सरतेशेवटी सत्यसाईबाबा अनंतात विलीन झाले.. (असंच लिहितात ना?) आज सकाळपासून त्यांच्या अत्याविधीचे थेट, आपलं लाईव्ह प्रक्षेपण सुरु होतो. गेले ३ दिवस हा प्रकार सुरु होता म्हणा. कोण रडले, कोण काय बोलले, त्यांची संपत्ती किती, त्यांचे शिष्य किती, तो बाबा खरा होता की खोटा, यावर प्रचंड काथ्याकुट झाला. माझा देवबाप्पा त्या बाबांच्यासमोर देहासमोर बसून शोकाकुल रडला, हे ही किती तरी वेळा बघितलं, नव्हे तेच तेच दाखवलं. सगळ सगळ बघत आलो हे गेले तीन दिवस. त्यांनी आयुष्यभर जमा केलेल्या मायेचा, माफ करा ट्रस्टचा पुढला धनी कोण यावर चिंतन सुरु आहे सध्या. ट्रस्टपण काही छोटी नाही, तब्बल १ लाख ४० हजार कोटीं रुपयाची मालमत्ता आहे. तुम्ही म्हणाल, हे सगळ का सांगतोय?
मी त्यांच्या विषयी बोलणारा कोण? त्यांनी पैसा कमावला, लोकांची सेवा केली आणि आता ते गेले. लोकांनी श्रध्दांजली वाहिली, त्यांना शांती मिळाली. एक बाबा इतकी संपती जगभरातून गोळा करतो, आणि त्याचा काही भाग लोकांसाठी वापरतो आणि त्याचा उदो उदो होतो. आता ती ट्रस्टच्या नावे असल्याने कोणी चौकशी करायचा प्रश्न नाहीच. आता तो सगळा पांढरा पैसा आहे.
असो, माझा बोलायचा मुद्दा हा नाही. आपण भारतात राहतो आणि बडे बडे देशो मैं, ऐसी छोटी छोटी बाते होती रहती हैं. आपल्या देशात पैश्याला काही म्हणजे काहीही कमी नाही हे दाखवायला एक उदाहरण सांगितलं. गेल्या एका वर्षात जितके घोटाळे बाहेर आले आहेत, त्याने आपण काही देशांच्या बजेटचा डोलारा उचलू शकलो असतो. १२ हजार कोटी काय, ७० हजार कोटी काय… किती किती पैसा आहे आपल्या देशात, पण साला आपलंच नशीब पांडू म्हणून रोज ऑफिसला जा, मरमर काम करा. महिन्याच्या शेवटी पोटाला चिमटे काढत जगा, हौसमौज टाळा. आपला जन्म हा केवळ असाच जाणार. ह्याउलट अशी लोक आहेत ज्यांना पैसे ठेवायला जागा नाही. स्विस बँकमध्ये १०-१२ खाती काय, ७०-८० मजल्याची घर ती काय, फिरायला ऊंची गाड्यांचा ताफा तो काय, जीव जपायला केलेली सुरक्षायंत्रणा काय.सगळ कसं स्वप्नवत.
पैसा कमावत असताना ह्यांनी केलेले कष्ट (???) जगजाहीर आहेतच. मोठमोठ्या लोकांकडून चुटकीसरशी कामे करून देणारा पैसा ह्यांच्या हातचा मळ. ह्या लोकांना भीती कशाचीही नाही, कालसुद्धा जेव्हा कलमाडीला कोर्टातून बाहेर आणलं, तेव्हा साहेब असे बाहेर आले की, त्यांनी भारतरत्न मिळवलं आहे. त्यांच्यावर सॉरी त्याच्यावर जेव्हा चप्पल फेकून मारली आणि त्याचा नेम चुकला, तर हे ध्यान दात काढून हसत होत. लाज, शरम, भीती, कायदा ह्या सगळ्या तुच्छ गोष्टी आहेत.
गेल्या दोन तीन दिवसात कानावर आलेल्या बातम्यांमध्ये अजून एक बातमी होती, ती ज्युलिअन असांजेची. टाइम्सला दिलेल्या एका मुलाखतीत त्याने सांगितलं की त्याने स्वतः स्विस बँकची माहिती बघितली आहे आणि त्यात अनेक भारतीय नावे आहेत. त्यांच्या नावावर भला मोठा पैसा जमा आहे. जगातला सगळ्यांत जास्त काळा पैसा हा भारतातूनच येतो (बातमी) आणि त्याचे पुरावेदेखील तो लवकरच देणार आहे. त्याने भारतीयांना सांगितलं आहे “Don’t Loose Hopes Completely, We will soon put those names in front of you”
हे तर आपल्या देशातील लोकसुद्धा, कित्येक वर्ष ओरडून सांगत आहेत. विरोधक थोडे दिवस हल्लाबोल करतात पण हे सगळ नावापुरतं. कारण त्यांचीही खाती जोपर्यंत तिथे भरली जात नाही, तोपर्यंत हे इथे गोंधळ घालणार. एकदा का पैसे पोचल्याची पोचपावती आली, की मुग गिळून गप्प राहायचं आणि दुसऱ्या मुद्द्यावर सरकारला धाऱ्यावर धरायचं.
खरंच सांगतो, आता पेशन्स नाही आणि खात्री तर नाहीच नाही. जे आजवर बघितलं आहे त्यानंतर जरी ती नावे बाहेर आली त्या बँकेमधून, तरी काही फरक पडणार नाही असंच दिसतंय. विकीलिक्सला सुरुवातीला अमेरिकेतून जास्त विरोध होता, पण आता तो भारतातून आहे. एखादी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी जशी कमीतकमी पैश्यात लोकांना काम करायला लावून जगवते आणि आपण वारेमाप नफा ओढत राहते. 😦
खरंच सांगा कुठे आहे होप? नक्की कुठे जातोय आपण? काय होणार पुढे?
– सुझे
अरे बाबा, सरळ सरळ Hint दिलेली आहे आपल्याला. ह्या लोकांसारखे हरामी बना आणि ऐश करा नाहीतर Hope Hope करत Breaking News बघत मरा.
सिद्धु,
काय बोलू यार. अगदी मनातलं बोललास बघ 😦
अवघड आहे रे सुहास…. कधी कधी खरच असहाय, हतबल वाटतं …. सचिन तिथे बसून रडतोय , त्याची बायको त्याला अश्रू पुसायला रूमाल देतेय हे पाहिलं आणि खरच काय भावना असावी मनात त्याक्षणी नक्की हेच कळेना……
तन्वी ताई,
हो ग, काय करणार 😦
दोन्ही बातम्यांनी असंच काहीसं वाटलं.. सकाळी बातमी वाचली तेव्हा वाटलं की हा काळा पैसा आहे हे तर समजतंय, मग तो देशासाठी खुला होऊ शकला तर किती बरं होईल….
प्राची,
सगळा जर तरचा प्रश्न आहे, आणि आपल्या इथे हे होईल इतक्या सहज असं वाटत तुला?
खरंच सांगा कुठे आहे होप?
अनु,
काय बोलू गं 😦
गटार आहे, मान्य………. वाईट्ट गटार आहे रे हे…… पण मी साफ़ करणार, बाह्या सरसावुन, अंगाला घाण आली तरी चालेल पण मी हे करणार, हेच माझे संस्कार आहेत, भगीरथाच्या देशात जन्मल्यामुळे असेल किंवा अगस्ती-लोपमुद्रेची (नर्मदेची) कथा ऐकुन असल्यामुळे असेल, बाबा आमटेंचा आदर्श असेल, हताश व्हायला माझे मन तयार नाही. प्रशासनात जाईन न जाईन तो भाग अलाहिदा , पण मी जोर लावणार. मला गटार साफ़ करायचंय अन मी ते करणार.
गुरु,
दोस्ता..पुर्ण सहमत आहे तुझ्याशी आणि त्यात मीही मागे हटणार नाही रे. पण असे काही प्रसंग, बातम्या येत असतात ज्या नुसत्या बडवून काही होत नाही हा माझा मुद्दा आहे. मी अण्णा हजारेंच्या आंदोलनादेखील पाठींबा दिला होता… फक्त छोटीशी आशा दिसत राहायला हवी रे बस्स 🙂
chan lihile ahe.
विक्रम,
अनेक अनेक आभार 🙂
अरे बाबा, सरळ सरळ Hint दिलेली आहे आपल्याला. ह्या लोकांसारखे हरामी बना आणि ऐश करा नाहीतर Hope Hope करत Breaking News बघत मरा. ++++++
सिद्धु ची कमेंट पटलीय !!
दीपक,
यप्प..काय बोलू अजून? 😦
फार वाईट वाटलं दोन्ही बातम्या वाचल्या तेव्हा.. आपण किती हेल्पलेस आहोत याची पुन्हा एकदा जाणीव झाली !!!!!
हेरंब,
हो रे, याची जाणीव ते मुद्दाम जाणूनबुजून करून देत आहेत त्यामुळे मोठ्या प्रमाणावर बंड होत नाही त्यांच्या विरुद्ध ..
खर्रेच कठीण आहे. सरकारी इतमामात अंतिम संस्कार करण्याचे कारण काय? इतके काय मोठे केले होते बुआ त्यांनी…?
मैथिली,
त्यांनी समाजोपयोगी खुप काम केली होती ते मान्य, पण त्यांनी ती करावीचं लागली कारण इतक्या मोठ्या प्रमाणात पैसा त्यांच्या ट्रस्टकडे होता…
http://www.youtube.com/watch?v=S72oq934bdM&feature=related . Ram joshi song. ati tatane.
दुर्गीजी
मस्तचं !!
सध्या तरि एकच आशेचा किरण दिसतोय. अण्णा हजारेंना मिळालेला पठिंबा ५०% जरि खरा धरला, तरी नवीन पिढी आता जाग्रुत होतेय असे वाटते. बघुया ते काय करतात!
अरुणाजी,
हो तेच बघायला हवं, ही ठिणगी विझता कामा नये हीच प्रार्थना…
मी गुरुनाथशी सहमत आहे. वाईट हे आहे की विशी आणि तिशीतल्या मंडळींनासुद्धा काही आशा दिसत नाहिये. आपण स्वत: जर काहिही करणार नसू तर ईतरांना शिव्या घालण्याचा आम्हाला काय अधिकार. पोलिसात तक्रार राहू दे पण महितीच्या अधिकाराखाली कधी अर्ज तरी केला आहे का आपण? शिवाजी जन्माला यावा पण तो दूसर्याच्या घरात, असा सगळा प्रकार झाला आहे ईथे.
सत्य साईबाबांनी किती मोठं कार्य केलं आणि कसं केलं, याविषयी मला फार काही माहिती नाही. पण सत्य साई बाबांनी काही चांगल्या गोष्टी जरूर केल्या आहेत.
http://www.sathyasai.org/saiinstservice.htm
अनिश,
मी सहमत आहे रे ह्या सगळ्या गोष्टींशी. कारण हे काम आपल्यालाचं करायचे आहें, पण आपण किती हतबल होऊ शकतो याची जाणीव ही लोक आपल्याला करून देत आहेत. माझे साई बाबांशी काही वैर नाही. खरंच 😀
माझं आहे. :p
हा हा हा …चांगली गोष्ट आहे. त्यातून काही सोन मिळाल की थोडं मला पण दे हां 😉