किल्ले रतनगड वॅक बरोबर…


किल्ले रतनगड भंडारदरा येथे रतनवाडी जवळ असलेला हा किल्ला. निसर्गरम्य परिसर आणि डोंगराआड लपलेला हा हिंदवी स्वराज्यामधील एक मस्त किल्ला. २२ ऑगस्टलाच अनुने या ट्रेकसाठी कन्फर्मेशन मागवला होत. ट्रेक स्पेशलच होता, कारण पहिल्यांदाच मी एका प्रोफेशनल ट्रेकिंग ग्रूप बरोबर जात होतो. त्यामुळेच आधी कन्फर्मेशन्स देणा गरजेचा होत. काही कारणामुळे मी मागील दोन ट्रेक जाउ न शकल्याने हा ट्रेक मला चुकवायचा नव्हता. ३ ला मध्यरात्री निघून ५ ला संध्याकाळी परत यायचा प्लान ठरला होता.

हा ट्रेक प्लान केला होता वसईच्या एक प्रसिद्ध ट्रेकिंग ग्रूपने. वॅक (VAC) वसई अडवेंचर क्लब. अनुजा ह्या ग्रूपची मेंबर होतीच आधीपासून आणि ती सगळ्यांनाच चांगल ओळखत होती. हा ग्रूप १९८८ पासून कार्यरत आहे आणि त्यांचे नियमीत ट्रेक्स सुरूच असतात. पंकज हा ह्या ट्रेकचा आमचा लीडर होता.

आम्हाला वसई बस डेपोमधून मध्यरात्री १२ ला निघायच होत..देवेन आणि दीपक तर कधीच पोचले होते. अनुजा परस्पर ठाण्याहून येत होती आणि मी बोरीवली हून थोडी खाण्याची खरेदी करून. आम्हा दोघांनाही पोचायला उशीर झाला होता आणि आम्ही धावतच बस कडे निघालो होतो. समान पण खूप होत कारण दोन दिवसाचे कपडे, पाणी, खाद्यसामग्री आणि स्लीपिंग बॅग ह्यामुळे खूप ओझ झाला होत. आम्ही बस पर्यंत धावत पोचलो आणि बॅक बेंचर्स सारखे मागच्या सीट अडवून बसलो. त्यावेळी कोणाची काही ओळख नाही, आम्ही कोणाशी बोलत नव्हतो, फक्त निखील जो आमच्या सोबत बसला होता तो गप्पा मारत होता. बाकी सगळ्यांच्या जोरदार गप्पा सुरू होत्या, त्यापण टिपिकल वाडवळ भाषेत. मला खूप कौतुक वाटत होत त्यांच ते बोलणा ऐकून आणि अनुजा मॅडम पण त्याच बोलीभाषेत बोलायला लागल्यावर संपला, बस मध्ये गप्पा सुरू, एकमेकांची खेचत काय होते, जुन्या आठवणी काढत होते. एकूण काय तर धम्माल सुरू होती. मी खिडकीतून बाहेर बघत त्यांच्या गप्पा ऐकू लागलो. वातावरण थंड होत, दीपक साहेब आइपॉड लावून शांत निजले होते..मग हळूहळू सगळेच निद्रादेवीच्या स्वाधीन झाले. मी, देवें आणि अनु काय ते जागे होतो, ह्या वेळी झोपायची सवय नाहीच म्हणा मला 😉

बस भरधाव जात होती, प्रवास लांबचा होता, त्यामुळे एक हॉल्ट मस्ट होता. रात्री ३:३० ला कसारा सुरू होण्याआधी बस थांबली, हलके हलके पाउस होता..त्यातच सगळे खाली उतरून हलके झाले 😉 पण मला मात्र चहाची तलप लागली होती. मग सरळ चहाची ऑर्डर देऊन मोकळा, मग देवेन आणि दीपक पण चहा घ्यायला आले, तो चहा म्हणजे साखरेचा पाक..मी आणि देवेन ने तो संपवला पण दीपक अर्ध्या ग्लासात आउट झाला. परत प्रवास सुरू भंडारदराकडे. कसारा घाटाचा रस्ता आता नवीन केल्यामुळे ट्रॅफिक नव्हत. घाट ओलांडून घोटी गावाच्या इथून इगतपुरी बायपास घेऊन भंडारदराला पोचलो. सगळे कुडकुडत होते, वातावरण प्रचंड थंड होत. शेंडी गावाला पोचल्यावर रस्ता विचारून निघालो रतनवाडीकडे. खड्ड्यात रस्ता होता, त्यामुळे सगळे शिव्या देत, चुक चुक करत डुलक्या घेत होते. अचानक ड्राइवर ने कचकन ब्रेक मारला आणि सांगितला रत्यावरून पाणी वाहतय. गाडी कशी जाणार पुढे. सगळे जागे झाले होते एव्हाना, खिडकीतून बघितल्यावर समोर प्रचंड जलाशय आणि त्यात हवेने निर्माण झालेल्या लाटा ते पाणी एका सिमेंटच्या भिंतीवरुन पाणी वाहत होत. रात्री ते दृष्या खूपच भयानक होत, पण पंकजने खाली उतरून पाण्याचा अंदाज घेतला आणि गाडी आणायला सांगितली. वळणावळणाचे रस्ते ओलांडून एकदाचे पोचलो रतनवाडीत.

अमृतेश्वर मंदिर..

६ वाजले होते, अमृतेश्वर मंदिराच्या परिसरात असलेल्या कुंडाजवळ गाडी पार्क केली, पाउस खूपच होता, कोणाचाही मूड दिसत नव्हता उतरायचा पण..जाव तर लागणारच होत. सगळ्या बॅग्स बसमध्येच ठेवून खाण्याचे सामान आणि पाणी घेऊन गडावर जायच ठरला. पण निघण्या आधी पोटला इंधन म्हणून गरमागरम पोहे आणि गवती चहा सांगितला. तो घेऊन आम्ही अमृतेश्वर मंदिर फिरून आलो. अतिशय रेखीव असा कोरीव काम असलेला ते शिल्प बघून डोळे तृप्त झाले. पावसाचा जोर वाढतच होता, मी, दीपकने काही छत्री, रेनकोट काही घेतला नव्हत, भिजायचा प्रचंड मूड होता. आम्ही मंदिरातून परत बसकडे आलो. सगळ्यांची ओळख परेड झाली, काही जणांनी रस्त्यात टाकायला झाडांच्या बिया घेतल्या होत्या. एक गावातला वाटाड्या घेऊन गडाकडे निघालो.

प्रवेशद्वार..

अनेक पाण्याचे ओहळ पार करत करत पावसाचे फटके सहन करत गप्पा मारत निघालो होतो. आजूबाजूच्या डोंगरावरून प्रचंड बधबधे वाहत होते. आमच्या ग्रूप मधले सीनियर मेंबर सुहासकाका आणि मामा या दोघांनाही सगळे बंधू बंधू हाक मारत असल्याने तीच त्यांची ओळख. मामा वॅक चे पहिल्यावर्षापासूनचे सदस्य म्हणजे १९८८ पासून आणि सुहास काका १९८९ पासून. मग त्यांचे अनुभव त्यांनी ट्रेकला केलेल्या गमतीजमती सांगत पुढे जात होतो. आम्हाला दोन तास लागणार होते, आम्ही अर्धा टप्पा पूर्ण केला मग थोडा हॉल्ट घेतला एका पठारावर..मग पुढे निघालो. पाउस थांबला होता, पण अधूनमधून एक सर येऊन आम्हाला भिजवून जायची.

आरामात चालत शेवटी आम्ही गडाच्या दरवाजाच्या खाली आलो, तिथे पुढे दोन शिड्या चढून जाव लागणार होत, त्या शिड्यांची हालत खूपच खराब होती. बाजूला धरायला काहीच नाही, कसेबसे एक एक करून वर चढलो आणि शेवटचा टप्पा आम्हाला रोप घेऊन पार करावा लागला. वातावरणात खूपच धुक होत, गडाच्या दरवाज्यातुनवर जाताना आम्ही ढगाच्या वर आलो अशी खात्री पटली कारण समोर नुसती पांढरी चादर होती. गडावरील पहिल्या गुहेत एक मंदिर होत आणि तिथून पुढे दोन मोठ्या गुहा. तिथे प्रचंड खादाडी झाली आणि आम्ही गडावरील बुरूज आणि टाक बघितला. पाउस आणि वारा इतका सुटला होता की काहीच दिसत नव्हत. मग थोडा विचार करून खाली उतरण्याचा निर्णय घेतला गेला, परत रोप लावला पण तेवढ्यात खालून दोन तीन ग्रूप वर येताना दिसले. मग त्याना रोपने वर घेऊन खाली उतरलो, ती मंडळी पण आमच्या सोबतच उतरली कारण त्यांना नंतर उतरायला काहीच मार्ग नव्हता कारण रोप फक्त आमच्याकडेच होता. उतरताना जास्त त्रास झाला नाही. एका तासात आम्ही बस पर्यंत पोचलो.

मग सगळ्यांनी फ्रेश होऊन कपडे बदलले. बंधू मंदिरात गेले होते प्रवचन ऐकायला आम्ही इथे मस्त चहा घेत बिस्कट हादडत होतो. जेवण लवकरच संगितल्याने घाई होती, आम्हाला सकाळी ६:३० निघायच होत. त्यामुळे जेवण रात्री ७:३० लाच आटपून झोपायची तयारी सुरू झाली. सगळ्या मुली आणि काहीशाळा मंडळी मंदिराच्या आश्रमात झोपायला गेले. आम्ही फक्त ७ जण होतो बस मध्ये. अंधार पडला होताच आणि आम्ही सगळी मुलच होतो बस मध्ये.

आता बस मध्ये आमची मैफल जमली, तशी नाही हो बॉइज टॉक्स..हा हा हा. कोणी जोक्स सांगत होते, कोणी काही अनुभव. गावाच्या वेशी बाहेर झाडाला लटकलेली भूत कशी हसतात तसे आम्ही जोरदार हसत होतो. अचानक आमची नजर बसच्या बाहेर चालेल्या प्रकारवर पडली. कोणी तरी बसकडे टॉर्च मारुन बंद करत होत. रस्त्यावरून जोर जोरात चालत होत, अचानक वारा बंद व्हायचा, सगळे शांत व्हायचे आणि बसच्या खिडकीला डोक लावून बाहेर बघत होते. कोणी बाहेर पडायच्या मूडमध्ये नव्हते. पाउस सुरू होता हलके हलके..मग आम्ही दुर्लक्ष करून परत आमच्या गप्पा सुरू केल्या मग परत कोणी तरी टॉर्च मारला, कधी पांढरी आकृती जाताना बघितली, सगळे भूत आहे असा सांगू लागले. मग वार्‍याला वारा म्हणून मी भुताच्याच गोष्टी सुरू केल्या 😉

विचारला कोणाचा विश्वास आहे ह्यावर, बहुतेक सगळे होच म्हणाले मला आणि देवेनला सोडून..मग भुताचे अनुभव. कल्पना करा रात्रीचे १०:३०च झाले असती, पण बाहेर काळोख, सोसाट्याचा वारा, बाजूला असा जुना मंदिर, पाण्याचा टाक, पिंपळाच झाड, एक बस आणि बसमध्ये भुताच्या गोष्टी 😉 खूप वेळ गप्पा मारुन आणि हसून हसून पार वाट लागली होती. थोड्यावेळाने सगळे निजले, मला रात्री जाग आली होती २ ला तेव्हा ड्राइवर शिव्या देत लाइट लावून काही तरी करत होता, बस सुरू केली होती (बॅटरी थंड पडू नये म्हणून) मला वाटला उठून बघाव पण सगळे सीटवर आडवे पसरल्याने मी पण पाय सीटवर ठेवून झोपून गेलो. पहाटे ५:३० लाच उठलो

मी, दीपक आणि देवेन बँटिंग करायला उठलो (ह्या टर्मचा अर्थ माहीत असेलच ना ;)). मी गाढ झोपेत होतो, कदाचित काही स्वप्न बघत होतो पण दचकून उठलो. सकाळी सकाळी हिरवळ आणि प्रवरा नदी बघून मन प्रसन्न झाला..सकाळी बंधुनी नाश्ता नको सांगितला होता फक्त चहा घेऊन निघालो, निघताना माळशेज मार्गे यायच ठरल आणि वाटेत रंधा फॉल आणि लेण्याद्री गणपती असा प्लान ठरला. वाटेत आम्ही त्या स्पिल गेटवर उतरलो आणि ते दृष्य खूपच आवडला..रात्री ते भयानक का वाटत होत ते तुम्ही फोटो बघूनच ठरावा..

हाच तो स्पिल गेट...

मग रांधा फॉल बघितला, त्या मध्ये तयार झालेली कुंड बघितली, प्रसिद्ध पेढा खाल्ला, तशी भूक नव्हती पण आमची सारखी खादाडी सुरूच होती. सगळ्यांच्या बॅगमधून एक एक गोष्टी बाहेर येत होत्या. लेण्याद्रीला जाताना खूप वेळ लागला आणि गणपतीच्या दर्शनाआधी पोटोबा करायच ठरला, मस्त दाबून जेवलो, मग काय सगळयांनाच सुस्ती चढली. मग पंकज म्हणाला आपण गणपती नको करूया घराकडे निघू कारण अजुन ५ तास लागणार होते पोचायला. हिरमोड झालाच सगळ्यांचा पण मग परत गप्पा सुरू झाल्या, माळशेजकडे जाताना दुरुनच शिवनेरी, हरिश्‍चंद्र, भैरवगड नाणेघाट बघितले. माळशेज मध्ये बेधुन्द तरुणाई बसरत होती एका एका फॉल खाली. गाड्याउभ्या करून, मोठ्याने गाणी लावून, नाच गाणी सुरू होत. आम्हीपण एका वळणावर बस सोडून चालत गेलो पुढे त्या धुक्याच्या वाटेमधून..खूप छान वाटत होत.

वसई अड्वेंचर क्लब (VAC)

मग परत निघालो घराकडे, बस भरधाव जात होती. आमच्या बसमध्ये मला एक गोष्ट सॉलिड आवडली, तो म्हणजे बसचा होर्न..म्हणजे तो वाजला की पुढल्या गाडीच्या ड्राइवरची वाट लागत असेल असा तो त्याचाआवाज, आम्हाला रस्ता मोकळा करून देत होता..शेवटी ७:३० ला वसईला पोचलो. बसमध्ये छोटेखानी ब्रीफिंग झाला आणि सगळ्यांचा निरोप घेतला. स्टेशनला आलो तर दिलप्या आणि परागने गळाभेट घेऊन परत नक्की ये असा सांगितला. सगळे आपापल्या घरी निघाले. मी जाताना एकटाच होतो ट्रेनमध्ये पण माझ्या आयुष्यात खूप नवीन नाती सहभागी झाल्याच समाधान होत, अजिबात थकवा नव्हता आणि मनोमन अनुला दुवा देत होतो.. थॅंक्स अनु…

—- सुझे

तळटिप –

तुम्ही म्हणाल सुझेची पोस्ट आणि खादाडीची नाव नाहीत..हो ना?? काय सांगू आता तुम्हाला..खाली दिलेली यादी वाचा कळेल काय काय होत ते..मग कळेल 🙂

पोळी, भाकरी, बटाट्याची भाजी, मटारची भाजी, थेपले, चिवडा, भेळ, श्रीखंड, आम्लेट, चिकन, वेज ज्वालामुखी, जीरा राइस, दाल तडका, गुड डे, मारी, क्रॅक जॅक, बरबॉर्न, कूकीज, खाकरा, वेफर्स, मूगडाळ + कांदा, पापडी, पोहे, केक, फाइवस्टार, टॅंग…हुश्श्श..असो थांबतो.. बाकी आठवत नाही 🙂

पोस्ट उशिरा टाकल्यामुळे क्षमस्व, पण कं ची लागण झाली आहे, काय करणार 🙂
बाकी फोटो तुम्ही इथे बघू शकता…

25 thoughts on “किल्ले रतनगड वॅक बरोबर…

  1. ये हुइ ना बात…उशिरा का होइना मस्तच लिहलस…सगळ परत तसच अनुभवल एकदा…तो हॉर्न पण…
    रतनगड सर केल्यावर संध्याकाळी गावाजवळच्या त्या धबधब्यासाठी ती पायपीट आणि नंतर प्रवरा नदी काठी केलेली खादाडी विसरलास का…खरच एकदम आठवणीतला ट्रेक होता हा..धन्स रे शब्दात मांडलास त्याबद्दल…

    1. अरे हो काही गोष्टी राहिल्या बघ, पण ते दोन दिवस कधी न विसरता येणारे आहेत..
      तो हॉर्न कुठे रेकॉर्ड केलेला मिळाला तर बघ ना 🙂 तू बोललास म्हणून कंटाळा करत का होईना शब्दात मांडण्याचा प्रयत्‍न केला..धन्स तुला म्हटला पाहिजे मी 🙂

  2. deepak parulekar

    Awesome!!!

    खरचं!! या ट्रेकने बरंच काही शिकवलं!!
    माझ्यासाठी हा ट्रेक खूप अविस्मरणिय राहील… तुझ्या या शब्दांचा आभारी आहे!!!
    असाच लिहित राहा!!!!

    1. येस्स हा ट्रेक ऑस्समच होता आणि माझ्या शब्दांपेक्षा आभारी कसला यार, काही आठवणी लिहून काढल्या बस..बाकी बसमध्ये काढलेली रात्र कधी विसरणार नाही मी…

  3. अरे वा, इकडे पण एक पंकज होता 🙂
    त्या स्पिलवेजवळ ती भिंत आहे तिची उंची आहे साधारण पाच फूट. आणि त्या भिंतींचा काटकोन झालाय त्या कोपर्‍यात आम्ही रात्रीचा मुक्काम केला होता. आज काय स्थिती आहे तिथे, विश्वासच नाही बसत.

    1. हो ट्रेक तिथे पंकज असायलाच हवा ना 🙂
      तिथे तुम्ही मुक्काम केला होता? कसा? तिथे तर सारख पाणी असत ना…?

      1. आम्ही अगदी उन्हाळ्यात गेलो होतो. तेव्हा तिथे पाणी नसते. धरण पण बरेच रिकामे झाले होते. त्या भिंतीवरुन अलंग-कुलंग-मदन असे नयनरम्य दृश्य दिसते.
        हा फोटो भिंतीच्याही आतमध्ये १००मीटर जाऊन काढलेला आहे.

        Sunset @ Bhandardara

  4. सुहासा,
    कैच्याकै मजा झालेली दिसतेय…
    एकदम ऍडव्हेंचरस ट्रेक…मस्तच..
    पण ते टॉर्च कोण मारत होतं फायनली? 😉

    1. अरे मग काय..
      विचार कर जर आपण सगळे असतो एकत्र तर काय धम्माल केली असतो…
      टॉर्च.. कोण नाही रे…थोड्या अंतरावर असलेल्या टपरीत कोणी गावकरी होता असा अंदाज आहे… बाकी माहीत नाही भूत असेल तर आम्हाला बघून पळाला असेल 😉

  5. सही सही सही.. ट्रेक, पाउस, रात्र आणि भूतांच्या गप्पा.. ऑस्सम कॉम्बो !!! धम्माल चालू आहे तुमची 🙂

    रच्याक, वेज ज्वालामुखी ??हा काय प्रकार आहे? तिखटजाळ असतं का? नुसतं नाव वाचूनच तोंडाला पाणी सुटलं 🙂

    1. हा हा…हो रे खरच डेड्ली होत वातावरण…भूत, टॉर्च, हवा, मंदिर, पिंपळ झाड आणि आम्ही वात्रट गडगडाटी हास्य करणारी पोर..ती भुतच म्हणत असतील माणूस कसला भास झाला असेल 😉
      अरे वेज ज्वालामुखी काही नाही मन्चुरियन बॉल्स इन वेज कोल्हापुरी ग्रेवी …

  6. aruna

    there is a mail going on yahoo mailing service with photos of Ratangagh. please check them out.i don’t have your email id or i would have forwarded them to you.

  7. Pingback: किल्ला कोहोजचा… « दवबिंदु

    1. हा हा भारी रे एकदम…

      तोंड काळे करणे: घसरून पडून आडवे होणे अथवा बुड जमिनीला टेकणे. साष्टांग नमस्कार घालणे.
      (पाय घसरणे आणि तोंड काळे करणे यात एक कोटि आहे.) >>> यालाच गोल म्हणतो आम्ही 😉

  8. सही….अरे मी वसईला राहायचे पुर्वी आणि दादरच्या एका ग्रुपबरोबर मध्येमध्ये ट्रेकला जायचे…तेव्हा व्हॅकची माहिती मिळाली असती तर पदरी जरा जास्त ट्रेक पडले असते…
    तुमचा अनुभव एकदम थरारक आहेत आणि फ़ोटु मस्त मस्त….

    1. काय बोलतेयस तू वसई ला राहायचीस..हा ग्रूप तर १९८८ पासून आहे. तू मिस्स केलस बघ ..
      बाकी ट्रेकला धम्माल आली.. 🙂

    1. नितीन, मी वॅकचा मेंबर तरी नाही पण मी तुला त्यांच ह्या वर्षीच ट्रेक कॅलेंडर पाठवीन मला मिळाल की माझ्याकडे तुमचा ईमेल अड्रेस आहे…. धन्यवाद 🙂

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.