किल्ले विसापूर..


किल्ले विसापूर..

रोहनच्या आणि आम्हा काही ट्रेक्कर बलॉगरच्या मनात आलेला विचार उचलून धरून रोहणा ने हा ट्रेक प्लान केला होता. हा किल्ला मी दोन वर्षापुर्वी भर उन्हाळ्यात चढलो होतो. किल्ला चढायचा मार्ग हा मागच्या बाजूनेच कारण जो रस्ता समोरून जायला आहे तो पूर्ण खराब झालाय, एका ओढ्याचा किल्ल्यावरून खाली येणार्‍या प्रवाहाला धरून वर चढाव लागत. उन्हाळ्यात गेल्यामुळे तो चढ खूपच घाम काढणारा होता.

रोहन ने गाडीच केल्यामुळे आम्हाला प्रवासच टेन्शन नव्हता. सगळ्याना घेत घेत आम्ही पुढे निघालो. सकाळी सकाळी दत्ता कडे गरम पोहे आणि वडे खाल्ले {जरा निषेध चालेल इथे ;)}. मग पुढचा प्रवास सुरू झाला. प्रसिद्ध पुणे वॉटरफॉल बघत लोणावळ्यात शिरलो, भारत एकटाच पुण्यवरून आला होता तेव्हा त्याला तिथून घेऊन किल्ल्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली. आम्ही जेव्हा किल्ल्याच्या पायथ्याशी आलो आणि हा किल्ला बघितला तेव्हा त्या काळ्या काताळाने हिरवा शालू नेसला होता. तो शालू उन-पावसाच्या खेळात चमकून दिसत होता. आम्ही सगळे गाडीनेच आलो असल्याने थकवा असा नव्हताच. सगळे पटापटा किल्याच्या दिशेने सरकू लागलो. ओढ्याच्या दगडावरून घसरत, धडपडत, गप्पा मारत, एकमेकांना आधार देत. सगळे स्वत:चा गोल होऊ न देता द्या निसरड्या दगडांवरून, पाण्यातून वर पोहोचलो.

This slideshow requires JavaScript.

विसापूरचा तो हिरवा प्लाटू बघून मन एकदम प्रसन्न झाला होता. रोहनने थोडी ऐतिहासिक माहिती सांगितली किल्ल्याबद्दल.  मग आम्ही पूर्ण किल्ल्याला प्रदक्षिणा मारली. आमच्या सोबत शेरू आणि त्याची बायको होतीच 😉 दोघेही मस्त पाणी मिळाले की डुबकी मारुन यायचे आणि गवताच्या टॉवेलला लोळून अंग पुसायचे. त्यानीच आम्हाला गडावरच्या माकड टोळी पासून वाचवला. मग फिरता फिरता किल्ल्याच्या कड्यावर बसून नारळवडी, गुड डे आणि स्निकर्स खाल्ले. एवढी मस्त हवा सुटली होती की तिथे त्या गवतावर डोळे मिटून शांत झोपवसा वाटत होत. समोर गर्द धूक्यात हरवलेला लोहगड आणि प्रचंड असा विंचूकट्टा दिसत होता. एका बाजूला राजमाचीचे डोंगर आम्हाला खुणावत होते. आवाज होता फक्त सो-सो करत वाहणार्‍या वार्‍याचा. मग शेवटी निघाव तर लागणार होतच. तिथल्या मिशीवाल्या मारूतीरायाचा दर्शन घेऊन (नेमका शनिवारच होता ना) आम्ही परत त्या ओढ्याच्या दिशेने फिरलो. परत ते दगड पायाखाली तुडवत त्या विसापूरच्या आठवणी घेऊन उतरत होतो. आमचा विचार होता लोहगडपण करावा पण मला आणि रोहनला आधीच तंबी दिली गेली होतो ज आणि च म्हणजे अजुन एक किल्ला चढणे आणि दुसर्‍या गडावर जाणे उच्चारयचे नाहीत 🙂 मग आम्ही जेवायला थांबलो तेव्हा जरा जोरात पाउस आला, एकदम अंधारून आल. विसापूरला उन-पावसाचा खेळ सुरू होता आणि लोहगडावर पाउस कोसळत होता जेव्हा आम्ही पायथ्याशी आलो. मग आम्ही पण लोहगडाच नाव काढला नाही कारण, जेवून टॅंक फुल्ल झाली होती आणि प्रचंड आळस आला होता सगळ्यांना…   🙂

जेवणात मस्त भाकरी आणि झुणका सोबत मिरचीचा ठेचा आणि कांदा. वर थंडगार लिंबू सरबत…अहाहा काय मस्त वाटला सांगू 🙂 मग परतीच्या वाटेवर लोणावळा इथे थांबून प्रसिद्ध पुरोहित चिक्की उचलली 🙂 ठाण्याला मी पोचलो ५:४५ ला मी तिथून बस ने बोरीवलीला जाणार होतो. सगळ्याना निरोप दिला, आणि रोहणाला परत ट्रेक काढू असा सांगूनच निघालो.

रोहन, सागर, दिपक , अनुजा आणि भारत खूप धम्माल केली मित्रहो…खूप खूप मज्जा आली

परत भेटूच एखाद्या सह्याद्रीच्या डोंगररांगेत…

— सुझे

24 thoughts on “किल्ले विसापूर..

  1. रोहन ने गाडीच केल्यामुळे आम्हाला प्रवास छान झाला. सगळयांना घेत घेत तुम्ही पुढे गेलात.खरं म्हणजे ही तुमची नेहमीचीच पद्धत दिसतेय. तुम्ही पुण्याहून जात असता तर मग अजून माझ्या सारखे कुणी इच्छुक असतील तर त्याना संधी मिळू शकेल काय? अर्थात माझ्यासारख्या वयस्करांचा तुम्हाला कदाचित त्रास व्हायचीच जास्त शक्यता असेल.पण तुम्ही संधी दिलीत तर विचार मात्र अवश्य करूं ! एकूण माहिती दिलखेचक अशीच आहे.
    न्युयॉर्क,दि.१८-७-१०18-7-10

    1. पुरुषोत्तमकाका, सगळ्यांना सांगितला होत की रोहनने. मुंबई आणि पुणे येथील सर्व बलॉगर आपला नाव नोंदवू शकत होते ज्यांना ट्रेकला यायच होत. असो पुढच्यावेळी नक्की.
      अभिप्रायाबद्दल धन्यवाद, असेच भेट देत रहा

  2. सुरेश पेठे

    वर्णन तोंडाला पाणी आणणारे … पण सिंहगडावरच्या फालतू ट्रेकच्य़ा वेळची दमछाट विसरता कशी येणार ? आता फोटॊ पाहूनच आनंद लुटायचा ! कुत्रे पाणी पितंय आ हा हा फोटो सुंदर.. मला मेल कर ना , बाकि फोटोंनी जुन्या आठवणी ताज्या झाल्यात … आम्ही तेव्हा मात्र दोन्ही किल्ले एका दमातच करायचो !

    1. काका, सिंहगडहा ट्रेकसाठी नाहीच. ट्रेकला जाव तर अशी दगड, पायवाटा तुडवतच जाव.
      आम्हीपण मागच्यावेळी हा किल्ला आणि लोहगड एकत्र केले होते.
      पोस्ट आवडली हे आवर्जून सांगितल्याबद्दल धन्यवाद. मी तुम्हाला फोटो पाठवले आहेत.

  3. सुहास, मस्त मजा केलीय….अजुन एक मावळा किंवा मावळण असती तर म्हणता आलं असतं वेडात मराठी ब्लॉगर दौडले सात…

  4. ्मला धाकट्या मुलीच्या शाळेत जावे लागले म्हणून… अगदी शेवटल्य क्षणी रद्द केले येणे. असो.. नेक्स्ट टाइम.. अरे सगळ्यांचे फोन नंबर्स गेलेत माझ्या कडले. जरा एसएमएस करा नां..

  5. जबर्‍या रे सुहास…लय मजा केलेली दिसतेय…
    आम्ही नाही तिथे..मिस करतोय! 😦

    1. अरे धम्माल, मज्जा काय बोलू नकोस. खूप मस्त वाटत होत.
      तुम्हा सगळ्यांना सॉलिड मिस केल रे मी पण 😦 😦

    1. हो ना, पावसात सगळी सह्याद्री हिरवाईने नटलेली मग तिथे जाण्याचा लोभ कसा सोडणार?
      प्रतिक्रियेबद्दल आभार

    1. थॅंक्स रे देवेन..
      खूप मिस केला तुम्हा सगळ्यांना. पुढल्यावेळी नक्की ये…

Leave a Reply to सुहास Cancel reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.