दुनोळी…


आज मी आनंद काळेच्या बझ्झवर केलेला एक प्रताप (दुनोळी) ब्लॉगवर टाकतोय. दुनोळी हा आम्हीच तय्यार केलेला एक काव्य (?) प्रकार आहे. एखादा विषय घेऊन सुरु करायची दोन दोन ओळींची मारामारी. आमच्या ह्या चर्चेचा विषय पण तसा उत्तमच होता – “माझ्यासाठी कोण आहेस तू..??”

मग केलेला एक प्रयत्न हा असा… 🙂

गर्द धुक्यात हरवलेली वाट तू..
माझ्या आयुष्यात झालेली सुंदर पहाट तू…

पहिल्या पावसाने दरवळलेला मातीचा सुगंध तू..
आजवर बघितलेलं सुंदर स्वप्न तू…

हिरव्या नवलाईने नटलेल माळरान तू..
पावसा पाठोपाठ कोकिळेने धरलेली तान तू..

वाळवंटात मृगजळाने भागलेली तहान तू..
हळूच खुदकन हसणारे मुल लहान तू…

मनाचे बांधकाम पक्क करणारी तू…
तुझ्या प्रेमाने थक्क करणारी तू..

स्वच्छंदी उंच भरारी घेणारा पक्षी तू…
रांगोळीच्या रंगात नटलेली नक्षी तू….

उकडीच्या मोदकातला गोड मसाला तु..
गरम गरम वरणभातावर सोडलेली तुपाची धार तु…

प्रेमात उत्स्फूर्त केलेलं मुक्तछंद तू..
मसाला पानातला गोड गुलकंद तू…

भविष्याच्या विचारात अथांग रमणारी तू
माझेच विश्व होऊन माझ्यातच हरवणारी तू..

काटेरी फणसातले गोड गोड गरे तू..
डोंगरकपाऱ्यातून वाहणारे शुभ्र झरे तू..

उफाळत्या तेलात मस्त पोहणारे वडे तू..
अशक्य अश्या चढणीचे सह्याद्रीचे कडे तू..

शुभ्र चंदन लेवून नभी आलेला चंद्र तू..
रात्रीचा दरवळणारा तो निशिगंध तू…

माऊताई ने बनवलेल्या केकवरच आयसिंग तू..
सचिनच्या बॅटमधून निघालेल्या स्ट्रेट शॉटचं टायमिंग तू…

मनात घोळत असलेले अविरत विचार तू..
शाळेतल्या फळ्यावर लिहिलेला सुविचार तू…

माझ्या मनाचे अंतरंग तू…
प्रीतीचे उठलेले स्वरतरंग तू…

माझ्या जखमेवर मारलेली हळुवार फुक तू…
वेड लावणारी वार्‍याची झुळूक आहेस तू..

लाजतेस किती गोड तू…
जसा तळहातावर जपलेला फोड तू…

बागेत हळुवार उमलणारी कळी तू.
हळूच गालावर फुलणारी खळी तू..

रात्र जागून केलेला देवीचा जागर तू..
दगडालाही फुटलेला प्रेमाचा पाझर तू… .

कधीही न सुटलेलं गणित तू..
माझ्या आयुष्याचे झालेलं फलित तू…

ब्लॉग सुरु करून दीड वर्ष झाले. महेंद्र काका आणि हेरंब ह्यांच्यामुळेच माझा हा ब्लॉगप्रपंच सुरु झाला आणि तुम्ही सगळ्यांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळेच लिहिण्याचा उत्साह (किडा) आजपर्यंत कमी झालेला नाही. हां आळशीपणा करतो कधी कधी, पण नियमित काही ना काही खरडणे हा केलेला निश्चय आहे. आज नेमकी शंभरावी पोस्ट, काय लिहावं सुचत नव्हत, त्यामुळे काही निवडक दुनोळ्या इथे पोस्ट करतोय. मान्य आहे असह्य आहे पण… चालवून घ्या प्लीज 🙂

तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार…असाच लोभ असू द्या 🙂

तुम्हाला सगळ्यांच्या दुनोळ्या वाचायच्या असतील तर इथे क्लिक करून दीपकचा ब्लॉग वाचा…

– सुझे 🙂

54 thoughts on “दुनोळी…

 1. शंभराव्या पोस्टबद्दल अभी आणि नंदन सुझे..

  एक निरीक्षण : निम्म्याच्या वर दुनोळ्या या खादाडीशी संबंधित आहेत.. हेहेहे 🙂

  असाच लिहीत रहा.. पोस्ट्सच्या संख्येवर अजून एक शून्य वाढेपर्यंत 😀

  1. हेरंब,
   धन्यवाद रे, तू आणि महेंद्रकाकांमुळे हा पल्ला गाठू शकलोय आणि खादाडी दुनोळ्याचं आवडल्या मला त्याच इथे टाकल्या 🙂

 2. शंभराव्या पोस्टबद्दल अभिनंदन….

  असाच लिहीत रहा.. पोस्ट्सच्या संख्येवर अनेकानेक शून्य वाढेपर्यंत

 3. बझ आल्यापासून कळलंय.. असह्य प्रकार बरेच सह्य करतो आपण 😉
  खुप खुप शुभेच्छा भावा.. असंच लिहित रहा…

  1. आनंदा,
   धन्स रे.. हो रे आपले प्रकार असह्य आहेतच, आणि जे ते खपवून घेतात त्यांच्या सहनशीलतेला सलाम 🙂

  1. काका,
   हे सगळं तुमच्यामुळेच, त्यामुळे तुमचे खुप खुप आभार !!! आणि हो स्कॉच ना, बोला कधी उघडायची मी तय्यार आहे 🙂

 4. Tanvi

  अभिनंदन सुहास…. 🙂

  असेच लिहीत रहा….

  >>>>एक निरीक्षण : निम्म्याच्या वर दुनोळ्या या खादाडीशी संबंधित आहेत.. हेहेहे 🙂
  🙂

 5. deepak parulekar

  Well played Mate !
  A Well balanced century and what a shot it was to get it !
  With the help of those 2 runs towards straight drive!!!
  Congratulations for the 1st century !
  🙂

  1. दीप,

   थॅंक्स रे मित्रा, अश्या अनेक धावा आपण एकाच सामन्यात केलेल्या आहेत 🙂 🙂

 6. सर सचिन, वीरू, विराट आणि यूवीनंतर ह्या विश्वचषकादरम्यान शतक झळकवण्याचा मान मिळवल्याबद्दल अभिनंदन भाऊ.

 7. शंभरावी पोस्ट! अभिनंदन! दुनोळ्या पोस्ट होत होत्या तेव्हा वाचत होतेच. सगळेच उत्साही होते, तेव्हा. इन्स्टंट सुचत होतं.
  सुहास, यापुढेही लिहीत रहा. पोस्ट्सच्या सेंचुरीज लागू देत.

 8. Meenal

  शंभराव्या पोस्टबद्दल अभिनंदन!
  आणि दुनोळ्या भारी.. 🙂

 9. aruna

  दुनोळ्या एकदम मस्त, आयडिया छान आहे.
  १००व्या पोस्ट बद्दल अभिनंदन.

 10. शंभराव्या पोस्टबद्दल अभिनंदन!
  आणि दुनोळ्या भारी..
  एकदम हृदयझेली….!!

 11. सुहास,
  अभिनंदन भावा… दुनोळ्यांचा बझ जबराच होता.. तुझा ब्लॉग वाढतच जावो.. पुढील लिखाणासाठी शुभेच्छा!! 🙂

 12. वाह वाह…आमच्या प्रांतात घुसखोरी…?
  असो…स्वागत आणि अभिनंदन….
  आमची शंभरी गाठता गाठता केस पांढरे होणार बहुतेक…!

  1. सागरा,

   मी घुसखोरी काय रे करणार, हा आपला असाच एक टाईमपास होता. कविता वगैरे प्रकार मला झेपणार नाहीत 🙂

   अनेक आभार्स 🙂

  1. भारता,

   नक्की प्रयत्न करेन, पण त्यासाठी आपल्याला बझ्झ बझ्झ करावा लागेल रे 😉

   धन्स रे !!!

  1. विशालदा,

   कवी वगैरे काही नाही, तो माझा प्रांत नाही. त्यासाठी आपणच समर्थ आहात. 🙂

   धन्स रे 🙂

 13. शंभराव्या लेखाबद्दल अभिनंदन. 🙂
  दुनोळ्यांची मजा दोनच ओळीत आहे. उगाच रतीब घालू नये. :p
  अर्थात जो पर्यंत तू वाचून वगैरे दाखवत नाहीस तोपर्यंत सगळ क्षम्य आहे. 😉

 14. jyoti

  शंभराव्या पोस्टबद्दल अभिनंदन…. 🙂

  दुनोळ्या भारीच होत्या ….आवडी

Leave a Reply to Aparna Cancel reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.