गेल्यावर्षी आजच्याच दिवशी एक पोस्ट टाकली होती, माझं बिन भिंतीचे घर म्हणून. त्यावेळी सगळ्यांची एकदा भेट घेता यावी, म्हणून कांचन ताई, महेंद्र काका आणि रोहनने अथक प्रयत्न करून मराठी ब्लॉगर्स स्नेह मेळावा (दासावा) इथे आयोजित केला होता. त्याला उत्कृष्ट प्रतिसाद सुद्धा मिळाला.
आपण ज्या ब्लॉग धारकाशी कमेंट्स, पोस्ट या माध्यमातून बोलतो. सूचना देतो, मनमुराद तारीफ करतो, त्या व्यक्तीला प्रत्यक्ष भेटायला कोणाला नाही आवडणार? गेल्यावर्षी याच उद्देशाने भरवलेला ब्लॉगर मेळावा आजपर्यंत विसरू शकलो नाही. अगदी काल परवाचं झाला असं वाटणारा, हा सोहळा अनेक आठवणी मनात कायमच्या घर करून गेल्या. सगळ्यांची भेट सुखावून गेली. होता होता १ वर्ष संपून गेलं, कळलं सुद्धा नाही. पुन्हा एकदा, असाच एक सोहळा करायचे ठरत आहे आणि आशा आहे आपण त्याला भरभरून प्रतिसाद द्याल.
गेल्या वर्षीच्या मेळाव्याची काही क्षणचित्रे –
यावर्षी होणाऱ्या मेळाव्याला उपस्थित राहण्याची इच्छा असलेल्या ब्लॉगर्स आणि वाचकांनी नाव नोंदणी इथे करावी – मराठी ब्लॉगर्स स्नेह मेळावा, मुंबई २०११ नावनोंदणी
– सुझे 🙂
पुन्हा एकदा सगळ्यांना भेटायची संधी हुकली 😦
असो… तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा !
हेरंब,
खरंच रे संधी हुकली परत… 😦
पुढल्यावेळी जमवू परत… फोन कर नक्की आणि अश्याच शुभेच्छा राहू देत रे. 🙂
खूप खूप शुभेच्छा.. माझं अजुन नक्की नाहिये.. कळवतो लवकरच!
आप्पा,
धन्स रे. नक्की प्रयत्न कर रे प्लीज… !!
99% !
mi asen, va jar june / july madhye asel tar 100% in 😀
राज,
मेळावा ५ जून लाच आहे. नक्की ये रे !!
मज्जा करा रे… 🙂 मी नसीन पण मनाने असीनच… ह्यावेळी हेरंब बरोबर मी सुद्धा फोनवरून…. 😀
आणि हो… माझ्या वाटचे वडे-समोसे जे काही असतील ते खायला विसरू नका.. आणि काय रे… यायला जमत नसेल तरीही जर आर्थिक योगदान द्यायचे असेल तर काय???
रोहणा,
हवा होतास यार तु. असो, फोनवरून हजेरी लाव नक्की. खादाडीबद्दल काही सांगायची गरज नाही, तेव्हढा आगाऊ आहे मी 😀
कांचन ताई किंवा महेंद्र काकांना विचारून सांगतो मी तुला त्याबद्दल…
Jamvayche baghtoy 🙂
विक्रम,
नक्की प्रयत्न कर रे !!
अगदी खरं! बिन भिंतींचं पण घरच. एक वर्ष किती भुर्रक्न उडून गेलं रे, कळलंच नाही. पण गेल्या वर्षीचा अनुभव विलक्षण होता. अनुभवामधून काही शिकायला मिळाल्याने या वर्षी थोडं प्लॅनिंग बिनिंग करायचा प्रयत्न केलाय खरा. आता प्रत्यक्ष रिझल्ट मेळाव्याच्या दिवशी कळेलच.
कांचन ताई,
हो ग, मागच्या वर्षी एकदम धम्माल केली होती. यावर्षी देखील करू. सगळ जमून यायला हवं बस्स…. 🙂
मी येतोय रे….
देवेंद्र,
स्वागत आहे मित्रा… 🙂
मुंबई :((
प्राची,
काय झालं, काही अडचण आहे का?
जास्तीत जास्त लोकांना सोईचं पडावं हेच आमचे प्रयत्न होत ग… !!
अडचण अशी काही नाही, पण मी पुण्याची असल्याने संध्याकाळी ५.३० ते ८.३० या वेळेत मुंबईत येऊ शकत नाही. तुमची छायाचित्रे/क्षणचित्रे पाहीनच…. 🙂
ओहह्ह…
अच्छा…. तुम्ही सुद्धा तिथे मेळावा ठरवा मला नक्की यायला आवडेल 🙂