वर्ष २०१० संपत आलय. काहीच तास उरले आहेत आता. नेहमीसारखच या वर्षी पण म्हणेन वर्ष कस गेल कळलच नाही 🙂
नवीन वर्ष सुरू होताना ह्या वर्षी घडलेल्या गोष्टींचा मागोवा घ्यायच ठरवल, तर खूप छान आणि वाईट अश्या गोष्टी घडल्या आहेत. विशेष उल्लेख करावसा वाटतो ते माझ्या ब्लॉग्गर मित्रांचा. अर्र्र्र्र्र्र आता ते माझे बलॉगर मित्र नाहीत..माझे काका, ताया, मित्र, मैत्रिणी आहेत. एक माझी नवीन फॅमिली. बरोबर बिन भिंतीच घर. आमचा बलॉगर मेळावा आणि त्यानंतर झालेल्या प्रत्येक भेटीने वृधिंगत झालेल आमच नात. ही ह्या वर्षाची माझी सर्वात मोठी अचिवमेण्ट.
या वर्षाबदद्ल अजुन एक जमेची बाजू म्हणजे नेहमीच्या मानाने खूप ट्रेक्स झाले. रोहनमुळे ओळख झालेले मित्र माझे बेस्ट बडी, मेट कधी झाले कळलच नाही. त्यांच्या सोबत प्रत्येक पावसातल्या वीकएण्डला ट्रेकला गेलोय. जून-ऑगस्ट याच काळात जवळजवळ १३ किल्ले झाले. मग मात्र पुढचे सगळे महिने नुसती खादाडी एके खादाडी (हा प्लस पॉइण्ट की माइनस तुम्ही ठरवा ;))
ऑफीसच म्हणाल तर कंटाळून, वैतागून सोडल. खूपच मानसिक त्रास होत होता. सो दिला ठोकून राम राम. आता नवीन इन्निंग सुरू केली आहे. त्यात थोडावेळ स्टेबल रहायचा प्रयत्न करेन. तीनवर्ष मी नवीन वर्षाच स्वागत ऑफीस फ्लोरवरुन केलय काम करता करता. मज्जा यायची, पण आज तसा होणार नाही. आज ट्रेकच जाम मूड होता पण सगळेच आपआपल्या प्लॅनिंगमध्ये बिज़ी आहेत त्यामुळे एक-दोन दिवसांनी जाईन (असा विचार आहे..) आज जमल नाही. मग आज नवीन वर्षाच स्वागत घरूनच आई-बाबा यांच्या सोबत टीवी बघत… 🙂
घरातली जबाबदारी वाढलीय, बाबा दोन वर्षांनी रिटायर होणार त्यांच्या नोकरीतून ह्याची जाणीव व्हायला लागलीय :(. लग्न कर लग्न कर असा मातोश्री बोलत असतात सारख्या (“सुन”वतच असते म्हणा ना :)), पण..पण खूप गोष्टी करायच्या राहिल्या आहेत, त्यानंतरच पुढचा विचार करेन. आयला, खूप सेंटी होतोय काय? हे हे..
असो, २०१० वर्ष छान होत. खूप खूप खूप मित्र-मैत्रिणी मिळाले, थोडफार ब्लॉगवर लिहतो असा सगळ्यांना वाटायला लागल, स्टार माझाने त्याची दखल ही घेतली. जुनी नाती अजुन बळकट झाली, कोणालाही माझ्यापरीने त्रास होणार नाही याची काळजी घेतली आणि घेणारच पुढे.
काही संकल्प केले आहेत, पण इथे डॉक्युमेंट करत नाही… पूर्ण केले की इथेच हक्काने सांगेन सगळ्यांना. तुम्हीसुद्धा तुमच्या परीने ह्या नवीन वर्षाच स्वागत कराल. नवीन संकल्प धरून, मग कोणी वाईट गोष्टी सोडायाच संकल्प करेल किवा कोणी चांगल्या आत्मसात करायचा. एकच करा “जे कराल ते मनापासून करा” (हे वाक्य मागच्या वर्षीच्याच पोस्ट मधून कॉपी पेस्ट आहे :)) आणि हो नियमीत ब्लॉगिंग हा गेल्यावर्षीचा संकल्प पूर्ण केलाय बर मी 🙂
काही आठवणी ह्या सरत्या वर्षाच्या …
.
सर्वांनी आनंदाने नवीन वर्षाचे स्वागत करा. माझ्या तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सगळ्यांना हे नवीन वर्ष भरभराटीच, आनंदाच आणि सुखाच जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
— सुझे —
सुहास खर बोललास….ह्या वर्षाने आपल्याला ब्लॉगर्सच्या रुपाने खुप छान मित्र दिले आहेत….आपल्या सर्वांची मैत्री अशीच बहरत राहो हीच प्रार्थना.
तुला अन तुझ्या परीवाराला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. 🙂
योगेश, खूप खूप शुभेच्छा रे तुला पण आणि हो ही मैत्री तुटायची नाय 🙂
मनातले लिहिले आहेस. नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
काका, हो मनात आल ते उतरवल इथे. तुम्हाला पण खूप खूप शुभेच्छा 🙂
सुहास लहानसं पण खूप सुंदर पोस्ट… 🙂
आई जे ’सुन’ वतेय त्याच्याकडे लक्ष दे नाहितर यावेळेस बाबाच्या घरी गेले होते पुढच्या ट्रिपला कांदिवलीला येते 🙂
तुला आणि तुझ्या सगळ्या कुटूंबियांना नवीन वर्षाच्या अनेक अनेक शुभेच्छा 🙂
हे हे नक्की ताई घरी यायच आहे तुला पुढाल्यावेळीस पण गप्पा मारायला आणि जेवायला. माझी सुनावणी घ्यायला नाही 😀 खूप खूप शुभेच्छा तुला आणि तुझ्या सगळ्या कुटुंबाला 🙂
नववर्षाभिनंदन…
मित्र परिवार वाढत जाओ, किल्ले सर होत राहो, ब्लॉग पोस्ट येत राहो आणि खादडी बहरत जावो.
आणि हो मिसेस सुझे येऊ दे… २०११ चा संकल्प सोड. म्हण वर्ल्ड कप पाहिन तर बायको बरोबरच 😉
हे हे ..काय बाबा माझा वर्ल्ड कप हुकवायच्या मागे आहेस…राहू दे की मला आनंदी असाच 😉
शुभेच्छांसाठी आभार. अशीच भेट देत रहा. आणि हो नवीन वर्षाच्या शुभेच्छा
Well Done Mate!
Such A Lovely Post !!
Happy New Year Dude !!
थॅंक्स मेट 🙂
तुलापण खूप खूप शुभेच्छा 🙂
गेलं ते वर्ष, गेला तो काल,
नवीन आशा अपेक्षा घेवून आले २०११ साल.
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! 🙂
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
प्रियांका, तुलापण खूप खूप शुभेच्छा !!
फोटो छान आहेत.
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
धन्यवाद राजेंद्र, ब्लॉग वर स्वागत. अशीच भेट देत रहा. 🙂
नवीन वर्षाच्या शुभेच्छा
नवीन वर्षाच्या शुभेच्छा…
आणि ते संकल्प वगैरे करण्याच्या भानगडीत पडू नको…
“जे कराल ते मनापासून करा” हेच खरे…
धन्यवाद सागर. अरे काही करावे लागणारच रे संकल्प 🙂 बघू काय होतय ते..
तुलापण खूप शुभेच्छा 🙂
Wish you a very very happy new year! ya warshat tujhya sagalya manokaamna purn howot. bharpurkille bagh aani killya saambhaLnaari suddha. 🙂
हे हे… नक्की सोनल. सध्या माझ्या किल्ल्या माझ्याकडे सुखरूप आहेत 🙂
तुलासुद्धा नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा
खरच यार तुझ्यासारखे मित्र ह्या वर्षी ह्या ब्लॉग जगताने दिले एकदम भरून पावलो…मनातल लिहिलास..तुझा संकल्प पूर्ण करण्यासाठी शुभेच्छा …!!!
आणि हो एखादी किल्लेदारीणही बघ आता लवकर …. 🙂
किल्लेदारीण का माझ्या हसर्या चेहर्यावर जळतोयस 😉
सुहासा, थोड्याशा उशिराने शुभेच्छा! 😀
तुलासुद्धा खूप शुभेच्छा भाई 🙂