शुक्रवार, २२ ऑक्टोबर. माझा शेवटचा दिवस कंपनीमध्ये. सगळ्या मित्रांना सोडून जाताना थोडं वाईट वाटत होत, पण काही पर्याय उरला नव्हता..म्हणजे अडोबी सोडताना माझ्या मनाला अतिशय लागलं होत, रडलो होतो खूप, पण ह्यावेळी स्वत:ला खूप सावरल होत, मन खूप घट्ट केल होत.
त्यादिवशी माझी सकाळची शिफ्ट असल्याने मला जास्त कोणी भेटलं नाही आणि मी सगळ्यांना भेटल्याशिवाय जाण अशक्य होत, म्हणून रात्री परत ऑफिसला यायचं ठरवलं आणि माझ्या फ्लोरवरुन निघालो. ४ थ्या मजल्यावर आपसूक पावले वळली..केतकी, तारिक, हेमंता, राजा अश्या माझ्या कितीतरी अडोबीयन मित्रांना भेटल्याशिवाय कसा जाणार मी?
केतकीच्या पॉडवरच मी, तारिक गप्पा मारत बसलो त्याने घरून आणलेला आणि माझ्यासाठी खास राखून ठेवलेला चिकन फ्राइड राइस संपवला. जुन्या आठवणी काढू लागलो, मोठमोठ्याने हसू लागलो. मध्येच केतकी डोळ्याच्या कडा पुसत होती मॉनिटरकडे डोळे करून. थोडे दिवस थांब असा सांगत होती माझा वाढदिवस आहे रे, प्लीज़ प्लीज़…पण पण…मला आता थांबण शक्यच नव्हत कारण मॅनेजमेंटला मी एक आठवडा वाढीव दिला होता पण…असो नसेल माझी गरज आता. कॉर्पोरेट नियमच आहे, एक जर मावळत असेल तर त्यांची किंमत रेवेन्यू प्रोडक्षनच्या दृष्टीने शून्यच…
मग तिथून देवकाकांकडे गेलो मग घरी आलो रात्री ९ ला आणि परत ११ ला निघालो ऑफीसला. ट्रेनमध्ये बसल्यावर जिमीला एसएमएस केला, की मी येतोय कोणाला सांगू नकोस. इम्रानने पण फोन केला “तू मुझे बिना मिले कैसे जा सकता है भाई?” म्हटलं आलोच आहे ऑफीसच्या गेटवर, येतोय वर. आज सगळं अनोळखी वाटायला लागलं होत. ज्या ऑफीसमध्ये परत आलो होतो एक वर्षाने, ते परत सोडताना वाईट वाटत होत म्हणा. पण काय करणार… फ्लोरवर आलो आणि सगळे अरे सुहास आया सुहास आया म्हणून आले उठून..लीडरशिप मधले कोणी नव्हतं कारण सगळे क्लाइंटला सोडायला एअरपोर्टवर गेले होते..
इम्रानसोबत ब्रेक घेतला..मस्त परत जेवलो. माझ्या सीनियर टीम मॅनेजरचा वाढदिवस होता त्याला शुभेच्छा दिल्या. नवीन बॅच जी आता फ्लोरवर येणार होती, त्यांना भेटलो कॅंटीन मध्येच… पोर सॉलिड उत्साही होती, पण जेव्हा त्यांना कळलं, आज की माझा शेवटचा दिवस आहे, तेव्हा थोडे सीरियस झाले. म्हटलं चला आता फ्लोरवर जाऊ आणि थोडी प्रॉडक्ट सपोर्टची प्रॅक्टीस करू.
आता विक्रांत सोबत मी पण त्यांच्या ट्रेनिंग सेशनमध्ये घुसलो होतो 🙂 तोपर्यंत फ्लोरवर सगळे सीनियर्स आले, गप्पा मारू लागले. मी आपला नवीन बॅच सोबत काही प्रॉब्लम्स सोडवात बसलो होतो.. पहाटेचे ३ वाजले होते, मी घरी जाणार होतो…पण म्हटलं अजुन एक तास थांबू. विक्रांतला म्हटलं, चल आपला एक खादाडीच सेशन करू अनायसे इम्रानपण आहे. त्याची शिफ्ट संपली होती, तो आणि पूजा थांबले होते. मी, इम्रान आणि विक्रांत असे काही जेवतो ऑफीसमध्ये की टेबलवरच्या डिश उचलायला ३-४ मिनिटे लागायची.. तिघेही एक नंबरचे खादाड खौ 🙂
कॅंटीनमध्ये आलो चहा, ब्रेड बटर घेतल..म्हटल हे काय खातोय मग दोन बोइल एग सॅंडविच मागवले, सोबत ४ कोल्ड ड्रिंक..चहा पिऊन झाल्यावर..मग इडली, मग डोसा, कोल्ड ड्रिंक, आइसक्रीम, परत दोन शेवपुरी, दोन सुखा भेळ, वेज स्प्रिंग रोल, परत कोल्ड ड्रिंक आणि शेवटी पास्ता 🙂 हुश्श्श् दमलो…लिहून नाही खाऊन..असं परत कधीच खायला मिळणार नाही असं आम्ही खाल्लं होत… 😀
४ वाजले इम्रान घरी निघाला, जाताना मला एक स्निकर्स चॉकलेट घेऊन दिलं. मी अजुन एक तास थांबतो अस सांगितलं आणि फ्लोरवर आलो. सगळे सीनियर्स अजुन थांबले होते, नॉर्मली ते ३ ला जातात किवा ४ ला… पण आज ते थांबले होते…मी फ्लोरवर सगळ्यांना मदत करत होतो, मस्ती करत होतो. कोणाला वाटलंच नसतं, की आज माझा शेवटचा दिवस आहे. मग मी सगळ्या फॉर्मॅलीटीज कंप्लीट केल्या. एफ न एफचा फॉर्म भरून आय कार्ड दिलं केतनला. आयकार्ड शिवाय मला कसं तरीच होत होते. सगळ्यांना भेटून पॉडवर आलो एक छोटा गुड बाइ ईमेल लिहला आणि दिला पाठवून…
Hi Friends,
Today is my last working day with Stream.. One year 10 days and few hours with RR n Two Years 4 months with Adobe. It was really tough decision for me ..but Growth means Change and Change involves Risk..Stepping from Known to Unknown..

Cheers to all dear Friends n God Bless you all…
Regards,
Suhas Zele
ईमेल टाकला आणि मी कोणालाच न सांगता निघू लागलो..तेवढ्यात मागून आवाज आला..
“अरे सुहास ये देख ना कस्टमर दिमाग मैं जा राहा है, क्या ट्रबलशूट करू??” काजल ओरडली आणि तिने जीभ चावली..सॉरी सॉरी.. मी म्हणालो “सॉरी किस लिये??” तिचा प्रॉब्लेम सॉल्व करून, पुढल्यावेळी हे अस् करायचं सांगितलं. ती थॅंक्स थॅंक्स करत होती, पण आता मला ६ चा होम ड्रॉप मिस नव्हता करायचा आणि तिच्या पाठीवर हात ठेवून तडक लिफ्टकडे निघून आलो आणि ती गॉड ब्लेस्स यू म्हणत कीप इन टच ओरडत होती…
😦 🙂
–सुझे !!
सुहास… पुढच्या वाटचालीसाठी तुला शुभेच्छा … 🙂
थॅंक्स रे रोहणा 🙂
Sahi yaar,,
Company sodatanaache anubhav maze hi vegale naahit…
Chhaan Lihiles !!
All the best for your future !!!
धन्स रे…हो रे होत काय करणार… 😦
सुहासा,
अवघड असतं हे…मला स्वतःला हा अनुभव नाही अजून..पण समजू शकतो!
ऑल द बेस्ट!
थॅंक्स भाई..
अवघड असतच रे..निदान माझ्यासारख्या अति भावनाशिल प्राण्याला 🙂
Oops!!! Are raja jatanahi Kam kam kam Te RR ani te Cx…….. Ati bhayankar..
Aso tula pudhachya vatchali sathi khup khup shubheccha!!!!!!
All the best!!!!!
काम करणारच रे…मला ते नुसता बसून राहणा चांगला नसत वाटला 😦
आता मी पण कटी पतंग काही दिवस…हा हा हा
सुझे,
नवीन नोकरी साठी शुभेच्छा रे………..
धन्यवाद, सपा!!
सुहास, पुढच्या वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा .
🙂
थॅंक्स सिद्धार्थ… 🙂
सुहास,
नवीन नोकरीसाठी शुभेच्छा….
मी मागच्यावेळी पहिलं मूल होणार म्हणून असा सगळ्यांचा निरोप घेतला होता तेव्हा झाले होते सेंटी त्याची आठवण झाली आणि त्यातली जी काही जवळची लोक आहेत ती अजूनही संपर्कात आहे…तुही राहशील…बाकी नोकरीमध्ये गुंतू नये …नव्या ठिकाणी असेच लागेबांधे जुळव…..
BTW I am getting senti about the canteen para…………….take it out……………….:)
थॅंक्स अपर्णा…
हो म्हणजे काय नेहमीच राहीन की संपर्कात..घाबरू नकोस 🙂
आणि कॅंटीनचा पॅरा जिवाभावाचा आहे ग..राहू देत ना … प्लीज़ 🙂 🙂
All the best for……future ahead…..:)
धन्स रे मित्रा 🙂
अगदी खरंय सुहास. आपण जिथे काही काळ राहीलो, काम केलं ती जागा, ज्यांच्याबरोबर काम केलं, ज्यांच्या बरोबर राहीलो ती माणसं हे सगळे सोडून जाताना कसंतरीच वाटतं. मला तर मी बंगलोरहून सुट्टीला पुण्याला जायला निघाले की कसं तरी होतं आणि पुण्याहून बंगलोरला यायला निघाले की सुद्धा तीच भावना असते. आपण किती चटकन गुंततोना सगळ्यात!!
तुझ्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा! डेल मध्ये जातोयस ना. मला डेलवर म्हणजे त्यांच्या सर्व्हीसींग वर एक पोस्ट टाकायची आहेच, कधीतरी सविस्तर बोलूया.
हो खरय ग ताई…मनाचा गुंता कधी कधी न सोडवता…
मी डेलमध्ये नाही जात आहे, फक्त एक इंटरव्यू दिला होता आता मफसिसला जॉइन होतोय…
सुहास, अगदी माझाच जुना अनुभव वाचतोय असं वाटलं. छान लिहिलंयस..
पुढच्या प्रवासासाठी मनःपूर्वक शुभेच्छा !
हो यार..खरच काय करू 🙂
तुमच्या शुभेच्छा अश्याच राहू देत…
वा खुपच ह्र्द्य आठवणी दिसतात तुमच्या .. तुम्ही अडोबी मधे होतात ??? :O सहीच राव .. आधि माहित असत तर तुमच्या कडून वशिला लावला असता .. लाय्सन्स साठी 😛 /..
पुढील वाट्चाली साठी शुभेच्छा !
आयला वीरू, तुला मागेच बोललो होतो ना..अरे तूरे कर म्हणून, माझा एवढ वय झालेल नाही 😉
लाइसेन्स मिळून जाईल, थोडा प्रयत्न केला की, ते काही कठीण नाही 🙂 शुभेच्छानसाठी धन्स रे…
मनाची ओढाताण होतेच रे अश्या क्षणी…
बाकी पुढील वाटचालीसाठी तुला भरल्या पोटाने शुभेच्छा … ; )
खरय..शुभेच्छा अश्याच राहू देत भरल्या पोटाने…हे हे हे 🙂
लेख छान आहे. आवडला.
>> चहा, ब्रेड बटर, दोन बॉईल्ड एग सॅंडविच, ४ कोल्ड ड्रिंक, चहा, इडली, डोसा, कोल्ड ड्रिंक, आइसक्रीम, दोन शेवपुरी, दोन सुखा भेळ, वेज स्प्रिंग रोल, कोल्ड ड्रिंक आणि पास्ता!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
हे एवढं तू एकट्याने खाल्लंस???? मला नुसतं वाचूनच धाप लागली; खायचं म्हटलं एवढं तर चक्करच येईल….
धन्स रे 🙂
मी, इम्रान आणि विक्रांत यानी मिळून खाल्ला रे ते सगळा मी एकटा कस खाईन एवढा ..हा हा हा 🙂
सेंटी झालीये पोस्ट..
तुझा गुडबाय मेसेज विशेष आवडला..
अनेक शुभेच्छा!
सेंटी होणारच ग तीन वर्ष दिले मी त्या कंपनीला 🙂
शुभेच्छासाठी धन्स..खूप गरज आहे त्याची 🙂
Suhas, mi bar0bar ek warshyani tuzi hi p0st wachtey…..saglyat aadhi abhinandan tuhi mazyach sarkha ex BP0 emply0ee….hi P0st wachtana JLT madhla last day hubehub athwala….Kahi karan nastana Checker varun kadhun takla h0t mala…karan kay ki U need in an0ther pr0cess….bull shit….ani puha tyach pr0cess madhe c0ntine karawa lagla h0t….dil resignati0n…pan 2 warsha kadhli tithe akkha flr 0lkhaycha friends la s0dun jatana far kathin watat h0t…aaj hi tech watat saal parat jau ki kay….Bala ajun sudha resume karun que bhar kaam deil….:(
अश्विनी,
चालायचंच इथे असंच आयुष्य असतं.. एकसंधपणा कधी येत नाहीच आणि जो त्रास होतो तो आपल्यासारख्या लोकांनाच भोगावा लागतो..पण आपण तो त्रास सहन करायला तयार असतो.. का ते तुला माहित असेलंच.
धन्यवाद 🙂