बदल


गेले तीन-चार आठवडे ब्लॉगवर काहीच पोस्ट नाही करता आला, ऑफीसच्या अंतर्गत राजकारणामुळे मला माझ्या आयुष्यच्या पहिल्या वाहिल्या दिवस पाळीला सामोरे जाव लागला. गेली ३ वर्ष आणि ४ महिने अविरत नाइट शिफ्ट करणारा मी आता ज्या वेळेला घरी यायचो त्या वेळेला ऑफीसला जायला लागलो ह्या सोमवार पासून. आता हा चेंज शरीराला लगेच मानवणारा नाही हे माहीत आहे, पण काय करणार करना पडता है. जिथे मला विचारल्या शिवाय माझे On शिफ्ट ब्रेकपण चेंज नाही व्हायचे तिथे माझी पूर्ण शिफ्टच बदलली गेली, कारण दिला गेला की मी नाइट शिफ्ट करतो म्हणून माझा पर्फॉर्मेन्स छान आहे.

सकाळच्या शिफ्टला उसात रात्र असते, त्यामुळे कस्टमर्स उगाचच काहीच  प्रॉब्लेम नसताना मुद्दामुन आम्हाला कॉंटॅक्ट करतात म्हणजे टाइमपास इश्यूस म्हणा हवा तर..ज्या मुळे सकाळच्या शिफ्ट करणार्‍या एजेंट्सचे स्कोर त्यामानाने थोडे कमीच असतात….हीच बाब लक्षात घेऊन आमच्या प्रतिस्पर्धी टीमच्या मॅनेजरने (हे माझ्या टीम मॅनेजरच्या भाषेत, पण ते सगळे माझे मित्रच) माझी शिफ्ट बदलायला लावली..म्हटला ठीक आहे. मला कामच तर करायाच आहे, म्हटला करू. माझ्या टीम मॅनेजरला हा माझा आटिट्यूड आवडाला नाही, त्याला वाटला मी खूप वाईट केला ती शिफ्ट करायाच मान्य करून. माझ्या स्कोर्सची चिंता सगळ्याना. (आयला एवढी काळजी दाखवतात सांगू :)) म्हटला जाउ दे जे होईल ते बघून घेईन मी, आपल्या टीम स्कोरपेक्षा मला क्लाइंट टार्गेट्स आणि पूर्ण फ्लोरचे स्टॅट्स महत्त्वाचे आहेत..

सकाळी सकाळी माफ करा, पहाटे ३ वाजता ट्रान्सपोर्टवाल्याचा फोन, “सर, पिक अप घेताय ना?” {साल्या एकतर आधीच झोपमोड करायची आणि वर विचारणार येणार की नाही} (त्याच पण बरोबरच हो, पण काय करू सुखाची झोप कोणी मोडली की राग येतो) गाडी येणार असते ४-४:१५ ला मी हो म्हटल्याशिवाय ते लोक गाडी पाठवत नाही. मग कंटाळा करत उठून आंघोळ आवरून गाडीच्या होर्नची किवा फोनची वाट बघायची हा दिनक्रम झाला. मग कधी मी उशिरा तयारी करायचो किवा गाडी उशिरा यायची. रोज-रोज वेगवेगळे ड्राइवर येत असल्याने दिशादर्शकाच काम कराव लागतच फ्रंट सीटवर बसून. ड्राइवरला झोप येऊ नये म्हणून गप्पा मारणे, साइकलवरचा चहा-कॉफी पिणे हा नित्यक्रमच झालाय.  सगळा कस वेगळा वेगळा वाटतय. 😦

बदल घडत जातायत..लोक बदलायत, मी बदलतोय. काही जण नव्याने ह्या बदलात सामील होतायत तर काही नव्याने हरवतायत. काही जण वेड्यात काढत असतील मला माझ्या वागण्याबद्दल तर काहींना दीडशहाणा वाटत असेन. कधी कधी वाटत नको काही बदल आयुष्यात सगळा आहे तस राहू देत पण कधी वाटत होऊ देत, बदलला नाही तर ते आयुष्य कसला?. निदान काही गोष्टी बदलेल्या चांगल्या असतात.

चला भेटू परत…बदललेल्या स्वरुपात 🙂

— सुझे

22 thoughts on “बदल

  1. Change is the only constant thing in life !!! तू ते पॉझिटीव्हली घेतो आहेस हे उत्तम !! ‘दिपा’साठी शुभेच्छा !!

  2. कदाचित या बदलात चांगले काही दडलेले असेल. आणि आयुष्यात बदल हवाच नाहीतर फार फार एकसुरी होऊन जाते. शुभेच्छा!

    1. हो ग ताई…काही तश्याच अपेक्षा आहेत..
      कदाचित मी सगळा संपवून दुसरीकडे जाण्याच्या प्रयत्नात आहे

    1. धन्यवाद नागेश..आपल्या लोकांचा पाठिंबा असेल तर बळ मिळत असा
      असेच भेट देत रहा

  3. बदल चांगला असतो!
    मी सुद्धा जवळ – जवळ ३ वर्षे नाईट शिफ्ट मध्ये काम केलंय… ते गणितच वेगळं असायचं! म्हणजे जस जसा सुर्य मावळतीला जायचा तस तसं “उजाडल्याचं” फिलींग यायचं! सायंकाळी ६ – ७ ला अगदी आजच्या सकाळसारखं फ्रेश वाटायचं! यावर जरा सविस्तर म्हणजे एक पोस्टच लिहितो.. कसं?

    1. अरे, नक्की लिह वाचायला आवडेल.
      माझ्यासारखपण कोणी तरी हाय म्हणजे हे हे हे 🙂

        1. झक्कास लिहलय दादा..एकदम माझे सगळे अनुभव परत वाचल्याचा भास झाला….हॅट्स ऑफ

  4. अरे सुहासा,
    चालायचंच…द ओन्ली थिंग परमनंट इस चेंज!;)
    पण तुझी धडाडी आवडली आपल्याला!

  5. Change is the only constant thing in life !!! तू ते पॉझिटीव्हली घेतो आहेस हे उत्तम !! ‘दिपा’साठी शुभेच्छा !!
    +1

  6. Monika

    हे खुपच छान पोस्ट आहेत सगळेच….मी सगळे नाही पण बरेच वाचले….एकदम छान वाटल…आपल्यातल मराठीपण अजूनही अगदी मस्त जपुन ठेवलय कुणितरी…हे बघून छान वाटल …शुभेछासाठी धन्यवाद. तुम्हालाही तुमच्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेछा.

    1. धन्यू, मोनिका. ब्लॉगवर स्वागत.
      मी ठरवल होत ब्लॉग असावा तर मराठीतच आणि इथे एकटा मीच नाही तर अनेक माझे ब्लॉगमित्र मराठीतूनच ब्लॉग लिहतात. अशीच भेट देत रहा. लग्नासाठी शुभेछा..

  7. मला खूप आवडते पाहते उठायला.. पण कामाला जाण्यासाठी नाही…. हीही… ट्रेक लाजायचे असेल तर… 🙂

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.