१४ जान्युअरी १७६१


प्रत्येक वर्षी १४ जानेवारी, मकरसंक्रांतीला जेव्हा मी सगळ्यांना शुभेच्छापर संदेश पाठवायचो, तेव्हा मला अभिजीतकडून लगेच एक ईमेल यायचा, लालभडक अक्षरात लिहलेला तो ईमेल म्हणजे पानिपताच्या संग्रामाची माहिती देणारा आणि सण कसले साजरे करता याचा जाब विचारणारा. तो ईमेल आजही इनबॉक्समध्ये पडून आहे. विचार करायचो. कारण, छत्रपती शिवाजी महाराज आणि इंग्रज यांच्यामध्ये जो मराठ्यांचा सुवर्णकाळ होता, तो पानिपतच्या लढाईमुळे पूर्णपणे दुर्लक्षित झाला.

नुकतच साठ्ये महाविद्यालयात, जनसेवा समिती विलेपार्लेतर्फे एक अभ्यासवर्ग “पानिपताचा महासंग्राम”आयोजित केला होता. निनादराव बेडेकर, पांडुरंगराव बलकवडे आणि लष्करातील निवृत्त मेजर जनरल शशिकांत पित्रे ह्यांनी आपले विचार ह्या अभ्यासवर्गात मांडले होते. अतिशय अभ्यासपूर्ण माहिती दिली गेली. त्याच धर्तीवर त्यांचे काही विचार इथे मांडतोय.

आज म्हणजे, १४ जान्युअरी २०११ ला या युद्धाला २५० वर्ष पूर्ण झाली. भारताच्या इतिहासातील एक मैलाचा दगड म्हणून पानिपताच्या लढाईकडे बघितल जात. पण आपण त्या घटनेला पार दुर्लक्षित केल आहे. जनमानसावरही या घटनेचा इतका प्रभाव होता की, त्या धरतीवर अनेक वाक्यप्रचार मराठी बोली भाषेत रूढ झाले. उदा. १७६० भानगडी, पानिपत होणे, विश्वासराव मेला पानिपतात, अटकेपार झेंडे लावणे. बोली भाषा ही खर्‍या अर्थाने संस्कृतीच प्रतिनिधित्व करत असते अस मानल्यास पानिपतचे समर समाज मनात किती खोलवर भिनले आहे याची प्रचीती येते.

सन १७५२ च्या करारा अन्वये बाळाजी बाजीराव पेशवे ह्यांनी मुघल सल्तनतला अंतर्गत आणि बहिर्गत आक्रमणापासून संरक्षण करावे असे ठरले होते. ह्यात मुख्यत्वे अब्दालीचे परकीय आक्रमण होते आणि त्या बदल्यात त्यांना म्हणजेच मराठ्यांना उत्तरेकडील सहा सुभ्यांची चौथाई आणि सरदेशमुखी गोळा करण्याचे हक्क मिळाले. त्यात नजीबखान रोहील्याने (हा अब्दालीचा हिंदूस्थानातील पाठीराखा.) अब्दालीला मुसलमान धर्माचे रक्षण करण्याच्या नावाखाली चिथवले. मराठ्यांचे नियंत्रण कायमचे उखडून टाकायला पटवून दिले आणि अब्दालीने १० जान्युअरी १७६० ला यमुना चार ठिकाणाहून ओलांडून मराठ्यांच्या बयाजी शिंदे आणि दत्ताजी शिंदे यांचा पाडाव करून दुआबातमध्ये तळ ठोकला आणि हीच पानिपताची नांदी होती. मराठ्यांनी दत्ताजीच्या वधाचा बदला आणि हिंदूस्थानाचे अब्दाली-नजीबाच्या आक्रमणापासून कायमचा बंदोबस्त करायचे ठरवले.

ह्यावेळी चुकुनही त्यांच्या मनात आल नाही की आपण एका धर्माविरुद्ध लढतोय. आपण लढतोय ते आपल्या हिंदूस्थानासाठी. पूर्ण देशाचे रक्षण करायची जबाबदारी मराठ्यानी आपल्या खांद्यावर घेतली होती. ह्यातूनच आपल्याला कळते की मराठे किती बलशाली होते. त्यांची जरब होती दिल्ली आणि संपूर्ण भारतावर. त्यामुळेच महाराष्ट्र सोडून ते अब्दालीचा बंदोबस्त करायला अटकेपार निघाले. त्यातच मराठ्यांनी केलेल्या कुंजपुर्‍यातील दारुण पराभवाचे वर्तमान ऐकून अब्दाली अतिशय संतप्त झाला. मोठ्या त्वेषाने बागपतजवळ गौरीपुराला यमुनापार करून २८ ऑक्टोबर रोजी मराठ्यांशी अंतिम युद्ध लढण्यासाठी पानिपतजवळ नूरपूर गावी तळ देऊन राहिला. भाऊंना हे वर्तमान समजल्याबरोबर त्यांनी अब्दालीसमोर दोन कोसावर पानिपतास मराठी सैन्याचा तळ दिला.

अशा रीतीने सात महिन्याच्या प्रतीक्षेनंतर एका महायुद्धाचे प्रतिस्पर्धी समोरासमोर उभे ठाकले. १३ जानेवारीला रात्री भाऊंनी ठरवले की उद्या युद्ध करायचे व दिल्लीची वाट धरायची आणि १४ जानेवारीस पहाटे खंदक ओलांडून सर्व मराठा सैन्य बुणगे व बायकांसकट छावणीतून बाहेर पडले व यमुनेच्या रोखाने युद्धास सज्ज झाले.

तुंबळ युद्ध झाले. दोन्हीकडे सैन्य जवळजवळ सारखेच. मराठे खूप त्वेषाने लढले. अखेरच्या काही तासात ह्या युद्धाला कलाटणी मिळाली. विश्वासराव गोळी लागून पडले. सैन्यात एकच गडबड उडाली. सगळे सैरावैरा पळू लागले. त्याचाच फायदा घेत अब्दालीने आपले राखीव सैन्य मराठ्यांच्या दिशेला सोडल. पानिपतच्या रणांगणावर सव्वा लाख बांगडी फुटली. खूप इतिहासकारांनी सदाशिवरावांनाच ह्या पराभावला कारणीभूत ठरवल, त्यांच कमकुवत नैत्रुत्व, फसलेली युद्धाची आखणी असे अनेक आरोप केले गेले त्यांच्यावर. भाऊ शूरवीर होते, पण त्यांच्यासमोर असलेला अब्दाली हा एक उत्तम अनुभवी सेनापती होता. तिथेच भाऊ थोडे कमी पडले. सगळे युद्धभुमी सोडून पळून जात असताना ते युद्धभूमीवर उतरून तलवारीचे सपासप वार करत शत्रूला मर्द मराठ्याच दर्शन घडवत होते. शेवटी ते पडले आणि मराठे हरले 😦

भाऊसाहेब योद्धा थोर अंगामधी जोर, पुरा धैर्याचा, विश्वासरावही तसाच शौर्याचा ||
दोहो बाजूस भाला दाट पलिटेना वाट, अशा पर्याचा, किंचित पडेना प्रकाश वर सूर्याचा ||
दृष्टांत किति कवि भरील,काय स्तव करील ऐश्वर्याचा,शेवटी बिघडला बेत सकळ कार्याचा ||

– कवी प्रभाकर

 

काला आम - पानिपत युद्धाचे स्मारक

हे युद्ध मराठे हरले असले तरी त्यांनी अब्दालीचा ज्या प्रकारे प्रतिकार केला त्यातून धडा घेऊन अब्दाली किंवा वायव्येकडील एकही आक्रमण त्यानंतर भारतावर हल्ला करू शकला नाही. हा मराठ्यांमुळे झालेला भारताचा एक महत्त्वाचा लाभ होय. दुसरे असे की पानिपतच्या रणभूमीवर एवढा जबरदस्त मार खाऊनदेखील मराठे परत उभे राहिले. या बाबतीत त्यांना उपमा फक्त फिनिक्स पक्ष्याचीच शोभेल. मराठे नुसते उठले असे नसून त्यांनी उत्तर हिंदुस्थानात पुन्हा एकदा आपले वर्चस्व प्रस्थापित केले. मोगल सत्ता हातात घेऊन तिचे नियंत्रण करण्याचा अपुरा राहिलेला मराठ्यांचा मनसुबा महादजी शिंद्यांनी तडीस नेला. दिल्लीत लाल महालावर तब्बल १५ वर्ष (१७८८ ते १८०३) भगवा दिमाखात फडकत होता.

१४ जान्युअरी  १७६१ साली पानिपत येथे मराठे भारतीय राजकीय ऐक्यासाठी, भारत हा येथील लोकांचा परकीयांना येथे स्थान नाही, या उदात्त भूमिकेसाठी लढले. त्यांचा पराजय होऊनही त्यांच्या ध्येयाचा विजय झाला.

|| त्या पानिपतच्या रणसंग्रामातील वीर मराठा योद्ध्यांना मानवंदना ||

 

संदर्भ:
पानिपताचा महासंग्राम अभ्यासवर्ग (निनादराव बेडेकर आणि पांडुरंगराव बलकवडे यांच भाषण)
पानिपतचा रणसंग्राम मराठे विरुद्ध अफगाण १४ जान्युअरी १७६१ – निनादराव बेडेकर (लेखक)
साप्ताहिक विवेक – http://www.evivek.com/index.html

— सुझे

36 thoughts on “१४ जान्युअरी १७६१

 1. खरंच पानिपतकडे आपण एक हरलेली लढाई अशाच भूमिकेतून कायम बघत राहिलो 😦

  छान लिहिलं आहेस..

 2. करेंगे या मरेंगे… ह्या घोषणेपेक्षा.. ‘बचेंगे तो और भी लढेंगे’ ही दत्ताजी शिंदे यांची बोली खुद्द महाराजांकडून आली होती. हा स्वराज्याचा मूलमंत्र होता… तो कार्यक्रम मी हुकवला.. पण तुम्हाला तो साधता आला ह्याचा आनंद आहे… 🙂 पोस्ट वाचनीय आणि माहितीपूर्ण… 🙂

  1. धन्स रोहन..
   तुझ्यामुळेच तर माहिती मिळाली..त्यामुळे तुझे आभार कसे मानावेत तेच कळत नाही बघ 🙂

  1. धन्यवाद काका…
   जमेल तितक लिहून काढलय पण ह्याचा इतिहास अजुन खूप मोठा आहे. नक्की बघा वाचून ते पुस्तक…

 3. Anuja Save

  छान लिहिलं आहेस.. सुहास
  || त्या पानिपतच्या रणसंग्रामातील वीर मराठा योद्ध्यांना मानवंदना ||

 4. सुझे खूप छान लेख. पानिपत पुस्तक वाचल्यानंतर आज तुझा आणि देचुचा लेख वाचून अजुन माहिती मिळाली. सैन्याबरोबर गेलेले यात्रेकरू जेव्हा डोळ्या समोर येतात तेंव्हा नुसती चीडचीड होते.

  1. हो रे काही चुका झाल्यात असो..त्या शूरविरांना कधी विसरायला नको आपण एवढ तरी आपण करू शकतो की…

 5. पानिपतावर मराठा सैन्याने जिंकलेली लढाई भले हरली असेल पण मराठा सैनिकांनी प्रतिकुल परिस्थितीत गाजवलेले असामान्य , अतुलनिय असे शौर्य हे निर्विवाद वाखाणण्याजोगेच आहे….या लढाईनंतर मराठ्यांची दिल्लीच्या तख्तावरची पकड ढिली झाली पण याच पानिपतानंतर पुन्हा हिंदुस्थानाकडे इस्लामी आक्रमणकर्त्यांनी आपली नजर वळवायचे धाडस भविष्यात कधीही केले नाही .सतत ५०० वर्षॅ हिंदुस्थानावर इस्लामी राज्यकर्त्यानी फिरवलेला वरवंटा दुर सारण्यात मराठी सैन्य युद्ध हरले असताना देखिल यशस्वी झाले हेच पानिपताच्या लढाईचे साध्य आहे…छ्त्रपतींच्या हिंदवी स्वराज्याच्या तेजस्वी स्वप्नाला मराठ्यांच्या या पानिपताने पुर्णत्वास नेले असे म्हटंल्यास अतिशयोक्ती होणार नाही.. याचे कारण एकच या लढाईने हिंदुस्थानावरचा क्रूर असा इस्लामी बद-अंमल कायमचा दुर झाला … अब्दालीने परत न जाता जर इथेच आपले बस्तान बसवले असते ?तर आताचे चित्र काय असते याची कल्पना देखिल करवत नाही…..जवळपास एकलाख सैन्य या लढाईत कामी आले….सदाशिवरावभाऊ आणि विश्वासराव यांच्यासारखे धुरंधर धारातिर्थी पडले….कैक मराठा सरदार कामी आले….कैक स्त्रियांची अस्मत लुटली गेली कित्येक बटिक बनवुन पळवल्या गेल्या ……मराठी दिसणार्‍या प्रत्येकाला अब्दालीच्या सैन्याने वेचुन वेचुन कापुन काढले….दत्ताजी शिंदेंसारखे “बचेंगे तो और भी लढेंगे” म्हणणारे शुरविर पतन पावले…..इब्राहिम गारद्यासारख्या खाल्यामिठाला जागलेल्यांनी मराठ्यांशी हरामखोरी न करता व आपल्या जातीवर व धर्मावर न जाता आपल्या समोर असलेल्या धर्मबांधवांशी एकदिलाने आणि निकराने लढण्याचे औदार्य दाखवले नि:शस्त्र इब्राहिमला अब क्या करोगे?असे विचारले असता फिरसे उठकर और फौज बांधकर अफगाणिस्थानपे हमला करेंगे “सारखे उत्तर दिले……पानिपताच्या लढाईने भले मराठ्यांना हतबल केले असेल ,पण या हिंदुस्थानावर हिंदुधर्मावर कैक वर्षे असलेली इस्लामी शासकांची पकड मात्र कायमची दुर केली….पानिपताच्या या इतिहासातुन आपण काय शिकु शकतो जे सद्य परिस्थितीत आपल्या कामी येईल याचा प्रत्येक स्वाभिमानी व देशप्रेमी मराठी माणसाने व इतरांनी देखिल विचार करणे हेच श्रेयस्कर ठरेल्.इथुन धडा घेत आपण आपल्या भविष्यकाळात काही बदल करु शकलोच तर आणि तरच ती पानिपतावर पतन पावलेल्या धर्माने हिंदु पण कर्माने मराठी असलेल्या असंख्य योध्यांना खरी खुरी श्रद्धांजली असेल..

  1. अत्यंत सुंदर प्रतिक्रिया अनामिकाजी…
   आपण खरच ह्या लढाईतून शिकायला हव…महाराष्ट्रातील अंतर्गत राजकाराणपेक्षा ज्या मराठ्यांना देशाची सुरक्षा करणे आपले कर्तव्य वाटले ह्यातच सगळ आल…

 6. Santosh Kashid

  Suhas,
  Nice post….
  Panipat has always been very near to heart… A very nice and informative post… I really think the term ‘Panipat Jhale’ should be used for any good, great work done, instead the way it is used currently! And this history should be told to every Maharashtrian who think Maharashtrians can do nothing. & I dont want to drag politics into this, but this should be told to all those people who think Marathis are selfish and arrogant people…

  BTW, will you please share that mail (which you referred in this article) with me? My mail ID is mentioned above.

  1. संतोष, पानिपत ही घटना वाईट होतीच पण त्या लढाईमुळे पूर्ण भारत देश भविष्यातील अफगाणी आक्रमणातून सुटला. मराठे लढले देशासाठी आणि त्यांचे बलिदान आपण विसरू शकत नाही…..

   मी ईमेल पाठवला आहे. ब्लॉगवर स्वागत. अशीच भेट देत रहा. 🙂

 7. ARUNAA ERANDE

  खरे आहे, आपण आता पानिपतच्या युध्दाचा नकारात्मक विचार करणे बन्द केले पाहिजे.

 8. lokhande priyanka

  nice post. every time when i read about panipat, i feel exciting. how great they r: Anamika give new inf about ibrahim. also why r u change ur desine? it give difficulty to find recentely published post. plz do something, so new post easily available.

  1. रोहित,

   प्रतिक्रियेसाठी खुप खुप आभार आणि ब्लॉगवर स्वागत. अशीच भेट देत रहा !! 🙂

 9. Kishore Palande

  पानिपतवर शहीद झालेल्या आपल्या वीर मराठा योध्यांना, विनम्र श्रधांजली !!!

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.