सगळचं बदलत चाललय.. :(


————————————————————————-
“आज तू रुमाल दे, बॉल करायचा आहे कॅच कॅचसाठी”
“नाही..नाही मी नाही देणार आई ओरडते रुमाल खराब होतो”
“मला पण ओरडतात ना, पण मी काल दिला होता, आज तू देणार”
“ठीक आहे, घे..”

————————————————————————-
“सुहास, अरे आज ना पलीकडच्या गल्लीतल्या साई निकेतन सोसायटी बरोबर मॅच आहे. एक रुपया घेऊन ये रे कॉंट्रिब्यूशन आहे ते. २० रुपयाची मॅच आहे”
“घरी ओरडतील रे, किती वेळा पैसे मागू?”
“तुला खेळायच आहे की नाही?”
“खेळायच आहेच, मी आणतो”

————————————————————————-
रविवारी कबड्डीची प्रॅक्टीस आहे.. आपला “अ” वर्ग जिंकलाच पाहिजे..
नक्की येऊ सर..सुट्टीच आहे पूर्ण दिवस मस्त खेळू…

————————————————————————-
(कॉलेज बाहेरील पीसीओवरुन)
अरे मी खेळायला येतोय मला पण घ्या टीममध्ये..मी आता निघतोय कॉलेजमधून. तुम्ही टॉस करून ठेवा मी येतोच…
————————————————————————-

खूप आठवतात हे दिवस. आता काय माझ वय झालाय अश्या आविर्भावात माझ्याबद्दल काही विचार करू नका…:) हे दिवस म्हणजे १०-१२ वर्षापुर्वीचे. शाळेत मधली सुट्टी झाली की डबा पटापटा पोटात ढकलून धावत खाली यायचो खेळायला. रूमालाची कॅच कॅच, डॉजबॉल, सोन-साखळी, कबड्डी, आबादुबी.. मग शाळेला सुट्टी असली किवा शनिवार असला की शाळा सुटल्यावर क्रिकेट खेळायचो.

साठेला असताना प्रॅक्टिकल ४:३० ला संपायच आणि मी ४:४७ ची बोरीवली लोकल पकडून घरी पोचायचो ५:१० ला आणि घरी न जाता खालीच क्रिकेट खेळत राहायचो. अगदी अंधार होईपर्यंत खेळायचो. सलग सुट्टी आली की टेस्ट मॅच किवा बाजूच्या सोसायटीच्या टीम बरोबर ग्राउंडमध्ये मॅच ठरवायची आणि मग जिंकल्यावर एक बॉल आणि प्लास्टिकच्या छोट्या पिशवीतली एक पेप्सी घेऊन जीभ लाल लाल होईपर्यंत ती चोखत घरी यायचो.

आता दिवाळीत सुट्टी होती तेव्हा विचारला बिल्डिंगच्या बच्चे मंडळींना चला सगळ्यांना बोलवा आपण मॅच खेळू. आता मी ऑफीसला असताना माझ त्यांच्याशी एवढ बोलण नसायच. ती पोर म्हणाली तुम्ही मोठी मुल खेळा, आम्ही टीवीवर मॅच बघतो. मग अर्पीतने आणलेल्या नवीन एक्सबॉक्सवर गेम खेळायचे आहेत. लगेच मोबाइलने अर्पीतला फोन करून कुठले गेम्स आहेत ते विचारला त्या मुलाने आणि निघून गेला. मी मनातच धन्य म्हटला आणि म्हणालो आपण मोठे झालोय की ही मंडळी? माझ्यापेक्षा बिज़ी ही आजकालची मुल आहेत. त्या बिल्डिंगच्या ओसाड कॉंपाउंडला फेरी मारली आणि आपले जुने दिवस बरे होते असा मनातच म्हटला.

आज घरी येताना राजे शिवाजी मैदानासमोरून परत घरी येताना फक्त काही मोजकीच शाळकरी मुल दिसली मैदानात खेळताना. काही जण खेळ बघत होते तर काही मोबाइलवर गाणी ऐकत होते..तर काही मेसेजेस वाचत होते मोठ्याने शायरी काय, प्रेमाच्या चारोळ्या काय, नॉनवेज काय..मैदानी खेळ हे फक्त टीवीवर बघण्यासारखेच आहेत आणि त्यातल्या त्यात माहीत असलेला मैदानी खेळ म्हणजे क्रिकेट बस बाकी अभ्यासपुरते माहीत आहेत…

खेळताना ह्यांचा फक्त सूपरहिरोच पडतो, धडपडतो..पण पेनकिलर घेऊन लगेच ताजतावना होऊन त्याच जोशात खेळतो. मोबाइलवरुन फोन करून डाइरेक्ट स्नॅक्स घरी बोलवायची अक्कल आहे या पिढीला आहे, त्यांना तूप-साखर पोळी काय गोड लागणार? याच वयात यांना बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड आहेत. त्यांचे जे चालते ते वेगळच, सांगायला पण लाज वाटते. 😦

हाताची बोट जॉयस्टिक आणि कंप्यूटरवर थिरकत आहेत त्यांना काय कळणार बॉल लागून सुजलेल्या हाताने खेळायची मज्जा काय और..थकल्यावर १ रुपयात मिळणार ग्लासभर ताक कस थकवा पळून लावत…सब वे आणि मॅकडीच्या बर्गरला आपल्या घरच्या पोळी-बटाट्याच्या भाजीची सर ती काय येणार…आई-बाबापण मुल डोळ्यासमोर रहाव म्हणून हे फाजील लाड पुरवत आहेत याचच दु:ख जास्त आहे. मोबाइल काय वीडियो गेम्स काय..पॉकेटमनी काय…कसला ऐशोआराम आहे हा?…बालपण हे असा नव्हत कधीच माझ्यावेळी.

खरच आपली नवीन पिढी टेक्नोलॉजीची गुलाम होत जातेय. शिक्षाणापेक्षा ऐशोआराम किवा स्टेटस महत्त्वाच होत जातय. खर सांगायच तर बालपणाची व्याख्या बदलत जातेय दिवसेंदिवस आणि आपली अवस्था लवकरच च्यामारीकेसारखी होणार. 😦

खरच सगळच बदलत चाललय… 😦

22 thoughts on “सगळचं बदलत चाललय.. :(

 1. ARUNAA ERANDE

  झालय खर अस. वाढती स्पर्धा आई-वडिलाना बिझि ठेवते, आणी मुलान्च्या हातात महागडी खेळणी येतात.
  the togetherness, sharing each other’s interests are all gone. by the time the tired parents com home, they are no longer in a position to interact actively with anyone, leave aside their children. fatigued physically and mentally.
  moreover, we now can no longer send our children out for a long tome safely.we only prefer to keep them within.
  what is to be done?

  1. हो एकदम बरोबर बोललात अरुणाजी…
   कामाच्या रगाड्यात मुलांना पुरेसा वेळ देता न आल्याने अश्या खेळण्यांनी त्यांचे समाधान केले जाते आणि ते त्या गोष्टीला आदी होऊन जातात…

   1. ARUNAA ERANDE

    आपण सगळ्याचा सुवर्ण मध्य काढायचा प्रयत्न कराय़चा.पण एक खरय कि आज्चि मुले लवकर स्वतन्त्र होत्तत. त्याना कुतुम्बाशी बान्धुन ठेवणे गरजेचे आहे.
    अणी प्लीज मला अरुणातै, काकु, आजी काहि म्हत्ले तती चालेल. नुस्ते अरुना पन पळेल. अरुणाजी वगैरे नको.
    .

    1. ती आहे, मी अरुणाच म्हणतो 🙂
     तुम्ही एकदम बरोबर बोललात. सुवर्णमध्य हवाच पण तो येईल इतक्यात अशी काडीचीही शक्यता नाही. थोडक्यात आपली संस्कृती पाश्चात्य देशासारखीच होणार आहे लवकरच… 😦

 2. सुहास…अगदी मनातल लिहल आहेस…आज कालच्या मुलांना बालपण जगायला मिळतच नाही… ते कोवळे जीव पाहिल की वाइट वाटत…त्यांच्या आयुष्यातील सर्वात सुंदर असे क्षण मातीमोल होत आहेत.

  1. हो रे योगेश..

   त्यांच्या आयुष्यातील सर्वात सुंदर असे क्षण मातीमोल होत आहेत. +1

 3. sahajach

  सुहास अरे सगळीकडे हेच होतेय हल्ली… पटला लेख!!!

  आपल्या मुलांपुरते जरी आपण काही करू शकलो ना तरी जिंकलो असे वाटायची वेळ आहे ही…. मैदानी खेळ तर हवेतच पण त्याचबरोबरआई-बाबांनीही मुलांना वेळ देऊन खिलाडू वृत्ती त्यांच्यात निर्माण होईल हे दक्षतेने बघण्याची गरज आहे….

 4. deepak parulekar

  अम्म! आयला मी हा छंद अजुन जपुन ठेवलाय मात्र!
  लहानपणापासुन आतापर्यंत क्रिकेट इज माय फर्स्ट लव्ह! मागे मी एकदा बोललो होतो मॅचबद्दल पण आपल्या बझ्झवरही कुणी सीरिअस नाही दिसले त्याबाबत!
  एनीवेज तु म्हणतोय ते बरोबरच आहे मैदानी खेळांची जागा आता एलेक्ट्रॉनिक्स गॅजेट्सनी घेतलीए! जमाना है भई क्या करेंगे!
  पण आपला छंद आपण जोपासु शकतो.
  बरं! बोल कधी मॅच घेतो? 🙂

  1. हे हे माहीत आहे मला..तुला क्रिकेटच भारीच वेड आहे. मॅच घ्यायला मी तर तयार आहे पण बाकी कोणी काही बोलत नाही ना … 🙂

 5. मस्तच लिहिलंयस रे.. लहानपणीचे दिवस आठवले एकदम.. आम्ही शेजारच्या सोसायटीशी पहिली मॅच कितीची खेळलो होतो माहित्ये?? १ रुपयाची.. हेहे.. आणि तेव्हा तीही खूप मोठी वाटली होती.. सगळ्यांनी घरातून चार चार आणे वगैरे आणले होते.

  त्यानंतर १ रुपयाही जास्त वाटायला लागल्याने फक्त खुन्नस लेव्हलची मॅच खेळायचो.. फुल भारत-पाकिस्तान 🙂

  खरंच आजच्या टेक्नोअ‍ॅडीक्ट पिढीला हे आनंद सांगूनही कळायचे नाहीत.. अर्थात आपल्या मागच्या पिढीला आपली पिढी बिघडलेली वाटत असणार आणि आजच्या लहान पिढीच्या पुढची पिढी त्यांना अजूनच बिघडलेली वाटेल.. चक्र आहे हे 🙂

  1. वाह एक रुपयाची मॅच..भारी एकदम.
   मॅचमध्ये खुन्नस असणारच रे आपली सोसायटी जिंकावी असाच वाटत असत..आणि खर बोललास त्यांना आपण बिघडलेले वाटत असणार 😉

 6. खर आहे रे सुहास …..सगळ बदलत चाललय ….आपल्या वेळच्या त्या सगळ्या गोष्टींची लज्जत आजकालची मुलंना नाही कळणार …. त्यांची करमणूकीची साधन बदलली आहेत,तरी तो निरागस ,अवखळ आनंद ते नाही घेऊ शकत…..आपल्या वेळचे बरेच खेळ आजच्या पिढीला माहितीही नाहीत ….. 😦

  1. हो ना यार…
   त्यांची करमणूकीची साधन बदलली आहेत,तरी तो निरागस ,अवखळ आनंद ते नाही घेऊ शकत. काय होणार पुढे ते देवालाच माहीत 😦

 7. Maithili

  पटले एकदम…!!! खर्रेय…
  आणि तुलाच काय…मला पण असे वाटते की बर्रेच काही बदलत चालले आहे…फक्त खेळ वैगरेच नाही…तर mind set पण…

  1. मैथिली, अग हो ते आहेच पण तो खूप पुढचा मुद्दा आहे, सुरूवात बालपणापासूनच होतेय ना …

 8. खरं आहे. आपल्या लहानपणी काय मजा यायची. आजकाल बाहेर पडतच नाहीत मुलं. नुसती कंप्यूटरला चिकटलेली असतात.

 9. मैदानी खेळ खेळण्यापेक्षा मुलं हल्ली कॉम्प्युटर गेम्स खेळतात. पिएस २ फक्त ६ हजारात मिळतं . दिवस बदलले आहेत रे बाबा…. मान्य कर, ही पिढी दुसरी पिढी आहे, जनरेशन गॅप दिसायला लागलेली आहे आतापासूनच. मला माझ्या आणि तुमच्या पिढीत फारसा फरक वाटत नाही, पण इथे मात्र म्हणजे दुसऱ्या पिढी मधे खूप जाणवतो..

  1. हो काका, सगळच बदलत जातय.
   आता माझ्या समोर राहणाराच मुलगा, शाळेत जातोय ७ वीत असेल, पण मोबाइल, पीएसपी, कंप्यूटर, इंटरनेट, खाण्याची होम डिलीवरी सगळा सगळा जमतय. आयला, ह्या वयात तर मला साध टीवी रिमोटपण ऑपरेट नाही करता यायच 😦

Leave a Reply to सुहास Cancel reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.