, देवकाका, दीपक, अनु, सागर…. अजुन खूप नावं आहेतच, बाजूला लिस्ट आहे बघा निवडक ब्लॉग्सची 🙂

ह्या सर्वांची ओळख सुरुवातीला मराठी ब्लॉगर्स म्हणून झाली, मग ते ब्लॉगर्स मित्र झाले आणि आता ते चांगले मित्र झाले आहेत, जे ब्लॉग्स लिहितात. रक्ताच्या नात्याहून काही महत्वाची नाती ह्या ब्लॉग्स मुळे मिळाली आणि त्याचा वेळोवेळी प्रत्यय देखील आला.  खरंच स्वतःला खूप नशीबवान समजतो, की हा ब्लॉगिंगचा किडा मला चावला आणि आज मी इथवर आलोय.  सुहास झेले चा सुझे आणि काही जणांसाठी सुझे चा अण्णा (अण्णा हजारे नव्हे 🙂 ) कधी झालो, ते कळलेच नाही. ह्या वर्षी मराठी ब्लॉगर्स मेळाव्याचे आयोजन करायची संधी सुद्धा मला मिळाली 🙂

 

मराठी ब्लॉगविश्व, मराठी ब्लॉग जगत, नेटभेट, मी मराठी.नेट, मिसळपाव, मायबोली अश्या अनेक मराठी संस्थळांचा मी आभारी आहे,  ज्यांनी मला एक निराळं अस्तित्व दिलं आणि सगळ्यांत महत्वाचे आभार ब्लॉग वाचकांचे, ज्यांनी वेळोवेळी प्रतिक्रियांमधून आपले मत बिनदिक्कतपणे मांडले. जे मला पुढल्या वाटचालीसाठी अत्यंत मार्गदर्शक ठरले.  सर्वांचे मन:पूर्वक आभार.  🙂

आजवर ब्लॉगवर ११८ पोस्ट पब्लिश केल्या असून, माझ्या प्रतिक्रियांच्या कमेंट्स धरून, एकूण २६९० कमेंट्स ब्लॉगला मिळाल्या आहेत आणि सध्याची वाचकसंख्या ५२,६०० आहे.  🙂

असाच लोभ राहू द्या… !!

आपलाच,
(कृतकृत्य) सुझे !!   🙂  🙂

48 thoughts on “नौ दस ग्यारह !!

  1. हबिनंदन सुझे….आपण सर्व एक बोटीमधले प्रवासी आहोत…
    शुद्धलेखनासाठी ते पहिल्या मुंबई मेळाव्याला दिलेलं पुस्तक वापरतोस का….:)
    असंच मस्त मस्त लिहित राहा…शुभेच्छा…

  2. सुहास उर्फ सुझे उर्फ अण्णा,
    मनःपूर्वक अभिनंदन !!! बघता बघता दोन वर्षं झाली :)) सहीच. असाच भरपूर लिहीत रहा आणि अनेक वर्षं आम्हाला तुझ्या ब्लॉगचा वाढदिवस साजरा करण्याची संधी मिळो.

    आणि हो.. पुन्हा हे असे आभार बिभार मानलेस तर प्रतिक्रिया देणार नाही कधीच !! :)))

    1. हेरंब,

      हो बघता बघता दोन वर्ष झाली यार… शुभेच्छांसाठी धन्स रे !!

      आभार नाही रे, पण तुझ्याशिवाय ब्लॉगप्रपंच सुरु नसता नं झाला म्हणून 🙂 🙂

  3. मस्तच सुहास! एक नंबर अण्णा! एकदम भारीच् सुझे!
    ब्लॉगच्या दुसऱ्या वाढदिवसाबद्दल हार्दिक अभिनंदन तुझे!!

    वरचं यमक अगदीच गरीब, पण आहे मनापासून.
    अनेक होवोत असेच वाढदिवस, लिहीत रहा कसून!!

  4. धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड…

    अभिनंदन भावा… अनेक शुभेच्छा… 🙂

  5. Tanvi

    अभिनंदन अभिनंदन सुहास 🙂
    खरय तुझं अगदी सुंदर नाती मिळालीत इथे…..

    असाच लिहीत रहा!!!!

  6. अभिनंदन अभिनंदन !!!! 🙂
    ‘खरंच स्वतःला खूप नशीबवान समजतो, की हा ब्लॉगिंगचा किडा मला चावला आणि आज मी इथवर आलोय.’ अगदी अगदी….’लिहाल तर वाचाल’…असं अगदी ! 🙂

  7. मनःपूर्वक अभिनंदन.. ब्लॉग लिहीणे बरेच लोकं सुरु करतात, पण सातत्याने लिहीणे फार कमी लोकं लिहितात.

  8. अभिनंदन सुहास…. खरतर ब्लॉगविश्वात यायचे प्रोत्साहन तूच मला दिलेस पण माझी गाडी अजूनही “दे धक्का” तत्वावर चालते आहे 🙂
    पण तुझा हा २ वर्षाचा चढता क्रम पाहून खूप आनंद झाला. अशीच प्रगती होवो ही शुभेच्छा

  9. सुझेअण्णाचा जयजयकार असो!
    २र्‍या वाढदिवसाबद्दल अभिनंदन आणि भविष्यातल्या वाटचालीसाठी खूप सार्‍या शुभेच्छा!

  10. अभिनंदन सुहास, गेले काही दिवस माझं स्वत:चं ब्लॉगवर लिहिणं , इतरांचे ब्लॉग्ज वाचणं हे कमी झालंय. त्यामुळे अर्थातच प्रतिक्रियाही देता येत नाहीत. सावकाशीने एकदा सगळ्यांच्या राहिलेल्या पोस्ट वाचायच्या आहेत. पाहूया कसा आणि कधी वेळ मिळतो ते.

    आणि हो, अपर्णा म्हणते त्या कारणाने असेल पण तुझ्या शुद्धलेखनात चांगलीच सुधारणा झालेली आहे. बाकी तुझं लेखन ओघवतं तर होतंच.

    पण पार्टी मिळाल्याशिवाय अभिनंदन कसं कोरडंच वाटतं नाही का ? 😉 ब्लॉगला तिसरं वर्ष पुर्ण व्हायच्या आत पार्टी मिळायला हवी बरं का ! नाहीतर परत पुढच्या वर्षी कशी काय मागता येईल ? 🙂

  11. aruna

    सुझे, मनःपूर्वक अभिनंदन. तन्वी म्हणते त्याप्रमाणे सगळ्यांची नाळ जुळली. ब्लॉगविश्व असेच विस्तारत राहूदे..
    तुमचे सगळ्यांचे ब्लॉग्स वचण्यातच खूप आनंद मिळतो.

  12. माझाही दुसरा वाढदिवस जवळ येतोय…
    पण ब्लॉग लिखाण आणि वाचन दोन्हीमध्ये बोंब आहे सध्या…
    वेळ मिळेगा तो और भी लिखेंगे….
    कॉंग्रेसचं अधिवेशन !!!

  13. विशाल फाळके

    सुहास, सर्व प्रथम तुझे अभिनंदन .ब्लॉग शिवाय ब्लॉगवरील फोटोग्राफी फार छान आहे. खूपच मस्त
    तुझ्या पुढील ब्लॉगसाठी हार्दिक शुभेच्छा.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.