आज चैत्र शुद्ध पौर्णिमा , शके १९३३
छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथी आणि हनुमान जयंती ..

आज महाराजांची ३३१ वी पुण्यतिथी.
मनात स्वराज्याच्या स्वप्नाची ज्योत अखंड तेवत ठेवून, आयुष्यभर त्या स्वप्नाच्या पूर्ततेसाठी झटणाऱ्या महाराजांच्या पराक्रमाचं कितीही वर्णन केलं तरी कमीच आहे. आज रायगडावर होणाऱ्या एका विशेष समारंभात, शिवभूषण हे पुस्तक प्रकाशीत होतंय. हे पुस्तक म्हणजे, कवी भूषण यांच्या ५८६ छंदांचे, श्रीयुत निनादराव बेडेकरांनी मराठीत केलेला अनुवाद आहे. त्यातील एक सवैया स्तुती छंद महाराजांच्या चरणी अर्पण.
सुंदरता गुरुता प्रभुता भनि भूषन होती है आदरजामें |
सज्जनता ओ दयालुता दीनता कोमलता झलकै परजा में |
दान कृपानहु कों करिबो करिबो अभै दिनन को बर जामें |
साहिनसें रनटेक विवेक इते गुन एक सिवा सरजा में || ३७७||
कवी भूषण म्हणतो – सौंदर्य, गुरुत्व, प्रभुत्व या गुणांमुळे त्याला आदर प्राप्त झाला आहे. प्रजेविषयी सौजन्य, सज्जनता, दयाळूपणा आणि विनम्रपणा हे गुणही त्याच्यात आहेत. शत्रूंना तो तलवारीचे दान तर दीनांना तो अभयदान देतो. शाहाशी प्राणपणे युद्ध आणि विवेक हे असे सर्व गुण त्या शिवा सरजात एकवटलेले आहेत….
|| छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मुजरा ||
– सुझे
खरंच त्या महानायकाला त्रिवार मुजरा… त्याच्या कृपेनेच आज नावापुढे ‘खान’ लावावं लागत नाहीये !!!
हेरंब,
हो ना यार …खरंच !!
मुळचे सातारा जिल्ह्यातले आम्ही, छत्रपतींना नावाने हाक मारायची आजपण टाप होत नाही, ते आपले “थोरले राजेच” पुण्यतिथी ला राजे तुम्हास मुजरा
गुरु,
अरे ती टाप कोणाचीच होणे शक्य नाही या जगात, ज्यांनी हा इतिहास वाचलाय, अनुभवलाय…
महाराजांना त्रिवार मुजरा
बघ ना कोणालाचं आठवण नाही… नको तेव्हा दोन दोन जयंत्या बऱ्या साजरे करतात ही राजकारणी लोक …हरामखोर साले 😦
महाराजांना त्रिवार मुजरा….
🙂
छत्रपतीना त्रिवार मुजरा !!
इन्द्र जिमि जंभ पर, बाडब सुअंभ पर, रावन सदंभ पर, रघुकुल राज हैं।
पौन बारिबाह पर, संभु रतिनाह पर, ज्यौं सहस्रबाह पर राम-द्विजराज हैं॥
दावा द्रुम दंड पर, चीता मृगझुंड पर, ‘भूषन वितुंड पर, जैसे मृगराज हैं।
तेज तम अंस पर, कान्ह जिमि कंस पर, त्यौं मलिच्छ बंस पर, सेर शिवराज हैं॥
– कवी भूषण
प्राची,
मस्त गं !!
शिवाजी महाराजांच्या २-२ जयंत्या दारू पिवून धिंगाणा करत साजरा करणाऱ्या दोन्ही पक्षांना महाराजांना श्रद्धांजली अर्पण करण्याची तसदी घ्यावीशी वाटली नाही. का? अश्या कार्यक्रमात धिंगाणा घालता येत नाही म्हणुन ते न साजरे केलेलेच बरे असा विचार ही या नेत्यांनी केला असेल. का? असे ही असू शकेल की आपले महाराज कोणत्या तिथीला वारले हे नक्की ठरवता येत नसेल . कारण दोन जयंत्या तर साजऱ्या होतातच त्या मुळे आज नक्की कोणाचे महाराज वारले त्यांचे की आपले हे ठरवता येत नसेल. आता कांही वर्षांनी दोन पुण्यतिथ्या सुद्धा साजरी कराव्या लागतील. आणि तसे झाले तर पुढच्या शतकात महाराष्ट्रात दोन शिवाजी राजे होवून गेलेत हा इतिहास लिहावा लागेल. इंग्रजा सारखे जार्ज पहिला, जार्ज दुसरा , तिसरा या धर्तीवर शिवाजी राजे पहिले, शिवाजी राजे दुसरे असा इतिहास निर्माण होईल…. आणि ज्यांचे त्यांचे भाट तय्यारच आहेत असा इतिहास लिहिण्या साठी. महाराजांची क्षमा मागून. मजकूर आक्षेपाहर्त वाटत असेल तर रद्द करावा
नाही अजिबात आक्षेपार्ह वाटत नाही, कारण मला काल कुठेच काही दिसले नाही. एक कार्यक्रम रायगड समिती ने केला तोच. बाकी कुठेही ह्या बद्दल एक शब्द मला आढळून आला नाही. आपले राजकीय पक्ष फक्त फायद्यासाठी वापर करतात हेच दिसून येते. अजून काय बोलणार …. 😦
सक्र जिमि सैल पर । अर्क तम-फैल पर । बिघन की रैल पर । लंबोदर देखीये … !
राम दसकंध पर । भीम जरासंध पर । भूषण ज्यो सिंधु पर । कुंभज विसेखिये … !
हर ज्यो अनंग पर । गरुड ज्यो भूज़ंग पर । कौरवके अंग पर । पारथ ज्यो पेखिये … !
बाज ज्यो विहंग पर । सिंह ज्यो मतंग पर । म्लेंच्छ चतुरंग पर । सिवराज देखीये … !
सिवराज देखीये … सिवराज देखीये … सिवराज देखीये … सिवराज देखीये … !
… कवीराज भूषण.
मस्त रोहणा !!