शुक्रवार २० ऑगस्ट, आमच्या प्रोसेसला भारतात तीन वर्ष पूर्ण झाली. संपूर्ण फ्लोरवर फुगे, लाइट्स लावले होते. मोठा केक आणला होता, फोटो काढत होते. कोणीच कामात लक्ष देत नव्हते. काम खूप वाढल होत हल्ली, पण त्यादिवशी कोणाला कशाचीच फिकर नव्हती. मी आपला माझ्या पॉडवर बसून काही एस्कलेशन्स बघत होतो. राहून राहून एक ईमेल मी सारखा बघत होतो. थोडे बदल करून परत ड्राफ्टमध्ये टाकून द्यायचो. हा ईमेल मी तयार केला होता तब्बल ३ वर्षापूर्वी, जेव्हा मी अडोबीला नवीन नवीन जॉइन झालो होतो. हा ईमेल होता राजीनाम्याचा.
अडोबी जेव्हा आधी जॉइन केल, तेव्हा ट्रेनिंग पार्ट सोडला की मग लगेच नाइट शिफ्ट सुरू होणार होती. खूप उत्सुक होतो एक वेगळ विश्व अनुभवायला मिळणार म्हणून. पहिले एक-दोन आठवडे जांभया देत, चहा पीत रात्र जागवल्या. त्याचे परिणाम दिसून आलेच अचानक तब्येत खराब झाली, ऑफीसला दांडी मारू शकत नव्हतो किंबहुना पहिलीच नोकरी असल्याने तस करायची भीती वाटायची. काही दिवस खुपच त्रास झाला, पण मग सावरलो आणि तेव्हा पासून जो आलो तो गेल्या महिन्यापर्यंत अविरत रात्रपाळी करणारा मी. त्यावेळी टायर केलेला तो ईमेल ड्राफ्ट मध्ये तसाच पडून होता. शॉन सकाळची शिफ्ट दिली गेल्यावर थोडा भांभावला, थोडा सांभाळून घेताना त्रास झाला, स्कोर्स पडले. मग कधीही मला माझ्या स्कोर, कामाबद्दल बदद्ल न विचारणारे माझ्यावर सरेखे नजर ठेवून असायचे. मान्य होत माझा स्कोर पडला होता, पण मी तो मॅनेज पण केला होता पुढल्या आठवड्यात.
तीन आठवडे झाले नसतील, तर मला परत नाइट शिफ्ट दिली गेली एका आठवड्यासाठी, मग परत सकाळची शिफ्ट दोन आठवडे, मग परत नाइटशिफ्ट रमजानमुळे शादाबसाठी. स्कोर्सचे असे लागले की काय सांगू, आणि लॉगिन्सपण कमी असल्याने तुफान काम वाढलय. खूप खूप त्रास होत होता, वाटलं आधी पण अस झाल होत, तेंव्हा निभावून नेल आता पण जाईल, पण नाही कामाचा ताण एवढा वाढला की काय सांगू. स्व:ताची समजूत काढत होतो, सगळ ठीक होईल. मग स्कोर नाही आला की थांबायचो ऑफीसमध्ये, ब्रेक न घेता काम करायला लागलो, सगळे वेड्यात काढायला लागले. ह्याला काय झालं म्हणून, माझ्या मित्रांच्या ग्रूपमध्ये मी संशोधनाचा विषय होऊन बसलो होतो का हा वागतो असा, काय कारण असाव. काय उत्तर देणार कोणाला. 😦
परवा, तो ईमेल बघितला, माझ्या नवीन मॅनेजरच नाव टाकलं, तारीख टाकली आणि शेवटची नजर फिरवून वेळ ठरवून बंद केला. ऑफीसमध्ये सेलेब्रेशन चालूच होत, पीझ्झा, सब-वे सॅन्डविचेस, कोल्ड ड्रिंक्स. मी आपली शिफ्ट संपवली आणि निघलो खाली जायला. ऑफीसच्या मागच्या लिफ्टने. ट्रान्सपोर्टमध्ये बसलो, गाडी सुरू झाली बोरीवलीला पोचल्यावर, मी नकळतपणे त्याला गाडी बाजूला सिग्नलला लाव अस सांगितल, तिथून माझ घर ३-३.५ किलोमीटर होत, पण मी तिथेच उतरलो.
घरच्या दिशेने चालू लागलो, रस्ता निर्जन होता. माझ्या बुटांचाच आवाज मला ऐकू येत होता. काय माहीत मी काय करत होतो, तब्येत ठीक नसताना पावसात का चालत जात होतो, माझ्या शरीराला का त्रास देत होतो, मला काय तपासून पाहायचे होते, ते मला पण कळत नव्हते. पण अर्धवट भिजत चारकोपच्या सिग्नलला पोचलो. नाक्यावर पोलीस होते, त्यांनी विचारले काय रे कुठून आलास एवढ्या रात्रीचा? मग मी माझ आय कार्ड दाखवलं. मग तसाच पुढे निघालो. वातावरण खूप शांत होत, पण माझ्या मनातील आणि डोक्यातील विचारांचा गोंधळ एवढा वाढला होता की काय सांगू..
पाउस थोडा वाढला, मी ओवरकोट घातला आणि जरा लगबग करून चालू लागलो, पण विचारसत्र काही थांबत नव्हत्. तेवढ्यात झाडाखाली उभ्या असलेल्या साइकलवर कॉफी विकणार्या अण्णाने आवाज दिला, साहब टाइम क्या हुआ? माझ्याकडे ना घड्याळ होत, ना मोबाइल मी अंदाजे सांगितला ४ बज गये, त्यावर तो लगेच आवरायला लागला म्हणाला अपना टाइम तो खतम यहा से, अब दुसरी जगह जाना पडेगा, यहां और धंदा नही मिलेगा. आपको कुछ दु सिगरेट, कॉफी, बूस्ट? गुपचुप एक दहाची नॉट काढून त्याच्याकडून बूस्ट घेतलं आणि घराकडे निघालो.
मनात म्हटलं काही निर्णय घेण एवढचं सोप्प असत तर? 😦 😦
– सुझे
19.212309
72.828347
Like this:
Like Loading...