“हेरंब दादा, अरे हो…विसरलेच…माझा खो सुहास दादाला…”
हे जेव्हा वाचला म्हटला आता हे काय, हे कसा जमणार, कुठला गाण निवडू, सोप्प हव, अनुवाद जमेल..छ्या काय करणार मी अनुवाद. मी खरोखर इमोसनल अत्याचार करणार हे ठरलाच. मागे त्या टॅगचे खो आरामात सांभाळता आला, पण कविता आणि मी? कसा शक्य आहे? मैथिली मला ह्याचा कॉंपेन्सेशन हवय बरर्रर का? ह्या खो साठी कारणीभूत हेरंब, देवेन आणि मैथीली आता भोगा 😉 गाण मुद्दाम सोप्प निवडल आहे, जास्त मेंदूला ताप न देता 🙂
हे गाण सदमा ह्या चित्रपटातील असून सुरेश वाडकर ह्यांनी स्वरबद्ध केल आहे. मला अतिशय आवडत हे गाण, सौम्य संगीत, टिपिकल सुरेश वाडकारांचा आवाज आणि उत्कृष्ठ अभिनयाने नटलेला हा चित्रपट. त्यातलच हे गाण “ए जिंदगी गले लगा ले”
प्लीज़ हसू नका ह 🙂
हे जीवना जवळ घे ना..
हे जीवना जवळ घे ना..
आम्हीपण तुझ्या प्रत्येक दु:खाला जवळ केल आहे..
हो ना?
हे जीवना जवळ घे ना..
हे जीवना…
आम्ही बहाण्याने लपून जगापासून
पापण्यांच्या पल्याड घर सजवल..
तुझी साथ लाभली जीवना..
ला ला ला ला ला ला ला…
तुझी साथ लाभली जीवना….
हे जीवना जवळ घे ना..
हे जीवना जवळ घे ना..
आम्हीपण तुझ्या प्रत्येक दु:खाला जवळ केल आहे..
हो ना?
हे जीवना जवळ घे ना..
हे जीवना…
छोटस ते प्रतिबिंब, डोळ्यात पडलेल्..
आम्ही तर दोन थेंबांनी मन भरवल
आम्हाला किनारा सापडला जीवना..
ला ला ला ला ला ला ला…
आम्हाला किनारा सापडला जीवना..
हे जीवना जवळ घे ना..
हे जीवना जवळ घे ना..
आम्हीपण तुझ्या प्रत्येक दु:खाला जवळ केल आहे..
हो ना?
हे जीवना जवळ घे ना..
हे जीवना…
मैथिली मला अर्ध चॉकलेट मिळायला हव..बस 🙂
आता मी खो देणार ना?…सागर, सागर, तृप्ती वाट बघतोय व्हा तय्यार … 🙂
>>आम्ही बहाण्याने लपून जगापासून
पापण्यांच्या पल्याड घर सजवल
हे आवडलं…
माझंही हे आवडतं गाणं सुहासा… मस्त जमलंय! 🙂
थॅंक्स विभि, असच आपला एक अत्याचार तुम्हा सर्वांनवर 😉
>>>>आम्ही बहाण्याने लपून जगापासून
पापण्यांच्या पल्याड घर सजवल..
हे मस्तच….
एक अतिशय भावनाप्रधान गाण्ं निवडलं आहेस…. जम्या जम्या मस्त जम्या 🙂
धन्यु ताई..माझ आवडत गाण आहे हे 🙂
सागर ला सुद्धा खोकला?
आई ग !!!!
व्हय जी..तुमची सुटका नाही यातून 😉
सही..
छोटस ते प्रतिबिंब, डोळ्यात पडलेल्..
आम्ही तर दोन थेंबांनी मन भरवल
धन्यवाद काका, 🙂
सुहास, खूप छान झालाय अनुवाद.. आवडेश !
थॅंक्स हेरंबा, तुझ्या खो खो मुळेच हा एक प्रयन्त माझा 🙂
ह्म्म्म…मला वाटलेच होते
तू माझ्या मागे लागल्याचे(फॉलो केल्याचे) पाहिले तेव्हाच शंका आली होती…
पण मला जास्त वेळ हवाय कारण रविवार शिवाय बिलकुल वेळ नाहीये.
हे हे आरामात कर, तुला कुठे डेडलाइन दिलीय..
टेक युवर ऑन स्वीट टाइम 😉
छान जम्लेय तुम्चे भाषान्तर. भावना पण सुन्दर express झाल्यात.
धन्यवाद अरुणाजी.. 🙂
सही..
Nagesh
http://blogmajha.blogspot.com
धन्यवाद नागेशजी 🙂
मस्त जमवलस सुहास…. 🙂
धन्स रे देवा 🙂
अरे वाह….मस्तच झालाय की अनुवाद…!!! 🙂
आवडला…!!! आणि हो, chocolate नक्की…!!! 🙂 पण त्या साठी भेटावे लागेल आपल्याला एकदा…
हे हे नक्की…तुझी परीक्षा संपू देत भेटूच 🙂
जीवन इतके हळुवार पणे लिहिले म्हणजे अनुवादले आहे कि खूपच आवडले……झक्कास!!!!सुहास
धन्यवाद तायडे..असाच एक प्रयत्न 🙂