इतके दिवस वाट बघत असलेला क्रिकेटचा महासंग्राम आजपासून ढाका येथे सुरू होतोय. जगातील १४ संघ ही स्पर्धा जिंकण्याचे मनसुबे घेऊन त्वेषाने ह्या संग्रामात उतरतील. भारतातील मीडियाचा सारखा प्रचार भारतीय जनतेच्या अपेक्षा अजुनच वाढवत आहेत. भारतीय संघाने हा कप जिंकवा म्हणून सगळे प्रार्थना करत आहेत. काहींनी देव पाण्यात ठेवलेत. काही जण भारताच्या मॅचला सुट्टी किवा आजारी पडून बॉल अन् बॉल याची देहा याची डोळे बघण्यास सज्ज आहेत. प्रचंड प्रमाणात जाहिरातबाजी सुरू आहेत. खेळाडूंच्या मुलाखती, त्यांचे स्टॅट्स सगळ सगळ आपल्यासमोर राहील पुढील दीड महिना. 🙂

आपण भारतीय लोक म्हणजे क्रिकेटसाठी अती भावनिक, गेले दोन वर्ल्डकप सुरू होण्याच्या आधी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी स्टेडियममध्ये सत्कार केले, हार फूल दिले….पण पण काही कारणाने एखाद्या संघाकडून पराभूत झाल्यावर त्यांच्या घराची तोडफोड केली, शिव्या दिल्या, खेळायची अक्कल काढली… अस व्हायला नको. खेळ आहे हा, जो चांगला खेळेल तो जिंकेलच आणि तोच जिंकायला हवा. खेळामधली खिलाडूवृत्ती जपून ह्या स्पर्धेचा आनंद लूटा.
स्पर्धेत सामील होणार्या प्रत्येक संघाला शुभेच्छा… 🙂
स्पर्धेच वेळापत्रक इथे बघता येईल – http://www.cricbuzz.com/cricket-schedule/series/228/icc-world-cup-2011
– सुझे
यस्स.. उद्या पहाटे ४ ला उठून बघणार आहे पहिल्या चेंडूपासून 😀
हेरंब 🙂
प्रामाणिक खेळ चाहत्यांची क्षमा मागून……..अपेक्षेच ओझ… चला दोन महीने भ्रष्ट्राचार, बेईमानी, राजा कलमाड़ी, jpc लोकसभा दहशदवाद ,महागाई, आत्महत्या या पासून मनमोहन सरकारची सुटका . रोजच्या जीवन मरणाच्या प्रश्ना पेक्षा या सट्टे बाजाराच्या मायाजालात जनतेला देश भावनेची अफूची नशा चढ़वुन सरकार आणि विरोधी पक्ष सुद्धा निवांत बसतील. यंत्र तंत्र जपजाप यज्ञ करत INDIAN जनता भारताचा नव्हे BCCI चा संघ जिंकावा म्हणून देव पाण्यात घालून बसतील आणि होय या सर्व तमाशाचे सूत्रधार सट्टेबाज अंधारात राहून सामना हार-जीत त्यांच्या सट्ट्या प्रमाणे ठरविण्यात, खेळाडूना वश करण्यात यश मिळविण्यात यशस्वी होतील.तर मुंबई सामन्याच्या निमित्ताने भारत-पाक दुष्मनी चा गैरफायदा घेत राजकारणी नेहमी प्रमाणे मतांचे राजकारण करतील तर उच्चभ्रू सिने कलाकार दहशदवादी हल्ल्यांचा इतिहास आपल्या मतलबा करता विसरून खेळात आणि कलेत देशाच्या दुष्मनीच्या सीमेत बांधु नका म्हणत गळा काढतील. …. मिडिया ज्यांना खेळातील कांहीच काळात नाही त्यांच्या बरोबर बकबक करत चर्चेचा आव आणत TRP वाढवण्याच्या गेम खेळात मग्न होतील …. आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या नेहमी प्रमाणे होतच राहतील …. पण या तमाश्यात यांचे सुतक कोणालाच असणार नाही.
मी समजू शकतो तुम्हाला काय म्हणायाच आहे ते…एकदम सहमत आहे मी त्याच्याशी
मला तर त्या सचिनची दया येते रे…किती अपेक्षा असतात त्याच्याकडून…
सगळे जण त्याच्या शतकमहोत्सवासाठी आतुर आहेत, प्रत्येक वेळी मैदानात उतरताना लोक १०० ची अपेक्षा ठेवून असतात त्याच्याकडून.
हो रे सागर, ते तर होणारच… शेवटी तो सचिन आहे. 🙂