रिस्क…


मी – नमस्कार मॅडम

ती – नमस्कार साहेबा, आहेस कुठे तु?

मी – मी ठीक आहे ग, तु सांग तुला घर मिळाल का भाड्याने?

ती – नाही, आणि इतक्यात त्याची गरजपण नाही.. 😦

मी – का ग? तुला घर भाड्याने मिळाल नाही का? मी प्रयत्‍न करू का? तुमचा बिल्डर काही नाटक करतोय का आता?

ती – नाही, आता मामला वेगळाच आहे.

मी – म्हणजे? तुमच्या बिल्डिंगच रीकन्स्ट्रक्षन कधी सुरू होणार आहे? कुठला मेंबर परत नडला काय?

ती – आता काम कधी सुरू होणार ते काही माहीत नाही, कारण मुंबई बीएमसी ने परवानगी नाकारलीय…त्यामुळे 😦

मी – काय? अस कस झाल मध्येच? तुमच प्रॉजेक्ट हल्लीच तर पास झाल होत ना? मग आता कुठे घोड अडल?

ती – अरे, काय सांगू? आता नवीन ऑफीसर आलाय बीएमसीमध्ये. त्याने फाइल अडकवून ठेवली परत. खुप धावपळ करून मागे आम्ही आधी ती परवानगी मिळवली होती, दीड वर्ष लागल होत…पण आता ते सगळ परत करायच्या भीतीने आम्ही सगळे… सोड. त्याने खूप फाइल्स अडकवून ठेवल्या आहेत आता.

मी – आयचा घो त्याच्या, आणि तु का अशी शांत बसतेयस? बातमी पेपरमध्ये दे, राजकीय दबाव आणू हव तर आपण.. काही तरी करायलाच पाहिजे ग. तुमच्या बिल्डिंगची आताची सद्य स्थिती एकदम वाईट आहे. रिस्की आहे तिथे राहण..

ती – ह्म्म्म..माहीत आहे. सोड तु. जे होईल ते बघू.

मी – अरे मी देतो बातमी पेपरमध्ये, मनसेच्या एका नेत्याला मी ओळखतो. त्याच्याकडे जायच काय?

ती – थॅंक्स सुहास, पण नको आता काही. खुप ताप सहन केलाय आधीच, अजुन नको. प्लीज़.

मी – अरे, अस कस बोलतेयस तु? मी घर शोधतो भाड्याने, तु ते घर सोड आणि मी पेपरमध्ये बातमी देतो ह्याबद्दल. निदान विरोधी पक्ष तरी मदत करेल आपल्याला.

ती – नको सुहास प्लीज़, थकलोय आम्ही. पेपरमध्ये बातमी गेली तर ही गोष्ट अजुन वाढेल. माझे बाबाच सेक्रेटरी आहेत, त्यांना परत सगळी धावपळ करावी लागेल. खुप त्रास सहन केलाय आधीच. अजुन परत नको. कुठलाही राजकीय पक्ष बिना काही स्वार्थ असल्याशिवाय मदत करणार नाही. मग ते कॉंग्रेस असो शिवसेना असो मनसे असो की कोणी इतर.. मीडियापर्यंत बातमी गेली तर हे प्रकरण अजुन चिघळेल रे. काही नको करुस. जे होतय ते होऊ देत. प्लीज़ प्लीज़.

मी – ह्म्म्म्म 😦

(हे काल झालेल एक ऑनलाइन संभाषण माझ्या मैत्रिणीबरोबर)

कांदिवलीमध्ये असलेली यांची एक जुनाट बिल्डिंग, दुरून भुत बंगलासारखीच दिसते. पावसात घरात भिंतीतून पाणी झिरपत, शॉक लागतो..सिमेंटचे बांधकाम हात लागला की असच तुटून पडत. नुसता फटाका जरी वाजला, तरी बिल्डिंग हादरते. खुप प्रयत्‍न करून सरतेशेवटी ह्या बिल्डिंगच्या रीकन्स्ट्रक्षनसाठी बीएमसीकडून परवानगी मिळाली. फेब्रुवारी-मार्चमध्ये सगळ्यांना घर खाली करायला नवीन बिल्डरने सांगून ठेवल होत. घर खाली करताना बिल्डर ह्यांना ११ महिन्याचे भाड्याचे पैसे देणार होता, पण आता ऑफीसर बदलला, फाइल अडकली, सगळी प्रक्रिया परत करावी लागणार ह्या भीतीने ती सगळी १५-१६ कुटुंब मोठी रिस्क घेऊन तिथेच राहत आहेत. जे व्हायच ते होऊ देत. देव बघून घेईल काय ते ह्याच आशेवर.

इथे मी मुद्दाम त्या मुलीच नाव, त्या बिल्डिंगच नाव किंवा त्या ऑफीसरच नाव देत नाही आहे. काय करू इथे देऊन? काय होणार आहे? तिलाच काय मला पण खात्री आहे की राजकीय आणि मीडीया हस्तक्षेप आला तर, जे काम एका वर्षात होईल ते परत रखडेल आणि किती वेळ ते सांगू शकत नाहीच. सामान्य माणसाची राजकीय आणि पत्रकारिता यंत्रणेकडे मदत मागण्याची हिंमतच उरली नाही. ती यंत्रणा आपल्यासाठी नाही, हे ह्या यंत्रणेमधल्या लोकांनीच आपल्या कार्यानेच पटवून दिलय. त्यामुळे त्यांना मदत मागायची म्हणजे, वाघापासून वाचवण्यासाठी सिंहाकडे मदत मागण्यासारखच आहे. त्यामुळे इथून नाही, तर तिथून मरण हे येणारच, मग काय करायच काय.. अजुन पिळवणूक होण्यापेक्षा आम्ही बिल्डिंगपडून मेलो तरी चालेल अस ती म्हणाली.

आपण एक त्रयस्थ म्हणून या प्रकरणाकडे बघू, तेव्हा आपल्याला वाटेल ती अशी का वागत आहेत, तिने पेटून उठायला हव, बोंबाबोंब करायला हवी ह्या प्रकरणाची…पण तिच्या जागी तुम्ही स्वत:ला ठेवून बघा. तुम्ही कुठली रिस्क निवडली असती?

-सुझे

38 thoughts on “रिस्क…

 1. कावळ्याच्या हाती कारभार *******भरला दरबार…

  सुहास ….आजुबाजुला पाहिल तर अशा परिस्थितीने पिचलेले खुप लोक आहेत….स्वातंत्र्याने आम्हाला काय दिल??? हाच विचार माझ्या मनात येतो.

  पुन्हा एकदा क्रांतीची नितांत गरज आहे.

  1. योगेश,
   हो ना यार… आपण स्वतंत्र झालो आहोत? नाय वाटत यार, एक प्रकारची गुलामीच आहे आपल्या देशात सद्ध्या…

   क्रांती…ह्म्म्म खुप कठीण गोष्ट आहे रे इथे 😦

 2. Dhundiraj

  काय बोलणार यावर…….मी तर एक त्रयस्थ…जसा तू बोललास तसाच विचार पहिल्यांदा आला डोक्यात.
  पण…तिच्या दृष्टीने विचार करायचा म्हटलं तर….नुसतं गप्प बसणे पण बरोबर नाही..

  1. धुंडीराज,
   विचार करून बघ ना, आपण सगळे त्रयस्थ रे…
   पण एकच सांगतो ज्याची जळते त्यालाच कळते 😦

 3. सगळी यंत्रणाच इतकी सडलेली आहे, जिथे खाता येईल तिथे हे लोक खात असतात. कोणालाच कसलीही चाड नाही. आपल्याला जे काम करण्याचा पगार मिळतो, तेच काम या लोकांकडून करवून घेण्याकरता सामान्य माणसाला यांचे हात ओले करावे लागतात. मेलेल्याच्या टाळूवरचे लोणी खाणारी जमात आहे ही. आपण जागच्या जागीच धुमसत बसण्याशिवाय काहीही करू शकत नाही याचीच जास्त चीड येते.

  1. श्रेयाताई,
   खरय…प्रत्येक गोष्टीला तोडपाणी मागून मागून किती पैसे खाणार ही लोक काय माहीत. सगळ कठीण आहे 😦
   सगळी यंत्रणाच इतकी सडलेली आहे, जिथे खाता येईल तिथे हे लोक खात असतात. कोणालाच कसलीही चाड नाही. +१

 4. सुहास, दुरून सांगणं सोपं असतं…तरी देखील गप्प बसण्याची ही वेळ नव्हे. धीर एकवटायची गरज आहे.

  1. अनघा,
   गप्प नाहीच ग बसत, मी माझ्यापरीने प्रयत्‍न करतोय…. ठोकशाही ने काम झाल असत ग लगेच पण, त्या सगळ्या लोकांना त्रास झाला असता ना, म्हणून गप्प आहोत….

 5. इकडून पण मरण आणि तिकडून पण मरण! रिस्क घेण्यात डोक्यावर डुगडुगत्या का होईना पण छपराचा आधार तरी आहे. तिची मानसिकता समजू शकते.

  पण आज एक sms आलाय तो शेअर करावासा वाटतो – The world suffers a lot, not because of the violence of bad people but because of the silence of good people!

  1. कांचनताई,
   हो ग काय करू?
   मी खुप संगितल की आपण काही करू, पण तिला जी काळजी आहे ती अजिबात चुकीची नाही आणि प्रकरण चिघळल तर अजुन त्रास होईल ग… 😦

 6. रिस्क जास्त मोठी आहे. सगळ्यांनी जागा विकून एकरकमी पैसे घेणे कधीही चांगले.पुन्हा जागा हवी म्हणून तिथे आग्रह धरण्यापेक्षा जास्त पैसे घेतले की दुसरी कडे घर घेता येईल ताबडतोब.

  1. महेंद्र काका,
   तुम्ही बोलताय तो मुद्दा बरोबर आहे, पण पैसाच तर मोठा अडसर आहे, कारण बिल्डर जे पैसे देणार होता भाड्याचे, ते तो आता का देईल जर प्रॉजेक्ट थांबल असेल तर? आणि ती जागा विकणे शक्य नाही इतक्यात तरी…

 7. सगळी यंत्रणा सडलेली आहे, अंधार आहे. पण एक तारा जोमाने चमकत आहे….. त्याचे तेज वाढत आहे. फक्त गरज आहे ती या ताऱ्याच्या प्रकाशात मार्गक्रमण करण्याची…. बरोबर आहे….. माहितीचा अधिकार २००५ वापरा. महाराष्ट्राच्या हजारे आण्णांनी भारतीयांना दिलेली ही एक अमूल्य देणगी आहे. आपण आपल्या मैत्रिणीला या कायद्याचा वापर करण्यास सांगा. कांही मार्गदर्शन हवे असेल तर मी देईन .मुंबईत अनेक सामाजिक संस्था आहेत ज्या आपल्याला हा अधिकार कसा वापरावा याचे मार्गदर्शन करतात. आपण मध्यमवर्गीय अधिकाराचा वापरच करत नसल्याने या भ्रष्ट्र नौकारशहा आणि नेत्यांचे फावते. मिडिया बद्दल बोलून XXX दगड टाकून आपल्या अंगावर शितोडे उडवून घेण्या सारखा प्रकार आहे. आणि मिडिया किंवा माणसे, शिवसेना कॉंग्रेस किंवा कोणत्या ही पक्षा कडे मदत मागणे म्हणजे चोरा पासून रक्षण करण्यासाठी पोलिसाची ( मोठ्या डाकूची ) मदत मागून आपल्याच पायावर धोंडा पाडून घेणे.

  1. काका,
   नक्कीच मी सांगेन तुम्हाला जर काही मदत लागली तर. मी उद्या जातोच आहे तिथे. आपण एकट्याने काही करू शकत नाही, कारण बिल्डिंगमधले इतर सदस्य तयार व्हायला हवेत. मी उद्या त्यांच्याशी बोलून घेतो. सद्ध्या कुठल्याही राजकीय पक्षाला ह्यात गुंतवलेले नाही आहे. त्यामुळे सगळ शांत आहे…

 8. महेंद्रदादांशी सहमत !
  प्राणापेक्षा काहीच मोठे नसते. इतक्या सगळ्या जणांच्या प्राणाशी खेळण्यापेक्षा जास्त पैसे घेवुन दुसरीकडे जागा घेतलेली बरी. आपली नोकरशाही इतक्या घाणेरड्या पातळीवर उतरलेली आहे की त्यांच्याकडुन कसलीही अपेक्षा करणे व्यर्थ आहे. 😦

  1. विशालदा,
   हो रे सहमत आहोत, पण काही गोष्टी असतात ज्या जुळून याव्या लागतात रे… तिथेच सगळ अडत बघ 😦

 9. शी शी शी… मूलभूत गरजांसाठी भीक मागावी लागते इथे. कसले हरामी लोकं असतात रे. इतका पैसा पैसा xxखाली दाबून काय करणार रे? खूपदा वाटतं काहीतरी पाप केलं असणार म्हणून ह्या देशात जन्म झाला आपला.

 10. aruna

  सध्या इतके भ्रश्टाचाराचे प्रकार बाहेर येत असतांना सुद्धा ते अधिकारि फ़ाईल अडवून ठेवतात म्हणजे किती निर्ढावलेले असतील!खरेच, माहितीच्या अधिकाराचा उपयोग करता आला तर पहावा.

  1. अरुणाजी,
   हो नक्कीच तसा प्रयत्‍न करणार आहोत, सद्ध्या बाकी काही गोष्टी निस्तरायला हव्यात आधी…

 11. अवघड आहे सुहास… पण ही रिस्क फार मोठी आहे…
  इथून पण मरण तिथून पण मरण, तर मग…
  जाऊ दे… जेव्हा मी सफरिंग पार्टी नसतो तेव्हा मला बोलणं सोपं असतं अन माझ्या बोलण्याला किंमतही नसते!
  😦

 12. भाई,
  प्रसंग वाईटच आहे…मी पण कितीही बडबड केली, तरी ती लोक ज्या मानसिक अवस्थेतून जात असतील याची कल्पना पण नाही करू शकत रे आपण… खरच 😦 😦

 13. ज्यांच्याकडे मदत मागायला जायला हव त्याच्याकडे जायला होत नाही ही आपल्या इथल्या यंत्रणेची मोठी हार आहे…
  खर आहे रे ज्याची जळते त्यालाच कळते …अश्या अनेक गोष्टी आपण आजूबाजूला पाहतो कि ज्यामुळे एकदम पेटून उठावस वाटते,पण परिणामाचा विचार केल्यावर शांत बसाव लागते.कारण आपल्यापेक्षा जास्त त्रास ज्याच्यासाठी लढू त्याला होणार ह्याची जाणीव होते….

  1. अरे हतबलता येतें एकप्रकारची… अशी भीती मनात आहे की दोन्ही बाजूने आपलीच लागणार हे नक्की असत 😦

 14. Gurunath

  आगाऊ माफ़ी मागुन विचार मांडण्याची गुस्ताखी करीत आहोत सरकार,

  दर प्रश्नाला सरकार ने आम्हाला काय दिले आम्ही काय करु शकतो ही उत्तरे काय फ़क्त भारतात असतात? तर मुळीच नाही, जर्मनी,अमेरीका सारख्या प्रगत देशांमधे पण असे प्रश्न असतातच, आपण स्वतःच कच खायची आणि वरुन टीका ही करायची, तर्क पटत नाही, माहिती चा अधिकार वापरा फ़ायली हलवायला मी स्वतः हलवल्या आहेत, नको राजकीय तर एन.जी.ओ’ज ना अप्रोच व्हा पण नुसते सिस्टीम ला दोष देत बसण्यात काय हशिल? मी स्वतः एक “घटनावादी” म्हणजे “constitutionalist” आहे, अन माझे स्पष्ट मत आहे भारताची राज्यघटना ही नेमकी प्रगल्भ आहे ,अमेरिकेत लोकांना सरकार चा त्रास का नाही होत? (किंवा का कमी त्रास होतो?) कारण तिथे प्रत्येक नागरीक घटना जाणतो त्यांची फ़ेडरल अन राज्य दोन्हीची, आपल्या कडे किती तथाकथित वेल एज्युकेटेड लोक हे गरजेचे मानतात काही आय.टी मधले मित्र तर माझे “मेरे डोमेन के बाहर का कुछ भी नही पता रहा तो भी चलता” ह्या माजात राहतात आता ह्यांच्यावर मी हसु की कीव करु ह्यांची? मॅकॉलेने आपल्याला प्रश्न विचारायची सवयच लावलेली नाही, म फ़्रस्ट्रेशन निघते कश्यात? कुठल्यातरी एका जातीवर, धर्मावर,भाषिक समुहावर किंवा कमीतकमी घरातल्यांवर!!!!,त्यात परत समाजमानसिकता पण आहेच आपली
  असो, प्रतिक्रिया म्हणुन पोस्ट टाकली जाईल अख्खी लिहीत बसलो तर, तुमच्या मैत्रिणी साठी म्हणाल तर एकच सल्ला सनदशीर अन कायद्याने लढ्लेच पाहीजे, फ़क्त प्रत्येक पावलाचे रेकॉर्ड ठेवत लॉग्स ठेवत, बाकी अजुन काय बोलु? जय हिंद

  ता.क :- हे जे काही लोकांना न आवडणारे स्वातंत्र्य आहे तेवढेच मिळवायला काय काय करावे लागले आहे हे मी लहानपणीच माझ्या स्वातंत्र्यसैनिक आजोबांच्या डोस्क्यावरची टेंगळे चाचपडुन शिकलो अन समजलो आहे, भारतीय म्हणुन मला ते अभिमानाचे पण आहे. त्यामुळे “स्वातंत्र्याने आम्हास काय दिले? वगैरे पचवणे मला घाण अवघड जाते, ना मी कॉंग्रेसी आहे ना भाजापाई… I am neither left nor right but i am upright ……

  पातळी सोडुन जास्तच बोललो असेन,लहानतोंडी मोठे घास घेतले असतील असे वाटले तर क्षमस्व…

  -आपलाच
  गुरु

  1. गुरुनाथ,

   तू म्हणतोयस तो मुद्दा बरोबर आहे, पण इथली परिस्थिती समजून घे आणि मुळात भ्रष्टाचार किंवा या न त्या मार्गाने प्रश्न सोडवणे ही गरज का पडतेय ते बघ. उद्या एक जण म्हणाला की मी ह्याविरुद्ध कायदेशीर मार्ग धरतो, पण बाकी १० जण नाही म्हणाले तर काय करणार? सर्वांना असे वाटणे गरजेचे आहे. एकट्याने बोलून काही होत नाही… मानसिकता बदललीय आणि ती सगळ्यांचीच बदललीय. ती एका फटक्यात सुधारणारी नाही..

 15. aruna

  i totally agree with Guru. we either are too lazy to bestir ourselves and wait for things to happen or we are plain cowards, and do not take any actions!
  also, i agree that people are not ready to enlarge their knowledge horizons. maybe they think ignorance is bliss! bit it is not. it can be very harmful, not to know. Later, there is no point in saying ‘only if i had known”.

  1. अरुणाजी,

   आम्ही पूर्णपणे कायदेशीर मार्गानेच प्रक्रिया पुर्ण करतोय, पण ही प्रक्रिया आधी पुर्ण झाली होती ती परत करतोय. आम्हाला पण इच्छा नाही की भ्रष्टाचारात सहभागी व्हावं, पण पैसे न घेता काम करणाऱ्या लोकांच्या मानसिकतेबद्दल मला मत मांडायचं होत इथे.

 16. aruna

  सुहास’
  मला कोणा एकाबद्दल लिहायचे नव्ह्ते. तुम्ही बरोबर प्रयत्न करतच आहात. मी एकूण आपल्या सगळ्यान्च्या मनोव्रुत्तीबद्दल जनरल कॊमेंट केलि, कारण मल्ला असे प्र्कर्षाने वाटते कि थोड्या लोकांनी जरी जोर धरला तरि बराच फ़रक पडू शकतो.
  तुम्हाल दोष देण्याचा माझा हेतु नव्हता. माई पोस्ट जरा स्टोंग, कारण घाईने लिहिली. क्षमस्व.

  1. अरुणाची,

   अहो.. मी अस् नाही म्हणत आहे की तुम्ही मला दोष देताय. मी पण समजू शकतो.
   आम्ही मुद्दाम वाकड्यात शिरणार नाही, कारण ह्यांना एकदा भरवायला सुरुवात केलं की अश्या लोकांचा आsss अजून मोठ्ठा होत जातो. आम्ही पुर्ण कायदेशीर बाबी पुर्ण करूनच सगळी प्रक्रिया परत करतोय, फक्त ती परत करावी लागली एका साध्या सही मुळे याचाच खेद वाटतो आणि ती प्रक्रिया एवढी किचकट आहे हे पाहून मनस्ताप होतो अजून काही नाही 😦

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.