ह्या विषयावर लेखन करणारे मात्तब्बर आणि अनुभवी असे अष्टप्रधान मंडळ आहेच आपल्याकडे. त्यानी केलेल्या खादाडी वाचून निषेधाची अशी लाट सुरू झाली ह्या ब्लॉगविश्वात की विचारू नका. (त्यानी टाकलेल्या पोस्ट आठवल्या बघा परत निssssषेssssध सगळ्यांचा …हे हे हे) तस किचन हा माझा आवडता विषय, घरात असलो की इथे जास्त रमतो मी. सगळा जेवण करू शकतो, नॉनवेज-वेज (कृपया वधुपक्ष वाचत असेल तर हा एक प्लस पॉइण्ट आहे बर माझ्यात : )
असो, आईच्या आजारपणात जेवण करण शिकलो मी, कारण बाबांच ऑफीस, भावाची शाळा ह्या मुळे मलाच ते करणा भाग होता. साठेला असताना अटेंडेन्सची काळजी अजिबात नव्हती, मग मी फक्त प्रॅक्टिकल्स करून घरी धुम. आजही तिथल्या प्रोफेसर मंडळींना मी तिथे होतो या बद्दल शंका वाटते. घरी आल्यावर कूकरमध्ये भात, डाळ लावून मग त्याला फोडणी देण एवढ भारी जमायाच मला. मग भाताची खिचडी, पुलाव आणि मसालेभात आणि वरणाची आमटी, सांबार, तडका डाल असा अपग्रेड होत गेला. जेवढा करायची आवड आहे तेवढीच खायची पण. मग कधी काही चुकल, बिघडला करताना की ते खाण क्रमपात्रच होतच. घरात मॅगी नूडल्स हा प्रकार फक्त मला आणि भावालाच आवडतो, त्यामुळे मला तिथे प्रयोग करायला भरपूर वाव मिळाला 🙂 मग त्या टू मिनिट मॅगीला तयार करायला १५-२० मिनिटे लावायचो. प्रकार पण भारी त्यात हेरंबने केलेले प्रकार आहेतच, पण वर माझे..सेजवान मॅगी, एग मॅगी, सांबार मॅगी (हा ऑफीसमध्ये केलेला प्रकार) 🙂
आता ऑफीसच नाव आला म्हणजे धम्माल, आम्ही मध्यरात्री-पहाटे खाणारे लोक, म्हणजे उसाच्या टाइमनुसार म्हणाना..लोवर परेलला जेव्हा कमला मिल्समध्ये तीन मजली ऑफीस होत आणि तिथला कॅंटीन लाजवाब. तेव्हा नवीन नवीन ह्या क्षेत्रात आल्यामुळे जरा दबकूनच असायचो. जेवण टाळायचो, घरूनच काय ते खाउन मग तिथे ज्युस किवा ब्रेड बटर खायचो. मग जसे दिवस पुढे गेले तसा आपला रुबाबपण हा हा …जेवण नाही खायचो पण जेवणासोबत दिली जाणारी स्वीट डिश ४-४ खायचो. मॅनेजर लोकाना एकदाच स्वीट डिश मिळणार असा सांगून त्यांना भीक न घालणारा आमचा कॅंटीनवाला रघु आमच्या पुढयात नुसती आरास लावायचा, शिरा, जिलेबी, बासुंदी, बर्फी, गुलाब जामून…बस अजुन नाही सांगू शकत भूक लागली 🙂 त्या रघुला किती दुवा देतो मी अजुनपण.
मग ऑफीस बदलला, अंधेरीला आलो. अंधेरीला ऑफीस छोटाच असल्याने तिथे कॅंटीनमध्ये उभा राहून स्वत:ला जे वाटेल ते बनवून घ्यायचो किवा बनवायचो, लोक बघत राहायचे हा काय करतोय पण मी आपला खुशाल चालू. त्याच दरम्यान शाळेच्या आणि कॉलेजच्य ग्रूपच रियूनियन झाला, मग भेटायला निरनिराळी हॉटेल्स आमचे अड्डे बनत गेले. ५डी काय, बीबीसी काय, बंजरा काय, बॉम्बे ब्लूज काय, कोबे काय…आठवला की कसा भरून येत सांगू (भरून पोट येतय याची नोंद घ्यावी… ;)) प्रत्येकवेळी नवीन नवीन हॉटेलमध्ये जेवायला जायचा यावर आमचा भर. कुठल्या हॉटेलमधली डिश आवडली की त्यातील सगळे जिन्नस खाताना लक्षांत ठेवायचे आणि घरी गिनीपिग सारखा प्रयोगुन पहायचो, याची मला नितांत आवड 😉
आमच्या खाण्याच्या जागा पण अश्या की गूगल मॅप्स मध्ये शोधून पण न सापडणार्या, मागे यावर लिहल होत. अजुन म्हणजे ट्रेकला केलेली खादाडी विशेष करून जास्त लक्षात राहिली मग ती रोहणा ने विसापूरला आणलेली पुरणपोळी, नारळाच्या वड्या, कचोरी, की राजमाचीला रात्री १ ला खाल्लेली पीठल भाकरी, पेठ ला खाल्लेला नुसता वरण भात आणि कच्च तेल, मीठ..स्वर्ग सुख म्हणतात ते हेच…अहाहहा बस थांबतो इथेच, जरा जेवून येतो. आज जरा लवकरच भूक लागलीय.. :)))))
पॉइण्ट टू बी नोटेड – मी जिथे जिथे खाल्लय ते सगळा व्यवस्थित पचवलय आणि तृप्तिचा ढेकरही दिलाय, त्यामुळे त्याची काळजी करू नका, माझ्या पोटात दुखणार नाही एकट्याने खादाडी केली म्हणून आणि अजुन तरी कोणाच्या पोटाबद्दल तक्रार नाही माझ्या हातच खाउन …हे हे हे.
आपलाच खादाड सुझे
🙂
हा हा हा सुझे… लय भारी.. खादाडीची पोस्ट म्हंटल्यावर पहाटे पावणे तीनला ही भूक लागली रे मला !!! त्यामुळे णी शे ढ !!!
न्यायाधीशमूर्ती आपल्या अमूल्य अभिप्रायाबद्दल धन्यवाद..
माझ्या ब्लॉगवर पहिल्यांदा आलेला णी शे ढ हसून हसून स्वीकारतोय 🙂
सुझे, खादाडी मस्त झालीये रे.
थॅंक्स सपा, तरी आपली खादाडी राहिली हाय अजुन लक्षात हाय ना..???
वा.. भावी सेनापती… आम्ही वाचूनच तृप्त झालो… पुढच्या वेळी अजून जास्त पुरणपोळ्या आणणार बघ… !!! आणि तुझ्या बरोबर बोरिवलीचे अड्डे फिरायचे आहेत अजून… 🙂
भावी सेनापती कोणीच नाही इथे, एकच हाय त्यो आणि सगळ्याना माहीत आहे कोण ते?
अड्डे फिरूया की आपण सगळेच, ये तू मज्जा करू 🙂
सुझे…मस्त रे…..
सेनापती (रोहना) ….
>>भावी सेनापती…
अमान्य….सेनापती फ़क्त तुम्हीच आहात…
सुहास बरोबर आहे ना????
बरोबर यवगेश, भावी कोणीच नाही..सेनापती एकाच राहतील, त्यांच्यासारखी कारकीर्द कोणाची असेल?
प्रतिक्रियेबद्दल आभार मित्रा
“साठेला असताना अटेंडेन्सची काळजी अजिबात नव्हती, मग मी फक्त प्रॅक्टिकल्स करून घरी धुम.” हा हा
सगळी खादाडी एकत्र करून भारी भेळ बनवलीस.मजा आली खाताना
तुझ्यामुळेच बनवली, आवडली ना तुला बस 🙂
मी पोस्ट पाहिली नाही..
मी कमेंट देणार नाही!!!
काय ग तन्वी ताई 😦
:-)))
सुझे…भलताच पेटलायस..खादाडीच्या नुसत्या नावानं…:D
चालू दे…अजून येऊदेत पोस्टा…म्हणजे आम्ही निषेध करत राहू!
धन्यवाद विभि, अरे एक महिना आधी लिहून ठेवली होती ही पोस्ट..कंटाळा करत होतो.
असाच पोस्टायचा प्रयत्न करेन मित्रा 🙂
wow…realisticially kuthalyahi khadadi jageche kautuk na karta barach kahi sangun gelas ki re baba….:)
Dakshin rahila majha Borivlalila khara tar aaichya gharun faar jawal hota pan tari….amhi Pangat war jaast joar marala itkyat lihilay wachalhi ashil…:)
One thing I really liked it not only did you try cooking, you are also accepting it unlike most of guys I know…Keep it up..and yes that point is to be noted for any prospective client…(jaude jaast kaam kartey ka mi aajkal?? ektar hya pc war marathi pan nahiye….asso…) Keep writing….
हो पंगत माहीत आहे गोराईच..
आणि खर सांगायला कसली आलीय लाज? जेवण बनवायला यायलाच हव 🙂
>> yes that point is to be noted for any prospective client
😀
तन्वी ताईसारखच मी पण काही पाहिलच नाही इथे… 🙂
हो काय, राहिला बाबा मग 😉
तुझा लेख पूर्ण वाचू शकलो नाही,………. सगळा लक्ष त्या slideshow वर होतं ………
हा हा माझेपण 🙂