डी सॅट…


आता शेवटचे काही दिवस उरले आहेत ह्या कंपनीमध्ये, राजीनामा दिल्यावर सुट्ट्या मिळत नाही, त्यामुळे ह्या गणपतीत सॉलिड धावपळ होतेय. ऑफीस सुटलं की, घरी येऊन मित्रांकडे गणपती दर्शनाला जावं लागतय. गुरुवारी रात्री सौरभच्या घरी गणपती विसर्जनला गेलो रात्री ८ ला, आणि विसर्जन होता होता २ वाजले. अजिबात झोप झाली नव्हती. घरी काहीसा चीडचीडतच आलो. काय करणार, पहाटे ५:३० ची शिफ्ट होती. बिल्डिंगच्या गेट जवळ पोचतो न पोचतोच ऑफीसमधून फोन, गाडी येतेय ४ पर्यंत. मी रागातच फोन ठेवला, म्हटलं दोन तास पण झोप नशिबात नाही 😦

ऑफीसला जायचा प्रचंड कंटाळा आला होता, पण आता वेळेवर आजारी पडणे शक्य नव्हते 😉 मी घरी जाऊन लगेच तयार झालो आणि गाडीची वाट बघत बसलो. ऑफिसमध्ये खूप काम पडलंय, त्यामुळे खूप राग येत होता. झोप नाही आणि वर इतकं काम करायच..पण पापी पेट का सवाल, म्हणून वाट बघत सोफ्यावर बसून डुलक्या काढू लागलो. बाहेर खूप जोरात पाउस सुरू होता. अचानक जाग आली तेव्हा ५ वाजले होते, पाऊस सुरूच होता आणि माझी मान दुखायला लागली होती. ५:३० ला गाडी आली, तेव्हा ट्रान्सपोर्टचा फोन आला. मी काहीसा ओरडतच बोलत होतो माझी शिफ्ट ५:३० ची आणि तुम्ही गाडी ५:३० ला पाठवताय? तो म्हणाला आम्ही तुझ्या म्यानेजरला कळवले आहे, काळजी नको करुस. मी काही नाही बोललो आणि ऑफीसला पोचलो.

Help ..Help..Help

६ वाजले होते, लॉगिन केलं आणि पहिलीच केस आली. साला खूप दिवसांपासून हा कस्टमर पीडत होता आम्हाला.. मनात म्हटलं काय, सुरूवात झाली ह्या दिवसाची. प्रथम सगळी माहिती घेतली, काय इश्यू आहे, काय कामं केली लोकल ऑफीस टेक्नीशियनने. तो आधीच तापला होता. मी काही सांगायच्या आधीच, तो शिव्या आणि रागात ओरडत होता. आमच्या क्लाइंटच अॅप्लिकेशन त्याच्या पीसीवर असलेलं नेटवर्क कार्ड डिटेक्ट करत नव्हतं. थोडं डोकं लावल्यावर कळलं, की ड्राइवर्सचा झोल असेल. मग मी त्याला सांगितलं, रिमोट सेशन ऑन कर, तर माझी मागणी सरळ उडवून लावली. जे काय आहे ते मी सांगेन आणि तो ते तिथे करेल, ह्याचं गोष्टीवर तो अडकून बसला होता. म्हटलं ठीक आहे रे बाबा, माझी पण कोणाशी हुज्जत घालायची मनस्थिती नव्हती.

मी म्हणालो, मी स्टेप्स सांगतो तसं कर..तो तयार झाला आणि मला थॅंक्स म्हणायला लागला. मग मी स्टेप्स सांगायला लागलो. (पुढील संभाषण शुद्ध-अशुद्ध इंग्रजीमध्ये आहे, पण मराठीत अनुवाद करायचा प्रयत्न करतोय..)

मी – रॉन, कुठली ऑपरेटिंग सिस्टम वापरत आहात?
रॉन – म्हणजे नक्की काय?
मी – म्हणजे विंडोज एक्सपी, विस्टा, सेव्हन
रॉन – माहीत नाही
मी – (This question was expected) प्लीज़ स्टार्ट किवा विंडोज लोगो वर क्लिक करा आणि रन मध्ये जाउन टाइप करा विनवर आणि एंटर मार
रॉन – स्टार्ट आयकॉन म्हणजे इथे स्टार्ट लिहिलं आहे डाव्या बाजूला खाली तिथे?
मी – हो, आता काही स्टेप्स करू नकोस थांब.
रॉन – का? तुला कळायला नको मी काय वापरतोय ते?
मी – मला कळलं आहे, आपण आता पुढील स्टेप्स करू.
रॉन – तुला कळलं कस? तू माझ्या पीसीच अक्सेस नाही ना घेतलास नकळत? मी केस करेन तुझ्या कंपनीवर (आइ विल सू यू ;))
मी – नाही, स्टार्ट फक्त विंडोज एक्सपी मध्येच लिहलेल असत. पुढल्या स्टेप्स देऊ का?
रॉन – अच्छा, चालेल. मी जरा वॉशरूमला जाउन येऊ का?
मी – चालेल (नाही म्हणून सांगतोय कोणाला)
रॉन – मी आलो आता पुढे बोल काय करू?
मी – स्वागत (वेलकम बॅक), आता स्टार्टवर क्लिक कर.
रॉन – स्टार्ट म्हणजे मघाशी आपण जे बोललो तेच का?
मी – (कपाळावर हात मारत) हो, रॉन… !!!
रॉन – ओके, कुठला क्लिक लेफ्ट की राइट
मी – लेफ्ट क्लिक..
रॉन – मी क्लिक केलं… आता?
मी – आता माय कंप्यूटरवर राइट क्लिक कर.
रॉन – ओके केलं..आता?
मी – आता हार्डवेअर टॅब वर क्लिक कर
रॉन – लेफ्ट की राइट?
मी – लेफ्ट..
रॉन – केलं… पुढे?
मी – डिवाइस मॅनेजर दिसतोय का? त्या बटन वर क्लिक कर.
रॉन – लेफ्ट की राइट?
मी – (काहीसा ओरडत) लेफ्ट..
रॉन – काही तरी विंडो उघडली आहे? तू काही करतोयस का तिथून?
मी – नाही, मी काही करत नाही आहे. ती विंडो उघड आणि नेटवर्क एडॅप्टर्सवर क्लिक कर..
रॉन – लेफ्ट की राइट?
मी – (काहीसा रागावत) रॉन, जिथे राइट क्लिक असेल मी सांगेन..तोवर सगळीकडे लेफ्ट क्लिक राहील..
रॉन – (वरमून) ओके
मी- तिथे बाजूला प्लस साईन असेल, त्यावर क्लिक कर
रॉन – प्लस साइन जे नेटवर्क अडॅप्टर्सच्या बाजूला आहे तेच का? आणि लेफ्ट क्लिकच ना?
मी – हो..तेच…तिथे काही कॉन्फ्लिक्ट्स दिसत आहेत का? म्हणजे यल्लो किवा रेड साईन्स??
रॉन – हो, एका ठिकाणी. नेटगियरच्या नावापुढे..
मी – ओके तुम्हाला पाठवलेली डिस्क पीसीमध्ये टाका आणि ऑटो रन नका करू.
रॉन – का?
मी – (आता सॉलिड तापलो होतो) प्लीज़ मी जे सांगतोय ते कर, कारण मी सांगतो नंतर.
रॉन – ओके, डिस्क टाकली.
मी – आता नेटगियरवर राइट क्‍लिक करा आणि अपडेट ड्राइवरला क्लिक कर.
रॉन – केला, पण अपडेट ड्राइवरला राइट क्लिक होत नाही आहे 😦
मी – रॉन, मी आधीच संगितल आहे जिथे राइट क्लिक असेल, तिथे सांगेन नाही तर लेफ्ट क्लिकच राहील..ओके???
रॉन – ओके..स्वीटहार्ट !!
मी – आता अपडेट ड्राइवर्स मधून सर्च ड्राइवर्स करा आणि सीडीचा पाथ द्या आणि लेफ्ट क्लिक ऑन ओके.
रॉन – केला आणि आता कॉन्फ्लिक्ट्स नाहीत.
मी – गुड
रॉन – आता?
मी – प्लीज़ होल्ड, मी सिग्नल्स रेफ्रेश करतो.

दोन मिनिटांनी

मी – (मी वॉशरूम ब्रेक घेऊन आलो) थॅंक यू फॉर युवर पेशन्स… (आमच्या पेशन्सची किंमत नसते इथे :()
मी – आता नेटवर्क्स सर्च कर..
रॉन – येस्स मला मिळालं..थॅंक्स. माझा प्रॉब्लेम संपला, प्लीज़ रिक्वेस्ट टिकिट बंद कर.. आणि तो लगेच निघून गेला.

चाळीस मिनिटे झाली असतील ह्या कस्टमरला, डोक्यात गेला होता. माझा विश्वासच बसत नाही की, ह्या उसातल्या लोकांनी कंप्यूटर शोधला. एक तासाने माझ्या मेंटरने मला बोलावलं. हा बघ पहिलाच डीसॅट आला तुझा (डीसॅट – कस्टमर डिस सॅटिस्फॅक्षन). म्हटलं ठीक आहे, केस नंबर दे मी बघतो. त्याने केस उघडली, बघितला तर रॉन साहेबांनीच डीसॅट दिला होता.

कॉमेंट अशी होती – The agent was very slow and computer literate. Though, he resolved my issue, but I m not happy with the support given by ur company and time to resolve this issue. I will contact ur company HQ to report this poor service,

मी वेड्यासारखा हसायला लागलो, त्याची दया येत होती आणि राग पण.. वाटलं शक्य असतं तर तर तुला घरी येऊन “समज” दिली असती… पण असो. अश्या कस्टमर्सची सवय असतेच, माझा मूड पण ठीक नव्हता. मॅनेजरला म्हटलं जाऊ दे, ईमेल कर मला फीडबॅक दिला ह्या डीसॅटचा आणि कामाला लागलो काही सॅट जमा करायला, ह्या डीसॅटची भरपाई म्हणून 🙂

— सुझे 🙂

33 thoughts on “डी सॅट…

 1. या घटनेवर एक मोठ्ठा, प्रचंड, अवाढव्य सुस्कारा सोडण्याशिवाय चांगली प्रतिक्रिया मी देऊ शकत नाही. हे भोग भोगून झालेले आहेत.
  >>माझा विश्वासच बसत नाही की ह्या उसातल्या लोकांनी कंप्यूटर शोधला.
  सहमत आहे रे! १०१ टक्के सहमत आहे.
  आज माझा तकिया कलाम बदलला. च्यायला! एक तर त्यांना समजेल अशा भाषेत सांगा, त्यांनी आधी करून ठेवलेले झोल निस्तरा आणि आपला रिपोर्ट काय तर एजंट वॉज व्हेरी स्लो….

  1. हे हे खरय ताई. तुला अनुभव आहेत मग मी जास्त काहीच बोलायला नको अश्या गोष्टींबाबत
   एक सुस्कारा सोडत… कस्टमर इज ऑल्वेज़ राइट 😉

 2. तुला गंमत माहित्ये का? अरे इथे बिल गेट्स, स्टीव्ह जॉब्स वगैरे एखादेच.. बाकी सगळे हे असलेच रॉन शॉन !!

  अजून एक.. नाहीतरी राजीनामा दिला आहेसच ना मग ते कस्टमर (आणि जमलं तर मॅनेजर उर्फ डॅमेजर)च्या डिसॅट रिक्वेस्टवर डिसॅट टाकता येते का बघ .. आणि असेल तर भाराभर डिसॅटा दे टाकून 😛

  1. काही कस्टमर्स असतात जे सॉलिड टेक सेवी असतात त्यांच्या बरोबर काम करण्यात वेगळीच मज्जा आहे 🙂

   अरे असे प्रकार पण खूप होतात म्हणजे डमी आइडी बनवून स्वत: सॅट भरणा, पण क्लाइंट सॉलिड हुशार असतो हे मला मान्य असल्याने असे प्रकार अजुन तरी करायच्या विचारात नाही..बघुया शेवटच्या दिवशी 😉

 3. आवरा….च्यायला…कसला चु**** आहे रे….अश्या लोकांसमोर पेशन्स ठेवुन काम करायच म्हणजे एक दिव्यच असतं…डोक्याची पार **** टाकत असतील ना???

 4. हा: हा: हा: “माझा विश्वासच बसत नाही की ह्या उसातल्या लोकांनी कंप्यूटर शोधला.” ultimate .२००% सहमत.. खूप उदाहरणं आहेत अशी.. अगदी मठ्ठोबा !!! मजा आली वाचतांना. त्त्याने d-sat टाकला कारण त्यांनासुद्धा माहित असते आपल्याशी बोलणारा कोणत्या देशातला आहे.

  1. हो त्यांना माहीत असतच की सगळ आउटसॉर्स्ड केला आहे त्यामुळे भारतीय आहे असा कळल्यामुळे सुद्धा खूप डीसॅट मिळाले आहेत..
   ब्लॉगवर स्वागत..अशीच भेट देत रहा

 5. हा रॉन नव्हे तुला रंतासिंग भेटला, तसेही ते भरभरुन आहेत म्हणून तर शेवटी काम देशी लोकं करतात..

  असो…नोकरी सोडलीच आहेस नं तर जाऊदे डोक्याला ताप नको करुन घेऊस..परत नवा भिडू नवा राज आहेच नं? शुभेच्छा.

  1. हे हे रंतासिंग सही आहे 🙂
   हो टेन्शन नाही आहे ग काहीच..असे बरेच सिंग मी सांभाळले आहेत तीन वर्षात, हा तर साधा होता 🙂

 6. ह्म्म.. बहुधा अशा कारणांसाठीसुद्धा संभाषण ध्वनीमुद्रित करत असतील. 🙂
  ह्यावरूनच २००५/६ मध्ये आलेल्या इंडिया कॊलिंग या मालिकेतील प्रसंग आठवला, ज्यात ग्राहक शिव्या देत असतो.

  1. आमच्या इथे प्रत्येक इंटरॅक्षन रेकॉर्ड करतात, त्यासाठी डेडिकेटेड फाइल सर्वर्स असतात. मग ते ईमेल ने असो, चॅट ने असो, कॉल ने, किंवा ऑनलाइन वेब केस.

   Everything should be documented 🙂

 7. सुझे….
  काय काय चालते रे तुझे!!! 😀
  खरंच मानलं तुम्हा सपोर्टवाल्यांना…इतक्यात माझं बीपी दोनदा शूट झालं असतं!
  मस्त झालीये पोस्टसुद्धा!

 8. Dhundiraj

  ह्म्म्म…. मला आठवण करून दिलीस, असल्या नालायक customers ची… पण हि post टाकून खूप बरे केलेस, आता मला कोणी विचारले कि, तू 2 yrs कुठला job करत होतास…..तर याची लिंक देऊन टाकीन सरळ …hahahaa..

  1. हे हे ..नक्कीच…
   सॉरी, की कॉम्मेण्ट चुकुन राहिली होती रिप्लाइ करायला. थॅंक्स रे 🙂

 9. सुझे, खूप छान लिहीलं आहेस. कल्पनाच नसते रे कॉल सेंटर मध्ये काय काय होत असतं ते. मला माझी डेल च्या सपोर्ट बरोबरची इंटरअ‍ॅक्शन आठवली. पण तो जो कोणी होता तो तुझ्या सारखा चांगला आजीबात नव्हाता. माझ्या काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं उडवा उडवीची दिलीन. मी एकूण सहा सपोर्ट वाल्या लोकांशी बोलले २-३ महिन्यांत त्यातील फक्त दोन चांगले होते. बाकीचे खूप अ‍ॅरोगंट आणि चुकीची माहीती देणारे होते, 😦

  1. हो मला देवकाका, म्हणाले होते की तुझा फार चांगला अनुभव नाही आहे ह्या इंडस्ट्रीच्या बाबतीत ..असो होणारच. नाण्याच्या दोन बाजू असतात हे मान्य कराव लागत अजुन काय?

 10. हाहाहा… लय भारी. हे असले काहीतरी प्रश्न विचारणार्‍याच्या तोंडात एक ठेवून द्यावी असे विचार येत असतील ना डोक्यात? बरं आहे, मला असला अनुभव नाही ते.

  1. हो.. कधी कधी राग मनस्ताप होतो पण तेच बाहेर न पडू देण हेच आमचा काम..कस्टमर फर्स्ट 🙂

 11. Meenal

  >>तू माझ्या पीसीच अक्सेस नाही ना घेतलास नकळत? मी केस करेन तुझ्या कंपनीवर
  >>काही तरी विंडो उघडली आहे? तू काही करतोयस का तिथून?
  हे प्रचंड भारी आहे.
  तू इथून काही करत जरी असतास, तर तसं कशाला सांगशिल?

  तुझ्या पेशन्सला कोपरापासून नमस्कार!

 12. Pingback: सी- सॅट … | मन उधाण वार्‍याचे…

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.