आणि सचिन नाचू लागला…


आज त्याला खुप आनंदाने नाचताना बघितलं. सगळ्यांनी त्याला खांद्यावर घेऊन मैदानाच्या चकरा मारल्या. त्याची पाठ थोपटली. मानाने भारतीय तिरंगा, त्याच्या हातात सोपवला. तो क्रिकेट विश्वचषक कप त्याच्या हाती देऊन, त्याला अक्षरशः सलाम केला…ज्याच्यासाठी हे केलं, त्या सचिन रमेश तेंडूलकरचे डोळे आज आनंदाश्रूंनी डबडबलेले होते.

खुप खडतर प्रयत्नानंतर हे अद्भुत यश, भारतीय संघाला मिळाले आहे ते सुद्धा तब्बल २८ वर्षांनी. भले कोणी काही म्हणो, काही पर्वा नाही मला. आज खुप आनंद झालाय. दिवसभर जो खेळाचा रोमांच अनुभवला तो शब्दात व्यक्त करणे कठीण आहे. एकावेळी अशी हालत होती की, सामना आपल्या हातून निसटतोय की काय. सगळे टीव्ही बंद करून, आपापल्या कामाला लागले. पण मन सांगत होत नाय रे जिंकू, आरामात खेळल तर मॅच आपलीच आहे आणि तेच झालं.

जेव्हा आपण सामना जिंकला तेव्हा, सगळे आनंदाने नाचत होते, पण सचिन काही दिसत नव्हता. काही मिनिटानंतर, ड्रेसिंग रूम मधून सचिन धावत बाहेर आला, चेहऱ्यावर निरागस हास्य, अप्रतिम आनंद आणि उंचावलेले हात. एखादा लहान मुलगा मी परीक्षेत यशस्वी झालो, असं सांगत धावत येतो ना आई-बाबांकडे तसा आनंद त्याच्या चेहऱ्यावर होता. खुप भरून आलं. त्याने एवढ केलं आपल्या देशासाठी, पण कारकीर्दीत विश्वचषक जिंकून दिला नाही हा कलंक (????) {आयचा घो, आधी हे कोण बोलले त्याला शोधा रे} त्याच्या माथी मारला, पण त्याच्याकडे याचे सुद्धा उत्तर होत आज.

 

जिंकलो रे जिंकलो....

 

 

सssचिsssन .... सsssचिsssन...

आजचा विजय संपूर्ण भारत देशासाठी आणि खास आपल्या लाडक्या तेंडल्यासाठी..

स्पर्धेत सगळ्यांनी केलेल्या कष्टाचे आज चीज झालं आणि भारत क्रिकेट विश्वविजेता झाला. सर्वांचे खुप खुप अभिनंदन !!!

 

विशेष सूचना – इथे येऊन फिक्सिंग किंवा तत्सम कमेंट्स टाकून माझ्या आनंदावर विरजण घालू नये. अशी लोक जगाच्या वेगळ्या कोपऱ्यात असतात जिथे, क्रिकेट हा फक्त चेंडू-फळी म्हणून ओळखला जातो. आमचा आनंद तुम्हाला नाही कळणार.. धन्यवाद !!

– सुझे 🙂

48 thoughts on “आणि सचिन नाचू लागला…

 1. धतड…धतड…धतड…धतड…धतड…धतड…धतड…धतड…धतड…धतड…धतड…धतड…धतड…धतड…धतड..धतड…धतड…धतड…धतड…धतड…धतड…धतड…धतड…धतड…धतड…धतड…धतड…धतड…धतड…धतड..धतड…धतड…धतड…धतड…धतड…धतड…धतड…धतड…धतड…धतड…धतड…धतड…धतड…धतड…धतड..धतड…धतड…धतड…धतड…धतड…धतड…धतड…धतड…धतड…धतड…धतड…धतड…धतड…धतड…धतड..धतड…धतड…धतड…धतड…धतड…धतड…धतड…धतड…धतड…धतड…धतड…धतड…धतड…धतड…धतड..धतड…धतड…धतड…धतड…धतड…धतड…धतड…धतड…धतड…धतड…धतड…धतड…धतड…धतड…धतड..धतड…धतड…धतड…धतड…धतड…धतड…धतड…धतड…धतड…धतड…धतड…धतड…धतड…धतड…धतड..धतड…धतड…धतड…धतड…धतड…धतड…धतड…धतड…धतड…धतड…धतड…धतड…धतड…धतड…धतड………

 2. 🙂

  टिव्ही बंद करण्यार्‍यामध्ये मी पण होतो… व हे सांगायला मला लाज वाट नाही आहे.
  खरं तर आपल्या टिमचे रेकॉर्डच तसे आहे… 😦 पण आज खेळले अगदी मना सारखे खेळले……… १२८ नंतर मी पाहयला सुरवात केली व शेवट पर्यंत ३२ लोकांना जागे वरून हलू पण दिले नाही 😉

  विई विन !!

  1. राज,
   हो माहित आहे ते, वैतागले होतेच सगळे. पण Gane is not over until its over .. 🙂

   शेवट गोड झाला आणि देव प्रसन्न झाला 🙂

 3. deepak parulekar

  फिक्सींग विक्सींग वाल्यांच्या आयच घो रे !!! आज खुशी का दिन है !!
  आप्ला लाडका तेंडल्या !!!
  खरचं !! क्रिकेट आणि सचिनवरचे निस्सिम प्रेम आणि भक्ति आज सार्थकी लागली !!!
  जियो !!
  धतड धतड धतड धतड धतड धतड धतड धतड धतड धतड धतड धतड धतड धतड धतड धतड !!!

  1. दीपक,

   खरंय रे, पण काही लोक…असू देत
   आपण जिंकलो आणि तेही तेंडल्यासाठी ही भावनाच खुप मोठी आहे … 🙂

 4. Nikhil Bellarykar

  Best post indeed! He sarv kahi ata satkarani lagla!!! Apan WC 2011 Jinkalo! No offense intended, pan sarkha sarkha WC 1983 aikun vaitaglo hoto. Aj WC 2011 jinkalo, ani anand aganit zala!!!

  Wooohooooo!!!!!!!!

  1. निखिल,

   हो ना यार… १९८३ च्या आठवणी, आपण अजून चिरतरुण केल्या हा विश्वचषक जिंकून 🙂
   ब्लॉगवर स्वगत, अशीच भेट देत रहा 🙂

 5. १००% खरंय. मलाही सेहवाग आणि सचिन आऊट झाल्यावर वातलं की आता विश्वचषक आपल्या हातून गेला. पण बाकीच्यांनी आज जबाबदारीने खेळले. सचिनच्या कारकीर्दीची सर्वोत्कृष्ट भेट त्याला त्याच्या टीममधील सहकार्‍यांनी दिली. धताड धताड धताड………..

  1. अलताई,
   हो मला ही काही वेळ असंच वाटल होत, पण शेवटी मन सांगत होत की आपण जिंकणार आणि जिंकलोच. सचिनला त्याच्या आयुष्यातली सगळ्यांत मोठी भेट मिळाली यातच मी भरून पावलो 🙂

 6. Gurunath

  एक खेळ तेराशे जाती धर्म असणारा १२१ कोटींचा देश एक करतो, सुहास राजे हा नुसता चेंडूफ़ळी चा करिष्मा नाही, हे खरे “भारत तत्व” आहे, श्रीमंत गरीब, सगळे गळ्यात गळे घालुन ओळख नसताना एकमेकांना “हाय फ़ाईव्ह” देताना पाहीले अन आनंदाने मनसोक्त रडलो, सच्या बहाद्दर देवच रे!!!!, आज माही पण “कप्तान” वाटला राव, युवी ने तेंडुलकर च्या आईला प्रॉमिस केलेलं वर्ल्ड कप च त्याचे फ़िल्ड वरचे आनंदाश्रु बघायला मिळणे ही पण पर्वणी!!!!!, अन शेवटी रैना चे वाक्य सचिन साठीचे “त्याने एकविस वर्षे देशाच्या अपेक्षा खांद्यावर घेतल्या, आम्ही म त्याला एकविस मिनिट्स पण खांद्यावर घेऊ नाही का?” धन्य ती टीम, धन्य तो देश अन धन्य आपण आज क्रिकेट नावाचा धर्म अन भारत नावाचा देश जिंकला महाराजा!!!!!!

  1. गुरुनाथ,

   हो रे, आपल्याकडे हा एक धर्मच आहे आणि त्याचा देव म्हणजे सर सचिन तेंडूलकर. सगळ्या संघाने सामुहीक उत्कृष्ठ कामगिरी करून आपला देवबाप्पाला ही भेट दिली आहे. 🙂

 7. भारत क्रिकेट विश्वविजेता झाला. सर्वांचे खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप अभिनंदन !!!

 8. चक दे इंडीया…. 🙂 🙂 🙂

  धतड….धधतड….धतड….धतड….धतड….धतड….धतड….धतड….धतड….धतड….धतड….धतड….धतड….
  धतड….धतड….धतड….धतड….धतड….धतड….धतड….धतड….धतड….
  धतड….धतड….धतड….धतड….धतड….धतड….धतड….धतड….धतड….धतड….धतड….धतड….
  धतड….धतड….धतड….धतड….धतड….धतड….धतड….धतड….धतड….धतड….धतड….तड….धतड….
  धतड….

  1. अश्विनी,
   सर्वप्रथम ब्लॉगवर स्वागत. फिक्सिंग म्हणणाऱ्या लोकांकडे दुर्लक्ष कर ग. मुद्दाम करतात ते.
   अशीच भेट देत रहा.. 🙂

 9. मंदार

  अवर्णनीय ! ! !

  कोणी काही म्हणू पण आपण विश्वविजयी झालोय व ते सुध्दा कोणतिही चालूगिरी , राग द्वेष , मत्सर न करता आपण विश्वविजयी झालोय …..

  भारतीय संघास मानाचा त्रिवार मुजरा !

 10. Post ek number tyahun Taltip ek number 😉

  Aaapalyala hach kshan pahacha hota aani mi eka avismarniy kshanache sakshidar jhalo aahot 🙂

  yupppeeyyy Love u Sach n Team India 🙂

  1. विक्रम,

   तळटीप गरजेची होती रे. मला खुप आनंद झाला त्यावर विरजण नको म्हणून तो प्रपंच 🙂
   असे क्षण रोज रोज नाही ना मिळत…

 11. धन्य धन्य झालो…हा विश्व कप हवाच होता…२००३ मध्ये खरं तर आपली टीम यावेळी पेक्षा चांगली खेळली होती पण ऑस्ट्रेलियापुढे आणि फायनलच्या दबावापुढे सगळे गळून पडले. भज्जी आणि युवीने तो पराभव पहिला होता म्हणूनच आज ते इतके भावुक झाले होते. आता सचिन, तू फक्त एवढ्यात निवृत्त नको होऊस.

  1. सागर,
   हो रे खरंच धन्य झालो. आपण याची देह याची डोळी हा विजय बघितला त्यातच सगळ आलं रे. सचिन अजून खेळणार आणि त्याने खेळायलाच हवं 🙂

 12. ek mumbaikar

  मुंबई सांसद वर झालेल्या अंतकवादी हल्ल्यात मरण पावलेल्यां नातेवाईक यांचे दुख सुद्धा बाजारीकरण झालेल्या तुमच्या मनाला पण समजणार नही.
  विशेष सूचना – इथे येऊन फिक्सिंग किंवा तत्सम कमेंट्स टाकून माझ्या आनंदावर विरजण घालू नये. अशी लोक जगाच्या वेगळ्या कोपऱ्यात असतात जिथे, क्रिकेट हा फक्त चेंडू-फळी म्हणून ओळखला जातो. आमचा आनंद तुम्हाला नाही कळणार.. धन्यवाद !!मुंबई सांसद वर झालेल्या अंतकवादी हल्ल्यात मरण पावलेल्यां नातेवाईक यांचे दुख सुद्धा बाजारीकरण झालेल्या तुमच्या मनाला पण समजणार नही.

  1. एक मुंबईकर,

   मी सुद्धा हाडाचा मुंबईकर आणी मी त्या जखमा ना कधी विसरलोय आणि ना कधी विसरणार नाही. क्रिकेटचं कौतुक केल्यावर माझ्या मनाला त्या गोष्टींचा विसर पडेल हे आपण कसे सांगू शकता?

 13. निःशब्द झालो (चांगल्या अर्थाने 🙂 )

  काय करावं तेच सुचत नव्हतं… वेड लागायची पाळी आली होती. सचिनला खांद्यावर घेऊन ग्राउंडला मारलेली ती फेरी तर निव्वळ अविस्मरणीय !!

  तळटीप एकदम शंभर नंबरी !! 🙂

  1. हेरंब,

   हो खरंच निःशब्द रे…. काश सचिनचा हात हातात घेऊन त्याच अभिनंदन करायला मिळाला असतं तर… 🙂

 14. भरून पावलो रे.
  २००३ ला पाकिस्तानबरोबर सर सचिन ९८ वर आउट झाला आणि त्या क्षणापासून मी तो खेळत असलेली एकही मॅच लाइव बघितली नाही. त्यात आत्ताच्या विश्वचषकातल्या कांगारू, पाकडे आणि लंकेबरोबरचे शेवटचे तीन सामने म्हणजे हद्द होती. माझ्यात गांधीजींची तीन ही माकडे अवतरली होती आणि हे सामने चालू असताना मी तोंड, डोळे आणि कान बंद करून होतो. सामना संपायची वेळ झाली की एकटाच गच्चीत जाऊन बसायचो आणि फटाक्यांची आतषबाजी झाली रे झाली की धावत खाली जायचो. बस्स आत्ता सचिनच्या हाती विश्वकप पाहिला. आत्ता काही टेन्शन नाही.

  1. सिद्ध्या,

   हो रे देवाकडे कप बघितला आता बस, देवबाप्पा जो पर्यंत खेळेल तो पर्यंत क्रिकेट बघणार 🙂

 15. सगळ्यांच्या प्रतिक्रियांमधून माझ्याही भावना व्यक्त झाल्याच आहेत.
  थोड वेगळ म्हणून एका ईमेल मधून आलेला मजकूर येथे पेस्ट करते.

  “I want my son to become Sachin Tendulkar.” -Brian Lara(WI)

  ”V did not lose 2 a team called India, v lost 2 a man called Sachin” – Mark Taylor(aus)

  ‘Nothing bad can happen 2 us if v were on a plane in India wit Sachin Tendulkar on it.” -Hashim Amla(SA)

  ”He can play that leg glance with a walking stick also” -Waqar Younis(Pak)

  ”There r 2 kind of batsman in the world. 1 Sachin Tendulkar and 2. all the others” -Andy Flower(ZIM)

  “I have seen God. He bats at no.4 for India in tests” -Matthew Hayden(AUS.)

  “I c myself when! i c Sachin batting” -Don Bradman(AUS)

  “Do your crime when Sachin is batting, bcos even God is busy watching his batting” -Australian Fan

  Barack Obama – “I don’t know about cricket but still I watch cricket to see Sachin play..Not b’coz I love his play its b’coz I want to know the reason why my country’s production goes down by 5 percent when he’s in batting”…

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.