मुंबईच्या वैभवाला साजेश्या हॉटेल ताजला सलाम..
हॉटेल ट्रायडेंटला सलाम..कॅफे लिओपोल्डला सलाम..
तिथे गोळ्या घालून मारलेल्यांना सलाम..
बोटीतून आलेल्या त्या दहशतवाद्याना सलाम..
सागरी सुरक्षेवर लक्ष नसणार्या सुरक्षा यंत्रणेला सलाम..
कोळी बांधवांनी दहशतवाद्याना दाखवलेल्या कोयत्याला सलाम..
सीएसटीला स्टेशनमध्ये प्राण गमावलेल्यांना सलाम..
शहीद करकरेंना सलाम…साळसकर साहेबांना सलाम..
जाबाझ कामटे यांचा प्राण घेणार्या लास्ट बुलेटला सलाम..
हुतात्मा मेजर संदीप उन्नीकृष्णन याला सलाम..
त्यांच्या गोळ्या लागून ठार झालेल्या प्रत्येक भारतीयाला सलाम..
मुंबईवर हल्ला करणार्या पाकिस्तानला सलाम…
पुरावे दाखवून त्यांच्यावर आरोप करणार्या आपल्या नेत्यांना सलाम
ते आम्ही नव्हेच म्हणणार्या त्यांच्या नेत्यांना सलाम..
हल्ल्याच लाइव्ह फुटेज टीवीवर दाखवणार्याला मीडीयाला सलाम…
त्याच रिपीट टेलीकास्ट करण्याच्या त्यांच्या मानसिकतेला सलाम..
वर्षातून एकदाच आठवण येऊन श्रद्धांजली देणार्याला सलाम..
कोरडे अश्रू ढाळणार्या लोकांना सलाम…
शाहीदांच्या बॅनर लावणार्या घोटाळेबाज राज्यकर्त्यांना सलाम..
बॅनर घेऊन मूक मोर्चे काढणार्यांना सलाम…
रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या लोकांना सलाम..
त्यांचे फोटो प्रदर्शित करणार्याला सलाम..
पोस्टर्सला बघून हळहळ व्यक्त करणार्याला सलाम..
उद्या त्याच पोस्टर्सचा कचरा उचलणार्याला सलाम…
कसाबला जिवंत पकडणार्या पोलिसांना सलाम..
त्याला पोसणार्या आपल्या सरकारला सलाम…
त्याला फाशी देणार्या आपल्या न्यायदेवतेला सलाम…
त्याला सुधारू द्या असा म्हणणार्या मानवाधिकार समितीला सलाम..
कॉंग्रेस सरकारला सलाम..त्यांच्या आदर्श राजकारणाला सलाम..
सगळा माहीत असूनही षंढ असलेल्या आपणा सर्वांना सलाम..
राग येऊन काही न करणार्यांना ह्या आपल्या हिजडयांच्या मानसिकतेला सलाम…
गांडीवर हात न ठेवता दोन्ही हाताने करतो सलाम…
लाथ नाही पडणार, गोळीने किवा बॉम्बने मरणार ह्या माझ्या विश्वासाला सलाम..
सलाम तुम्हा सर्वांना सलाम…
सलाम तुम्हा सर्वांना सलाम…
———
सगळा माहीत असूनही षंढ असलेल्या आपणा सर्वांना सलाम..
राग येऊन काही न करणार्यांना ह्या आपल्या हिजडयांच्या मानसिकतेला सलाम…
गांडीवर हात न ठेवता दोन्ही हाताने करतो सलाम…
लाथ नाही पडणार गोळीने किवा बॉम्बने मरणार ह्या माझ्या विश्वासाला सलाम..
पूर्ण अनुमोदन…
हो रे सिद्धार्थ …माझपण अनुमोदन 😦
जबरदस्त कविता…
दिलसे दिलतक पोहोचली..
धन्यवाद काका..
मी आधी खूप मोठ्ठी पोस्ट लिहली होती पण मलाच ती नाही आवडली कारण त्याच त्याच गोष्टी लिहल्या होत्या. त्यामुळे हा छोटा सलामीचा मार्ग 🙂
२६/११ आणि त्यायोगे येणा-या सर्व प्रतिक्रियांचे अगदी समर्पक चित्रण.
ह्या कवितेसाठी तुला सलाम !!!!!!!
हो ग तृप्ती…एक छोटा प्रयत्न.
तो आवडल्याचे आवर्जून सांगितल्याबद्दल आभार 🙂
Khup chaan lihilays…Atyant jaljalit pan katu satya aahe tech tu saangitle aahes…
धन्यवाद अर्चना..
जळजळीत आहे पण कटू सत्य हे पण आहे की आता सगळे विसरले आहेत…
जिंकलस मित्रा!!!!
खूपच छान कविता!
धन्यवाद अविनाश… 🙂
बहुतेकांच्या मनातील प्रातिनिधिक भावना खुपच सुंदर पद्धतीने मांडल्यास रे …
थॅंक्स रे मित्रा…असच सुचला आणि लिहत गेलो बघ 🙂
सुहास…मस्त लिहल आहेस..जबरदस्त…
धन्यवाद यवगेश 🙂
सुहास, असे बरेच सलाम करायचेत अजून अनेक वर्षं.. तयारीत रहा.. कारण कसाब काय एवढ्यात मरत नाही !!!!!
हो रे हेरंब..
तो जिवंत आहे आणि अजुन राहीलच..आणि आपण असेच सलाम करत करत संपणार..आपण असेच संपणार
सुंदर पोस्ट सुहास… खरच मनापासून सलाम….
>>>>सुहास, असे बरेच सलाम करायचेत अजून अनेक वर्षं.. तयारीत रहा.. कारण कसाब काय एवढ्यात मरत नाही !!!!! अगदी अगदी…तो मरत नाही आणि आपण काही करत नाही तोवर हे असेच…..
थॅंक्स ग ताई…
आपण काहीच करू शकत नाही, कारण आपणच त्याला ह्या अश्या न्यायप्रक्रियेमध्ये अडकवलाय की तो एवढ्यात मारत नाही. खाउ देत त्याला बिर्यानी आपली लोक ताट उचलतील 😦
आपण काहीही करु शकत नाही याचीच चीड येते. एकाला बाजुला करावा तर दुसरा तसाच!
तुमचा साअम योग्य ठिकणी पोचावा, ही प्रार्थना.
हो अगदी खर बोललात अरुणाजी…सलाम पोचणार नाहीच खात्री आहे मला, त्या लोकांचे कान पैसे कोंबून बुजवले आहेत…
सुहासा,
जबरदस्त पोस्ट एकदम!!!
आतला आवाज आहे आपल्या सगळ्यांचाच….आपली घुसमट आणि आपली तडफड व्यवस्थित व्यक्त होतेय…
थॅंक्स भाई..असाच एक प्रयत्न..
घुसमट आणि तडफड अजुन खूप आहे रे 😦
मस्त आहे कविता. भावना तीव्रतेने पोचल्या.
धन्यवाद संकेता 🙂